टॅली कोर्सची संपूर्ण माहिती Tally Course Information In Marathi

Tally Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, आणि त्यामधील कुठल्याही सांखिक माहिती व्यवस्थितरित्या हाताळून त्यावर विविध प्रक्रिया करण्यासाठी काही सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम ची आवश्यकता असते. त्यातील एक सर्वोत्तम प्रोग्राम म्हणून टॅली या प्रोग्रामला ओळखले जाते. हा एक अकाउंटिंग प्रकारातील प्रोग्राम असून, कोणत्याही व्यवसायाच्या आर्थिक गोष्टींचे व्यवस्थापन करण्याकरिता या प्रोग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ज्यामध्ये वस्तूंच्या यादीपासून त्यावर झालेला खर्च, उत्पादन या संदर्भातील विविध माहिती नियंत्रित आणि व्यवस्थापित केली जाऊ शकते.

Tally Course Information In Marathi

टॅली कोर्सची संपूर्ण माहिती Tally Course Information In Marathi

या टॅली प्रोग्राम मधील कोर्स करून, तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगले करिअर देखील करू शकता. थोडक्यात टॅली करणे म्हणजे कंपनीच्या कुठल्याही सांख्यिकी माहितीचे आवक व जावक प्रमाण योग्य आहे का, ते व्यवस्थापित करणे होय. यामध्ये कंपनीच्या कॅश क्रेडिट, खर्च, उत्पन्न, विविध डिपॉझिट्स, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

टॅली हे सॉफ्टवेअर टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी द्वारे तयार करण्यात आलेले असून, जागतिक पातळीवर त्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे स्थित असून, त्यांच्याकडे विविध प्रकारच्या इतरही सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाते. आज घडीला सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये या सॉफ्टवेअरचा उत्तम वापर केला जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधी तुमच्या नक्कीच लक्षात येत असतील.

आजच्या भागामध्ये आपण या टॅली कोर्स बद्दल माहिती बघणार आहोत…

नावटॅली
प्रकारकोर्स
उपप्रकारसॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम
क्षेत्रसंगणक क्षेत्र
उप क्षेत्रअकाउंटिंग
वापरकंपन्यांमध्ये
निर्माताटॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

टॅली कोर्स करण्याचे फायदे:

मित्रांनो, टॅली हा लेखा किंवा अकाउंटिंग क्षेत्रातील एक अभ्यासक्रम कोर्स असून, या मार्फत तुम्हाला अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील नोकरी मिळू शकते. याबरोबरच याचे अनेक फायदे देखील आहेत, जे पुढे नमूद केलेले आहेत.

सर्वप्रथम, संगणक क्षेत्रातील कुठलाही कोर्स करायचा असेल, तर अशा उमेदवारांसाठी टॅली हा कोर्स अतिशय उत्तम आहे. कारण तो समजण्यासाठी अतिशय सोपा असून त्यासाठी कुठल्याही पूर्वज्ञानाची गरज पडत नाही. याशिवाय आपल्या जवळच्या संगणक प्रशिक्षण केंद्रावर हा कोर्स पूर्ण केला जाऊ शकतो.

उमेदवाराची भाषा हा कोर्स शिकण्यासाठी कधीही अडसर ठरणार नाही, कारण अनेक प्रकारच्या भाषांमध्ये हा टेली कोर्स उपलब्ध आहे.

टॅली हा कोर्स पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रातील प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी नवीन उमेदवारांना पैसे देऊन हे सॉफ्टवेअर खरेदी करण्याची गरज पडत नाही, कारण कंपन्यांमध्ये कार्य सुरू करण्यापूर्वी कोणीही विनामूल्य आवृत्ती घेऊन त्यावर प्रॅक्टिस करू शकतो. जेणेकरून कंपन्यांमध्ये गेल्यानंतर अडचणी येणार नाहीत.

टॅली कोर्स चा अभ्यासक्रम:

मित्रांनो, टॅली कोर्सचा अभ्यासक्रम हा पाच ब्लॉक मध्ये तयार करण्यात आला असून, त्यामध्ये डबल एन्ट्री अकाउंटिंग, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, व्यवसाय विश्लेषण, लेखा प्रणाली, इत्यादी विभागांचा समावेश होतो. यामध्ये तुम्हाला एन्ट्री कशी करावी, डेबिट किंवा क्रेडिट प्रकारच्या इंट्रीज वेगवेगळ्या कशा कराव्या, इत्यादी बेसिक ज्ञान देखील शिकवले जाते.

यासोबतच अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला टॅली या सॉफ्टवेअरचे विविध पैलू काय आहेत, युजर इंटरफेस कसा असतो, व रिपोर्टिंग कसे करावे, इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. तसेच यामध्ये आर्थिक विवरणपत्रे देखील समाविष्ट असतात, ती वाचणे, समजून घेणे, इत्यादी गोष्टी देखील शिकवल्या जातात.

व्यवसाय विश्लेषणामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाबद्दल माहिती देऊन, विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांमध्ये टॅली कोर्स चे ज्ञान कसे वापरावे यांसारख्या गोष्टी शिकविल्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणून लेखाप्रणाली या अभ्यासक्रम प्रकाराला ओळखले जाते.

हा अंतिम विभाग असून, यामध्ये विविध कर व त्या संदर्भातील माहिती शिकवली जाते. ज्यामध्ये जीएसटी, व्हॅट, टी डी एस, यांसारख्या व्यवसाय पातळीवरील टॅक्स किंवा कार्याबद्दल माहिती दिली जाते. यासाठी विविध भारतीय लेखा मानके वापरले जातात, आणि भारतामध्ये या टॅक्सनुसार कशाप्रकारे बॅलन्स सीट बनवावे किंवा टॅली करावी या गोष्टी शिकविल्या जातात.

निष्कर्ष:

मित्रांनो, आयुष्यात कुठल्याही घटकाची बेरीज योग्य आली की, आपण सुटकेचा निःश्वास सोडत असतो. त्याचप्रमाणे कंपन्यांमध्ये देखील असते. जेव्हा कंपन्यांमध्ये आवक आणि जावक झालेल्या कुठल्याही गोष्टीची, मग तो पैसा असो, वस्तु असो, किंवा उत्पादने असो याची व्यवस्थितरित्या नोंद ठेवणे फार गरजेचे असते. आणि आवक व जावक यांचे प्रमाण योग्य आहे का, हे तपासणे महत्वाचे ठरते.

ही गोष्ट सोपी करण्यासाठी टॅली हे सॉफ्टवेअर निर्माण करण्यात आलेले असून, त्यामध्ये अनेकांना करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आजच्या भागामध्ये आपण या टॅली कोर्स बद्दल माहिती बघितली आहे. ज्यामध्ये तुम्हाला टॅली म्हणजे काय असते, ते विक्री, खरेदी, आणि खर्च यांचा मागवा कशा प्रमाणे ठेवते, टॅली या प्रोग्राम चा इतिहास काय आहे, हे कोर्स केल्याने काय फायदे मिळतात, त्यामध्ये काय शिकवले जाते, व पुढे करिअरच्या संधी काय आहे, इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

टॅली कोर्स नेमके काय आहे?

टॅली हा एक अकाउंट क्षेत्रातील सॉफ्टवेअरचा प्रकार असून,हे संगणक पद्धतीनुसार चालते. यामध्ये कंपन्यांच्या खरेदी, विक्री, आणि आवक- जावक इत्यादी गोष्टी व्यवस्थापित केल्या जात असतात.

टॅली मधील सर्वात महत्त्वाची कार्य काय आहेत?

मित्रांनो, टॅली मध्ये सर्वात जास्त महत्व हे अकाउंटिंग क्षेत्राला दिले जाते. अर्थात टॅली हे संपूर्ण रित्या अकाउंटिंग वरच अवलंबून आहे. यासोबतच त्यामध्ये अनेक विस्तृत कार्य प्रकार आहेत, ज्या मार्फत लेखा संदर्भातील अनेक कार्य सोप्या रीतीने केले जाऊ शकतात. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असते, तसेच उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर असते, अशा ठिकाणी या सॉफ्टवेअरचा चांगला फायदा होत असतो.

टॅली या सॉफ्टवेअर प्रोग्राम ची निर्मिती कोणत्या कंपनी द्वारे करण्यात आलेली आहे व ती कोठे स्थित आहे?

टॅली या सॉफ्टवेअर प्रोग्राम ची निर्मिती टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी द्वारे करण्यात आलेली असून, ही कंपनी सद्यस्थितीमध्ये बंगळूर या ठिकाणी स्थित आहे.

टॅली चे उपयोग कुठे कुठे होतात?

सर्वसाधारणपणे टॅली हे सॉफ्टवेअर माहितीची वर्गीकरण करणे, प्रकारानुसार वेगवेगळी करणे, माहितीचे व्यवस्थापन करणे, पैशासंदर्भातील नोंदी ठेवणे, यासोबतच प्रदान केलेला डेटा सुरक्षित आणि विश्वासार्हपणे स्टोअर करणे इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्य करत असते. सोबतच यामध्ये फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल देखील वापरला जातो.

टॅली कोर्स कुठे केला जाऊ शकतो?

मित्रांनो, टॅली हा कोर्स करण्यासाठी कुठल्याही महाविद्यालयामध्ये जाण्याची गरज नाही, अगदी आपल्या आसपासच्या संगणक प्रशिक्षण केंद्रावर, भारतात ज्या ठिकाणी एम एस सी आय टी किंवा टायपिंग या प्रकारचे कोर्स पुरविले जातात अशा ठिकाणी हा कोर्स केला जाऊ शकतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण टॅली या कोर्स बद्दल इत्यंभूत माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून त्यांना या कोर्स चे महत्व पटवून द्या. धन्यवाद…!

Leave a Comment