झाडांची संपूर्ण माहिती Trees Information In Marathi

Trees Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पृथ्वीतलावर जीवन अस्तित्वात असण्यासाठी झाडांचा फार मोठा वाटा आहे. पृथ्वीवर जर झाडे नसतील तर इतर कुठलाही सजीव जिवंत राहणे निव्वळ अशक्य आहे. अखिल ब्रम्हांडामध्ये पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे, जेथे झाडे किंवा वनस्पती आढळून येतात. आणि ज्यामुळे येथे जीवन शक्य झालेले आहे. झाडांना भारतीय संस्कृतीमध्ये देव समजले जाते.

Trees Information In Marathi

झाडांची संपूर्ण माहिती Trees Information In Marathi

झाडांचे अनेक फायदे असले तरीदेखील सर्वात महत्त्वाच्या फायद्यामध्ये स्वच्छ ऑक्सिजनचा पुरवठा करणे, याचा समावेश होतो. ज्यामुळे प्रत्येक जीव जगू शकतो. झाडे हे हिरव्या रंगांमध्ये असतात, ज्यासाठी त्यांच्या पानांमधील क्लोरोफिल कारणीभूत असते. झाडांपासून मानवाला अनेक फायदे मिळतात, जसे की फर्निचर बनवण्यासाठी लाकूड, खाण्यासाठी फळे, जळणासाठी सरपन इत्यादी.

अनेक ठिकाणी झाडांना हिरव्या सोन्याच्या स्वरूपात संबोधले जाते. झाडांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, ते आपण कधीही विसरू शकत नाही.

आजच्या भागामध्ये आपण झाडांविषयी माहिती बघणार आहोत…

नावझाड
प्रकारसजीव
उपप्रकारवन्य झाड, फुलझाड, फळझाड इत्यादी.
मुख्य फायदेमानवासाठी स्वच्छ ऑक्सिजन
रंगमुख्यतः हिरवा

झाडांचे महत्त्व:

मित्रांनो, झाडांचे आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, हे प्रत्येक मनुष्य जाणतो. माणूस संपूर्णतः वृक्षांवरच अवलंबून असून, अगदी खाण्यापासून विविध ऐशोरामाच्या गोष्टींपर्यंत झाडांचा फारच उपयोग केला जातो.

भारतीय संस्कृती सह अनेक ठिकाणी झाडे देवाचे स्वरूप म्हणून ओळखले जातात. मानवाच्या प्रगती होण्यामध्ये झाडांचा फार मोठा वाटा आहे. अगदी अश्मयुगन कालावधीपासून मनुष्य आणि इतरही सजीव वनस्पतींवर अवलंबून असत.

काही झाडे मौल्यवान लाकडासाठी, तर काही झाडे औषधी वनस्पती साठी ओळखली जातात. इतर काही सात्विक फुलांसाठी व फळांसाठी देखील ओळखले जातात. झाडाच्या विविध प्रकारच्या वापरानुसार आणि त्याचे उपलब्धतेनुसार झाडांना वेगवेगळ्या किमती प्राप्त होतात.

उत्कृष्ट औषधी वनस्पतींमध्ये आवळा, तुळस, कडूनिंब यांसारख्या विविध झाडांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. पृथ्वीवर पडणारा पाऊस हा केवळ आणि केवळ झाडांमुळेच पडतो, असे सांगितले जाते. त्यामुळे अगदी प्रत्येक कार्यासाठी हव्या असलेल्या पाण्याची मानवा करीता उपलब्धता होते.

वनस्पतींचे इतर फायदे:

मित्रांनो, वनस्पती मुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत मिळते. आज संपूर्ण जगभर प्रदूषणाने मोठे थैमान घातलेले आहे. या प्रदूषणाला कमी करण्याचे कार्य झाडामार्फत केले जाते, मात्र आजकाल झाडांची संख्या कमी झाल्यामुळे आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे यामध्ये असमतोल निर्माण झालेला आहे.

मित्रांनो, अनेक लोकांसाठी झाडे ही उदारनिर्वाहाची साधने असून, त्यापासून बनवलेल्या फर्निचर, घरे, खेळण्या इत्यादी वस्तू, तसेच झाडापासून मिळवलेले मध, फळे, फुले, लाकूड यांसारखे उत्पादने विकून माणूस आपला उदरनिर्वाह करत आहे.

झाडांपासून पाने देखील बनवली जातात, त्यापासून वह्या पुस्तके यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे अगदी शिक्षणापासून देखील झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. झाडे आपल्याला सामाजिक, आर्थिक, भावनिक, शारीरिक या सर्वच प्रकारे मदत करत लाभ देत असतात.

झाडे तोडल्याने होणारे नुकसान:

मित्रांनो, झाडे फायद्याचे आहेत. मात्र जलद फायदा मिळवण्याकरिता काही लोक या वृक्षांची तोड देखील मोठ्या प्रमाणावर करत असतात. त्यामुळे जंगलाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहे. यामध्ये मानवाचा वैयक्तिक स्वार्थ आडवा येतो. मित्रांनो, जागा उपलब्ध होण्यासाठी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोडणी करण्यात येत आहे.

अनेक नवीन उद्योग उभारताना झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. ज्यामुळे झाडांची संख्या तर कमी होतच आहे, मात्र या कारखान्यामधून बाहेर पडणारे अनेक विषारी वायू आणि पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे.

झाडे तोडल्यामुळे मानवाला शुद्ध ताज्या हवेचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. याशिवाय तापमान वाढ ही समस्या देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मानवाला असह्य उकाडा जाणवतो.

झाडांच्या कमी होत जाणाऱ्या संख्येमुळे अनेक नैसर्गिक आपत्ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. ज्यामध्ये त्सुनामी, पूर, दुष्काळ, भूस्खलन, यासारख्या समस्या समाविष्ट आहेत.

दरवर्षी लाखो लोक उष्माघातामुळे मृत्युमुखी पडत असतात, आणि या उष्माघाताला रोखण्यासाठी केवळ एकच दीर्घकालीन उपाय ठरू शकतो, आणि तो म्हणजे वृक्षांची संख्या वाढवणे होय. जेणेकरून हवेमध्ये गारवा टिकून राहील, आणि अशा घटना कमी होण्यास मदत होईल.

झाडांचा वापर:

मित्रांनो, झाडाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. या झाडांचा असा एकही भाग नाही, ज्याचा कुठलाही उपयोग नाही. खोडाचा उपयोग जळण्यासाठी किंवा फर्निचर करण्यासाठी, पानांचा उपयोग खत तयार करण्यासाठी, फुलांचा उपयोग अनेक ठिकाणी, आणि फळे खाण्यासाठी वापरली जातात.

त्याचबरोबर विशिष्ट झाडांचा विशिष्ट उपयोगाकरिता देखील वापर केला जातो. तसेच काही औषधे बनविणे, धागे मिळविणे, फर्निचर मिळवणे, सौंदर्यप्रसाधने मिळविणे, यांसाठी झाडे वापरले जातात. तर पिकवर्गीय वनस्पती अन्नधान्य पुरवण्याचे देखील कार्य करत असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, झाडे हे जीवन आहेत असे बऱ्याचदा आपल्या कानावर पडते. मात्र प्रॅक्टिकल आयुष्यात कोणीही फारसे झाडांचा विचार करताना दिसत नाहीत. आणि यामुळेच आजकाल झाडांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहे. यामुळे मानवाला अनेक नुकसानांना सामोरे जावे लागत आहे, ज्यामध्ये ग्लोबल वार्मिंग, ऑक्सिजनचा पुरवठा कमी, प्रदूषण, विविध रोगांच्या साथी, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण झाडांविषयी माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला झाडे म्हणजे काय, झाडांचे काय महत्त्व असते, वनस्पती पासून मिळणारे फायदे, झाड तोडल्यामुळे होणारे विविध नुकसान, झाडांचा वापर कशासाठी केला जातो, झाडापासून काय पोषण तत्वे मिळतात, इत्यादी गोष्टी बघितलेल्या आहेत. या सोबतच झाडांच्या विषयी विविध नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

झाड म्हणजे काय?

मित्रांनो, झाड म्हणजे कमीत कमी जमिनीपासून साडेचार फूट उंच, आणि कमीत कमी तीन इंच व्यास असणाऱ्या खोडाचे वृक्ष म्हणजे झाड होय. चार फुटापेक्षा उंच सर्व वनस्पतींना झाड म्हणून ओळखले जाते.

वनस्पती म्हणजे काय?

सर्व हिरव्या रंगाच्या झाडाझुडपांना वनस्पती म्हणून ओळखले जाते. मग ते लहान असो किंवा मोठे याचा काहीही फरक पडत नाही.

झुडूप म्हणजे काय?

झुडूप म्हणजे अशी वनस्पती, जी जमिनीलगतच वाढत असते आणि जमिनीपासून एक मुख्य खोड न येता अनेक बारीक बारीक खोड येत असतात. शक्यतो झुडूपे ही काटेरी असतात, जी फार उंच वाढत नाहीत.

झाडांचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व काय आहे?

झाडे ही मानवाला सर्वात आवश्यक असणारा प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात. आणि मानवाने सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडला स्वतःकडे साठवून ठेवत असतात, ज्यामुळे पर्यावरणामध्ये समतोल राहण्यास मदत मिळते. या सोबतच अनेक प्रकारचे प्रदूषण देखील दूर केले जातात. तसेच झाडांपासून मिळणारी विविध उत्पादने देखील मानवाच्या रोजच्या वापरामध्ये अतिशय उपयुक्त ठरत असतात.

वृक्षांची संख्या चांगली रहावी म्हणून काय केले जाते?

वृक्षांची संख्या योग्य प्रमाणात राहावी याकरिता दरवर्षी वृक्षारोपणाची कार्यक्रम घेतले जातात. तसेच सप्ताह देखील साजरा केला जातो. साधारणपणे एकूण भूभागाच्या ३३% भुभाग हा वनांनी किंवा झाडांनी अच्छादलेला असावा असे सांगितले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण झाडांविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती प्रत्येकाला आवडली असेलच, मात्र केवळ माहिती आवडून उपयोग नाही तर प्रत्येकाने झाडे लावून ती जगविले पाहिजेत. आणि झाड तोडण्यापासून रोखले पाहिजे. तेव्हा या माहितीचा खरा फायदा झाला असे म्हणता येईल. मित्रांनो तुम्हाला झाडांविषयी काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहून, सर्वांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा. आणि इतरांना देखील हा लेख नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment