Koyna Dam Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला नेहमी पाण्याची आवश्यकता भासत असते. त्यासाठी सतत आपल्याजवळ पाणी असणे गरजेचे ठरते, म्हणूनच पाणी साठवून ठेवण्याचा अनेक पद्धती विकसित झालेल्या आहेत. यातील एक पद्धत म्हणजे धरण बांधणे होय.
कोयना धरणची संपूर्ण माहिती Koyna Dam Information In Marathi
महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमध्ये गणल्या जाणाऱ्या धरणाचे नाव म्हणजे कोयना धरण होय. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये असणारे हे धरण कोयनानगर, चिपळूण आणि कराड या दरम्यान वसलेले आहे. थोडक्यात पश्चिम घाटांमधील हे धरण अतिशय प्रसिद्ध धरण आहे.
महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या कोयना या नदीवर हे धरण बांधलेले असून, याची भिंत काँक्रीट पासून तयार करण्यात आलेली आहे. विद्युत निर्मिती हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेल्या या धरणाचा वापर सिंचन सुविधासाठी देखील केला जातो. जे पश्चिम महाराष्ट्राला पाणीपुरवठा करण्याची कार्य करते. तसेच येथील आजूबाजूच्या परिसराला तयार झालेली वीज देखील पुरविण्याचे कार्य करत असते.
या कोयना धरणाला शिवाजी सागर तलाव म्हणून देखील ओळखले जाते. याचे पानलोट क्षेत्र सुमारे पन्नास किलोमीटर पर्यंत लांब आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्याद्वारे या धरणावर विद्युत निर्मितीचा प्रकल्प तयार करण्यात आलेला असून, पर्यटनासाठी देखील हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. याच धरणाच्या जवळ नेहरू गार्डन देखील आहे. ज्यामुळे येथे पर्यटकांची फार मोठी गर्दी असते.
आजच्या भागामध्ये आपण कोयना या धरणाबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | कोयना |
इतर नाव | शिवसागर तलाव |
प्रकार | धरण |
साधारण उंची | १०३ मीटर |
विजनिर्मिती क्षमता | १९६० मेगा वॅट |
स्थापना | १९६४ |
पाणी साठवण क्षमता | ९८.७७ टी एम सी |
भौगोलिक स्थळ | कोयना नगर, सातारा, महाराष्ट्र |
मालकी | महाराष्ट्र शासन |
मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भारतातील मोठ्या धरणांमधील एक धरण म्हणून कोयना या धरणाला ओळखले जाते. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगांमध्ये स्थित असलेल्या या धरणाची निर्मिती कोयना नदीवर करण्यात आलेली आहे.
ज्याला काँक्रीटच्या भिंतींनी संरक्षित करण्यात आलेले आहे. पश्चिम घाटाच्या कराड चिपळूण महामार्ग दरम्यान या धरणाचा सुंदर देखावा आपल्याला बघायला मिळतो.
कोयना धरणाच्या निर्मिती मागील कारण:
मित्रांनो, कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्यामागे भक्कम कारण असावे लागते. तसेच कोयना धरणाच्या निर्मिती करिता देखील कारण आहे.
यातील मुख्य कारण म्हणजे जलविद्युत निर्मिती करणे आहे, कारण या धरणाचे क्षेत्र नैसर्गिकरीत्या उंचीवर असल्यामुळे तेथे जलविद्युत निर्मिती करणे खूपच फायदेशीर ठरते. त्याचबरोबर या धरणामध्ये साठवण्यात आलेल्या पाण्याचा जलसिंचनाकरिता अधिक मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचे मुख्य कार्य असणाऱ्या जलविद्युत निर्मिती क्षमतेमुळे त्याला महाराष्ट्राची भाग्यरेखा किंवा जीवनरेखा इत्यादी नावांनी ओळखले जाते.
एकूण सहा रेडियल दरवाजे असणाऱ्या या धरणाला मध्यभागी एक स्पील वे देखील बनविण्यात आलेला आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पूर व्यवस्थापनाकरिता हे धरण खूपच महत्त्वपूर्ण ठरते. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर हे नाव असून, ज्याचा पल्ला सुमारे पन्नास किलोमीटर लांब पर्यंत आहे. या धरणाची निर्मिती स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात करण्यात आलेली असून, येथे वीजनिर्मिती करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अर्थात एम एस ई बी यांनी स्वीकारलेली आहे.
कोयना धरणाची काही तथ्य:
- कोयना या धरणाची निर्मिती कोयना नदीवर करण्यात आलेली असून, त्याच्या जलाशयाला शिवसागर म्हणून संबोधले जाते.
- पश्चिम घाटात असलेल्या या धरणामुळे जलविद्युत निर्मिती, जलसिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र चिंताहीन झालेला आहे.
- या धरणाचे भौगोलिक स्थान महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
- या धरणापासून सुमारे १९२० मेगा वॅट वीज निर्मिती केली जाते.
- भारतातील सर्वात मोठा आणि पूर्णपणे कार्यरत असणारा जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना जलविद्युत प्रकल्पाला ओळखले जाते.
- कोयना परिसरामध्ये १९६७ या वर्षी भूकंप झाला होता, त्यामुळे या धरणाच्या भिंतींना काही भेगा देखील पडलेल्या आहेत.
कोयना नदी बद्दल माहिती:
- मित्रांनो, कोयना नदी महाबळेश्वरला उगम पावून पुढे कृष्णेला मिळणारी एक उपनदी आहे.
- कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी होतो. या ठिकाणाला प्रीतीसंगम किंवा प्रेमाचा संगम म्हणून ओळखले जाते.
- कृष्णा कोयना संगमावर असलेले कराड हे शहर साखर उत्पादना करिता खूपच प्रसिद्ध आहे.
- कोयना नदीचा प्रवास उत्तर दक्षिण दिशेने होत असतो.
- कोयना ही नदी महाराष्ट्राचे जीवन रेखा म्हणून सुप्रसिद्ध आहे.
कोयना परिक्षेत्रातील वन्यजीव अभयारण्य:
मित्रांनो, कोयना धरण क्षेत्रामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य नावाचे एक संरक्षित क्षेत्र देखील तयार करण्यात आलेले आहे. ज्याचे स्थान पश्चिम घाटामध्ये असून, क्षेत्रफळ सुमारे ४२३.५५ चौरस किलोमीटर इतके आहे. या अभयारण्याची निर्मिती १९८५ यावर्षी करण्यात आलेली आहे. यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प देखील समाविष्ट आहे.
कोयना धरणावर कसे पोहोचावे:
मित्रांनो, तुम्ही पर्यटनाकरिता कोयना धरणावर जाऊ इच्छित असाल, तर कोयना धरणापासून सर्वात जवळच्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही उतरू शकता. जे स्टेशन साताऱ्यामध्ये आहे. इथून ९० किलोमीटरच्या प्रवासाने तुम्ही कोयना धरणावर पोहोचू शकता. याशिवाय तुम्ही स्वतःच्या वाहनाने देखील कोयना धरणावर जाऊ शकता, आणि तेथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेऊन चांगले पर्यटन अनुभव मिळू शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो, पाण्याचे महत्व जाणून पाणी साठवण्याचा अनेक पद्धती निर्माण करण्यात आल्या. ज्यामध्ये धरणाचा देखील समावेश होतो. इंग्रज राजवटीमध्ये अनेक धरणांची निर्मिती करण्यात आली, त्यामुळे भारताला सिंचन समृद्ध, वीजनिर्मिती समृद्ध, आणि पिण्याच्या पाण्याने समृद्ध होण्यास मदत मिळाली.
आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील मोठ्या धरणाबद्दल अर्थात कोयना धरणाबद्दल माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कोयना धरण नेमके आहे तरी काय, त्याची निर्मिती का करण्यात आली, त्याचा इतिहास काय आहे, याशिवाय कोयना नदी बद्दल माहिती, धरण बांधण्याची प्रक्रिया, येथे जवळच असणारे वन्यजीव अभयारण्य, जवळील शहर, या ठिकाणी कसे पोहोचावे, इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. याशिवाय काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
कोयना धरणाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
कोयना धरणाला शिवसागर तलाव या नावाने देखील ओळखले जाते.
कोयना धरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे व त्याची साधारण उंची किती आहे?
कोयना धरणाची स्थापना १९६४ या वर्षी करण्यात आलेली असून त्याची साधारण उंची सुमारे १०३ मीटर इतकी आहे.
कोयना धरणाची वीजनिर्मिती क्षमता आणि पाणी साठवण क्षमता अनुक्रमे किती आहे?
कोयना धरणाची वीजनिर्मिती क्षमता १९६० मेगावॅट तर पाणी साठवण क्षमता ९८.७७ टी एम सी इतकी आहे.
कोयना धरणातील वीज निर्मिती प्रकल्प कोणी स्थापन केलेला आहे?
कोयना धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्प हा टाटा समूहामार्फत उभारला गेलेला आहे.
कोयना धरणाशी भूकंपाचा काय संदर्भ आहे?
मित्रांनो १९६७ यावर्षी कोयनानगर भागामध्ये मोठा भूकंप झाला होता, आणि यामुळे कोयना धरणाच्या भिंतीला काही प्रमाणात तडे पडलेले होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कोयना धरणाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जाणून घ्यायला फार आवडेल. तसेच आमच्या वाचकांपैकी कोण कोण या धरणाच्या जवळ राहते किंवा लाभक्षेत्रामध्ये राहते हे जाणून घ्यायला फार आवडेल. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून तुम्ही त्यांच्या देखील ज्ञानामध्ये भर टाकू शकता.
धन्यवाद…!
Excellent