लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi

Lata Mangeshkar Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो लता मंगेशकर या भारतातील प्रत्येक व्यक्तीला परिचित आहेत. आपल्या मधुर स्वराने चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांना संगीताची राणी म्हणून ओळखले जाते. त्यांना आवाजाचा एक अमूल्य दागिना लाभलेला असून, त्यामुळे त्या संपूर्ण जगभर आता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील आपले नाव नोंदविलेले आहे. हा विक्रम त्यांनी सर्वाधिक गाणे गाऊन केलेला आहे. त्यांनी वीस वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायलेली असून, त्या गाण्यांची संख्या सुमारे ४०,००० पेक्षा ही अधिक आहे.

Lata Mangeshkar Information In Marathi

लता मंगेशकर यांची संपूर्ण माहिती Lata Mangeshkar Information In Marathi

लता मंगेशकर यांचा आवाज आजपर्यंत होऊन गेलेल्या कुठल्याही गायिका पेक्षा सरस असून, अमेरिकन तज्ञांनी त्यावर संशोधन करण्यासाठी केलं ठरविले होते. आज लता मंगेशकर यांचे वय झालेले असून, संगीत क्षेत्रातील प्रत्येक लोक त्यांना देवीची उपमा देतात. व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक होतात.

आजच्या भागामध्ये आपण लता मंगेशकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत व त्यांच्या जीवनचरित्राबद्दल जाणून घेणार आहोत…

नावलता मंगेशकर
संपूर्ण नावलता दीनानाथ मंगेशकर
जन्म दिनांक२८ सप्टेंबर १९२९
जन्मस्थळमध्य प्रदेश राज्यातील इंदूर या ठिकाणी
वडिलांचे नावदीनानाथ मंगेशकर
आईचे नावशेवंती मंगेशकर
भावंडेआशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ
मृत्यु दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२
मृत्यू स्थळमुंबई
संपूर्ण आयुष्य९२ वर्ष

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला सुरुवात:

मित्रांनो, लता मंगेशकर यांना लहानपणापासून संगीत क्षेत्रामध्ये प्रचंड आवड होती. त्यांच्या घरामध्ये देखील संगीतमय वातावरण असल्यामुळे, त्यांच्यामध्ये ही आवड रुजण्यास मदत मिळाली. सर्वात प्रथम त्यांनी आपल्या वडिलांच्या नाटकांमध्ये भूमिका केली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे पाच वर्ष इतके होते.

त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या हाताखाली आपले शिक्षण सुरू ठेवले. सर्वात पहिले गाणे १९४२ या वर्षी त्यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी रेकॉर्ड केले होते. ते एका मराठी चित्रपटासाठी होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अतिशय प्रसिद्ध देखील झाला होता, मात्र निर्मात्यांनी काही कारणाने ते गाणे चित्रपटांमधून हटवले होते. त्यामुळे लता मंगेशकर यांना खूप वाईट वाटले होते.

पुढे लता मंगेशकर त्यांच्या वडिलांचे अर्थात दीनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. सर्व भावंडांमध्ये मोठ्या असणाऱ्या लता मंगेशकर यांच्यावर घरच्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या, या वेळेला एका फिल्म कंपनीचे मालक असणारे विनायक दामोदर यांनी त्यांना आश्रय दिला होता.

लता मंगेशकर यांचे करियर:

मित्रांनो, आज सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांनी १९४५ या वर्षी गुलाम हैदर यांच्या सांगण्यावरून एस मुखर्जी या निर्मात्यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते शहीद या चित्रपटासाठी कार्य करत होते. या चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळावी म्हणून लता मंगेशकर यांनी विनवणी केली होती, मात्र मुखर्जी यांना लता मंगेशकर यांचा आवाज आवडला नसल्यामुळे त्यांनी त्यांना नकार दिला. मात्र पुढे आयेगा आने वाला या गाण्यासाठी त्यांना गायनाची संधी मिळाली. हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले. त्यामुळे लता मंगेशकर यांना गायन क्षेत्रामध्ये एक मोठा ब्रेक मिळाला.

१९५० या दशकामध्ये त्यांनी अतिशय प्रतीतयश गाणी सिनेमा इंडस्ट्रीला दिली. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. विविध बॉलीवूड संगीतकार त्यांच्याकडून गाणे गाऊन घेण्यासाठी स्पर्धा करत असत. यामध्ये एसडी बर्मन,शंकर जयकिशन, हेमंत कुमार, नौशाद, सलील चौधरी इत्यादी संगीतकारांचा समावेश होता. शंकर जयकिशन यांना लता मंगेशकर यांच्या आवाजांनी भुरळ पाडली होती. त्यामुळे ते आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनाच संधी देत असत.

१९६० च्या दशकामध्ये पार्श्व गायनामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लता मंगेशकर यांचा कोणीही हात धरत नसे, त्यांनी त्याकाळी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला होता.

१९७० च्या दशकामध्ये मात्र लता मंगेशकर यांचे नाव प्रचंड झाले होते. आणि त्यातच त्यांनी पाकीजा या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले, आणि जे खूपच प्रसिद्ध झाले.

पुढे अनेक दिवस त्यांनी इतर संगीतकारांमार्फत काम केले असले, तरी देखील १९९० यावर्षी त्यांनी स्वतःची संगीत कंपनी स्थापन केली. त्यांनी सुमारे २० पेक्षा अधिक भाषांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गाणे गायलेले आहेत. यामध्ये अगदी भजन, कव्वाली, चित्रपट संगीत यांचा देखील समावेश आहे.

मित्रांनो, लता मंगेशकर इंडस्ट्री मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा एसडी बर्मन यांच्यासोबत वाद झाला होता. जो सर्वत्र प्रसिद्ध आहे. कारण लता मंगेशकर यांनी एस डी बर्मन यांच्यासोबत काम करण्याकरिता नकार सांगितला होता. त्याच बरोबर १९६२ या वर्षी मोहम्मद रफी यांच्यासोबत देखील लता मंगेशकर यांचा रॉयल्टी च्या कारणावरून वाद झाला होता.

लता मंगेशकर यांना मिळालेले विविध पुरस्कार:

मित्रांनो, लता मंगेशकर यांनी गायनाच्या क्षेत्रामध्ये फार मोठे नावलौकिक मिळवलेले आहे. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. भारताने सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा भारतरत्न हा पुरस्कार लता मंगेशकर यांना प्रदान केलेला आहे.

याबरोबरच त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, झी सिनेमा पुरस्कार, राष्ट्रीय दूरदर्शन पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, लिजन ऑफ ओनर पुरस्कार, राष्ट्रीय ए एन आर पुरस्कार, पत्रकार संघ पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, फ्रेंच सुप्रीम ऑर्डर पुरस्कार, यासह अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तसेच त्यांच्या नावाने देखील १९९२ पासून महाराष्ट्र राज्य लता मंगेशकर पुरस्कार देत आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, गानकोकिळा किंवा संगीताची देवी अशी उपमा असणारी गायिका म्हणजे लता मंगेशकर होय. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त गाणी गाण्याचा विक्रम केलेला असून, त्यांच्या आवाजामध्ये एक अतिशय मधुरता आहे. आजच्या भागामध्ये आपण या लता मंगेशकर यांच्या विषयी माहिती घेतलेली असून, त्यांचे जीवन चरित्र अभ्यासलेले आहे.

यामध्ये तुम्हाला त्यांचे प्रारंभिक आयुष्य, त्यांची कारकीर्द, सुरुवातीचे संघर्ष, त्यांच्या संदर्भात झालेले वाद, त्यांनी आजपर्यंत गायलेल्या गाण्यांमध्ये सर्वोत्तम गाणी, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये दाखवलेले कर्तुत्व, त्यांचे निधन इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. त्यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरली असेल, अशी आशा आहे…

FAQ

लता मंगेशकर यांचे संपूर्ण नाव काय होते?

लता मंगेशकर यांचे संपूर्ण नाव लता दीनानाथ मंगेशकर असे होते.

लता मंगेशकर यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ या दिवशी मध्य प्रदेश मधील इंदूर या ठिकाणी झाला होता.

लता मंगेशकर यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?

लता मंगेशकर यांच्या आईचे नाव शेवंती मंगेशकर, तर वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर असे होते.

लता मंगेशकर यांचा मृत्यू कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

लता मंगेशकर यांचा मृत्यू ०६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी मुंबईमध्ये झाला होता.

लता मंगेशकर यांचे मृत्यू समयी वय किती होते?

लता मंगेशकर यांचे मृत्यू समयी वय ९२ इतके होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गान कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. व त्यांचे  जीवन चरित्र देखील जाणून घेतलेले आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि शेअर बटनावर क्लिक करून तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींपर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा.

 धन्यवाद…!

Leave a Comment