Mumbai City Information In Marathi नमस्कार मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराला ओळखले जाते. तसेच महाराष्ट्राची देखील राजधानी असणारे हे मुंबई शहर समुद्रकिनारी वसलेले असून, दिल्लीनंतर सर्वात मोठे महानगर म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे जगामध्ये देखील सर्वात मोठ्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक सातवा लागतो. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे १.२५ दशलक्ष लोक वास्तव्य करत होते.
मुंबई शहराची संपूर्ण माहिती Mumbai City Information In Marathi
भारतातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र किंवा आर्थिक केंद्र म्हणून मुंबई ओळखली जाते. या शहराचा भारताच्या जीडीपी मध्ये सुमारे पाच टक्के वाटा असून, सुमारे २५% औद्योगिक उत्पादन मुंबई या ठिकाणी होत असते.
त्याचबरोबर सागरी मार्गे होणाऱ्या व्यापारामध्ये ४०% वाटा हा मुंबई बंदराचा आहे. देशामध्ये जेवढे भांडवली व्यवहार होतात, त्याच्या सुमारे ७० टक्के व्यवहार एकट्या मुंबईमध्ये होत असतात.
अशा या सर्वांच्या प्रिय मुंबई शहराबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत…
नाव | मुंबई |
प्रकार | शहर |
उपप्रकार | जिल्ह्याचे ठिकाण |
राजधानी | महाराष्ट्राची राजधानी व भारताचे आर्थिक राजधानी |
क्षेत्रफळ | सुमारे ६०३.४ चौरस किलोमीटर |
समुद्रसपाटीपासून उंची | १४ मीटर |
हवामान | उष्ण व दमट |
आसपासची शहरे | मालाड, सांताक्रुज, कांदिवली, घाटकोपर, आणि मुंबई उपनगर |
मुंबई शहराचे नाव पडण्याचा इतिहास:
मित्रांनो, मुंबई हे शहर सर्वत्र प्रसिद्ध असले, तरी देखील या शहराला नाव मिळण्याची कथा अतिशय रंजक अशी आहे. मुंबई शहरामध्ये मुंबादेवी चे मंदिर आहे, जी येथील मुख्य देवता म्हणून ओळखली जाते. या मुंबादेवीला कोळी समाजाने त्यांची कुलदेवता म्हणून ओळखले असून, या देवतेच्या नावावरूनच मुंबा पासून मुंबई हा शब्द आलेला आहे.
पूर्वी काही काळापूर्वी मुंबईला बॉम्बे म्हणून देखील ओळखले जात असे, मुंबई या नावाची फोड महाआंबा म्हणून देखील केली जाते. देवीला मराठी मध्ये आई म्हणून देखील ओळखले जाते, त्यामुळे मुंबा देवी किंवा आई म्हणून मुंबई असे नाव तयार झालेले आहे.
परदेशी प्रवाशांपैकी सर्वात प्रथम पोर्तुगीज यांनी या शहराला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी मुंबई शहराला विविध नाव दिले होते. त्यानंतर पोर्तुगीजाद्वारे मुंबईला बॉम्बे म्हणून ओळखले जात असे. अजून देखील पोर्तुगालमध्ये मुंबईला बॉम्बे म्हणूनच ओळखले जाते. मात्र इंग्रजांनी या शहरावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांनी या शहराला इंग्रजी नाव दिले होते. मात्र पुढे पुन्हा त्याचे मुंबई असे करण्यात आले.
आज अनेक हिंदी भाषिक लोक मुंबईला बॉम्बे म्हणतात, तर मराठी भाषिक लोक मुंबई असा उल्लेख करत असतात. १९९५ यावर्षी मुंबईला मुंबई असे नाव कायम करण्यात आले. पोर्तुगीजांनी मुंबईला बॉम्बे हे नाव देण्यामागे देखील एक कारण होते, कारण बॉम्बे या शब्दाचा पोर्तुगीज मध्ये अर्थ उत्कृष्ट खाडी असा होतो. आणि मुंबई हे एक नैसर्गिक बंदर असल्यामुळे, त्यानुसार हे नाव पडले होते.
मात्र काही संदर्भानुसार बघितले, तर पोर्तुगीज शब्दांमध्ये याचा अर्थ वेगळा होतो. पोर्तुगीज मधील एका डिक्शनरी नुसार पोर्तुगाल मध्ये असलेल्या एका शहराचे नाव या मुंबई शहराला दिले होते, असे देखील सांगितले जाते. मात्र आज देखील मराठी लोक आपल्या अस्मितेकरीता मुंबईला मुंबादेवीवरून नाव मिळालेले असल्याचे सांगत असतात, आणि हे खरे देखील आहे.
मुंबई विषयी ऐतिहासिक माहिती:
मित्रांनो, मुंबई या मुख्य शहराला अनेक वर्षांपासून इतिहास लाभलेला आहे. अगदी पाषाण युग किंवा अश्मयुगापासून देखील या ठिकाणचे अवशेष आढळून येत असतात. इसवी सन पूर्व २५० पासून येथे लोकवस्ती असल्याचे पुरावे मिळत असतात. त्याचबरोबर सम्राट अशोक यांनी ज्यावेळी मौर्य साम्राज्यावर स्वारी केली, तेव्हा या मुंबई शहराचा उल्लेख आढळून येतो. त्यानंतर गुजरातच्या शासकांनी या प्रदेशावर काही काळ नियंत्रण मिळवले होते.
पुढे १५३४ मध्ये पोर्तुगीज या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गुजरातच्या शासकाकडून मुंबई शहर जिंकून घेतले. पुढे हे शहर इंग्लंड चा राजा दुसरा चार्ल्स याला हुंड्यामध्ये हे शहर देण्यात आले होते. त्याने १६६८ मध्ये मुंबई शहराचा भूखंड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दहा पौंड प्रति वर्ष या दराने भाडेतत्त्वावर दिला होता.
भारतीय उपखंडातील सर्वात पहिले बंदर अर्थात डीप हार्बर या ठिकाणी बांधले गेले होते. काही संदर्भानुसार १६६१ च्या आसपास येथे दहा हजार लोकांची वस्ती होती. मात्र अवघ्या पंधरा वर्षातच तिथे ही लोक वस्ती ६०,००० इतकी झाली होती. ईस्ट इंडिया कंपनी यांचे मुख्यालय सुरुवातीला सुरत येथे होते, मात्र त्यांनी १६८७ मध्ये हे मुख्यालय हलवून मुंबई शहरामध्ये आणले होते.
मित्रांनो, मुंबई शहर हे समुद्रकिनारी असल्यामुळे, येथे शक्यतो उष्ण व दमट स्वरूपाचे हवामान दिसून येते. साधारणपणे २७ ते ३० अंश सेल्सिअस तापमान असण्याबरोबरच येथे पाऊस देखील चांगला पडत असतो. मात्र कान्हेरी लेणीच्या परिसरामध्ये थंडी देखील जाणवत असते.
मुंबई शहराला पाणीपुरवठा हा बृहन्मुंबई महानगरपालिका कडून केला जातो. त्याचबरोबर बीएमसी द्वारे कचरा व्यवस्थापन व वीज पुरवठा देखील केला जात असतो.
मुंबई शहराला भेट दिल्यानंतर तुम्ही येथील अनेक ठिकाणे बघू शकता. त्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया अतिशय प्रसिद्ध आहे. सोबतच तुम्ही येथील अविस्मरणीय नाईट लाईफचा अनुभव घेऊ शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो, मुंबई म्हटलं की आपल्याला स्वप्नांची दुनिया दिसत असते. अनेक लोकांना या मुंबईने लहानाचे मोठे केलेले आहे. अनेकांनी अगदी झोपडपट्टीमध्ये राहून या शहरांमध्ये मोठा पैसा कमावलेला आहे. मुंबईमध्ये आलेला कोणीही उपाशी मरत नाही, असे म्हटले जाते.
आजच्या भागामध्ये आपण या मुंबई शहराबद्दल विशेष माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये मुंबई म्हणजे काय, या शहराबद्दल माहिती, मुंबईचे नाव पडण्याचा इतिहास, तसेच या शहराचा इतिहास, येथील हवामान, येथे असणारी वीजसेवा, मुंबईमधील विविध प्रेक्षणीय स्थळे, इत्यादी गोष्टी बघितल्या आहेत. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल. व मुंबई शहराविषयी तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच वाढ झाली असेल. अशी आशा आहे.
FAQ
मुंबई शहर कशासाठी ओळखले जाते?
मुंबई शहर हे महाराष्ट्राचे राजधानी व भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
मुंबई शहराला काय म्हणून ओळखले जाते?
मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, कारण समुद्रकिनारी असणारे हे शहर बेटांच्या समूहातून तयार झालेले आहे.
मुंबई इतर शहरापासून कशी वेगळी आहे?
मुंबई या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेले तीन ठिकाणे असून, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात पूर्वीचे विक्टोरिया टर्मिनस, एलिफंटा लेणी, आणि व्हिक्टोरिया आर्ट डेको संग्रह यांचा समावेश आहे.
मुंबई शहराबद्दल काय सांगता येईल?
मुंबई शहर हे समुद्रकिनारी वसलेले शहर असून, येथे एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. या ठिकाणावरून भारतातील बरेचसे आर्थिक व्यवहार चालत असतात. अनेक श्रीमंत लोकांचे घर देखील या मुंबई शहरांमध्ये आहे. सोबतच इथे बॉलीवूड ही चित्रपट सृष्टी देखील आहे.
मुंबई शहराला कोणता किताब मिळालेला आहे?
मुंबई शहराला अल्फा वर्ल्ड सिटी या नावाचा किताब मिळालेला असून, हा किताब मुंबईला २००८ यावर्षी मिळाला होता.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मुंबई या शहराबद्दल माहिती बघितलेली आहे. ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला नक्कीच आवडली असेल, सोबतच तुमच्या इतरही महाराष्ट्रीयन मित्रांना ही माहिती शेअर करा. तसेच मुंबई शहराबाहेर राहून मुंबईची आठवण काढणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…!