चिमणी पक्षाची संपूर्ण माहिती Sparrow Bird Information In Marathi

Sparrow Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो चिऊ चिऊ चिमणी हे गीत लहानपणी सर्वांनीच ताला सुरात म्हटलेले असेल, मात्र आजकाल ही चिमणी कुठेही बघायला मिळत नाही. कारण हल्ली चिमण्यांची संख्याच फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. चिमणी हा एक अतिशय सुंदर दिसणारा लहानसा पक्षी असून, जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आढळत असतो. चिमणी ही अतिशय चपळ असून, तिच्या मोठ्या प्रमाणावर प्रजाती आढळून येतात.

Sparrow Bird Information In Marathi

चिमणी पक्षाची संपूर्ण माहिती Sparrow Bird Information In Marathi

आपले छोटेसे पंख जमिनीवर घासून ती आनंद मिळवत असते. तपकिरी रंगाचे पाय, पिवळ्या रंगाची चोच, आणि थोडेसे राखाडी शरीर त्याचबरोबर मानेवर काहीसे काळसर पट्टे अशी वैशिष्ट्ये असणारी ही चिमणी सर्वांच्याच ओळखीची आहे.  चिमणी नर व मादी अशा दोन प्रकारात वेगवेगळी दिसते. यातील नर पक्षी मादी पेक्षा अधिक आकर्षक असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चिमणी या सर्वांच्या ओळखीच्या पक्षाबद्दल माहिती बघणार आहोत…

नावचिमणी
इंग्रजी नावस्पॅरो
कुटुंबप्यासीरीडी
प्रकारपक्षी
हायर क्लासिफिकेशनप्यासेरीन
साधारण आयुष्यमानतीन वर्षे
पंखांचा अंदाजे विस्तार२१ सेंटीमीटर पर्यंत
उडण्याची साधारण गतीप्रति तास ४६ किलोमीटर

मित्रांनो, साधारणपणे चार ते सात वर्षांपर्यंत जगणाऱ्या या चिमण्या कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम असतात. तसेच सुमारे ४६ किलोमीटर प्रति तास या वेगाने देखील त्या उडू शकतात, यावरून या छोट्याशा चिमणीची चपळता तुमच्या लक्षात येईल. शक्यतो चिमण्या या कळपामध्ये राहणे पसंत करत असतात. आणि छोटीशी झाडे किंवा जमिनी यासारख्या ठिकाणी राहणे त्यांना जास्त आवडते.

चिमणी हे पक्षी फार क्वचितच उंचीवरील ठिकाणी आढळून येतात, मात्र आजकाल मोबाईल टॉवर ची संख्या वाढल्यामुळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे या चिमण्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहे. त्यामुळे आजकाल तुम्हाला अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या अतिशय कमी आढळून येत असेल.

मित्रांनो, या चिमणी पक्षाची कमी होत जाणारी संख्या वाचविण्यासाठी २० मार्च या दिवशी जागतिक पातळीवर चिमणी दिन साजरा केला जातो, आणि चिमण्या वाचविणे का गरजेचे आहे या संदर्भात समाजामध्ये जनजागृती निर्माण केली जाते. मोबाईल टॉवर आणि अधिक उष्णता किंवा जागतिक तापमान वाढ हे चिमण्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारे घटक आहेत.

चिमणी या पक्षाविषयी काही मनोरंजक तथ्य:

ब्रिटन या ठिकाणी जगभरातील सर्वात जास्त चिमण्यांची संख्या होती, मात्र अलीकडील काळात या ठिकाणी देखील चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. चिमणी या पक्षाचा उगम पूर्व आशिया खंडातील समजला जातो.

चिमणी या पक्षाला एकत्रित राहणे फार आवडते, त्यामुळे त्या नेहमी एकत्रितरीत्या घरटी बांधण्यास प्राधान्य देत असतात. आणि फिरताना देखील शक्यतो टोळक्याने फिरताना आढळून येतात.

चिमणी ही मुख्यतः शाकाहारी प्रकारातील पक्षी असून, शेतातील धनधान्य, बिया, गवत इत्यादी गोष्टी खाण्यावर त्यांचा भर असतो. मात्र आपल्या शरीरातील प्रथिनाची आवश्यकता पूर्ण करण्याकरिता अनेक वेळा त्या मांसाहारी बनतात, व लहान लहान कीटक खात असतात.

कोल्हे, कुत्रे, मांजर, साप यांसारख्या प्राण्यांकडून या चिमण्यांची सर्रास शिकार केली जात असते. चीनमध्ये एकदा मोठ्या प्रमाणावर चिमण्यांची कत्तल करण्यात आली होती, मात्र त्यावर्षी धनधान्यांच्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली होती.

लंडनमध्ये असणाऱ्या एकूण चिमण्यांच्या संख्यांमध्ये १९९४ ते २००० या अवघ्या सहा वर्षांमध्ये सुमारे ७५% नी घट दिसून आली होती. आणि त्यामुळेच चिमण्याच्या संवर्धनाची गरज लक्षात आली होती.

चिमणी जास्तीत जास्त आठ इंच लांबीची असू शकते, व वजनाने १.४ औंस पर्यंत असू शकते. शक्यतो चिमण्या या पाण्यातील पक्षी नाहीत, तरीदेखील पाण्यामध्ये चिमण्या अतिशय जलदरीत्या पोहू शकतात.

चिमण्यांच्या आवाजाला चिवचीवाट किंवा किलबिलाट म्हणून ओळखले जाते, आणि हा आवाज अतिशय सुरेल आणि सुंदर प्रकारचा असतो. ज्याने सकाळी वातावरणामध्ये एक वेगळेच चैतन्य पसरून, प्रसन्नता निर्माण होते.

चिमण्यांच्या जगभरात असंख्य प्रजाती आढळून येतात, ज्यामध्ये ट्रि चिमणी, पांढऱ्या मुकुटाची चिमणी, व्हेस्पर चिमणी, गान चिमणी, फॉक्स चिमणी इत्यादी प्रजाती मुख्य आहेत.

विस्पर चिमणीची प्रजाती लांब शेपटी असणारी, आणि आकाराने देखील मोठी असते. आणि ही प्रजाती वातावरणातील बदलाला पटकन प्रतिसाद देत असते. या प्रजातीची चिमणी मुख्यतः यु एस आणि कॅनडा या देशांच्या भागांमध्ये आढळून येत असते.

युरेशियन ट्री चिमणी हा देखील एक चिमणी चा प्रकार असून, ती शक्यतो जंगली प्रदेशांमध्ये आढळून येते. मात्र शहरी भागात प्रदूषणामुळे या चिमण्यांची संख्या आढळत नाही. उत्तर अमेरिकेमध्ये पांढरा मुकुट असलेली चिमणी देखील आढळून येते, मात्र हल्लीच्या दिवसांमध्ये या चिमणीची प्रजाती मोठ्या प्रमाणावर लोप पावत आहे.

सर्व साधारण स्थितीत आढळून येणारी, आणि कुठल्याही प्रकारच्या हवामानाला तग धरणारी चिमणी म्हणून गाण चिमणीला ओळखले जाते. जी अतिशय सामान्य आणि सर्वत्र आढळणारी प्रजाती आहे.

फॉक्स प्रजातीची चिमणी उंच प्रदेशांमध्ये आढळून येते, आणि दुर्गम ठिकाणी घरटे बांधून राहण्यासाठी ही चिमणी ओळखली जाते. या चिमणीचा आकार गान चिमणीपेक्षा काहीसा मोठा असतो, आणि या चिमणीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अनेक वेळा हिवाळ्यामध्ये स्थलांतर करण्यासाठी ओळखली जाते.

मित्रांनो, मानवाच्या अनेक नैसर्गिक हस्तक्षेपामुळे निसर्गाला मोठा धोका पोहोचत आहे. ज्यामध्ये चिमण्यांची संख्या कमी होण्याचा देखील समावेश होतो. मित्रांनो मानवाने आपल्या वैयक्तिक फायदा करिता, चिमण्यांना धोका पोहोचवला आहे. म्हणून आज चिमण्याच्या संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या घराच्या आजूबाजूला नेहमी वावरणारा पक्षी म्हणून चिमणी या पक्षाला ओळखले जाते. अतिशय लहान असणारा हा चिमणी पक्षी दिसायला देखील खूपच आकर्षक असून, अतिशय चपळ आहे. आपल्या चिवचिवाट आवाजाने सकाळी अतिशय वातावरण प्रसन्न करून टाकणारा हा पक्षी, आजकाल मात्र संख्येने कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे चिमणी पक्षाची संख्या वाचविण्याकरिता उपाययोजना करण्याची गरज येऊन ठेवलेली आहे. अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांना केवळ चित्रांमध्येच चिमणी बघावी लागेल.

आजच्या भागामध्ये आपण चिमणी या पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला या चिमणी पक्षाचे वैशिष्ट्ये, त्याबद्दलची काही तथ्य, यांसह इतर देखील माहिती वाचायला मिळाली असेल. सोबतच काही नेहमी विचारले जाणाऱ्या प्रकारचे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

चिमणी या पक्षाचे इंग्रजी नाव आणि कुटुंब कोणते आहे?

चिमणी या पक्षाचे इंग्रजी नाव स्पॅरो असे असून, त्याचे कुटुंब पॅसिरिडी असे आहे.

चिमणी हा पक्षी साधारणपणे किती वेगाने उडू शकतो?

चिमणी हा पक्षी साधारणपणे प्रति तास ४६ किलोमीटर या वेगाने उडू शकतो.

चिमणी या पक्षाचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते?

चिमणी हा पक्षी सरासरी चार ते सात वर्षांपर्यंत जगत असला, तरी देखील साधारण आयुष्यमान तीन वर्षे इतके समजले जाते.

चिमण्यांच्या खाद्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो?

चिमण्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये आपण खात असलेल्या अन्नाचे तुकडे, धन धान्य, लहान लहान किडे, विविध बिया इत्यादी अन्नपदार्थ खात असतात.

चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे कोणते कारण मुख्य समजले जाते?

चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे वाढत्या मोबाईल टॉवरची संख्या हे कारण मुख्य समजले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चिमणी या पक्षा विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवतानाच, चिमणी पक्षाविषयीच्या तुमच्या लहानपणीच्या मजेदार आठवणी देखील नक्की शेअर करा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती जरूर पाठवा. धन्यवाद…!

Leave a Comment