वरळी किल्याची संपूर्ण माहिती Worli Fort Information In Marathi

Worli Fort Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पर्यटनामध्ये किल्ले बघायला आवडणारे अनेक लोक आहेत. किल्ला म्हटलं की आपल्याला डोंगराळ भाग आठवतो, मात्र तुम्हाला माहिती आहे का मुंबईसारख्या शहरांमध्ये देखील किल्ला असून यातील एका किल्ल्याचे नाव वरळी किल्ला असे आहे.

Worli Fort Information In Marathi

वरळी किल्याची संपूर्ण माहिती Worli Fort Information In Marathi

वरळी टेकडीवर वसलेला हा किल्ला खरे तर १६७५ च्या सुमारास इंग्रजांनी बांधला होता. मात्र अनेक ठिकाणी हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असल्याचे देखील उल्लेख आढळून येतो. मुंबई हे सात बेटांचे शहर, त्यातील माहीमच्या खाडीकडे तोंड करून असलेला हा किल्ला वरळीचा किल्ला प्रसिद्ध होता. या किल्ल्यावरून समुद्री चाचांची टेहळणी केली जात असे. म्हणून याला टेहळणी बुरुज असे देखील म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी कित्येक वर्षांपासून मुंबईच्या मच्छीमारांची वस्ती आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वरळी किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाववरळी किल्ला
प्रकारसमुद्री किल्ला
स्थापनावर्ष इसवी सन १६७५
स्थापना करणारेइंग्रज किंवा ब्रिटिश
किल्ल्याच्या टेकडीची उंचीसाधारणपणे एक ते दोन मीटर पर्यंत

मित्रांनो, मुंबईच्या एका उपनगरामध्ये स्थित असलेला हा वरळी किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा तर आहेच, याशिवाय मुंबईमधील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक देखील आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय चालतो. ब्रिटीशांद्वारे एका टेकडीवर या किल्ल्याची निर्मिती केली गेली होती, जिथून सागरी कारवायांवर लक्ष ठेवले जात असे.

अलीकडील काळामध्ये या ठिकाणी वांद्रे वरळी सी लिंक अर्थात समुद्री पूल तयार केला गेल्यामुळे, येथे पर्यटकांचे अधिकच आकर्षण वेधले गेलेले आहे. तसेच या पुलामुळेच वरळी किल्ल्यावर येणाऱ्या इतिहास प्रेमी, परदेशी, आणि विद्यार्थी यांच्यामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे.

मित्रांनो, हा किल्ला अनेक वर्ष दुर्लक्षित होता, तरी देखील वर्षानुवर्षे खराब हवामान आणि कुठल्याही प्रकारच्या जबाबदारी शिवाय अजूनही हा किल्ला अतिशय भक्कम आणि भव्य दिसत आहे. २००७ या वर्षी या किल्ल्याचे नूतनीकरण किंवा डागडुजी करण्यात आली, आणि तेव्हापासून काही खाजगी लोकांसह मुंबई महानगरपालिका देखील त्याची देखभाल काळजी घेत आहे.

मित्रांनो, हा किल्ला भेट देण्यासाठी नेहमी खुला आणि मोफत असतो. त्याच्या आसपास काही कोळी समाजातील बांधवांची वस्ती असून, तेथे आपण सहजतेने पायी देखील जाऊ शकतो.

या किल्ल्यावर जाणारी वाट मात्र अतिशय अस्ताव्यस्त असून, बऱ्यापैकी बंदिस्त जागेतून जात असते. पुढे लहान लहान पायऱ्या चढले की, या किल्ल्यावर आपण पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा अतिशय सुशोभित आणि कमान असलेला आहे. या किल्ल्यावर विहीर, हनुमानाचे मंदिर, व्यायामशाळा इत्यादी गोष्टी आढळून येतात. शिवाय या किल्ल्यावर प्रचंड मोठी मोकळी जागा देखील आहे.

या किल्ल्याला भेट दिल्यावर तुम्ही माहीमची खाडी, वांद्रे वरळी पूल इत्यादी ठिकाणे देखील बघू शकता. आणि त्याचा आनंद लुटू शकता. या ठिकाणी गेल्यानंतर समुद्राच्या थंड वाऱ्याची झुळूक तुम्हाला अनुभवता येते.

वरळी किल्ल्यावर कसे जावे:

मित्रांनो, वरळी किल्ल्याबद्दल तुम्हाला माहिती झाली असली, तरी देखील तिथे कसे पोहोचावे हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो. यासाठी तुम्ही विमान, खाजगी वाहने, ऑटो रिक्षा यांसारखे असंख्य मार्ग वापरू शकता.

तुम्ही या किल्ल्याला भेट देण्यासाठी विमानाने आला असाल, तर मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर तुम्ही कॅब, बस किंवा रेल्वे मार्गाने जाऊ शकता.

सांताक्रुज रेल्वे स्थानकावर बसल्यानंतर लोकलने दादर स्टेशन किंवा एल्फिस्टन्स रोड स्टेशन यापैकी कुठल्याही एका स्थानकावर उतरावे. पुढे तेथून तुम्हाला वरळी किल्ल्यावर जाण्यासाठी ऑटो रिक्षा मिळू शकतील. ऑटो रिक्षा ने तुम्हाला सोडल्यानंतर तुम्हाला अरुंद रस्त्याने गडावर जावे लागते, किंवा तुम्ही थेट कॅब च्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचू शकता.

वरळी किल्ल्यावर भेट देण्यासाठीची उत्तम वेळ:

मित्रांनो, काही अपवाद वगळता प्रत्येक पर्यटन स्थळ वर्षभर पर्यटकांसाठी खुले असतात. मात्र त्या ठिकाणी आनंद केवळ काही विशिष्ट वेळीच मिळत असतो. परळी किल्ल्यावर भेट देण्याकरिता ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत चा कालावधी अतिशय उत्तम समजला जातो. या काळामध्ये मुंबईचे हवामान देखील विलक्षण रित्या चांगले असते, शिवाय आद्रता देखील कमी असल्यामुळे तुम्हाला तेथे फारसा त्रास होत नाही.

या कालावधीमध्ये आकाशामध्ये कुठलेही ढग नसल्यामुळे संपूर्ण समुद्राचे वैभव, सूर्योदयाचे दृश्य, इत्यादी गोष्टींचा तुम्ही आनंद लुटू शकता.

वरळी किल्ल्यावर जाताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, त्या म्हणजे हा किल्ला केवळ सोमवार ते शनिवार आणि वेळेनुसार सकाळी पाच ते संध्याकाळी सात पर्यंतच खुला असतो.

या किल्ल्यावर पोहोचताना तुम्हाला माशांचा प्रचंड वास सहन करावे लागेल. तुम्हाला येथील आठवणी आपल्या सोबत कायमस्वरूपी साठी घेऊन जायचे असतील तर तुम्ही कॅमेरा घेऊन येणे उत्तम ठरते.

निष्कर्ष:

मित्रांनो, किल्ला म्हटलं की आपल्याला दगडी बांधकाम आणि अभ्यद्य रचना डोळ्यासमोर येते. बहुतेकांना किल्ला म्हटलं की डोंगराळ प्रदेशातील किल्ले आठवतात, मात्र मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी देखील एक किल्ला वसलेला असून, त्याचे नाव वरळी किल्ला असा आहे.

हा वरळी किल्ला समुद्री किल्ला असून, वरळीच्या टेकडीवर वसलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण या वरळी किल्ल्याबद्दल माहिती बघितली आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची माहिती वाचायला मिळाली. जसे की वरळी किल्ल्यावर कसे पोहोचायचे, येथे भेट देण्यासाठी ची सर्वोत्तम वेळ काय आहे.

किल्ल्याला भेट देण्यापूर्वी तुम्हाला काय माहिती आवश्यक असली पाहिजे, तसेच येथे भेट देण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स, इत्यादी माहिती बघितली आहे. यासोबतच काही महत्त्वाचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. या माहितीचा तुम्हाला नक्कीच पर्यटन करताना फायदा होईल, अशी आशा आहे.

FAQ

वरळी या समुद्र किल्ल्याचे महत्व कशाप्रकारे सांगितले जाते?

मित्रांनो, प्रत्येक किल्ला बांधण्यासाठी त्याचे वैयक्तिक असे काहीतरी महत्त्व असतेच. त्याचप्रमाणे १७ व्या शतकामध्ये ब्रिटिशांद्वारे बांधण्यात आलेला हा किल्ला, एक टेकडीवरील किल्ला असून, समुद्राच्या कडेला बांधलेला आहे. अनेक वर्ष चुकीच्या माहितीनुसार या किल्ल्याची निर्मिती पोर्तुगीजांनी केली असे सांगितले जात असे. मित्रांनो या किल्ल्याचे निर्मितीमागील महत्त्वाचे कारण म्हणून समुद्रावर लक्ष ठेवणे, आणि समुद्री चाच्यांना आळा घालणे हे होते. या किल्ल्याचा टेहाळणी बुरुज म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई.

वरळी किल्ला जिथे असलेला आहे, त्या वरळी ठिकाणाचे काय महत्त्व आहे?

मित्रांनो, मुंबईच्या जडणघडणीमध्ये वरळीचा फार मोठा वाटा आहे. ही वरळी अनेक चित्त थरारक दृश्यांसाठी व उंच सखल भागांसाठी प्रसिद्ध असून, वांद्रे वरळी यांना जोडणारा एक सागरी पूल येथील सौंदर्यामध्ये फारच भर घालत असतो. यासोबतच वरळी हे एक रोजगारासाठीचे केंद्र असून, या ठिकाणी दिवसभर अनेक कामगारांची ये जा सुरू असते.

वरळी किल्ल्याचा इतिहास काय सांगतो?

वरळी किल्ल्याच्या खऱ्या इतिहासानुसार या किल्ल्याचे बांधकाम १७ व्या शतकामध्ये ब्रिटिशांद्वारे केले गेले होते. आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे समुद्री चाच्यापासून संरक्षण करणे, आणि शत्रूंच्या चाहाजावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज म्हणून केले गेले होते. मात्र काही ठिकाणी असे देखील आढळून येते की, १६ व्या शतकामध्ये पोर्तुगीजांद्वारे हा किल्ला निर्माण केला गेला.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मुंबईसारख्या शहरी ठिकाणी वसलेल्या एका समुद्रकिनारपट्टीवरील किल्ल्याची माहिती बघितली. ज्याचे नाव वरळी किल्ला असे आहे. हा वरळी किल्ला व त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवश्य कळवा. तसेच तुम्ही जर या किल्ल्याला भेट दिली असेल, तर तेथील तुमचा अनुभव देखील नक्की नमूद करा. आणि सोबतच ज्या मित्रांसोबत तुम्हाला या किल्ल्यावर भेट द्यायला आवडेल त्यांना हा लेख नक्की शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment