वटवृक्षाची संपूर्ण माहिती Banyan Tree Information In Marathi

Banyan Tree Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारत देशामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात. त्यामध्ये उंच वाढणाऱ्या वृक्षा पेक्षा पसरणाऱ्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. यातीलच एक वृक्ष म्हणून वडाच्या झाडाला किंवा वटवृक्षाच्या झाडाला ओळखले जाते. या झाडाची खासियत म्हणजे त्याच्या फांद्यांपासून खाली मुळे फुटतात. 

Banyan Tree Information In Marathi

वटवृक्षाची संपूर्ण माहिती Banyan Tree Information In Marathi

ती झाडाला आधार देत असतात. अशा रीतीने हे झाड अनेक फुटांपर्यंत वाढत असते. जोपर्यंत ही मुळे जमिनीला टेकत नाहीत तोपर्यंत अतिशय हळूहळू वाढतात, मात्र जमिनीला स्पर्श केल्या केल्या ते अतिशय झपाट्याने वाढायला लागतात. व मजबूत देखील होतात. आणि झाडांच्या इतर फांद्यांना आधार देत असतात.

आजच्या भागामध्ये आपण वटवृक्ष अर्थात वडाच्या झाडाविषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

नाववड
इतर नाववटवृक्ष
इंग्रजी नावबनयान ट्री
शास्त्रीय नावफिकस स्पेसिस/ बेंगेलेंसिस
पदवीभारतीय राष्ट्रीय वृक्ष
उंचीसुमारे २० ते २५ मीटर पर्यंत
महत्वधार्मिक महत्त्व

मित्रांनो, भारतामधील धार्मिक महत्त्व असणाऱ्या वृक्षांमध्ये वटवृक्षाचा समावेश होतो. अनेकांना माहीत नसेल, मात्र वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. ज्याला १९५० मध्ये भारतीय राष्ट्रीय वृक्षाच्या दर्जा देण्यात आला होता. संपूर्ण भारतभर वटवृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतो. आपल्या विस्तीर्ण सावलीसाठी या झाडाला ओळखले जाते. उन्हाळ्यामध्ये अनेक लोक वडाच्या झाडाखाली बसत असतात.

अनेक लोकांनुसार हे झाड खूप मोठे होऊ शकते. अगदी ८ ते १० हजार लोक देखील त्याच्या सावलीमध्ये सहज बसू शकतात. इंग्रजीमध्ये या वटवृक्षाला बनयान म्हणून ओळखले जाते, कारण पूर्वी बनिया लोक किंवा व्यापारी लोक व्यापार निमित्ताने प्रवास करताना या झाडाच्या सावलीखाली थांबत असत.

वटवृक्ष भारतासह शेजारील राष्ट्रांमध्ये देखील आढळून येतो. ज्यामध्ये म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांचा समावेश होतो. या झाडासाठी उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय हवामान चांगलेच मानवत असते. आणि ज्या राष्ट्रांमध्ये असे हवामान आढळून येईल, तिथे हे वृक्ष मोठ्या प्रमाणावर उगत असतात.

वटवृक्ष हा सदाहरित प्रकारचा वृक्ष असून, तो सुमारे २० ते २५ मीटर देखील उंच होऊ शकतो. त्याचे शास्त्रीय नाव फिकस बेंगालींसिस असे असून, अगदी मजबूत लाकडासाठी आणि टिकाऊ फर्निचर साठी या झाडाला ओळखले जाते. सोबतच धार्मिक व्यवहारांमध्ये देखील या झाडाच्या लाकडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे, सुरुवातीला एका फांदीच्या स्वरूपात उगणारे हे झाड हळूहळू मोठे होताना त्याला फांदीवर मुळ्या यायला लागतात, ज्याला पारंब्या म्हणून ओळखले जाते. ही मुळे हळूहळू जमिनीच्या दिशेने वाढत असतात, तोपर्यंत ती अतिशय लवचिक आणि संथ गतीने वाढत असतात.

मात्र जमिनीला टेकल्यानंतर या मुळांची वाढ अतिशय जलदरीत्या होते, तसेच ते भरभक्कम आणि टनक देखील होतात. जेणेकरून झाडाच्या फांद्यांना आधार दिला जाऊ शकेल. या पारंब्या येणे कधीच बंद होत नाही, त्यामुळे हे झाड कितीही मोठे होऊ शकते. ही नवीन मुळे देखील झाडाकरीता जमिनीतून पाणी आणि अन्न पदार्थ शोषून घेण्याचे कार्य करत असतात.

वडाची पाने अंडाकृती आकाराची असतात. व काहीशी जाडसर असतात. वरील बाजूने अगदी चकचकीत तर खालील बाजूने खडबडीत पृष्ठभाग असणारी ही पाने लांबीला पाच ते सात इंचापर्यंत वाढत असतात. त्यांचा रंग सुरुवातीला किरीमिजी असतो. जो पुढे जाऊन हिरवा होतो. या झाडाची पाने तोडली असता, त्यातून दुधासम पांढरा चिकट स्त्राव बाहेर पडत असतो.

वटवृक्षाचे फायदे:

मित्रांनो, वटवृक्ष अनेक शारीरिक व्याधींमध्ये गुणकारी आहे, असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. ज्यामध्ये सांधेदुखी या आजारासाठी याची पाने खूपच गुणकारी असतात, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे शरीरावरील सूज देखील कमी करण्यासाठी गुणकारी असतात. चेहऱ्यावर मुरूम किंवा फुटकुळ्या आल्या असतील तर त्यामध्ये देखील वटवृक्ष अतिशय गुणकारी समजला जातो.

मित्रांनो, दाताचे आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर वडाच्या मुळांनी दात घासावे. त्याचप्रमाणे केसांचे आरोग्य चांगले ठेवणे, आणि केसांना चमकदार करणे इत्यादी फायदे मिळवायचे असतील तर, वडाच्या झाडाची साल आणि पाने घेऊन त्याची पेस्ट तयार करावी, आणि डोक्यांना लावावी. यामुळे केसांमध्ये होणारे विविध संसर्ग देखील रोखले जाऊ शकतात.

वटवृक्षाचे तोटे:

मित्रांनो, वटवृक्षाचे अजून काही तोटे झालेले नसले तरी देखील दात घासण्यासाठी किंवा डोक्याला लावण्यासाठी याचा मर्यादित स्वरूपातच वापर करायला हवा.

केसांवर वटवृक्षाचा वापर करण्यापूर्वी त्वचारोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच गरजेचे ठरते, जेणेकरून तुमच्या केसांना ते सहन होईल की नाही याबाबत अंदाज बांधता येतो.

काही लोकांना वटवृक्षापासून मिळणाऱ्या चिकाची ऍलर्जी होऊ शकते.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची रेलचेल आहे, आणि या प्रत्येक वृक्षांची स्वतःचे काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे वटवृक्षाचे देखील एक वैशिष्ट्य असून, त्यानुसार वटवृक्ष आपल्या फांद्यांवरून पुन्हा मुळांची निर्मिती करत असते.

ज्या हळूहळू जमिनीच्या दिशेने वाढतात, आणि जमिनीला स्पर्श केल्या केल्या त्यापासून खोडाची निर्मिती होते, आणि हे त्यांना आधार देऊ लागते. आजच्या भागामध्ये आपण या वटवृक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला वटवृक्षाचे फायदे वाचायला मिळाले, तसेच तोटे देखील वाचायला मिळाले. सर्वात जुन्या, सर्वात मोठ्या, यांसारख्या विशेष वटवृक्षाविषयी देखील माहिती वाचायला मिळाली.

सोबतच वटवृक्षाच्या फायद्यामधील सांधेदुखीत फायदे, दात आणि हिरड्यांविषयी महत्त्व, आणि केसांच्या आरोग्यासाठीचे फायदे देखील बघितलेले आहेत. याचबरोबर काही नेहमी विचारले जाणाऱ्या प्रकारातील प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरलेली असेल अशी आशा आहे.

FAQ

वटवृक्षाला इतर नावे काय आहेत?

मित्रांनो, वटवृक्षाला वड या नावाने देखील ओळखले जाते. सोबतच इंग्रजी भाषेमध्ये याला बनयान ट्री म्हणून नाव आहे.

वटवृक्षाचा झाडाला फुले येत असतात का?

मित्रांनो, वटवृक्ष हा एक सजीव आहे. त्यामुळे त्याला नक्कीच फुले येतात. यातील नर फुले आणि मादी फुले अगदी स्पष्टरित्या ओळखली जाऊ शकतात. ही फुले पोकळ आणि नाशपतीच्या आकाराची असतात. यामध्ये पित्त फुले नावाची तिसरी फुले देखील असतात. जे स्टराईल असतात म्हणजेच यापासून बीज निर्मिती होत नाही.

वटवृक्षाचे महत्त्व काय आहे?

मित्रांनो, वटवृक्ष एक विशाल महाकाय वृक्ष असून, सर्व सजीवांना अनेक प्रकारे फायदेशीर ठरत असतो. अनेक पशु पक्षी या ठिकाणी आपले निवासस्थान बनवत असतात. त्यामध्ये कावळा, मुंगूस, मैना इतकेच नाही तर नागाचा देखील समावेश होतो. वटवृक्ष आणि खारुताई यांचे एक अतूट नाते आहे. या वृक्षावर खारुताई नेहमीच आढळून येत असते.

वटवृक्षाचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते?

मित्रांनो, एक वटवृक्ष सुमारे २०० वर्षापासून ५०० वर्षांपर्यंत जगू शकतो, असे सांगितले जाते. आणि यानुसार कलकत्त्याच्या वनस्पती उद्यानामध्ये एक वटवृक्षाचे झाड सर्वात जुने असून त्याचे वय सुमारे अडीचशे वर्षे आहे असे सांगितले जाते.

वटवृक्षाच्या आकाराबद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो, एक विशाल आणि महाकाय वृक्षांमध्ये वटवृक्षाचा समावेश होत असतो. या वृक्षाच्या आकाराची कल्पना करायची असेल, तर असे सांगितले जाते की या झाडाच्या सावलीमध्ये सुमारे आठ ते दहा हजार लोक सुद्धा बसू शकतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वटवृक्ष या भारताच्या राष्ट्रीय वृक्षाबद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नेहमीप्रमाणे कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना न विसरता हा लेख शेअर करा. जेणेकरून त्यांच्या देखील ज्ञानामध्ये भर पडेल.

 धन्यवाद…!

Leave a Comment