एम पी एस सीची संपूर्ण माहिती MPSC Information In Marathi

MPSC Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पदवीच्या परीक्षेपर्यंत अगदी निश्चिंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी झाल्यानंतर भविष्यात काय करायचे हा प्रश्न उद्भवत असतो. त्यातही समाजातील अनेक लोक पुढे काय हा प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडत असतात. त्यामुळे विद्यार्थी वेगवेगळे क्षेत्र करियर म्हणून निवडत असतात. यातील एक क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षा होय. महाराष्ट्र मध्ये स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याचे कार्य एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत असते.

 MPSC Information In Marathi

एम पी एस सीची संपूर्ण माहिती MPSC Information In Marathi

या अंतर्गत शासकीय खात्यामध्ये विविध पदांसाठी जाहिराती काढल्या जातात. व परीक्षा आयोजित केली जाते. व त्यानुसार उमेदवारांना नोकऱ्यांचे वाटप केले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना राज्यघटनेच्या कलमांमध्ये आढळून येते. त्यासाठी कलम ३१५ देण्यात आलेले आहे.

या एम पी एस सी अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत असते. ज्यामध्ये पोलीस उपअधीक्षक, उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, यांच्याबरोबरच वर्ग एक, दोन, आणि तीन मधील पदे देखील भरण्यात येत असतात.

आजच्या भागामध्ये आपण या एम पी एस सी बद्दल माहिती बघणार आहोत…

नावमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
प्रकारसंविधानिक आयोग
राज्यघटना कलमकलम ३१५
घेतली जाणारी परीक्षामहाराष्ट्र राज्यपत्रीत व अराजपत्रित परीक्षा
भाषेचे माध्यमइंग्रजी व मराठी दोन्ही
परीक्षेचे टप्पेपूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मुलाखत

एमपीएससी म्हणजे काय:

एमपीएससी चे संपूर्ण रूप महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन असे असून, त्या अंतर्गत शासकीय पदांसाठी विविध प्रकारची भरती परीक्षा आयोजित करण्यात येते. एमपीएससी ही सरकार व उमेदवार यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा असून, त्या अंतर्गत पोलीस, प्रशासन, अभियांत्रिकी, वन, कृषी, यांसारख्या विविध क्षेत्रांकरिता एक उत्तम उमेदवार निवडता यावा, याकरिता परीक्षा आयोजित केल्या जात असतात.

एमपीएससीच्या अभ्यासक्रमांमध्ये कशाचा समावेश असतो:

मित्रांनो, एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे तीन टप्पे असतात. यात पूर्व, मुख्य, आणि मुलाखत या टप्प्यांचा समावेश असतो. पूर्व परीक्षा या सर्वसाधारणपणे एकाच प्रकारच्या अभ्यासक्रमावर घेतल्या जातात. ज्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होतो.

सामान्यज्ञान या विषयांमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, यांसह अनेक विषयांचा समावेश असतो. पूर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवाराला मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र समजले जाते. मुख्य परीक्षा करिता ज्या पदासाठी ही मुख्य परीक्षा देण्यात येणार आहे, त्या संदर्भातील विशेष अभ्यासक्रम पदानुसार वेगवेगळ्या असतो. आणि सरते शेवटी राज्यपत्रित पद असेल तर त्याकरिता मुलाखत देखील घेतली जाते. या मुलाखतीला विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमता तपासल्या जातात.

एम पी एस सी च्या परीक्षा देण्यासाठी आवश्यक पात्रता:

मित्रांनो, एमपीएससी ही परीक्षा देण्यासाठी पात्र होण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. या पात्रता पूर्ण केल्या तरच एमपीएससीची परीक्षा देता येते. त्यासाठी या आयोगाकडून काही मानके ठरवण्यात आलेली असून, अर्ज भरण्यापूर्वीच या मानकांची चाचणी केली जाते.

ही मानके पूर्ण असतील तरच फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्यामध्ये सर्वप्रथम उमेदवार हा भारत देशाचा रहिवासी असणे गरजेचे असते. अन्यथा परदेशी व्यक्ती अशा परीक्षा देऊ शकत नाही. जर उमेदवाराला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित प्रवर्गातील कास्ट सर्टिफिकेट अर्थात जातीचा दाखला आणि त्याचे वैधता प्रमाणपत्र असणे खूपच गरजेचे ठरते. अन्यथा अनारक्षित गटामधून परीक्षा द्यावी लागते.

एमपीएससीची परीक्षा देण्याकरिता वय हा खूपच महत्त्वाचा घटक समजला जातो. या परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे अठरा वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते, त्याचबरोबर जास्तीत जास्त उमेदवार वयाच्या ३३व्या वर्षे पर्यंत या एमपीएससी स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. मात्र किमान वय १८ ठेवले असले तरी देखील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता पूर्ण होण्याकरिता आपोआपच उमेदवारांचे वय २१ होत असते.

एमपीएससी साठी अर्ज करण्याची पद्धती:

मित्रांनो, आजकाल सर्वत्र ऑनलाईन प्रणाली राबवण्यात येत असल्यामुळे, एमपीएससी चा फॉर्म देखील ऑनलाइन स्वरूपात भरला जातो. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या एमपीएससी पोर्टलवर लॉगिन करून, तिथे तुमची नोंदणी करावी लागते. नोंदणी करिता तुम्हाला वैध ई-मेल व फोन नंबर ची आवश्यकता असते. त्यानंतर तुम्हाला अर्ज भरता येतो.

अर्ज भरताना उमेदवारांनी आपली स्वतःची वैयक्तिक माहिती योग्यरीत्या भरली पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक माहिती देखील काटेकोरपणे भरली पाहिजे. फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांना सोबत जोडावे लागते. त्यामध्ये तुमचा फोटो, व स्वाक्षरी यांचा देखील समावेश असतो. सर्वात शेवटी तुम्हाला द्यावयाच्या परीक्षा निवडून त्यांचे परीक्षा शुल्क भरावे लागते. अश्या रीतीने तुम्ही या परीक्षेकरिता अर्ज भरू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो, अनेकांना आपले आयुष्य सुखकर व्हावे असे वाटत असते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्यातरी क्षेत्रामध्ये करिअर करणे गरजेचे असते. अनेकांना आपण शासकीय खात्यामध्ये नोकरीला असावे, असे वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात.

शासकीय खात्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी एम पी एस सी करण्याचा मार्ग अनेक जण अवलंबत असतात. आज याच एम पी एस सी बद्दल आपण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये तुम्हाला एमपीएससी म्हणजे काय, त्या अंतर्गत कोणत्या परीक्षा घेतल्या जातात, त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो.

अभ्यास करण्यासाठीचे विविध मार्ग, परीक्षा देण्यासाठीच्या पात्रता, विविध जाहिराती, परीक्षा साठी लागणारे शुल्क, वेतन रचना कशी असते, यांसह परीक्षा विषयी देखील संपूर्ण माहिती बघितली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल, आणि तुमच्या करिअरला कलाटणी देण्यासाठी उपयुक्त असेल अशी आशा करतो.

FAQ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काय कार्य केले जाते?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे उमेदवारांना सरकारी आस्थापनांमधील नोकऱ्यांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्याचे कार्य करत असते. आणि त्या संदर्भातील निकालानुसार जागावाटप देखील करत असते.

एम पी एस सी करिता राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहे?

एमपीएससी करिता राज्यघटनेमध्ये कलम ३१५ देण्यात आलेले असून, त्या अंतर्गत या आयोगाने महाराष्ट्रातील विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा नुसार परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करावी असे सांगितलेले आहे.

एम पी एस सी केल्यानंतर साधारणपणे किती पगार मिळू शकतो?

मित्रांनो एमपीएससी मध्ये विविध प्रकारची पदे असतात, त्यानुसार पगाराचे प्रमाण बदलत असते. सोबतच नोकरीच्या कालावधीनुसार देखील या प्रकारांमध्ये बदल होत असतात. मात्र सर्वसाधारणपणे बघितल्यास ३८ हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत या उमेदवारांना पगार मिळू शकतो.

एमपीएससी परीक्षेचे कोणकोणते टप्पे असतात?

एमपीएससी परीक्षा ही राजपत्रित व अराजपत्रित अशा दोन प्रकारांमध्ये घेतली जाते. यातील राजपत्रित प्रकारांमध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखत तर अराजपत्रित प्रकारामध्ये केवळ पूर्व व मुख्य अशा दोनच परीक्षा घेतल्या जात असतात.

एम पी एस सी करण्याकरिता कोणते मुख्य चार विषय असतात?

एम पी एस सी करिता इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असतात. त्यातील सामान्य ज्ञान विषयांमध्ये पुन्हा अनेक उपविषय पडत असतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविषयी माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या माहितीतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही माहिती आवर्जून शेअर करा. धन्यवाद…!

Leave a Comment