शेतीची संपूर्ण माहिती Agriculture Information In Marathi

Agriculture Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी भोजन करत असतो, मात्र हे भोजन मिळवण्याकरिता शेतकऱ्याला शेती करावी लागते. भारतामधील एक मुख्य व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या शेती व्यवस्थेला ओळखले जाते. तसेच भारताला कृषिप्रधान देश म्हणून देखील ओळख आहे, कारण भारतातील बहुसंख्य लोक शेती करत असतात. शेती एक आदर्श जीवनशैली जगण्याचा मार्ग असून, संपूर्ण देशाचा मजबूत पाया आहे. ज्यावर संपूर्ण देश दोन वेळच्या जेवणाची सोय करत असतो. संपूर्ण जगाचे पोट भरण्याकरिता एकमेव गोष्ट आवश्यक असते, आणि ती म्हणजे शेती होय. नाहीतर मानवाने केलेल्या कुठल्याही प्रगतीला किंमत उरत नाही.

Agriculture Information In Marathi

शेतीची संपूर्ण माहिती Agriculture Information In Marathi.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शेती या विषयावर माहिती बघणार आहोत.…

नावशेती
प्रकारव्यवसाय
मुख्य कार्यअन्नधान्य पिकविणे
कामपिके पेरणी, वाढविणे, कापणे, आणि त्यापासून अन्नधान्य निर्मिती करणे
व्यावसायिकशेतकरी
भौगोलिक ठिकाणखेडेगाव किंवा शेतजमिनी

शेती म्हणजे काय:

मित्रांनो, शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अनेक वन्य प्रजाती मानवाच्या अन्नधान्य उत्पादनाकरिता आणि इतर गरजांकरिता योग्य पद्धतीने, रूपाने उगविणे म्हणजे शेती होय. मानवाला आपल्या अस्तित्वासाठी शेती करणे फार गरजेचे आहे, कारण शेती हा असा एकमेव पर्याय आहे जेथून माणसाला अन्न निर्माण करता येऊ शकते. आणि आजकाल वाढत्या लोकसंख्येला अनुदानाचा पुरवठा होण्याकरिता शेतीचे फार महत्त्व आहे.

शेती म्हणजे केवळ पिकांची लागवड करणे, किंवा त्यापासून उत्पादन मिळवणे नसून, शेती ही एक खूप मोठी विस्तीर्ण संकल्पना आहे. यामध्ये अन्नधान्य पिके उगवण्याबरोबरच विविध जोडधंदे किंवा सहव्यवसायांचा देखील समावेश होतो.

कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हणून ओळखले जाते. ॲग्री या लॅटिन शब्दापासून अग्रिकल्चर हा शब्द बनलेला आहे.

थोडक्यात एका जमिनीच्या तुकड्यावर अन्नधान्य मिळवणे, आणि आर्थिक फायदा मिळवणे या उद्देशाने लावलेल्या वनस्पतींना योग्य रीतीने वाढवण्याच्या प्रक्रियेला शेती म्हणून संबोधले जाते.

भारतातील शेतीची वैशिष्ट्ये

मित्रांनो, जसा देश बदलेल त्याप्रमाणे शेतीच्या पद्धती, त्यातील वैशिष्ट्ये, आणि समस्या या गोष्टी देखील बदलत असतात. असेच भारतीय शेतीचे देखील काही वैशिष्ट्ये आहेत. ते आता आपण बघूया.

मित्रांनो, मानवाला उपजीविका मिळवण्याकरिता असणारा एकमेव स्त्रोत म्हणून शेतीकडे बघितले जाते. प्राथमिक उद्योग क्षेत्रामध्ये समाविष्ट असणारी ही शेती सुमारे ६१ टक्के लोकसंख्येद्वारे केली जाते, आणि देशाच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे २५ टक्के उत्पन्न केवळ शेती क्षेत्रातून येत असते.

भारतातील शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून पावसावर आधारित शेती समजली जाते, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

मित्रांनो, भारतामध्ये श्रम केंद्रित शेती करण्याकडे अनेकांचा कल आढळून येतो, कारण वाढत्या लोकसंख्येमुळे भारतीय शेत जमिनीचे तुकडीकरण झालेले आहे. आणि या छोट्या छोट्या शेत जमिनीमध्ये यांत्रिकीकरण करण्यासाठी वाव मिळत नाही. त्यामुळे आपोआपच श्रम केंद्रित शेती करावी लागते.

मित्रांनो, भारतीय शेती बऱ्याच प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्यामुळे, येथे हंगामी शेती केली जाते. उर्वरित हंगाम शेतकरी बेरोजगार असतो. हे देखील भारतीय शेतीचे एक वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.

जमिनीच्या तुकडीकरणामुळे भारतीय शेतकऱ्यांकडे जमीन धारणा क्षेत्र फारच कमी आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न देखील कमी होत जाते. आणि परिणामी ते कर्जाच्या विळख्यामध्ये अडकण्याची शक्यता देखील निर्माण होते.

भारतामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे पारंपारिक प्रकारच्या शेती करण्याला प्राधान्य दिले जाते. हे देखील एक भारतीय शेतीचे वैशिष्ट्य आहे.

भारतीय शेतीमध्ये इतर देशांच्या तुलनेत उत्पन्नाचे प्रमाण खूपच कमी असते, या उलट नॉर्वे, अमेरिका, युके यांसारख्या देशांमध्ये प्रति क्षेत्र आणि दरडोई उत्पन्न या दोन्ही गोष्टी खूपच जास्त आहेत.

वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्याकरिता भारतामध्ये अन्न पिकांचे वर्चस्व अधिक आढळून येते. मित्रांनो भारतातील एकूण लागवड खाली असणाऱ्या क्षेत्रांमध्ये सुमारे ७५ टक्के क्षेत्र हे बाजरी, ज्वारी, गहू, तांदुळ यांसारख्या अन्नधान्य पिकांना खाली आहे, तर उर्वरित नगदी पिके केवळ २५% क्षेत्रावर लागवडीत केली जातात.

भारतीय शेतीचा मुख्य जोडधंदा अर्थात पशुपालन:

मित्रांनो, भारतीय शेतीमध्ये केवळ पिके उगविणे इतकेच केले जात नसून जोडधंदांचा देखील सहारा घेतला जातो. सर्वात महत्त्वाचा जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाला ओळखले जाते. कारण या जोडधंदातून अनेक अंगांनी फायदा मिळवता येतो.

जसे की शेतीमध्ये निर्माण झालेल्या विविध उत्पादनाचे अर्थात कडबा किंवा गवत इत्यादींचे जनावरांकरिता चारा म्हणून वापर केले जातात. याशिवाय जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचा वापर जमिनीमध्ये खत म्हणून केला जातो, ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच त्यामध्ये अनेक आवश्यक घटक मिसळण्यास देखील मदत होते.

सोबतच पशुधनामुळे दुग्ध उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर केली जात असल्यामुळे, तिथून देखील अधिकचा फायदा उठवता येतो. याशिवाय शेळी सारख्या प्राण्यांचा वापर मांस उत्पादनासाठी सुद्धा केला जातो. त्यासोबतच कुकुट पालन हा देखील व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्यवसाय आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे आपण अनेकदा ऐकलेले असेल. मात्र कुठल्याही गोष्टीचा कणाच भरभक्कम नसेल तर मग मात्र फारच अवघड ठरते. मित्रांनो, आज भारत एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजकाल इथे सर्व लोकांना अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, आणि या सर्वांसाठी वाढत्या महागाईच्या तुलनेत अन्नधान्यांच्या किंवा शेती उत्पादनाच्या किमती न वाढणे हे कारण आहे. मित्रांनो शेती टिकवण्याकरिता शेतीमालाला योग्य दर मिळणे खूपच महत्त्वाचे ठरते.

आजच्या भागामध्ये आपण शेती या विषयावर माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळाले असतील, जसे की शेती म्हणजे काय, भारतीय शेतीची काय वैशिष्ट्ये आहेत, उपजीविका करण्याकरिता शेती स्त्रोत असू शकतो का, शेतीमधील विविध समस्या, शेतीचे विविध प्रकार, शेती सोबतचे जोडधंदे, इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. याशिवाय नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

शेती म्हणजे काय?

शेती म्हणजे योग्य रीतीने आणि पद्धतीशीरपणे पिके लावणी, त्यांना वाढविणे, आणि त्यांच्यापासून अन्नधान्य मिळवणे होय. शेती म्हणजे केवळ जमिनीवर केली जाणारी शेती नसून या संकल्पनेमध्ये अनेक जोडधंद्यांचा देखील समावेश होतो.

शेती सोबत केल्या जाणाऱ्या इतर जोडधंद्यांची नावे काय आहेत?

मित्रांनो, शेतीसोबत हमखास केला जाणारा मुख्य जोडधंदा म्हणून पशुपालनाला ओळखले जाते. यासोबतच मत्स्यपालन, मीठ उत्पादन, दुग्ध उत्पादन, झूम लागवड, गांडूळ खत निर्मिती इत्यादी प्रकारचे जोडधंदे केले जातात.

भारतीय शेतीमध्ये कोणकोणत्या समस्या उद्भवतात?

मित्रांनो, शेती क्षेत्राकडे झालेले दुर्लक्ष खूप मोठ्या समस्या निर्माण करत असते. जसे की दुष्काळ, बेरोजगारी, अल्प भूधारणा क्षेत्र, नवीन तंत्रज्ञानाचा अभाव, कमी उत्पन्न इत्यादी.

शेतीमध्ये बदल घडवून आणणाऱ्या हरितक्रांतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

मित्रांनो, शेतीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला कृषी वैज्ञानिक व आधुनिक शेतीचे जनक तसेच हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचे नाव नॉर्मन बोरलॉग असे आहे.

श्रम केंद्रित शेती म्हणजे काय?

मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांची भूधारणा क्षमता कमी झालेली आहे. परिणामी छोट्याशा क्षेत्रामध्ये अनेक लोक राबत असतात. आणि ज्यामध्ये यंत्रसामग्रीचा वापर फार क्वचित केला जातो, त्यामुळे त्याला श्रम केंद्रित शेती असे म्हणतात.

 मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शेती या विषयाबद्दल माहिती घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील आम्हाला अवश्य कळवा, आणि सोबतच तुमच्या घरी शेती आहे का, व शेती बद्दल तुम्हाला काय वाटते हे देखील कमेंट सेक्शन मध्ये अवश्य लिहा. सोबतच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment