गोदावरी नदीची संपूर्ण माहिती Godavari River Information In Marathi

Godavari River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये नदीला जीवनदायी किंवा माता म्हणून ओळखले जाते. नदी मानवाच्या प्रगतीमध्ये एक महत्त्वाचे संसाधन म्हणून वापरली जाते. त्यामुळेच पूर्वीच्या काळापासून नदीच्या किनारी वसाहती किंवा वस्त्या तयार होण्याचे प्रमाण जास्त आहे.

Godavari River Information In Marathi

गोदावरी नदीची संपूर्ण माहिती Godavari River Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण गोदावरी या दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या व प्रमुख नदी बद्दल माहिती घेणार आहोत, जिला दक्षिणगंगा म्हणून देखील ओळखले जाते. ही संपूर्ण भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी असून, दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. पश्चिम घाटामध्ये उगम पावणारी ही नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावत असते.

लांबीला सुमारे १४६५ किलोमीटर असणारी ही नदी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक जिल्ह्यांना उपयुक्त ठरत असते. गोदावरीला इंद्रावती आणि प्राणहिता नावाच्या दोन मोठ्या उपनद्या असून, अनेक छोट्या-मोठ्या उपनद्या देखील आहेत. महाराष्ट्रातून पुढे तेलंगणा आणि नंतर आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहणारी ही नदी राजमहेंद्री या ठिकाणांना जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते.

नावगोदावरी
प्रकारनदी
एकूण लांबी१४६५ किलोमीटर
महाराष्ट्रातील लांबी६६८ किलोमीटर
पाण्याचा प्रवाहप्रति सेकंद तीन हजार पाचशे पाच घनमीटर
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळसुमारे ३ लाख १२ हजार ८१२ चौरस किलोमीटर अर्थात महाराष्ट्राच्या अर्धे क्षेत्रफळ
मुखबंगालच्या उपसागरामध्ये
राज्यमहाराष्ट्र, तेलंगणा, व आंध्र प्रदेश

गोदावरी या नदीची ऐतिहासिक माहिती:

मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास जवळपास महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या अर्धे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक महत्त्व देखील प्राप्त आहे.

एक दंतकथेनुसार ज्यावेळी महर्षी गौतम यांना रुद्र प्रसन्न पावले होते, व या प्रभावामुळे केसातून अर्थात जटामधून गंगा वाहू लागली होती. या पाण्याने अर्थात गंगाजलाने मृत गाईचे पुन्हा जिवंत स्वरूप दिसून आले होते, त्यामुळे गौतम ऋषींच्या नावावरून तिला गोदावरी असे नाव देण्यात आले. ऋषी गौतम यांच्याशी संबंध असल्यामुळे तिला अनेक ठिकाणी गौतमी या नावाने देखील ओळखले जाते. गोदावरी मध्ये स्नान केले असता, माणसाची सर्व पापे निघून जातात व माणूस पवित्र होतो अशी देखील मान्यता आहे.

गोदावरी ही दक्षिणगंगा नावाने ओळखली जात असून, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ब्रह्मगिरीच्या डोंगरांमध्ये हिचा उगम होतो. तिचे उगमाचे ठिकाण सुमारे १०६७ मीटर उंच असून, पुढे १४६५ किलोमीटरचा मोठा प्रवास करून ती राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळत असते.

गोदावरी ज्या ठिकाणी उगम पावते त्या त्र्यंबकेश्वर येथे भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे या नदीला मोठ्या प्रमाणावर धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

गोदावरी नदीची सद्यस्थिती:

मित्रांनो, उगम पावल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून वाहत पुढे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या या नदीचे खोरे किंवा पाणलोट क्षेत्र मध्य प्रदेश, कर्नाटक, उडीसा, आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये देखील काही प्रमाणात आढळून येते. शेती क्षेत्रासाठी वरदान ठरलेली ही नदी महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी आहे.

गोदावरी नदीवरील महत्त्वाचे प्रकल्प:

मित्रांनो, महाराष्ट्राचे सर्वात मोठी नदी असल्यामुळे या नदीवर अनेक प्रकल्प बांधण्यात आलेले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश राज्यात उभारण्यात आलेले पोलावरण जलसिंचन प्रकल्प प्रसिद्ध आहे. यासोबतच या नदीवर कलेश्वरम सिंचन प्रकल्प, सदरमत आणि अनिकट नावाचे निचरा प्रकल्प प्रसिद्ध आहेत. ज्यावेळी गोदावरी आणि इंद्रावती नद्यांचा संगम होतो, तिथून पुढे १२ किलोमीटर अंतरावर इंचमपल्ली नावाचा एक प्रकल्प असून, तेलंगणामध्ये देखील श्रीराम सागर प्रकल्प आहे.

 महाराष्ट्र मध्ये या नदीवर घंटाघर, जायकवाडी आणि गंगापूर यांसारखे प्रकल्प आहेत. त्याशिवाय काही लहान प्रकल्प देखील आहेत. या विविध प्रकल्पांवर कालवे तयार केल्यामुळे, शेतीसाठी या नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

गोदावरी नदीला सद्यस्थितीमधील धोका:

मित्रांनो, गोदावरी नदी असो किंवा दुसरी कोणती नदी असो आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रदूषणाने आपले साम्राज्य उभारलेले आहे. आणि या वाढत्या प्रदूषण आणि लोकसंख्येमुळे गोदावरी नदी देखील धोक्यात आलेली आहे. कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषक पाणी या नदीमध्ये सोडले जात असल्यामुळे, पिण्यासाठी हे पाणी अतिशय खराब होत आहे. यासोबतच या नदीचे पाणी शेतीसाठी देखील उपयुक्त राहिलेले नाही, त्यामुळे या नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

गोदावरी नदी बद्दल मनोरंजक तथ्य:

मित्रांनो, गोदावरी नावाने प्रसिद्ध असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी दक्षिणगंगा किंवा गौतमी या नावाने देखील ओळखली जाते. गोदावरी नदीला अनेक उपनद्या मिळतात, यामध्ये मांजरा, इंद्रावती यांसारख्या नद्या प्रमुख आहेत.

गोदावरी नदीला धार्मिक स्वरूपाचे महत्त्व असून, तिच्या काठावर अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र उभारण्यात आलेले आहेत. यातील त्र्यंबकेश्वर, व पंचवटी, नाशिक ही खूपच महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा देखील भरत असतो.

राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी या नदीचे वितरिकांमध्ये रूपांतर होत असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, पाणी हे जीवन आहे आणि मानवाला रोजच्या वापराकरता मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी नदीवर अवलंबून राहावे लागते. म्हणून नद्यांना जीवनवाहिनी म्हणून देखील ओळखले जाते. दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी म्हणून गोदावरी नदीचा उल्लेख केला जातो. जिने महाराष्ट्रातील सुमारे अर्धे क्षेत्रफळ व्यापलेले आहे.

आजच्या भागामध्ये आपण गोदावरी या नदी बद्दल विशेष माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला गोदावरी नदीबद्दल इतिहास, तिची सद्यस्थिती, गोदावरी नदीला प्राप्त असलेले धार्मिक महत्त्व, तिच्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या विविध पौराणिक कथा, गोदावरी नदीवर बांधलेले विविध पाणी साठवण प्रकल्प, त्याचप्रमाणे गोदावरी नदीला पोहोचत असलेला धोका, आणि तिच्याबद्दल काही तथ्य रूप माहिती इत्यादी गोष्टी बघितल्या आहेत. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो?

गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र या ठिकाणी होतो.

गोदावरी नदी साधारणपणे किती किलोमीटर लांबीचा प्रवास करते?

गोदावरी नदी साधारणपणे महाराष्ट्र मधून ६६८ तर संपूर्ण प्रवासामध्ये १४६५ किलोमीटरचे अंतर पार करते.

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ किती आहे?

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ सुमारे ०३ लाख १२ हजार ८१२ चौरस किलोमीटर असून, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ते ४९ टक्के इतके आहे.

गोदावरी नदी कोणकोणत्या राज्यातून प्रवास करते?

गोदावरी नदी महाराष्ट्र मध्ये उगम पावल्यानंतर पुढे तेलंगणा या राज्यात प्रवेश करते, आणि तिथून आंध्र प्रदेश राज्यांमधून वाहत की बंगालच्या उपसागराला राजमहेंद्री आंध्र प्रदेश या  ठिकाणाजवळ मिळते.

गोदावरी नदी कोणत्या कारणास्तव प्रसिद्ध समजली जाते?

गोदावरी नदीला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले असून, तिच्या उगमा जवळच एक शिवमंदिर आहे. त्याचप्रमाणे पंचवटी, नाशिक, प्रवरा संगम, कायगाव टोके, इत्यादी धार्मिक स्थळे देखील या नदीच्या काठी वसलेली आहेत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गोदावरी या नदीविषयी इत्यंभूत आणि संपूर्ण माहिती बघितली असून, ही माहिती नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडली असेलच. तर मग पटापट कमेंट सेक्शन उघडून तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या, आणि तुम्ही देखील गोदावरी नदीच्या जवळील क्षेत्रामध्ये राहत आहात का? याबद्दल देखील दिलखुलास पणे सांगा. सोबतच गोदावरी नदी सोबत आठवणी असलेल्या तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद.…!

Leave a Comment