Chess Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो संपूर्ण जगभर बुद्धीला चालना देण्यासाठी पूर्वीपासूनच विविध खेळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये बुद्धिबळ या खेळाचा देखील समावेश होतो. चेस किंवा बुद्धिबळ या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळ अनेक शतकांपासून खेळला जात आहे. याकरिता दोन खेळाडूंची संख्या आवश्यक असते. व बुद्धिबळाचा पट आणि सोंगट्या इत्यादी साधनांची गरज भासते.
बुद्धिबळ खेळाची संपूर्ण माहिती Chess Game Information In Marathi
बुद्धिबळ हा शारीरिक क्षमतेचा विकास करणारा खेळ नसून, बौद्धिक पातळीवर उमेदवाराची कसोटी लावणारा खेळ आहे. त्यामुळे या खेळाला अतिशय प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. त्याचबरोबर हा खेळ खेळणाऱ्यांचे मनोरंजन देखील करत असतो. आणि डोक्यातील विविध नकारात्मक विचार दूर करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरत असतो.
मित्रांनो, कुठल्याही वयोगटातील लोकांना ताण तणाव जाणवत असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी मनोरंजन खूपच महत्त्वाचे ठरते. केवळ शारीरिक खेळ खेळूनच मनोरंजन केले जाऊ शकते, असे काही नाही. तुम्ही बैठ्या खेळ प्रकारांमध्ये देखील अनेक खेळ खेळू शकता. यासाठी बुद्धिबळ एक अतिशय उत्तम पर्याय आहे.
आजच्या भागामध्ये आपण बुद्धिबळ या खेळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | बुद्धिबळ |
इंग्रजी नाव | चेस |
प्रकार | खेळ |
उपप्रकार | इंडोअर बैठा खेळ |
खेळाडूंची संख्या | दोन |
साधने | बुद्धिबळ पट आणि सोंगट्या |
कौशल्य | बौद्धिक कौशल्य |
जुना प्रकार | चतुरंग |
बुद्धिबळ या खेळाची उत्पत्ती:
मित्रांनो, बुद्धिबळाचा इतिहास कोणालाही माहिती नसून, त्याबद्दल ठळक संदर्भ आढळून येत नाही. तरी देखील अंदाजे दोन हजार वर्षांआधी हा खेळ खेळला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. तर इतर काही संदर्भानुसार इसवी सन २८० ते ५५० या दरम्यान गुप्त साम्राज्याने हा खेळ सुरू केला असावा, असा देखील अंदाज व्यक्त केला जातो.
युरोपीय इतिहासकारांच्या मते युरोपमध्ये या खेळाची सुरुवात इसवी सन १२०० च्या आसपास झाली असावी, मात्र १४७५ नंतर या खेळाबद्दल संदर्भ माहिती आढळून येत आहे. त्यानुसार या कालावधीच्या पुढे खऱ्या अर्थाने या खेळांमध्ये सुधारणा घडवून आणल्या गेल्या, असे सांगितले जाते. जो आपण आज खेळ खेळत आहोत, त्यामध्ये स्पेन व इटली यांनी केलेल्या बदलांचा मोठा समावेश आहे.
बुद्धिबळ खेळण्यामागील उद्देश:
मित्रांनो, बुद्धिबळ हा दोन व्यक्तींच्या मध्ये खेळल्या जाणारा स्पर्धात्मक खेळ असून, खेळाडूंच्या विविध व्यक्तिमत्व पैलूंचा विकास करणे हे या खेळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये निर्णय क्षमता, जलद हालचाली, बौद्धिक क्षमता, इत्यादींचा विकास होण्यास मदत होते.
बुद्धिबळाच्या पटावर ६४ घरे असतात. ज्यातील अर्धे पांढऱ्या रंगाने तर अर्धे काळ्या रंगाने रंगविलेले असतात. आणि हे रंगवण्याचे पद्धती ही एक आड एक अशी असते, त्यामुळे हा बुद्धिबळपट अतिशय वैशिष्ट्यपूर्णरित्या दिसत असतो. त्याचप्रमाणे या खेळामध्ये वापरण्यात येणाऱ्या सोंगट्या देखील काळ्या व पांढऱ्या अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असतात.
ज्यांची संख्या एकूण ३२ असते. पैकी प्रत्येक खेळाडूला १६ १६ सोंगट्या वाटल्या जातात. एका खेळाडूकडे काळ्या सोंगड्या, तर दुसऱ्या खेळाडूकडे पांढऱ्या येत असतात. या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूकडे एक राजा, राणी, दोन हत्ती, दोन उंट, दोन घोडे यांच्या बरोबरच आठ प्यादे असतात.
या प्रत्येक सोंगट्यांचा चालण्याचा क्रम किंवा स्वरूप हे वेगवेगळे असते. आणि त्यानुसारच त्यांची हालचाल केली जावी. समोरच्या खेळाडूच्या जास्तीत जास्त सोंगट्या बाहेर करणे, किंवा त्याला चेकमेट करणे, हा खऱ्या अर्थाने या खेळाचा उद्देश असतो. ज्यावेळी समोरील संघाच्या राजाच्या ठिकाणी कोणीही प्रवेश मिळवतो, त्यावेळी समोरचा प्रतिस्पर्धी हा डाव पराभूत होत असतो.
बुद्धिबळ खेळण्याचे नियम:
मित्रांनो, बुद्धिबळामध्ये विविध प्रकारच्या सोंगट्या असतात, आणि या प्रत्येक प्रकारच्या सोंगट्याना चालवण्यासाठी विविध नियम बनवण्यात आलेले आहेत.
- राजा केवळ एकदाच कास्ट करता येऊ शकतो.
- राजा व हत्ती यांना एकत्रित बांधले जाऊ नये.
- इतर सैन्य बाहेर गेले तरी देखील राजा पराभूत होता कामा नये.
- राणी कोणत्याही दिशेने कितीही चौरस चालू शकते.
- हत्ती केवळ उभा किंवा आडवा अशा दोनच दिशेने चालू शकतो, त्याला तिरपे चालता येत नाही.
- उंट हा तिरप्या स्वरूपात कितीही लांबपर्यंत चालू शकतो.
- घोडा हा अडीच घरांनी कोणत्याही दिशेला चालू शकतो. अडीच घरे म्हणजे दोन घरे समोर व एक घर आडवे होय. हा आकार इंग्रजी मधील एल सारखा असतो.
- प्यादे म्हणजे या खेळातील सैनिक समजले जातात, ते केवळ एकच चौरस चालू शकतात.
चेस अर्थात बुद्धिबळ या खेळाविषयी काही तथ्य:
मित्रांनो, बुद्धिबळ हा खेळ चतुरंग या भारतीय प्राचीन खेळापासून निर्माण करण्यात आला आहे असे सांगितले जाते. आणि या खेळाला हिंदी मध्ये शतरंज असे म्हटले जाते त्यामुळे या गोष्टीला दुजोरा मिळतो.
बुद्धिबळाच्या खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चाली केल्या जात असतात, ज्यांची संख्या सुमारे ५९४९ इतकी आहे. ज्यावेळी पुस्तके छापणे सुरू झाले, त्यावेळी जे दोन क्रमांकावर छापले गेलेले पुस्तक होते ते बुद्धिबळाबद्दलच लिहिलेले होते.
निष्कर्ष:
मित्रांनो, आजकाल बाहेर मैदानावर खेळणाऱ्या खेळांपेक्षा घरात खेळ खेळण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण आज काल प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची काळजी असते, आणि मैदानावर गेल्यानंतर मुलाला काहीही इजा किंवा दुखापत होईल असे त्यांना वाटत असते. यासाठी बुद्धिबळ हा अतिशय उत्तम पर्याय असून, यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा चांगला विकास होत असतो.
आजच्या भागामध्ये आपण बुद्धिबळ या खेळाविषयी संपूर्ण माहिती बघितली असून, यामध्ये या खेळाची उत्पत्ती कशी झाली, इतिहास काय आहे, या खेळाला खेळण्यांमध्ये काय उद्देश होता, तसेच या खेळाच्या नियमाविषयी माहिती देखील दिलेली आहे.
सोबतच काही बुद्धिबळाविषयीची तथ्य देखील बघितलेली असून, नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल, तसेच तुम्हाला देखील या बुद्धिबळ खेळाविषयी आवड निर्माण झाली असेल अशी आशा करतो.
FAQ
बुद्धिबळ या खेळाला इंग्रजी भाषेमध्ये काय म्हटले जाते?
बुद्धिबळ या खेळाला इंग्रजी भाषेमध्ये चेस या नावाने ओळखले जाते.
बुद्धिबळ या खेळाचा प्राचीन प्रकार किंवा स्वरूपात कोणत्या खेळाला समजले जाते?
बुद्धिबळ या खेळाचा प्राचीन प्रकार अर्थात स्वरूप म्हणून चतुरंग या खेळाला ओळखले जाते.
बुद्धिबळ खेळाच्या शोधाचे श्रेय कोणाला दिले जाते?
बुद्धिबळ या खेळाच्या शोधाचे श्रेय ग्रँड व्हिजियर सिसा बेन दाहीर यांना दिले जाते.
बुद्धिबळाला इतके महत्त्व का दिले जाते?
बुद्धिबळ हा बौद्धिक पातळीवर खेळला जाणारा खेळ असून, त्यामुळे खेळणाऱ्याच्या बुद्धीचा चांगला विकास होत असतो. तसेच विविध समस्या सोडवण्याची कला देखील येत असते. सोबतच कोणत्या प्रसंगी कसे निर्णय घेतले जावेत, सर्जनशील पणे कसा विचार करावा, तसेच निर्णय क्षमता कशी विकसित करावी, इत्यादी गोष्टींमध्ये फायदा होतो.
बुद्धिबळाचा मुख्य नियम काय आहे?
बुद्धिबळाचा मुख्य नियम म्हणजे कोणताही खेळाडू त्याच्या विरोधी खेळाडूने एक चाल खेळल्यानंतरच खेळू शकतो. एकावेळी एकच चाल खेळण्याची संधी दिली जाते, त्याचप्रमाणे विविध सोंगट्यांच्या किंवा कवड्यांच्या नियमानुसारच हालचाली केल्या जाव्यात.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बुद्धिबळ या खेळाविषयी इत्यंभूत माहिती बघितलेली असून, ही माहिती नेहमीप्रमाणेच तुम्हाला आवडली देखील असेल. त्यामुळे पटापट कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवताना, इतर मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून या माहितीच्या प्रसारामध्ये हातभार लावावा, ही विनंती.
धन्यवाद…!