निलेश साबळे यांची संपूर्ण माहिती Nilesh Sable Information In Marathi

Nilesh Sable Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जण टीव्ही बघत असतात. त्यामध्ये मराठी वाहिन्या बघणार्‍यांची संख्या देखील प्रचंड आहे. मराठी वाहिनी वर एक हास्य कार्यक्रम प्रसिद्ध केला जातो, ज्याचे नाव सर्वांनाच माहिती असेल. आणि तो कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. या चला हवा येऊ द्या कार्यक्रम मुळे एक नाव संपूर्ण घराघरात पोहोचलेले आहे आणि ते म्हणजे निलेश साबळे होय.

Nilesh Sable Information In Marathi

निलेश साबळे यांची संपूर्ण माहिती Nilesh Sable Information In Marathi

निलेश साबळे हे एक चित्रपट अभिनेते असण्याबरोबरच, टेलिव्हिजन कार्यक्रम प्रस्तुत कर्ते देखील आहेत. त्यांनी महात्मा गांधी महाविद्यालय, दहिवडी या ठिकाणी आपले प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्र सुपरस्टार हा रियालिटी शो जिंकलेला असून, इथूनच त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी एक मोहर अबोल, होम मिनिस्टर, फु बाई फु यांसारख्या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये प्रसिद्धी मिळवली होती.

चित्रपटांबद्दल म्हणायचे झाले तर सर्वप्रथम नवरा माझा भवरा या चित्रपटातून त्यांनी, चित्रपटांमध्ये आपले पाऊल ठेवले होते. आज सर्वात जास्त लोकप्रिय असणारा कॉमेडी शो चला हवा येऊ द्या यामध्ये ते एक उत्कृष्ट होष्ट म्हणून कार्य करत आहेत.

आजच्या भागामध्ये आपण या निलेश साबळे यांच्या विषयी माहिती बघणार आहोत.

नावनिलेश साबळे
जन्म दिनांक३० जून १९८६
जन्म स्थळसासवड, महाराष्ट्र
२०२४ मध्ये वय३८ वर्ष
उंची५ फूट ८ इंच
वजन६० किलो
रिलेशन स्टेटसविवाहित
शिक्षणवैद्यकीय पदवी

निलेश साबळे यांचे प्रारंभिक व शैक्षणिक आयुष्य:

एक प्रसिद्ध अभिनेता, कार्यक्रमांचा होस्ट, आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असणारे निलेश साबळे हे एक मराठी अभिनय क्षेत्रातील उत्तम नाव आहे. दिनांक ३० जून १९८६ या दिवशी पुण्याच्या सासवड येथे जन्मलेले निलेश साबळे सध्याला ३८ वर्षांचे असून, आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी दहिवडी मधील महात्मा गांधी विद्यालय आणि महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे पूर्ण केलेले आहे.

पुढे त्यांनी आयुर्वेदिक क्षेत्रातील वैद्यकीय शिक्षण घेतलेले असून, त्यासाठी त्यांनी एम एस केदारी रेडकर आयुर्वेदिक महाविद्यालय निवडले होते. त्यांचे वडील हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत असून, त्यांच्या पत्नीचे नाव गौरी असे आहे.

निलेश साबळे यांचे करिअर:

मित्रांनो, निलेश साबळे यांनी जरी आपले शिक्षण वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेतले असले, तरी देखील बालपणापासूनच त्यांना अभिनयाचा आणि चित्रपट सृष्टीचा फार लळा लागलेला होता. २००५ यावर्षीच्या झी मराठी वाहिनीने प्रसारित केलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या लोकप्रिय कार्यक्रमामधून निलेश साबळे सर्वांसमोर सर्वप्रथम आले होते.

या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेऊन ती स्पर्धा जिंकली देखील होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा झी मराठी याच वाहिनीने प्रसारित केलेला होम मिनिस्टर या टेलिव्हिजन शोमधून दर्शकांना दर्शन दिले.

या कार्यक्रमात ते पाहुणे स्वरूपात होते. पुढे मराठी कॉमेडी शो अर्थात झी मराठी द्वारे प्रसारित केला जाणारा फु बाई फु या कार्यक्रमांमध्ये देखील त्यांना बघण्यात आले. या ठिकाणी अनेक भूमिका देखील वठवल्या. विविध स्केच देखील सादरीकरण केले, सोबतच कार्यक्रमाचे अँकरिंग करण्याबरोबरच ते या शोसाठी स्किट्स देखील लिहीत असत.

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील आपले नाव कमवलेले आहे. २०१३ या वर्षी आलेला मराठी चित्रपट नवरा माझा भवरा हा त्यांचा सर्वात पहिला चित्रपट होता. तेथे त्यांनी बाबू पवार ही भूमिका साकारली होती, जी एका वृत्त निवेदकाची होती. पुढे त्यांनी बुद्धिबळ नावाच्या अजून एका मराठी चित्रपटांमध्ये कार्य केलेले आहे.

पुढे फु बाई फु या शोचा सीजन संपल्यानंतर निलेश साबळे यांनी त्यांच्या अनेक सहकार्यांना एकत्र करून, स्वतःचा एक कॉमेडी शो सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वात पहिला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा एपिसोड त्यांनी भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत शूट करून प्रसारित केला होता.

पहिलाच भाग आल्यानंतर हा कार्यक्रम अतिशय गाजला, त्यामुळे निलेश साबळे यांना चांगले यश मिळाले. पुढे या कार्यक्रमांमध्ये अनेक कलाकारांची देखील एंट्री झाली. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी एक वेगळा पॅटर्न ठरवला होता, त्यामध्ये निलेश साबळे यांच्याद्वारे अँकरिंग देखील केली जात असे.

तसेच ते स्वतः स्किट्स लिहिन्यापासून या कार्यक्रमांमध्ये विनोद सादर करण्याबरोबरच विविध सेलिब्रिटी व्यक्तींच्या मुलाखती घेणे आणि सिनेमांची प्रमोशन करणे यादेखील गोष्टींचा समावेश होता. या कार्यक्रमाला अनेक प्रख्यात सिनेतारकांनी देखील भेट दिलेली आहे.

निलेश साबळे अँकरिंग करण्याबरोबरच मिमिक्री करण्यामध्ये देखील अतिशय तरबेज आहेत. त्यांनी आपल्या शोमध्ये अनेक प्रसिद्ध लोकांची मिमिक्री देखील केलेली आहे, ज्यामध्ये दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, प्रवीण तरडे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होतो.

निलेश साबळे यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. आणि आज तो अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सुमारे पाचशे भाग पूर्ण झालेले असून, या सर्वांचे श्रेय तो आपल्या टीमला देत असतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, प्रत्येक माणूस आपल्या कर्तृत्वाने ओळखला जात असतो. तसेच एक चांगला मराठी कॉमेडियन, आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणून निलेश साबळे यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्य केलेले असून, ते दिग्दर्शक, अभिनेता, आणि कार्यक्रमाचे होस्ट देखील आहेत. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या या निलेश साबळे यांच्या जीवनचरित्राबद्दल आज आपण जाणून घेतलेले आहे.

ज्यामध्ये त्यांचे वैयक्तिक जीवन आणि शैक्षणिक जीवन, यांच्या विषयी माहिती बघतानाच त्यांचे करियर आणि करिअरच्या सुरुवातीच्या संघर्ष याबद्दल देखील जाणून घेतले आहेत. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत, त्यामुळे निलेश साबळे यांच्या बद्दल आपल्याला बरीचशी माहिती मिळण्यास मदत झालेली असेल.

FAQ

निलेश साबळे यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता, व त्यांचे वय काय आहे?

निलेश साबळे यांचा जन्म ३० जून १९८६ या दिवशी झाला होता, आणि आज घडीला त्यांचे वय ३८ वर्ष इतके आहे.

निलेश साबळे यांनी आपले अभिनय क्षेत्रात चित्रपटसृष्टी मधील पदार्पण कोणत्या चित्रपटापासून केले होते?

निलेश साबळे यांनी आपले अभिनय क्षेत्रातील चित्रपटसृष्टी मधील पदार्पण नवरा माझा भवरा या चित्रपटापासून केले होते.

निलेश साबळे यांची उंची व वजन किती आहे?

निलेश साबळे एक बऱ्यापैकी उंच व्यक्ती असून, त्यांची उंची सुमारे ५ फूट ८ इंच इतकी आहे. यासोबतच त्यांचे वजन मात्र साधारणपणे ६० किलोच्या आसपास असते.

निलेश साबळे यांची वैवाहिक स्थिती काय आहे?

निलेश साबळे यांचे वैवाहिक स्थिती विवाहित अशी असून, त्यांच्या पत्नीचे नाव गौरी असे आहे.

निलेश साबळे यांनी कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले आहे?

निलेश साबळे यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले शिक्षण घेतलेले असून, हे शिक्षण त्यांनी गडहिंग्लज च्या एम एस केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, कोल्हापूर येथून घेतलेले आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण निलेश साबळे यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना ही माहिती पाठवून, त्यांना देखील त्यांच्या आवडीच्या कॉमेडी कलाकाराबद्दल माहिती कळू द्या.

धन्यवाद.…!

Leave a Comment