B.ed Degree Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थीच असतो असे आपण कुठेतरी ऐकले किंवा वाचले असेल. मग ते शालेय शिक्षण असो किंवा जीवनातील, प्रत्येक बाबींवरचे शिकणे नेहमी चालूच असते. मात्र शिकवणे हे देखील एक चांगले प्रोफेशन असून, अनेक जणांना यामध्ये करिअर करण्याची इच्छा असते.
बीएड पदवीची संपूर्ण माहिती B.ed Degree Information In Marathi
शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरिता अनेक लोकांची पसंती बी एड अर्थात बॅचलर ऑफ एज्युकेशन हा कोर्स करण्याकडे असते. शिक्षक व्हायचे असेल तर हा अभ्यासक्रम पूर्ण करणे खूपच महत्त्वाचे ठरते, कारण याशिवाय शाळेमध्ये शिकविणे शक्य नसते. भारतामध्ये ही पदवी करून अनेक लोक शिक्षक म्हणून नोकरी करत आहे, त्यामध्ये सरकारी किंवा खाजगी शाळांचा देखील समावेश आहे. आणि वेळेनुसार चांगला पगार देखील मिळवत आहेत.
मित्रांनो, पूर्वीच्या काळी अर्थात २०१९ पूर्वी बीएड ही पदवी नसेल तरीदेखील खाजगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकत होते. मात्र हल्ली शिकवण्याकरिता बीएड पदवी बंधनकारक करण्यात आल्यामुळे अनेक जुन्या शिक्षकांनी देखील या कोर्सला प्राधान्य दर्शविले आहे.
आजच्या भागामध्ये आपण बीएड या पदवी बद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | बी एड |
संपूर्ण रूप | बॅचलर ऑफ एज्युकेशन |
प्रकार | पदवी |
शैक्षणिक पात्रता | किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण |
करिअर | शैक्षणिक क्षेत्रामध्ये |
वय | पात्रता किमान २१ ते कमाल ४० वर्ष |
कालावधी | दोन वर्ष |
पॅटर्न | सेमिस्टर पॅटर्न |
मित्रांनो, ज्या उमेदवारांना शिक्षकी पेशामध्ये आपले करिअर करायचे असेल, त्यांच्यासाठी सर्वात उत्तम समजणारा कोर्स म्हणून बीएड या कोर्स कडे बघितले जाते. २०१९ पूर्वी या कोर्सची आवश्यकता नव्हती, मात्र आज हा कोर्स केल्याशिवाय शिक्षकी पेशा स्वीकारता येत नाही.
या कोर्सचा साधारण कालावधी दोन वर्षे असून, मुलांना कशाप्रकारे शिकवावे, त्यांच्याशी कसे वागावे, शिक्षण पद्धती काय असाव्यात, इत्यादी प्रकारचे शिक्षण या कोर्समध्ये देण्यात येते. या पदवीमध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांसोबत कशा रीतीने वागावे, आणि त्यांना अभ्यासाकडे जास्तीत जास्त कसे आकर्षित करावे, शाळेतील मुलांच्या विविध क्षमता, जसे की सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक, भावनिक, आणि कला तसेच आध्यात्मिक कशा रीतीने ओळखाव्या, व त्यांना कशा रीतीने प्रोत्साहन द्यावे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.
उमेदवारांना ज्या क्षेत्रामधील शिक्षक व्हायचे आहे, त्या क्षेत्रामधील परीक्षा प्राप्त असणे खूपच गरजेचे ठरते.
हा दोन वर्षांचा बीएड पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी प्रकारच्या शाळेमध्ये नियुक्त होऊन, शिकवू शकता. या क्षेत्रामध्ये मोठी व्याप्ती असून, अगदी शासकीय स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी शाळेमध्ये देखील शिक्षक होता येते. जेव्हा आर टी ई कायदा २००९ हा एप्रिल २०१० पासून लागू झाला, तिथून पुढे शिक्षकांसाठी अनेक आव्हाने उभी राहिली होती.
बीएड साठी पात्रता:
मित्रांनो, ज्या उमेदवारांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांनी बारावी शिक्षणानंतर त्यांना ज्या क्षेत्रात शिक्षक व्हायचे आहे त्यामधील पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे ठरते. त्यानंतर त्यांना बीएड साठी प्रवेश दिला जातो, मात्र पदवी परीक्षेमध्ये त्यांनी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असते.
या पात्रतेनुसार आपोआपच उमेदवाराचे वय २१ पेक्षा जास्त असते, त्यामुळे वयाची मर्यादा ही कमीत कमी २१ वर्षे तर जास्तीत जास्त ४० वर्ष इतकी ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला पाच वर्षाची सुट देखील मिळत असते.
बी एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा:
बीएड या कोर्ससाठी जास्त गर्दी नसल्यामुळे अनेक विद्यालय किंवा विद्यापीठ पदवीच्या गुणवत्तेवर आधारितच प्रवेश देत असतात. मात्र काही ठिकाणी यासाठी प्रवेश परीक्षा देखील आयोजित केली जाते. तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, त्यांच्या प्रवेश पद्धती नुसार तुम्ही तुमचा पुढील मार्ग निवडला पाहिजे.
बी एड साठी प्रवेश घेताना:
बीएड या कोर्स साठी तीन प्रकारे प्रवेश घेता येऊ शकतात, त्यामध्ये थेट प्रवेश घेतला जाऊ शकतो, किंवा पदवीची गुणवत्ता अथवा, प्रवेश परीक्षा यानुसार मिरीट पद्धतीने देखील प्रश्न मिळवता येतो. तुम्हाला थेट प्रवेश मिळवायचा असेल, तर त्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधून पुढील कारवाई पार पाडावी लागते. त्याचप्रमाणे प्रवेश परीक्षा द्यायची असेल तर त्या संदर्भात प्रवेश फॉर्म भरून गुणवत्तेवर आधारित प्रवेश घ्यावा लागतो.
बी एड कोर्स चे फायदे:
- शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करता येते.
- शिकविण्याची आवड असेल तर ती जोपासता येते.
- मुलांमध्ये अधिक काळ रमता येते.
- देशाचे भविष्य घडविण्यासाठी हातभार लावण्याचा आनंद मिळू शकतो.
बी एड नंतर करिअर:
मित्रांनो, बी एड नंतर तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता, ज्यामध्ये प्राचार्य, शिक्षक, खाजगी शिकवणी शिक्षक, शिक्षण सल्लागार, प्रशिक्षक, किंवा अभ्यासाचे साहित्य निर्माता इत्यादी क्षेत्र तुमच्यासाठी खुली असतील.
निष्कर्ष:
मित्रांनो, शिक्षण घेत नाही असे मुले सापडणे अतिशय दुरापास्त आहे. अगदी हातावर मोलमजुरी करून जगणाऱ्या लोकांना देखील शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे, आजकाल अनेक मुले शाळेत जात आहे. त्यामुळे शाळांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि आपोआपच शिक्षकांची गरज देखील भासत आहे. याकरिता उत्तम शिक्षक निर्माण होणे काळाची गरज आहे.
बी एड कोर्स करून अनेक लोक शिक्षण क्षेत्रामध्ये आपले करिअर यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत. आजच्या भागामध्ये आपण या बी एड कोर्स बद्दल संपूर्ण माहिती बघितली असून, त्यामध्ये बीएड म्हणजे काय, त्यासाठी काय पात्रता आवश्यक असतात, प्रवेश कसा घ्यावा, प्रवेश परीक्षा बद्दल माहिती, अभ्यासक्रम काय असतो, कालावधी किती असतो, त्याचप्रमाणे बी एड करण्यासाठीचे उत्तम कॉलेज कोणते आहेत, या कोर्स ने काय फायदा होतो, आणि या कोर्स नंतर नोकरी मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावेत, इत्यादी सर्व माहिती बघितलेली आहे. त्याशिवाय काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरली असेल, अशी आशा आहे.
FAQ
बी एड या पदवी अभ्यासक्रमाचे संपूर्ण रूप काय आहे?
बीएड अभ्यासक्रमाचे संपूर्ण रूप बॅचलर ऑफ एज्युकेशन असे आहे.
बी एड अर्थात बॅचलर ऑफ एज्युकेशन हा कोर्स साधारणपणे किती कालावधीचा असतो?
बॅचलर ऑफ एज्युकेशन हा कोर्स दोन वर्ष कालावधीचा असतो, ज्यामध्ये पॅटर्न हा सेमिस्टर प्रकारचा असून, सेमिस्टर ची संख्या चार इतकी असते.
बीएड हा कोर्स करण्यासाठी साधारणपणे शैक्षणिक पात्रता काय आवश्यक असते?
बीएड हा कोर्स करण्यासाठी साधारणपणे शैक्षणिक पात्रता ही बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. तुम्हाला ज्या क्षेत्रातील शिक्षक व्हायचे आहे त्या क्षेत्रातून तुम्ही बारावी परीक्षा पूर्ण केलेली असावी, जसे की विज्ञान, कला किंवा वाणिज्य.
बी एड कोर्स साठी वयाची काही मर्यादा आहे का?, व असेल तर किती?
बीएड हा कोर्स करण्यासाठी वयाची मर्यादा असून, ती किमान २१ वर्षे तर कमाल ४० वर्षे इतकी आहे.
बी एड नंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर केले जाऊ शकते?
बीएड हा कोर्स शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असून, या कोर्सनंतर तुम्ही खाजगी किंवा सरकारी शाळेमध्ये शिक्षक होऊ शकता. त्याचप्रमाणे स्वतःच्या खाजगी शिकवण्या देखील सुरू करू शकता.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बीएड या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून, त्यांना देखील या क्षेत्राबद्दल माहिती कळू द्या.
धन्यवाद…!