मेकॅनिकल इंजिनिअरिंगची संपूर्ण माहिती Mechanical Engineering Information In Marathi

Mechanical Engineering Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो इंजीनियरिंग हे अतिशय नावाजलेले क्षेत्र आहे. दरवर्षी लाखो तरुण इंजीनियरिंग ची पदवी प्राप्त करून बाहेर पडत असतात. एका संशोधनानुसार २०१९ यावर्षी एक माहिती प्रकाशित केली गेली होती.

Mechanical Engineering Information In Marathi

मेकॅनिकल इंजिनिअरिंगची संपूर्ण माहिती Mechanical Engineering Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल माहिती बघणार आहोत…

नावमेकॅनिकल इंजिनिअरिंग
मराठी नावयांत्रिकी अभियांत्रिकी
प्रकारपदवी
कालावधीचार वर्ष
कार्यक्षेत्रमशिनरींच्या क्षेत्रामध्ये
पात्रताकिमान १२ वी अथवा समतूल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण
प्रवेश परीक्षासीईटी, जेईई

मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय:

मित्रांनो, अभियांत्रिकी शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा म्हणून यांत्रिकी अभियांत्रिकी अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ओळखले जाते. या क्षेत्रामध्ये मशीन तयार करण्यापासून, त्या कशा रीतीने डिझाईन कराव्यात, कोणत्या प्रकारचे तंत्र यामध्ये वापरावे, मशीन कसे कार्य करतात, इत्यादी मूलभूत गोष्टी शिकवण्याबरोबरच मशीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या तंत्राचे देखील शिक्षण दिले जाते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी ही अतिशय जुनी शाखा असून, आजच्या काळामध्ये मात्र त्याचे महत्त्व कुठेतरी कमी होताना दिसत आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर साठी करिअरच्या संधी:

मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनिअर होण्यापूर्वी त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या करियरच्या संधी जाणून घेणे फारच महत्वाचे ठरते. मेकॅनिकल इंजिनियर हे ऊर्जेचे हस्तांतरण, उत्पादनाच्या डिझाईन बनविणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, यासोबतच विविध मूलभूत सिद्धांत, गणित, रासायनिक शास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांमधील महत्त्वाच्या संकल्पना इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. त्यामुळे त्यांना अनेक क्षेत्रांमध्ये ज्ञान असते.

यासोबतच कुठल्याही कॉलेजला प्रवेश मिळवण्यापूर्वी त्या कॉलेजमध्ये शिकवले जाणारे विषय, शिकवण्याच्या पद्धती, तेथे राबवली जाणारे विविध संशोधन उपक्रम, आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळा, येथे होत असलेल्या इंडस्ट्री प्लेसमेंट, इत्यादी देखील माहिती असणे गरजेचे ठरते.

यांत्रिकी अभियांत्रिकी प्रवेश पात्रता:

मित्रांनो, प्रत्येक पदवीच्या वेगवेगळ्या पात्रता असतात. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअर होण्यासाठी देखील काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात.

या क्षेत्रामध्ये पदवी करण्याकरिता मान्यताप्राप्त बोर्ड कडून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. आणि यासाठी शास्त्र अर्थात विज्ञान शाखा निवडलेली असावी. या परीक्षेमध्ये कमीत कमी ५५% मार्क असणे अपेक्षित असते. मात्र यासाठी मेरिट लावली जाते, या मेरिटमध्ये येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडणे गरजेचे ठरते.

यानंतर तुम्हाला काही प्रवेश परीक्षा देखील द्याव्या लागतात, यामध्ये सीईटी आणि जे ई ई  या मुख्य परीक्षांचा समावेश होतो. या परीक्षेमध्ये मिळणाऱ्या मार्क नुसार तुम्हाला मेरीट लिस्ट मध्ये मिरीट नंबर दिला जातो.

जर तुम्हाला या क्षेत्रामधील उच्च शिक्षण घ्यायचे असेल, तर तुम्हाला पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान ५० टक्के गुण किंवा ३.० जी पी ए प्राप्त करणे क्रमप्राप्त असते.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करिअर करताना:

मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर कुठलाही पदवीधर उत्पादन क्षेत्र, मेकॅनिक्स, डिझाइनिंग, इत्यादी क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण देखील घेण्यासाठी सज्ज असतो. ज्या उमेदवारांनी बी टेक किंवा पीएचडी पर्यंत शिक्षण घेतले असेल, त्यांना नोकरी मिळण्यामध्ये अजूनच फायदा मिळत असतो. त्याचबरोबर नोकरी मिळवताना त्या क्षेत्रामध्ये अनुभव असेल, तर तुम्हाला उच्च प्रकाराचा नोकऱ्या दिला जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला इंटर्नशिप करणे फार गरजेचे ठरते.

या पदवीनंतर तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये कार्य करू शकता. ज्यामध्ये ऑटोमॅटिक अभियंता, एरोप्लेस अभियंता, इत्यादींचा समावेश असतो. ऑटोमॅटिक अभियंता हा रस्त्यावर धावणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांमध्ये कार्य करत असतो, तर एरोस्पेस अभियंता हा उपग्रह, विमाने, शस्त्रास्त्र वाहने, उपकरणे इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्य करत असतो.

त्याचबरोबर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम मध्ये इंजिनियर म्हणून देखील नियुक्त होता येते, ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जात असते. येथे असणाच्या विविध यंत्रांची देखभाल ठेवणे, त्यांच्या क्षमता तपासणे, कच्च्या मालानुसार योग्य प्रकारचे उत्पादन होत आहे का, यावर लक्ष ठेवणे, इत्यादी कामे करावी लागतात.

तुम्ही अभियांत्रिकी सल्लागार म्हणून देखील नियुक्त होऊ शकता, किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यानुसार विविध मोठ्या प्रकल्पांसाठी कोणकोणत्या क्षमतांचे यंत्र सामग्री आवश्यक असेल, त्याचप्रमाणे कुठे कोणती यंत्रसामग्री गरजेची आहे, याबाबत तुम्ही या प्रकल्पांवर भेटी देऊन सल्ला देऊ शकता. व त्या बदल्यात तुम्हाला पैसा देखील मिळू शकतो.

या सोबतच तुम्ही अनु अभियंता म्हणून देखील कार्य करू शकता. अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये स्थिरता ठेवणे, त्याचे पर्यवेक्षण करून, आरोग्य व सुरक्षितता अबाधित राखणे, इत्यादी कार्य तुम्हाला करावी लागत असतात.

याच बरोबरीने तुम्ही अनेक यांत्रिकी क्षेत्रातील तुमचे स्वतःचे व्यवसाय देखील सुरू करू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो, दरवर्षी लाखो तरुण इंजिनिअरिंग या क्षेत्राला प्रवेश घेत असतात. आणि त्याच पटीत अनेक तरुण इंजीनियरिंग करून बाहेर देखील पडत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून इंजिनिअरिंग मध्ये उमेदवारांचे प्रमाण वाढल्यामुळे, नोकरीची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे हे क्षेत्र नाहक बदनाम झालेले आहे.

मात्र तुम्ही योग्य अभ्यास करून, आणि चांगल्या गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केली तर तुम्हाला चांगल्या संस्थांमध्ये नोकरी करता येऊ शकते. किंवा अगदीच स्वतःचा व्यवसाय करणे देखील तुम्हाला शक्य होऊ शकते. आजच्या भागांमध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग याबद्दल माहिती बघितलेली आहे.

ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्यांना पुढे काय करिअर असते, त्यासाठी पात्रता काय आवश्यक असते, करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये केले जाऊ शकते, त्याचप्रमाणे कोणकोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत, इत्यादी माहिती बघितलेली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच करिअर बद्दल मार्गदर्शन मिळाले असेल, किंवा या क्षेत्राबद्दल ज्ञान मिळाले असेल अशी आशा आहे.

FAQ

मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला मराठी मध्ये काय म्हटले जाते?

मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला मराठी मध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी असे म्हटले जाते.

मेकॅनिकल इंजिनियर कशा संदर्भात कार्य करत असतात?

मेकॅनिकल इंजिनियर या नावामध्येच मशीन अर्थात यंत्रांच्या स्वरूपाचे कार्य समाविष्ट आहे. यंत्र कसे कार्य करतात, त्यांना कशा रीतीने बनविले जावे जेणेकरून कमीत कमी ऊर्जा वापरली जाईल, विशिष्ट काम करण्यासाठी कोणत्या प्रकारची यंत्र बनवावे लागेल, इत्यादी क्षेत्रामध्ये या मेकॅनिकल इंजिनियर चे काम असते.

मेकॅनिकल इंजिनियर  होण्यासाठी किती वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो?

मेकॅनिकल इंजिनिअर होण्यासाठी सुमारे चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

मेकॅनिकल इंजिनियर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपले करिअर करू शकतो?

मेकॅनिकल इंजिनियर अनेक क्षेत्रांमध्ये आपले करिअर करत असतो, ज्यामध्ये एरोस्पेस इंजिनियर, ऑटोमोटिव्ह इंजिनियर, यांत्रिकी सल्लागार, ऍटम इंजिनियर आणि मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम इंजिनिअर इत्यादी प्रकारचे करिअर समाविष्ट असतात.

मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर भविष्य आहे का?

मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही कशा रीतीने त्यामध्ये आपले योगदान देत आहात, यावर त्या क्षेत्रातील यश अवलंबून असते. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअर होण्यासाठी तुम्ही किती प्रमाणात कष्ट घेत आहात त्यावर आधारित तुमचे यश अवलंबून असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग याविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवतानाच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना जरासा वेळ काढून ही माहिती अवश्य शेअर करा. तसेच बारावी उत्तीर्ण होऊन या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना ही माहिती शेअर करून त्यांच्या निर्णयामध्ये एक मोलाची भूमिका बजवा.

धन्यवाद…!

Leave a Comment