लान्स नाईक करम सिंह यांची संपूर्ण माहिती Lance Naik Karam Singh Information In Marathi

Lance Naik Karam Singh Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो लष्करी जीवनशैली बद्दल प्रत्येकालाच कुतूहल असते. त्यामुळे लहानपणापासून अनेकांचे स्वप्न लष्कर दलामध्ये सहभागी होण्याचे असते. मात्र पुढे काही कारणास्तव प्रत्येक जण यामध्ये सहभागी होऊ शकत नसला, तरी देखील प्रत्येकाला या लष्करी जवानांबद्दल आदरभाव नक्कीच असतो. आज आपण अशाच एका लष्करी अधिकाऱ्याबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांचे नाव म्हणजे लान्स नाईक करम सिंह होय. आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे हे व्यक्तिमत्व परंपरा, देशभक्ती, परिश्रम, राष्ट्राप्रती निष्ठा, इत्यादी गुणांचे महामेरू होते.

Lance Naik Karam Singh Information In Marathi

लान्स नाईक करम सिंह यांची संपूर्ण माहिती Lance Naik Karam Singh Information In Marathi

मित्रांनो, त्यांनी दाखवलेल्या शौर्य आणि केलेल्या सेवेमुळे त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. या जवानांनी पाकिस्तानी भारताच्या इतिहासात एक सुवर्ण लेख लिहिलेला आहे.

चला तर मग आजच्या भागामध्ये आपण या लान्स नाईक करम सिंह यांच्या बद्दल माहिती बघूया…

नावलान्स नाईक करम सिंह
जन्म दिनांक १५ सप्टेंबर १९१५
जन्म स्थळभालिया, पंजाब, महाराष्ट्र
वडीलसरदार उत्तम सिंग
पत्नीगुरदल कौर
सेवाभारतीय सैन्यदल
युद्ध कामगिरीभारत पाकिस्तान युद्ध
सन्मानितआर्मी पदक आणि परमवीर चक्राने सन्मानित
राष्ट्रीयत्वभारतीय
मृत्यू दिनांक २० जानेवारी १९९३
मृत्यू स्थळबर्नाला, पंजाब, भारत

लान्स नाईक करम सिंह यांचे प्रारंभिक जीवन:

मित्रांनो, एका पंजाबी कुटुंबामध्ये १५ सप्टेंबर १९१५ या दिवशी लान्स नाईक करम सिंह या शूरवीर योध्याचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब अतिशय धनसंपन्न जाट शीख समुदायाचे होते. लहानपणी करम सिंह खूपच खोडकर स्वभावाचे होते. त्यांना शिक्षण कसे द्यावे हा त्यांच्या वडिलांसाठी एक आव्हानात्मक विषय ठरलेला होता.

शिक्षणामध्ये फारसे रस नसलेल्या करम सिंह यांना, त्यांच्या वडिलांनी शेतीमध्ये प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी शेती करता करता कुस्ती या खेळामध्ये देखील प्राविण्य मिळवत अतिशय आनंद लुटला. त्यांनी पोल्ट नावाचा खेळ देखील खेळून, त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर यश मिळविले. करम सिंहांचे चुलते ब्रिटिश सैन्यामध्ये अधिकारी पदावर होते. त्यांनी करम सिंह यांच्यामध्ये असलेल्या क्षमता लहानपणीच ओळखल्या होत्या. त्यामुळे त्यांनी देखील सैनिक व्हावे असे त्यांच्या काकांची मनोमन इच्छा होती.

आपल्या काकांची इच्छा आणि गावातील अनेक सैनिकांच्या शौर्याचा परिणाम म्हणून ते सैन्यामध्ये भरती होण्यासाठी उत्सुक झाले. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण शेजारच्या गावी अर्थात दारौली या ठिकाणी घेतले.

करम सिंह यांचे लष्करी आयुष्य:

मित्रांनो, १५ सप्टेंबर १९४१ या दिवशी आपल्या वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सहभाग घेतला. प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना रांची या ठिकाणी पाठविण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांची रवानगी शिख रेजमेंट या दलाच्या प्रथम बटालियनमध्ये करण्यात आले.

येथे त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बर्मा मोहिमेत दाखविलेल्या शौर्याने मोठी ओळख मिळवून दिली, आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नजरेत देखील त्यांनी चांगलाच आदर कमावला.

लान्स नाईक करम सिंह यांना मिळालेला आदर सत्कार:

मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले की गुणगौरव हा केला जातो. त्याच गोष्टीसाठी लान्स नाईक करम सिंह मागे नाहीत. ज्याने त्यांना अनेक विविध प्रकारचे सन्मान मिळालेले आहेत. लान्सनाईक करम सिंह यांना १४ मार्च १९४४ या दिवशी मानाचा लष्करी पदक पुरस्कार मिळालेला आहे.

ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये असताना त्यांना एक प्रतिष्ठित सैनिकाच्या रूपात ओळखले जात असे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या रात्री ध्वजारोहण करण्याकरिता लान्स नाईक करम सिंह यांची निवड केली होती. जी एक खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे.

मित्रांनो, लष्करी सेवेमधील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार म्हणजे परमवीर चक्र हा पुरस्कार होय. लान्स नाईक करम सिंह यांना हा पुरस्कार २६ जानेवारी १९५० या दिवशी देण्यात आलेला होता.

कुठल्याही व्यक्तीचे स्मारक बांधणे हे त्याच्यासाठी खूप मोठा सन्मान असतो. आणि यामुळेच पंजाब सरकारने कॅम्पस या ठिकाणी करम सिंह यांचे एक खूप मोठे स्मारक बांधलेले आहे.

करम सिंग यांनी आपल्या सेवेचा शेवट १९६९ यावर्षी केला, तेव्हा त्यांच्या रिटायरमेंट वेळी त्यांना मानद कॅप्टन या पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे.

मित्रांनो, २० जानेवारी १९९३ या दिवशी लॉन्स नाईक करम सिंह यांचे निधन झाले. मात्र त्यांना आपल्या हयातीतच अर्थात २६ जानेवारी १९५० या दिवशी परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि हयात असतानाच पुरस्कार मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

मित्रांनो, लान्स नाईक करम सिंह यांनी भारतीय सैन्यामध्ये अनेक मोठमोठे विक्रम केलेले आहेत. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये त्यांनी फार मोठी भूमिका बजावलेली असून, पाकिस्तानी पळवून लावण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि यामुळे त्यांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि संपूर्ण भारतीयांना त्यांच्याविषयी आधार भाव आहे. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि शौर्य आज सैन्यातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देत आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन भारताची सेवा करावी असे प्रत्येकालाच वाटत असते, आणि त्यासाठी अनेक जण प्रयत्न देखील करतात. मात्र काही लोकांनाच या सैन्यदलामध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभते. जे लोक येथे सहभागी होतात, ते आपल्या सर्व ताकतीनिशी भारतासाठी प्रयत्न करतात. आज आपण अशाच एका धैर्यशील अधिकाऱ्याविषयी अर्थाचा लान्स नायक करम सिंह यांच्या विषयी माहिती बघितली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दल माहिती व त्यांचा परिचय, त्याचबरोबर लष्करी सेवेतील त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या गौरवगाथा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर, इत्यादी गोष्टी देखील बघितलेले आहेत. त्यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

लान्स नाईक करम सिंह यांचा जन्म केव्हा व कुठे झाला होता?

लान्स नाईक करम सिंह यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१५ या दिवशी भालिया या पंजाब राज्यातील एका गावामध्ये झाला होता.

लान्स नाईक करम सिंह यांना परमवीर चक्र हा पुरस्कार देण्याचे काय कारण होते?

लान्स नाईक करम सिंह यांनी भारतीय भूभागाचा बचाव करण्याकरिता एक पलटवार युद्ध छेडले होते. यामध्ये त्यांनी शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून हल्लेखोरांवर आक्रमण करून, आपले शौर्य दाखवले होते. याकरिता त्यांना भारत सरकारकडून परमवीर चक्र हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

लान्स नाईक करम सिंह यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी व केव्हा झाला होता?

लान्स नाईक करम सिंह यांचा मृत्यू पंजाबच्या बर्नाला या ठिकाणी २० जानेवारी १९९३ या दिवशी झाला होता.

लान्स नाईक करम सिंह यांच्या वडिलांचे नाव काय होते?

लान्स नाईक करम सिंह यांच्या वडिलांचे नाव सरदार उत्तम सिंग असे होते.

लान्स नाईक करम सिंह यांच्या पत्नीचे नाव काय होते?

लान्स नाईक करम सिंह यांच्या पत्नीचे नाव गुरदल कौर असे होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण लष्करी अधिकारी असणाऱ्या आणि पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये एक चांगली कामगिरी बजावणाऱ्या परमवीर चक्र प्राप्त लान्स नायक करम सिंह यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला जरूर कळवा. तसेच तुमच्या कुटुंबातील कोणी सैन्य दलात आहे का, आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून लिहा. तसेच आठवणीने तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा.

धन्यवाद…!

Leave a Comment