चाफेकर बंधू यांची संपूर्ण माहिती Chafekar Bandhu Information In Marathi

Chafekar Bandhu Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो चाफेकर बंधू म्हटलं की आपल्याला रँड या इंग्रज अधिकाऱ्याचा वध नक्कीच आठवतो. या चाफेकर बंधूंमध्ये बाळकृष्ण हरी चाफेकर, दामोदर हरी चाफेकर आणि वासुदेव हरी चाफेकर या तीन बंधूंचा समावेश होता. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान अगदी हसत हसत दिले. या तीनही बंधूंना एकत्रितरीत्या चाफेकर बंधू असे म्हणून ओळखले जाते.

Chafekar Bandhu Information In Marathi

चाफेकर बंधू यांची संपूर्ण माहिती Chafekar Bandhu Information In Marathi

सर्वात पहिला क्रांतिकारी उठाव करणाऱ्यांमध्ये या चाफेकर बंधूंचा समावेश होतो. ज्यावेळी पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती, त्याकरिता रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. ज्यांनी प्लेगच्या नावाखाली अनेक जनतेचे हाल केले होते. या घटनेचा बाळ गंगाधर टिळक व आगरकर यांनी देखील निषेध नोंदवला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, म्हणून या चाफेकर बंधूंना राग आला. आणि त्यांनी या रॅंडची हत्या करण्याचा कट आखला.

आजच्या भागामध्ये आपण या चाफेकर बंधूंविषयी माहिती बघणार आहोत, आणि त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया भारतासाठी बलिदान देणाऱ्या चाफेकर बंधूंच्या माहितीबद्दल…

नावचाफेकर बंधू
समावेशबाळकृष्ण हरी चाफेकर, दामोदर हरी चाफेकर, आणि वासुदेव हरी चाफेकर
कार्यरँड आणि लेफ्टनंट आयस्टर या अधिकाऱ्यांची हत्या
रँडच्या हत्येचा दिवस२२ जून १८९७
निधन०८ व १२ मे १८९९
निधनाचे कारणरँडच्या हत्येबद्दल फाशी

चाफेकर बंधू यांचा परिचय:

मित्रांनो, पुण्याच्या चिंचवडगाव येथे असलेल्या चाफेकर बंधू विषयी प्रत्येकालाच माहिती आहे. चिंचवडगाव मधील एक प्रसिद्ध कीर्तनकार असलेले हरिपंत चाफेकर यांचे हे तीन पुत्र होते. यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून दामोदर पंत चाफेकर यांना ओळखले जाते. ज्यांचा जन्म २५ जून १८६९ या दिवशी झाला होता. त्यानंतर त्यांना बाळकृष्ण चाफेकर व वासुदेव चाफेकर नावाचे दोन धाकटे बंधू झाले होते. या तिघांना एकत्रित रित्या चाफेकर बंधू असे म्हटले जात असे.

कौटुंबिक कीर्तनाचा वारसा असला तरी देखील दामोदर पंत यांना सैन्यामध्ये भरती व्हावे अशी इच्छा होती. त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महर्षी पटवर्धन यांना आपले आदर्श समजले होते. त्यांनी तरुणांना व्यायाम करता यावा याकरिता एक तालमीची देखील स्थापना केली होती. यासाठी त्यांनी टिळकांचे मार्गदर्शन देखील घेतली होती.

तरुण वयात आल्यानंतर त्यांना ब्रिटिश राजकारभाराबद्दल राग वाटत असे. त्यामुळे त्यांनी मुंबई येथे असणाऱ्या राणी व्हिक्टोरिया यांच्या पुतळ्याला चपलेचा किंवा बुटांचा हार घालून काळे फासले होते. टिळकांच्या पावलावर पाऊल देत चाफेकर बंधू यांनी १८९४ मध्ये पुण्यात शिवजयंती व गणपती उत्सव आयोजित करायला सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांच्याकडून विविध पोवाडा यांचे देखील आयोजन केले जात असे.

या उत्सवांच्या निमित्ताने त्यांनी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला. आपण आपल्या देशासाठी काहीतरी करणे फार महत्त्वाचे आहे. आज स्त्री असो की पुरुष प्रत्येकाने तलवार आणि उचललेली पाहिजे, असे ते नेहमी सांगत असतात.

प्रत्येक भारतीयाचा एकच शत्रू आहे, आणि तो म्हणजे इंग्रज. आणि या इंग्रजांविरुद्ध सर्वांनी एकत्र व्हायला पाहिजे असे त्यांचे मत होते. याबरोबरच त्यांनी धर्माला देखील वाढवण्यासाठी प्रयत्न केले. ते नेहमी म्हणत की आपण धर्मासाठी काहीही प्रयत्न केले नाही तर इंग्रज आपला धर्म लवकरच संपवून टाकतील. आणि पुढील पिढ्यांमध्ये केवळ आपल्या धर्माचा किस्सा शिल्लक राहील. त्यांनी एका ठिकाणी असे म्हटले होते की गाई आणि धर्म या दोन गोष्टींचे रक्षण करणे खूप महत्त्वपूर्ण आहे.

ते म्हणत असत की गुलामगिरीचे जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या करा, किंवा या इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न तरी करा. मात्र मरण्यापेक्षा मारणं केव्हाही चांगलं असे ते समजावत असत. हिंदुस्थान हा आपला प्रदेश आहे, आणि तेथे इंग्रजांनी राज्य केलेले तुम्हाला कसे खपू शकते असा सवाल ते जनतेला करत असत.

चाफेकर बंधूंचे कार्य:

मित्रांनो, चाफेकर बंधू यांनी रॅंड या अधिकाऱ्याची हत्या केली होती हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. १८९७ या वर्षी पुणे शहरांमध्ये प्लेग या रोगाची भयानक साथ आली होती. त्यावेळी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक या साथीला आटोक्यात आणण्यासाठी केली होती.

मात्र हा रँड जनतेचे कल्याण करणे ऐवजी त्यांचा अमानुष छळ करत होता. त्याच्या जोडीला आयस्टर नावाचा अधिकारी देखील होता.  या दोघांनीही देखील लोकांच्या भावनांशी अतिशय खिलवाड केला. ते हिंदू मंदिरांमध्ये बूट घालून प्रवेश करत असत, त्यामुळे संपूर्ण जनता त्रासलेली होती.

चाफेकर बंधूंना देखील हा अत्याचार बघून फार राग येत होता. त्यांना नेहमी वाटत असे, की शिवाजी महाराजांनी मोगलाविरोधी आवाज उठवला होता, मात्र आज या इंग्रजांविरुद्ध आपण काय करत आहोत. आपण देखील त्यांच्याविरोधी आवाज उठवला पाहिजे आणि त्यामुळेच या चाफेकर बंधूंनी रँड अधिकाऱ्यांच्या वध करण्याची योजना आखली.

आणि त्याच्यासाठी एक संधी चालून देखील आली. दिनांक २२ जून १८९७ या दिवशी राणी विक्टोरिया चा हीरक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जो पुण्यातील सरकारी गृह मध्ये होणार होता. त्यावेळेस हे अधिकारी देखील तेथे उपस्थित राहणार होते.

ज्यावेळी रँड हा कार्यक्रम आटोपून येत होता, त्यावेळी चाफेकर बंधूंनी या रॅंडचा वध केला. यासाठी या तिघांना देखील पोलिसांनी पकडून फाशी दिली. मात्र आपल्या देशाच्या कल्याणाकरता हसत हसत फाशी जाणारे एकाच घरातील हे तीन बंधू आज देखील प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये जिवंत आहेत.

निष्कर्ष:

मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये जुलमी इंग्रज सरकारने खूपच अमानुष पद्धती राबवली होती. इंग्रज अधिकारी केवळ जनतेचे शोषण करून स्वतःचा खजिना भरविणे, आणि इंग्लंडला भारतातील संपत्ती पाठवणे याच उद्देशाने प्रेरित होते.

त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत, किंवा त्यांचे शोषण होत आहे याबद्दल त्यांना काही वाटत नसे. आणि म्हणूनच अनेक क्रांतिकारकांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची बाजी लावून या इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाया केल्यामुळे त्यांना वेळप्रसंगी जीवाला देखील मुकावे लागले. असेच क्रांतिकारी म्हणजे चाफेकर बंधू होय.

एकाच घरातील सख्खे भाऊ असणारे हे तीन बंधू स्वतंत्र्यासाठी हसत हसत आपल्या प्राणाची बलिदान देऊन फासावर चढले. आजच्या भागामध्ये आपण या चाफेकर बंधूंविषयी माहिती घेतलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला चाफेकर बंधू कोण होते, त्यांच्या बद्दल माहिती, त्यांचा परिचय, त्यांनी काय कार्य केलेले आहे, यासह अनेक नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

चाफेकर बंधू यांचा जन्म कोठे झाला होता?

चाफेकर बंधू यांचा जन्म आजच्या चिंचवड गाव येथे झाला होता. जे पुण्यापासून अवघ्या १८ ते २० किलोमीटर अंतरावर आहे.

चाफेकर बंधू यांचा जन्म केव्हा झाला होता?

मित्रांनो, चाफेकर बंधू हे तीन बंधू होते, यातील दामोदर चाफेकर यांचा जन्म २५ जून १८६९ या दिवशी झाल्याची नोंद आढळते. मात्र वासुदेव चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांच्या जन्माची केवळ वर्षे उपलब्ध आहेत, जी अनुक्रमे १८८० व १८७३ असे आहेत.

चाफेकर बंधूंना कशामुळे स्वातंत्र्य कार्याची प्रेरणा मिळाली होती?

चाफेकर बंधूंना लोकमान्य टिळकांद्वारे आयोजित केलेल्या शिवाजी महोत्सव आणि गणपती महोत्सव यांच्यामुळे बंड करण्याची प्रेरणा मिळाली होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चाफेकर बंधू यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल, तसेच चाफेकर बंधूंचे कार्य देखील तुम्हाला समजले असेल. तर मग लगेचच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, आणि इतरांना देखील ही माहिती अवश्य शेअर करा. धन्यवाद…!

Leave a Comment