रावस मासाची संपूर्ण माहिती Salmon Fish Information In Marathi

Salmon Fish Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मांसाहारी लोकांचा आवडीचा पदार्थ म्हणून मासे ओळखले जातात. यामध्ये गोड्या पाण्यातील व खाऱ्या पाण्यातील मासे असे वेगवेगळे प्रकार पडत असतात. मात्र या दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये राहणारा मासा म्हणून रावस या माशाला ओळखले जाते. महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर रावस माशाची प्रजाती आढळून येत असते, आणि संपूर्ण जगभर या माशाला खूप आवडीने खाल्ले जाते.

Salmon Fish Information In Marathi

रावस मासाची संपूर्ण माहिती Salmon Fish Information In Marathi

या माशांचे प्रजननाचे एक वैशिष्ट्य असून, हे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर त्यांची अंडी घालत असतात. ही अंडी आपोआप उबत असतात, आणि अंडी दिल्यानंतर मासा मरत असतो. या माशांचा रंग फिकट गुलाबी असतो, तर क्वचित पांढरा देखील दिसू शकतो.

रावस माशाच्या काही प्रजाती लाल किंवा निळ्या रंगांमध्ये देखील आढळून येतात. त्यांच्या वयानुसार त्यांच्या रंगांमध्ये बदल होत जात असतो. लांबीला अगदी वीस इंचापासून तब्बल पाच फुटापर्यंत देखील हा मासा वाढतो. रावस माशातील सर्वात लहान मासा हा चेरी रावस तर सर्वात मोठा मासा चीनुक रावस म्हणून ओळखला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण रावस मासा याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावरावस
प्रकारमासा किंवा जलचर प्राणी
साधारण आयुष्यमानदोन ते सात वर्ष
पुनरुत्पादनाचा कालावधीतीन ते चार वर्ष
आढळस्थानपॅसिफिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर
रंगफिकट गुलाबी ते पांढरा
साधारण लांबीकिमान २० इंच ते कमाल पाच फूट

रावस मासा म्हणजे काय:

मित्रांनो, जगभर आढळणारी खाऱ्या आणि गोड्या अशा दोन्ही पाण्यामध्ये राहू शकणारी माशांची एक प्रजाती म्हणून रावस मासाला ओळखले जाते. तो त्याच्या असाधारण रंगाकरिता सर्वत्र प्रसिद्ध आहे. साधारणपणे पांढरा आणि गुलाबी या रंगाच्या छटा असणारा हा मासा काही वेळेला लालसर नारंगी रंगामध्ये देखील आढळून येतो. माशाला त्याचा रंगावरून नाव देण्यात आलेले असून, त्याच्या पृष्ठभागावरील थर हा चंदेरी रंगाचा असतो.

मात्र त्याची त्वचा स्वच्छ केल्यानंतर आपल्याला गुलाबी रंग स्पष्टपणे दिसून येतो. शक्यतो गोड्या पाण्यामध्ये अंडी घालवण्याकडे या माशाचा कल असतो. लांबीला कमीत कमी २० इंच वाढणारा हा मासा जास्तीत जास्त पाच फुटापर्यंत देखील वाढत असतो. आणि वजनाचा विचार केल्यास, जास्तीत जास्त ५७ किलो पर्यंत त्याचे वजन होऊ शकते.

रावस मासा खाण्याचे फायदे:

मित्रांनो, रावस मासा हा आरोग्यदायी मासा म्हणून ओळखला जातो. हृदयाच्या अनेक समस्यांसाठी या माशाचे सेवन करण्याचे सल्ले दिले जातात. अमेरिकन हार्ट असोसिएशन या संस्थेने हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या रुग्णांकरिता आठवड्यातून किमान एक वेळा तरी या माशाचे सेवन करण्याचा सल्ला दिलेला आहे.

जेणेकरून हृदयविकार आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्या टाळता येऊ शकतील. काही लोक आठवड्यातून दोनदा देखील या माशाचे सेवन करू शकतात, मात्र आपल्या आरोग्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवनाचे प्रमाण निश्चित करावे.

ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत असेल, त्यांच्यासाठी देखील रावस मासा खूपच फायदेशीर ठरवण्यात आलेला आहे अनेक लोकांनी या माशाच्या सेवनाने आपले वजन नियंत्रित केलेले आहे. कारण या माशाच्या मांसामध्ये कॅलरीचे प्रमाण अतिशय कमी असते. सोबतच पाणी आणि फायबर यांनी समृद्ध असलेला या माशाच्या सेवनामुळे माणसाला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत मिळते.

शरीरावर सूज आली असेल, किंवा जळजळ होत असेल अशा लक्षणांमध्ये रावस मासा खूपच प्रभावीपणे कार्य करत असतो. कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड्स आढळून येतात. जे दाहक विरोधी गुणधर्माचे असतात. त्यामुळे अशी समस्या आल्यास रावस मासा खाण्याचा उपाय सांगितला जातो, मात्र ही समस्या मोठी किंवा जास्त असेल तर वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे ठरते.

मित्रांनो, आज काल बुद्धिमत्तेच्या जोरावर अगदी जग देखील जिंकता येऊ शकते, आणि अशी मेंदूची कार्यक्षमता किंवा बुद्धिमत्ता वाढवायची असेल, तर नेहमी रावस माशाचे सेवन करावे असे सांगण्यात येते. आणि एन सी बी आय अर्थात नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांनी या गोष्टीला पाठिंबा देखील दर्शवलेला आहे. या माशांमध्ये अनेक घटक असतात, आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असते.

रावस मासा खाण्याबद्दल माहिती:

मित्रांनो, रावस मासा विविध प्रकारांमध्ये बनवून खाता येतो. काही लोक हा तळून खातात, तर काही करी डिश बनवतात. अनेक लोक वाफवून देखील या माशाचे सेवन करत असतात. विविध फास्ट फूड मध्ये पॅटीस च्या स्वरूपात देखील या माशाचे मांस वापरले जाते.

या माशाचे सेवन अगदी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही करता येते. मात्र सकाळी सेवन केल्यास अतिरिक्त फायदे दिसून येतात. मात्र या माशाचे सेवन किती प्रमाणात करावे यासाठी तुमच्या आहार तज्ञाला विचारणे गरजेचे ठरते.

रावस मासा खाण्याचे तोटे:

रावस मासा पकडण्यासाठी काही लोक रसायनांचा वापर करतात. मात्र असे रसायनांनी मारलेले मासे खाणे मानवासाठी धोकेदायक ठरू शकते.

कृत्रिम पद्धतीने पाळलेले मासे दूषित किंवा जीवाणू रहित आहेत का याबद्दल खात्री करून घेणे फार गरजेचे ठरते.

हा मासा शक्यतो ताज्या स्वरूपात खाल्ला जावा, कारण जास्त दिवस बर्फावर साठवलेले मासे अनेक शारीरिक व्याधीना निमंत्रण देत असते.

रावस माशाची एलर्जी असणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक या माशाचे सेवन केले पाहिजे. किंवा आपल्या फॅमिली डॉक्टर ला विचारून याबाबत निर्णय घेतला पाहिजे.

निष्कर्ष:

मित्रांनो, प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून माशांकडे बघितले जाते. मासे खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, असे आपण अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल. त्यामध्ये रावस मासा हा संपूर्ण जगभरातील लोकांच्या फारच आवडीचा आणि चवदार प्रकारातील मासा आहे.

आजच्या भागामध्ये आपण या रावस माशा विषयी विविध माहिती बघितली आहे, ज्यामध्ये रावस मासा म्हणजे काय, त्याचे आरोग्यदायी फायदे, हृदयाचा आरोग्यासाठी या माशाचे उपयोग, त्याचप्रमाणे वजन कमी करणे, सूज घालविणे, मेंदूची कार्यक्षमता वाढवणे, इत्यादी गोष्टींमध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा. इत्यादी माहिती बघितलेली आहे.

त्याचप्रमाणे या माशाचा वापर कसा करावा, हा मासा कधी खावा, व त्याचे प्रमाण किती असावे, याबद्दल देखील माहिती बघितलेली आहे. सोबतच या माशाच्या सेवनाचे तोटे देखील बघितलेले आहेत. आणि काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

रावस मासा साधारणपणे कुठे आढळून येतो, व त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते?

रावस मासा हा साधारणपणे उत्तर अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरामध्ये आढळून येतो. ज्याला इंग्रजीमध्ये सॅलमोन या नावाने ओळखले जाते.

रावस मासा साधारणपणे किती वर्षापर्यंत जगतो?

रावस मासा साधारणपणे किमान दोन वर्षे तर कमाल सात वर्षांपर्यंत जगत असतो.

रावस माशाच्या योग्य वाढीसाठी कोणत्या पाण्याची आवश्यकता असते?

रावस माशाच्या योग्य वाढीकरिता खारे आणि गोडे अशा दोन्ही प्रकारच्या पाण्याला उत्तम समजले जाते.

रावस माशाची कमीत कमी लांबी आणि जास्तीत जास्त लांबी किती असू शकते?

रावस माशाची कमीत कमी लांबी २० इंच इतकी असते, तर जास्तीत जास्त लांबी पाच फूट किंवा दीड मीटर इतकी असू शकते.

रावस मासा जास्तीत जास्त किती किलोग्राम वजनापर्यंत वाढतो?

रावस मासा जास्तीत जास्त ५७.२ किलोग्रॅम पर्यंत वाढतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण रावस मासा याच्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment