मदर तेरेसा यांची संपूर्ण माहिती Mother Teresa Information In Marathi

Mother Teresa Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सेवा हेच जीवन समजून अनेक लोकांनी समाजसेवेमध्ये आपले उभे आयुष्य खर्ची घातलेले आहे. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणून मदर तेरेसा यांना ओळखलेजाते. त्या कलकत्ता चर्च या ठिकाणी कार्यरत होत्या. त्यांना सेंट तेरेसा या नावाने देखील ओळखले जाते. या मदर तेरेसा यांचा जन्म ऑटोमन तुर्की साम्राज्यांमधील उसबुक येथे झाला होता.

Mother Teresa Information In Marathi

मदर तेरेसा यांची संपूर्ण माहिती Mother Teresa Information In Marathi

रोमन कॅथोलिक नन असणाऱ्या या मदर तेरेसांनी १९४८ मध्ये स्वतःच्या इच्छेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते. पुढे १९५० मध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची कोलकत्ता येथे त्यांनी स्थापना केली. सुमारे ४५ वर्ष त्यांनी अनेक लोकांना मदत करत निराधार, आजारी, मरणासन्न अवस्थेत असणारी लोक, आणि अनाथ यांना आश्रय दिला होता. त्या मिशनरीच्या माध्यमातून धर्मप्रसार देखील करत असत.

आजच्या भागामध्ये आपण मदर तेरेसा यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमदर तेरेसा
खरे नावएग्नेस गोंजा बोयाजीजू
जन्मदिनांक २६ ऑगस्ट १९१०
जन्म स्थळस्कोप्जे, मॅसेडोनिया
आई वडिलांचे नावनिकोला बोयाजु आणि द्राणा बोयाजु
मृत्यू दिनांक५ सप्टेंबर १९९७
भावंडांची संख्यादोन, ज्यामध्ये एक बहीण व एक भाऊ
धर्मकॅथोलिक ख्रिश्चन
कार्यमिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करून समाजसेवा

मदर तेरेसा यांचे प्रारंभिक आयुष्य:

मित्रांनो, २६ ऑगस्ट १९१० या दिवशी जन्माला आलेल्या मदर तेरेसा जन्माने ख्रिश्चन होत्या. त्यांना त्यांच्या धर्माचा फार अभिमान होता. त्यांचे वडील एक उत्तम व्यापारी, आणि खूप धार्मिक देखील होते. ते नेहमी न चुकता त्यांच्या घराच्या जवळ असणाऱ्या चर्चमध्ये जात असत.

त्यांच्या जन्मानंतर अवघ्या नऊ वर्षांनी मदर तेरेसा यांचे वडील देवा घरी गेले. त्यावेळी मदर तेरेसा आणि त्यांच्या इतर दोन भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. त्यांच्या आईंनी अनेक कौटुंबिक, आर्थिक अडचणींचा सामना करत या मुलांना लहानाचे मोठे केले. आणि अनेक चांगले संस्कार देखील दिले. लहानपणापासूनच कुठल्याही खाण्याची गोष्ट एकमेकांमध्ये वाटून खाण्याची सवय त्यांच्या आईने या तीनही मुलांमध्ये रुजवली होती.

मदर तेरेसा यांनी आपले शिक्षण पूर्ण करून, आईसोबत चर्चमध्ये गाणी म्हणायला सुरुवात केली. बारा वर्षांच्या वयामध्ये त्यांना धर्माविषयी खूपच अभिमान वाटू लागला. आणि त्यांनी धार्मिक प्रवास करण्याचे ठरविले.  या प्रवासामध्ये संपूर्ण जगभर सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला.

१९२८ यावर्षी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मदर तेरेसा यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून, डब्लीन येथे आपले वास्तव्य केले. त्यानंतर त्या कधीही घराकडे आल्या नाहीत. तिथूनच त्यांनी धर्माचा कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले, आणि स्वतःला सिस्टर मेरी तेरेसा हे नाव धारण केले.

मदर तेरेसा यांचे भारतामधील कार्य:

दिनांक ०६ जानेवारी १९२९ या दिवशी मदर तेरेसा आयर्लंड वरून कोलकाता येथे आल्या. त्यानंतर त्यांनी पटना येथे असणाऱ्या होली फॅमिली हॉस्पिटल या ठिकाणी नर्सिंगचे संपूर्ण प्रशिक्षण घेतले, आणि पुन्हा १९४८ यावर्षी कोलकत्ता मध्ये आपले वास्तव्य केले.

त्यानंतर त्यांनी १९४८ यावर्षी आजूबाजूच्या परिसरातील मुलांना शिक्षण घेता यावे, याकरिता एक शाळा स्थापन केली. जिला मिशनरीज ऑफ चारिटी म्हणून ओळखले गेले. पुढे रोमन कॅथोलिक चर्च यांनी दिनांक ७ ऑक्टोबर १९५० या दिवशी याला मान्यता देखील दिली.

मदर तेरेसा यांनी त्यांच्या मिशनरीच्या माध्यमातून आपल्या वयाच्या अखेरपर्यंत, अर्थात १९९६ पर्यंत सुमारे सव्वाशे देशांमध्ये अनेक निराधार निवारे उघडले. त्यांची संख्या सुमारे ७५५ इतकी होती. या अंतर्गत दररोज सुमारे पाच लाख लोकांना जेवण वाटप केले जात असे. त्यांनी अनेक आश्रमांची देखील स्थापना केली, त्यामध्ये निर्मला शिशु भवन, निर्मल हृदय इत्यादी प्रमुख होते.

मदर तेरेसा यांना मिळालेले विविध पुरस्कार:

मदर तेरेसा यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये पद्मश्री, नोबेल, भारतरत्न, यु एस ए चे स्वातंत्र्यपदक, ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, पॉप पाचवा शांतता पुरस्कार यासारख्या पुरस्कारांचा मुख्यतः समावेश होतो.

मदर तेरेसा यांच्या विषयी काही तथ्य माहिती:

मदर तेरेसा यांचे लहानपणीचे नाव किंवा खरे नाव अग्नेस गोंझा बोयाजीजू असे होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांनी खूप मोठे दुःख पचवलेले होते. त्यांच्या कुटुंबातील मदर तेरेसा या सर्वात लहान व्यक्ती होत्या, मात्र असे असले तरी देखील त्या सर्वात मेहनती आणि हुशार होत्या.

अगदी लहान वयापासूनच गरीब, निराधार, अनाथ किंवा मदतहीन लोकांना बघून त्यांचे हृदय पिळवटत असे. व त्यांना खूपच त्रास जाणवत असे. गरीब आणि दिनदुबळ्या लोकांना मदत करण्याची त्यांची इच्छा त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नव्हती. मदर तेरेसा यांनी सांगितलेले विविध प्रेरणादायी विचार आज देखील लोकांना प्रोत्साहित करत असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, मिशनरी संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रसार आणि मानव सेवा करणाऱ्या व्यक्ती म्हणून मदर तेरेसा यांना ओळखले जाते. त्यांना भारताने अनेक पुरस्कार देखील दिलेले आहेत. यामध्ये भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा देखील समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण मदर तेरेसा यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती बघितलेली आहे.

त्यामध्ये तुम्हाला त्यांचे बालपण, भारतामध्ये येण्याचा प्रवास, त्यांच्या मदत करण्याच्या सवयी, त्यांनी इतिहासात केलेले मिशनरी कार्य, त्यांच्यासोबत झालेले वाद, त्यांच्या मृत्यू बद्दल माहिती, इत्यादी गोष्टी देखील बघितलेल्या आहेत. यासोबतच त्यांनी कोलकत्याच्या चर्चमध्ये केलेले मिशनरी कार्य, विविध धर्मादाय मिशनरी संस्थांच्या स्थापना, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, यासोबतच इतर गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता व त्या कोणत्या दिवशी मृत पावल्या होत्या?

मित्रांनो, मदर तेरेसा यांचा जन्मदिवस २६ ऑगस्ट १९१० असून, त्यांचा मृत्यू दिवस किंवा निधनाचा दिवस ५ सप्टेंबर १९९७ हा आहे.

मदर तेरेसा यांचा धर्म कोणता होता?

मदर तेरेसा यांचा धर्म कॅथोलिक ख्रिश्चन असा होता.

मदर तेरेसा कशासाठी प्रसिद्ध आहेत?

मदर तेरेसा या त्यांनी दाखवलेल्या करुणा आणि दया या तत्त्वांसाठी प्रसिद्ध असून, त्यांनी अनेक गरीब लोकांना मदत केलेली आहे. त्या सतत निराधार लोकांची काळजी घेत असत, व त्यांना मदत करत असत.

मदर तेरेसा यांनी भारतामध्ये येऊन काय कार्य केले?

मित्रांनो, भारतामध्ये अनेक लोक वंचित आहेत हे त्यांना माहिती झाल्यामुळे त्यांनी भारतातील अनेक गरजू लोकांना मदत केली. त्याच शिवाय मिशनरीज ऑफ चॅरिटी नावाची एक संस्था स्थापन करून, त्याचे मुख्यालय कलकत्ता येथे उभारले. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्या अनेक मदतीची कार्य देखील करत असत. आणि सोबतच धर्मप्रसाराचे कार्य देखील करत असत.

मदर तेरेसा कशासाठी ओळखले जातात?

मदर तेरेसा या मानवता आणि शांतता या तत्त्वांसाठी ओळखले जातात. त्या नेहमी म्हणत की, मानव म्हणून जन्माला आल्यानंतर प्राण्यांसारखे जगू नका. आपले मरण देवदूतांसारखे आले पाहिजे. याचबरोबर त्या भारत सरकारकडून वितरित करण्यात आलेल्या शांतता क्षेत्रातील नोबेल पारितोषिकासाठी देखील ओळखल्या जातात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मदर तेरेसा या एक समाजसेवी स्त्री, आणि मिशनरी बद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवश्य कळवा, आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment