Kasturi Rangan Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भरारी घेतल्यानंतर या क्षेत्रामध्ये अनेकांनी आपले करिअर केलेले आहे. ज्यामध्ये कृष्ण स्वामी कस्तुरी रंगन यांचा देखील समावेश होतो. भारतीय अवकाश शास्त्रज्ञ अशी ओळख असणारे कृष्ण स्वामी रंगन हे राज्यसभेचे सदस्य देखील होते. त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिलेले असून, १९९२ या वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देखील दिलेला आहे.
कस्तुरी रंगन यांची संपूर्ण माहिती Kasturi Rangan Information In Marathi
१९९४ ते २००३ या कालावधीमध्ये त्यांनी इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे अध्यक्ष पद देखील भूषवलेले आहे. त्याचबरोबर भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले होते. आजच्या भागामध्ये आपण या कृष्ण स्वामी कस्तुरी रंगन यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | कृष्णस्वामी कस्तुरी रंगन |
ओळख | भारतीय शास्त्रज्ञ |
पद | भारतीय अंतराळ संशोधन संस्था व भारतीय नियोजन आयोग चे अध्यक्ष |
जन्म दिनांक | २० ऑक्टोबर १९४० |
जन्मस्थळ | केरळ मधील एरणाकुलम |
पुरस्कार | पद्मभूषण, पद्मविभूषण, आणि पद्मश्री |
कृष्ण स्वामी कस्तुरी रंगन यांचे प्रारंभिक जीवन:
सुमारे नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी करिता भारतीय अंतराळ संस्थेचे शास्त्रज्ञ व अध्यक्ष राहिलेले डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन, यांचा जन्म २० ऑक्टोबर १९४० या दिवशी केरळच्या एरणाकुलम या ठिकाणी झाला होता. त्यांनी भारतीय संसदेच्या राज्यसभेमधून देखील कार्य केलेले आहे.
२००४ या वर्षी त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज या ठिकाणी संचालक म्हणून नेमण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना भारत सरकारने १९९२ या वर्षी पद्मविभूषण, १९८२ या वर्षी पद्मभूषण तर १९८२ या वर्षीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून देखील कार्य केलेले असून, २७ ऑगस्ट २००३ या दिवशी त्यांनी आपले इस्त्रोचे अध्यक्ष पद सोडले होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी इस्त्रो या संस्थेमध्ये एक प्रभावी नेतृत्व म्हणून आपली कारकीर्द केली होती.
भारताने प्रक्षेपित केलेल्या आय आर एस वन ए या रिमोट सेन्सिंग उपग्रहांमध्ये त्यांची फार मोलाची भूमिका होती. त्याचबरोबर त्यांनी भास्कर १ व भास्कर २ यासारख्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांमध्ये देखील प्रकल्प संचालक पदी कार्य केलेले आहे.
डॉक्टर कस्तुरी रंगन यांनी आपली विज्ञान शाखेतील पदवी बॉम्बे विद्यापीठातून मिळवली होती, येथे त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी घेतलेली असून, १९७१ या वर्षी त्यांनी खगोलशास्त्र विषयांमधील पीएचडी अर्थात डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. त्यावेळी ते अहमदाबाद मधील भौतिक संशोधन प्रयोगशाळा या ठिकाणी काम करत आहे.
भारताने पी एस एल व्ही, जी एस एल व्ही यांसारखे अनेक उपग्रह प्रक्षेपण वाहन तयार केलेले आहेत. यामध्ये डॉक्टर कस्तुरी रंजन यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.
डॉक्टर कस्तुरी रंगन यांचे शैक्षणिक आयुष्य:
मित्रांनो, डॉक्टर कस्तुरी रंगन हे लहानपणापासूनच अभ्यासामध्ये फार हुशार होते, त्यांनी आपले शिक्षण सुरुवातीला माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालय येथून पूर्ण केले होते. तसेच आपली भौतिकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवलेली होती.
पुढे १९७१ या वर्षी अहमदाबाद मधील भौतिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये नोकरी करतानाच, त्यांनी डॉक्टरेट ही पदवी देखील मिळवली. जी खगोलशास्त्र या विषयातील होती. त्यासाठी त्यांनी खगोलशास्त्र विषयातील सुमारे २४४ पेक्षाही अधिक शोध निबंध प्रकाशित केले होते.
कस्तुरी रंगन यांचे विविध क्षेत्रातील योगदान:
मित्रांनो, इस्त्रो सारख्या संस्थेमध्ये डॉक्टर कृष्ण स्वामी कस्तुरी रंगन यांनी मोलाची भूमिका बजावलेली असून, तिथे त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी अनेक उपग्रहांच्या निर्मितीमध्ये व विकासामध्ये देखील कार्य केलेले असून इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे देखील संचालक होते. भारताने सर्वात प्रथम तयार केलेल्या पृथ्वी निरीक्षण प्रकारातील भास्कर १ व भास्कर २ या उपग्रहांमध्ये त्यांचा सहभाग होता.
डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांना मिळालेले विविध पुरस्कार:
मित्रांनो, डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरी रंगन यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये आपले भरीव योगदान दिलेले आहे. त्यासाठी त्यांना भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कारातील पद्मभूषण, पद्मविभूषण, आणि पद्मश्री हे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना विक्रम साराभाई प्रीत पुरस्कार दिलेला आहे.
सोबतच खगोलशास्त्रामध्ये दिल्या जाणारा एम पी बिर्ला स्मृती पुरस्कार, श्री एम एम चुगानी स्मृती पुरस्कार, एच के फिरोदिया विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार, यांसारखे अनेक पुरस्कार देखील त्यांनी पटकावले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये इंडियन नॉटिकल सोसायटीचा आर्यभट्ट पुरस्कार, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ फोटोग्राफी यांच्या मार्फत दिला जाणारा ब्रोक पुरस्कार, आणि फ्रान्सच्या थीओडोर वॊन कर्मन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे.
निष्कर्ष:
मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो या ठिकाणी अनेक लोकांनी कार्य करून आपल्या करिअरला एक वेगळी कलाटणी दिलेली आहे. त्यामध्ये कस्तुरी रंगन यांचा देखील समावेश होतो. त्यांनी इस्त्रोचे अध्यक्षपद भूषवलेले असून, आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी फार मोलाची कामगिरी बजावली आहे.
आजच्या भागामध्ये आपण या कृष्ण स्वामी कस्तुरी रंगन यांच्या बद्दल माहिती बघितलेली असून, त्यांच्या प्रारंभिक जीवन, शैक्षणिक जीवन यांसह यांनी विज्ञान क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल माहिती बघितली आहे. त्यासोबतच त्यांना मिळालेले विविध सन्मान, व पुरस्कार यांची देखील माहिती घेतलेली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेले कार्य देखील जाणून घेतलेले आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल, याबाबत कुठलीही शंका नाही.
FAQ
कस्तुरी रंगन यांचे संपूर्ण नाव काय आहे?
कस्तुरी रंगन यांचे संपूर्ण नाव कृष्णास्वामी कस्तुरी रंगन असे आहे.
कस्तुरी रंगन यांनी कोणच्या संस्थेचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे?
कस्तुरी रंगन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारतीय नियोजन आयोग या ठिकाणी अध्यक्ष पद भूषवलेले आहे. त्यांच्या नियोजन आयोगाला कस्तुरीरंगण आयोग या नावाने ओळखले जाते.
कस्तुरीरंगण आयोगामध्ये सदस्यांची संख्या किती होती?
कस्तुरीरंगण आयोगामध्ये सदस्यांची संख्या एकूण १२ होती, आणि या समितीची रचना एन सी एफ यांच्यामार्फत केली गेली होती.
कस्तुरी रंगन यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्षपद केव्हा भूषवले होते?
कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाची समिती ऑगस्ट २०१२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. ज्यावेळी गाडगीळ समितीने आपले अहवाल प्रकाशित केले होते, त्या अहवालाचे विश्लेषण करण्याकरिता या कस्तुरीरंगन समितीची स्थापना करण्यात आली होती.
कस्तुरी रंगन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणकोणते सन्मान मिळालेले आहेत?
कस्तुरी रंगन यांना इंटरनॅशनल सोसायटी ऑफ फोटोग्राफी तसेच रिमोट सेन्सिंग मधील ब्रोक मेडल हा पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर फ्रान्सच्या इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ ऍस्ट्रॉनॉटिक्स यांच्यामार्फत थिओडोर वॉन कर्मण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. यासोबत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांनी पटकावले आहेत.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कस्तुरी रंगन यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती घेतलेली आहे. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटते, तसेच या माहितीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये वाचायला नक्की आवडेल. सोबतच तुमच्या मित्रांना ही माहिती वाचायला मिळावी, याकरिता त्यांच्यासोबत देखील शेअर करा.
धन्यवाद…!