मोबाईल फोनची संपूर्ण माहिती Mobile Phone Information In Marathi

Mobile Phone Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमी आपल्याला हवाहवासा वाटणारा म्हणजे आपला मोबाईल होय. आजच्या आधुनिक युगामध्ये मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला असून जगभरातील सुमारे ६७% लोकांकडे मोबाईल फोन आहे आणि दिवसेंदिवास ही टक्केवारी वाढतच असलेली आहे. पूर्वी अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत असे म्हटले जात होते मात्र चौथी मूलभूत गरज मोबाईल बनत आहे.

Mobile Phone Information In Marathi

मोबाईल फोनची संपूर्ण माहिती Mobile Phone Information In Marathi

काही लोकांना मोबाईलची इतकी सवय झालेली असते की अगदी एक तास देखील मोबाईल त्यांच्यापासून दूर केला तर त्यांना करमत नाही. मोबाईल फोन वापरला नाही तर ते अगदी अस्वस्थ होतात कारण आजकाल हवं नको ते सगळं मोबाईल मध्ये उपलब्ध असतं.

आजच्या भागामध्ये आपण मोबाईल फोन विषयी माहिती घेणार आहोत.

नावमोबाईल फोन
प्रकारसंभाषण मध्यम
वर्गीकरणकीपॅड फोन, अँड्रॉइड फोन, टच स्क्रीन फोन, आय ओ एस फोन इत्यादी
मुख्य कार्यदुरून संभाषण साधने
ब्रँड्सअँपल, सॅमसंग, विवो, ओपो, रिअलमी, रेडमी, एम आय, आयटेल, वन प्लस इत्यादी…

मोबाईल फोन म्हणजे नेमके काय?

मित्रांनो मोबाईल फोन हे एक असे उपकरण आहे ज्याला तुम्ही हातामध्ये घेऊन कुठेही फिरू शकता आणि ज्याला वायर जोडण्याची देखील गरज नाही फक्त फोन करण्यासाठी बनवण्यात आलेला हा मोबाईल आजकाल व्हिडिओ काढण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, इंटरनेट एक्सेस करण्यासाठी, मनोरंजन मिळवण्यासाठी तसेच कुठे जाण्यासाठी पत्ता बघण्यासाठी देखील उपयोगात आणण्यात येतो. सेल्युलर फोन अर्थात सेल फोन असेच मोबाईल फोनचे दुसरे नाव आहे.

जेव्हा मोबाईल फोनची निर्मिती करण्यात आली होती तेव्हा तो सर्वप्रथम केवळ एकमेकांना फोन करणे या उद्देशासाठीच वापरण्यात येत असे जो खूप अवजड देखील होता आणि खिशात घेऊन जाणे देखील अतिशय त्रासदायक होते. मात्र आजकाल हळूहळू मोबाईल मध्ये उत्क्रांती घडून आल्यामुळे मोबाईलला सहजपणे कॅरी करता येते.

मोबाईल वापरण्याकरिता सिम कार्ड असावे लागते जे जी एस एम असतात. मोबाईल कम्युनिकेशन्स या नेटवर्कद्वारे जोडलेले असते आणि याच तंत्रज्ञानाने तुम्ही सर्वांशी जोडलेले राहू शकतात.

मोबाईल फोनची उत्क्रांती कशी झाली?

मित्रांनो पूर्वीच्या काळी कबुतरांमार्फत संदेशाची देवाण-घेवाण केली जायची असे तुम्ही ऐकले असेल त्यानंतर त्याची जागा पोस्टमन यांनी घेतली. यामध्ये नेहमी दुरुस्त्या होत गेल्या पुढे टेलिफोन आले त्याला आपण लँडलाईन म्हणून ओळखतो.

खरतर संभाषणामधील सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा टप्पा या टेलिफोन द्वारे करण्यात आला होता मात्र कुठे बाहेर गेले असता त्या टेलिफोन चा वापर करता येत नसे कारण केवळ घरातच याचा वापर होई त्यामुळे शास्त्रज्ञांनी विना वायर असलेला फोन बनवता येईल का याबाबत संशोधन केले. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अशा रीतीने या मोबाईलचा जन्म झाला.

पुढे केवळ कॉल करण्याची सिस्टम न ठेवता त्यामध्ये अनेक गरजेच्या गोष्टी टाकण्यात आल्या आणि अशा रितीने आजचा प्रकट मोबाईल उत्क्रांत झाला. मोबाईलच्या उत्क्रांतीमध्ये कॅमेरा समाविष्ट करणे खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

जगातील पहिला मोबाईल फोन:

मित्रांनो दिनांक ३ एप्रिल १९७३ या दिवशी मार्टिन्कुपार नावाच्या अमेरिकन अभियंत्यांनी सर्वात पहिला मोबाईल फोन तयार केला अशी नोंद आढळते यांनी मोटोरोला या कंपनी अंतर्गत या मोबाईल फोनची निर्मिती केली होती. खरे तर या मोबाईल फोनची निर्मिती  १९७० मध्येच सुरुवात करण्यात आली होती जी १९७३ मध्ये संपूर्ण रित्या नावारूपास आली. मात्र बाजारपेठेमध्ये त्याची उपलब्धता तब्बल दहा वर्षानंतर अर्थात १९८३ यावर्षी झाली.

जगातील पहिल्या स्मार्टफोन बद्दल माहिती:

मित्रांनो जगातील सर्वप्रथम बनवण्यात आलेल्या स्मार्टफोनचे वजन सुमारे दोन किलो इतके होते आणि एकदा चार्ज केल्यानंतर केवळ ३० मिनिटेच तुम्ही यावरून संभाषण करू शकत असायचे मात्र याला चार्ज होण्यासाठी दहा तास लागत असत. मुख्य गोष्ट म्हणजे त्याकाळी हा फोन सुमारे दोन लाख रुपये किमतीला होता या फोनला 0G असे नाव देण्यात आलेले होते याचा अर्थ झिरो जनरेशन असा होतो.

मोबाईल फोनचे फायदे किंवा तोटे:

मित्रांनो मोबाईल फोन गरजेची गोष्ट असली तरी देखील काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील आहेत.

आज माणूस या मोबाईल फोन द्वारे अगदी कॅल्क्युलेटर पासून फिल्म निर्मितीपर्यंत सर्व कामे करू शकतो. खरेदी करणे, ऑनलाईन काही गोष्टी शोधणे, माहिती मिळवणे,  इत्यादी फायदे आहेत. तर डोळ्यांना त्रास, झोपेचे चक्र बिघडणे, मनावर वाईट परिणाम होणे, यांसारखे तोटे देखील दिसून येतात.

निष्कर्ष:

मित्रांनो काहीही कार्य असो सर्वात प्रथम मोबाईल हातात घेतला जातो अगदी कुठला प्रश्न पडला तरी देखील नकळतपणे आपण मोबाईल हाती घेऊन तिथे ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. पूर्वीच्या काळी केवळ ख्याली खुशाली विचारण्यासाठी आणि महत्त्वाच्या वेळीच एकमेकांना फोन केले जात असत.

मात्र आजकाल घरातल्या घरात देखील एकमेकांना फोन लावून संभाषण केली जातात. एवढी या मोबाईलची व्याप्ती वाढलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण मोबाईल फोन विषयी माहिती घेतली त्यामध्ये तुम्हाला मोबाईल फोन म्हणजे नक्की काय असते, त्याची उत्क्रांती कशाप्रकारे झाली, इतिहास काय आहे, जगातील पहिला मोबाईल फोन केव्हा व कोठे बनवण्यात आला असेल, फोन म्हणजे काय, सर्वप्रथम तयार करण्यात आलेला फोन कसा असेल व तो कसा दिसत असेल, टेलिफोन चा इतिहास काय आहे, भारतामध्ये फोनचा कशाप्रकारे वापर वाढला, इन्कमिंग कॉल वर देखील शुल्क असतो त्याबद्दल माहिती पाहिली.

हळूहळू मोबाईल फोनचे स्मार्टफोन मध्ये कसे रूपांतर झाले इत्यादी गोष्टींबद्दल माहिती बघितलेली आहे. याशिवाय मोबाईल फोनच्या वापराचे फायदे व तोटे इत्यादी विषयाबद्दल माहिती बघितली सोबतच काही प्रश्न उत्तरे देखील वाचलेली आहेत.

FAQ

मोबाईल फोनची उपयुक्तता काय आहे?

मित्रांनो सर्वप्रथम दूरवरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी या मोबाईलचा वापर केला जात असे मात्र आजकाल याबरोबरच एकमेकांना संदेश पाठवणे ई-मेल करणे मनोरंजन बघणे किंवा माहितीची देवाण-घेवाण करणे इत्यादी अनेक गोष्टींमध्ये मोबाईल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

मोबाईल फोनचा मुख्य हेतू काय आहे?

आपल्या जवळील व्यक्तींच्या संपर्कात नेहमी राहण्यासाठी मोबाईल फोनचा मुख्य हेतूने वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या जवळील व्यक्तींशी संपर्क साधने आपल्या व्यवसायिक वापराकरिता ग्राहकांशी संपर्क साधने याकरता मोबाईल वापरला जातो.

मोबाईल फोन म्हणजे काय?

मोबाईल फोन म्हणजे एक विना वायर हातात घेऊन फिरू शकणारे यंत्र असून जे फोन करणे, माहिती पाठवणे, गेम्स खेळणे, वेब ब्राउझर ॲक्सेस करणे, कॅमेरा वापरणे, व्हिडिओ बघणे यांसाठी उपयुक्त आहे.

आज आर्थिक क्षेत्रामध्ये कशा रीतीने मोबाईलचा वापर वाढलेला आहे?

आर्थिक क्षेत्राचा वापर म्हणाल तर आजकाल यूपीआय मार्फत मोबाईल द्वारे कोणालाही पैशांचे व्यवहार करता येऊ शकतात यासोबतच मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे तुमच्या बँक खात्याच्या सर्व व्यवहारांना तुम्ही आपल्या तळहातावर बघू शकता.

मोबाईलच्या तोट्यामध्ये कशाचा समावेश होतो?

मोबाईल मध्ये मनोरंजनाचा समावेश केल्यामुळे लहान मुले गेम खेळणे किंवा व्हिडिओ बघणे अशा गोष्टी सातत्याने करत असतात त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो तसेच मोबाईलवर उपलब्ध असलेल्या हानिकारक गोष्टींमुळे त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मोबाईल फोन विषयी माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जाणून घेण्यास फार आनंद होईल. यासोबतच सांगून देखील मोबाईलची सवय न सुटणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख अवश्य शेअर करा.

धन्यवाद!!!

Leave a Comment