CET Full Form Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पूर्वी बारावीनंतर बारावीच्या मार्कांना फार महत्त्व असायचे, कारण या मार्कांवर पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेश मिळत असे. मात्र आजकाल कुठल्याही पदवीला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठीची प्रवेश परीक्षा ही द्यावीच लागते.
सी इ टी फुल फॉर्मची संपूर्ण माहिती CET Full Form Information In Marathi
आज कुठल्याही शासकीय महाविद्यालयामध्ये किंवा खाजगी महाविद्यालयामध्ये मग ते अनुदानित असो, किंवा विनाअनुदानित, अथवा विद्यापीठे असो या सर्व ठिकाणी आरोग्य विज्ञान, फार्मसी, अभियांत्रिकी, कृषी यांसारख्या पदवींना प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक एकत्रित प्रवेश परीक्षा सुरू केलेली आहे. ज्याला एम एच टी सी इ टी या नावाने ओळखले जाते. या सी इ टी चा फुल फॉर्म कॉमन एंट्रन्स टेस्ट असा आहे.
आजच्या भागामध्ये आपण या एम एच टी सी इ टी परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत…
नाव | एम एच टी – सी ई टी |
फुल फॉर्म | महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट आयोजक महाराष्ट्र शासन |
उपयोग | आरोग्य विभाग फार्मसी कृषी किंवा अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांमध्ये पदवीस प्रवेश मिळवण्यासाठी |
पात्रता | किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण |
सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी म्हणजे काय:
मित्रांनो, कुठल्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी बारावीचे गुण ग्राह्य धरले जात असतात. मात्र आजकाल या गुणांबरोबरच आणखी एक गुणांना भार दिला जातो, तो म्हणजे सीईटीचे मार्क होय. मित्रांनो सीईटी या परीक्षेमध्ये तुम्हाला बारावी इयत्तेमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम दिलेला असतो. आणि त्या आधारावर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडून हे प्रश्न सोडवावे लागतात.
या परीक्षेमध्ये विषयानुसार वेगवेगळे पेपर होत असतात. ही परीक्षा पार पडल्यानंतर काही दिवसांनी याचा निकाल लावला जातो, यामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेला गुणाचे गुणपत्रक त्यांच्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहोचवले जाते.
पुढे ज्या पदवीसाठी प्रवेश घ्यायचा असेल तेथे ऑनलाइन स्वरूपाचा फॉर्म भरावा लागतो. आणि या सिईटी परीक्षेमध्ये मिळालेले मार्क तिथे टाकावे लागतात. काही दिवसानंतर त्या पदवीसाठी प्रवेश फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची मेरीट नुसार यादी लावली जाते. यामध्ये बारावी आणि सीईटी अशा दोन्ही गुणांना वेटेज दिलेले असते.
त्यानुसार पुढील जागावाटप यादी प्रकाशित केल्या जातात, यानुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. असे चार ते पाच फेऱ्या झाल्यानंतर सर्व महाविद्यालयांमधील जागा भरल्या जातात. आणि त्यानंतर मग मात्र उर्वरित विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही, किंवा त्यांना इतर पदवीला प्रवेश घ्यावा लागतो.
सीईटी परीक्षा देण्यासाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता:
मित्रांनो, सीईटी चा पेपर हा पदवीला प्रवेश मिळवण्याकरिता दिला जातो. त्यामुळे पदवीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच पात्रता या परीक्षेसाठी देखील लागू होतात. त्यामधील मुख्य पात्रतेमध्ये किमान बारावी इयत्तेचे शिक्षण घेतलेले असावे, ही पात्रता सर्वात महत्त्वाची मानली जाते. आणि हे शिक्षण सायन्स या शाखेतून घेतलेले असावे, असा देखील मापदंड आहे. याबरोबरच या विज्ञान शाखेमधून कृषीसाठी पीसीबी आणि उर्वरित सर्व शाखांसाठी पीसीएमबी या ग्रुप अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे.
या प्रवेश परीक्षा करिता बारावी इयत्तेमध्ये किमान गुण किती असावेत, याबाबत मात्र कुठलीही पात्रता देण्यात आलेली नाही. मात्र उत्तीर्ण झालेले असले पाहिजे.
सीईटी परीक्षेचा नमुना:
मित्रांनो, सीईटी ही परीक्षा तुम्ही पीसीबी ग्रुप घेतला आहे की पीसीएमबी यानुसार वेगवेगळी ठरत असते. यातील प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे पेपर घेतले जातात. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात, आणि तुम्हाला वेगळी उत्तर पत्रिका दिली जाते.
ज्याला ओ एम आर शीट म्हणून ओळखले जाते. यामध्ये तुम्हाला बरोबर उत्तराचा पर्याय पेनने रंगवायचा असतो. पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हे पेपर तपासले जातात. आणि उमेदवाराला मिळालेल्या गुणांच्या निकालाची प्रत संकेतस्थळावर सादर केली जाते. तसेच विद्यार्थ्यांना देखील एसएमएस स्वरूपाने ही माहिती पुरविली जाते.
सीईटी परीक्षेसाठी अभ्यासक्रम:
मित्रांनो, सीईटीच्या परीक्षेसाठी बारावी इयत्तेमध्ये शिकलेला अभ्यासक्रम ग्राह्य धरला जातो. यामध्ये तुमचा जो ग्रुप असेल, त्यानुसार तुम्ही विषय निवडू शकता. जे पीसीबी किंवा पीसीएमबी प्रकारातील असतील. याकरिता बारावी इयत्तेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि अकरावी इयत्तेतील बेसिक चा काही महत्त्वाचा भाग, यांचा समावेश होतो.
मित्रांनो, सीईटी ही आज पुढील शिक्षणासाठी अनिवार्य ठरलेली परीक्षा असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी अकरावीपासूनच या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली तर नक्कीच यश संपादन करण्यात मदत होईल.
निष्कर्ष:
मित्रांनो, आजकाल शिक्षण हे फारच महत्वाचे झालेले आहे. त्यातही पूर्वीच्या काळी बारावी झाली की बऱ्यापैकी शिक्षण समजले जात असे, मात्र आज पदवी घेऊन देखील अनेक विद्यार्थी बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे योग्य विद्यार्थ्यांनाच पदवीचे शिक्षण मिळावे याकरिता महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रम राबवलेले आहेत.
बारावीच्या परीक्षांमध्ये हेराफेरी करून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात, आणि नामांकित महाविद्यालयांमध्ये पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवत असत. त्यामुळे या गोष्टीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एम एच टी सी इ टी नावाची एक प्रवेश परीक्षा निश्चित केलेली आहे. त्यानुसार या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारेच विद्यार्थी पदवीच्या कार्यक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
आजच्या भागामध्ये आपण या एम एच टी सी इ टी परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा म्हणजे काय आहे, त्याबद्दलची माहिती, परीक्षा कशी घेतली जाते, यासाठी पात्रता काय असते, या परीक्षेसाठी कोणती एजन्सी कार्य करते, या परीक्षेचा नमुना कसा असतो, त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो, प्रमाणपत्र मिळते का, इत्यादी माहिती घेतलेली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
एम एच टी सी इ टी या परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे?
एम एच टी सी इ टी चा फुल फॉर्म महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट असा आहे.
सी इ टी ची परीक्षा दिल्यानंतर प्रमाणपत्र मिळते का?
सी इ टी ची परीक्षा दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र मिळत नाही, मात्र तुम्हाला तुमचे गुणपत्र विवरण मिळते. च्या माध्यमातून तुम्ही पुढील अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळू शकता.
सीईटी या परीक्षेकरिता कोणकोणते विषय असतात?
मित्रांनो, सीईटी ही परीक्षा विज्ञान शाखेतील विद्यार्थी देत असल्यामुळे त्यास गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भौतिकशास्त्र यासारख्या विषयांचा अभ्यासक्रम असतो. यातील कृषी पदवी परीक्षा साठी गणित विषय वगळता देखील येतो.
सीईटी परीक्षा देण्यासाठी कोण पात्र ठरते?
मित्रांनो, सीईटी ही परीक्षा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असते, मात्र त्यांनी आपल्या बारावी इयत्तेतील अभ्यासक्रम विज्ञान शाखेतून पूर्ण केलेला असावा. आणि कृषी वगळता इतर शाखांसाठी त्याने पीसीएमबी हा ग्रुप अभ्यासालेला असावा. कृषीसाठी पीसीबी हा ग्रुप असला तरी चालू शकतो.
सीईटी परीक्षा दिल्यानंतर त्याचा उपयोग कोठे होतो?
मित्रांनो सीईटी ही एक प्रवेश परीक्षा असून, या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सामायिक पात्रता चाचणी अर्थात एमएचटी सीईटी या परीक्षेबद्दल माहिती घेतलेली आहे. आपल्यापैकी अनेकांनी ही परीक्षा दिलेली असेल, किंवा द्यायचा विचार सुरू असेल त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरलेली असेल. तर मग पटपट तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना आणि नुकतेच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद…