बालमजुरीची संपूर्ण माहिती Child Labor Information In Marathi

Child Labor Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज काल आपण कुठल्या टपरीवर साधा चहा प्यायला गेलो, तरी देखील दुकानदार छोटूला हाक मारून चहा द्यायला सांगतो. हा छोटू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बालमजूर असतो. ही समस्या फारच गंभीर झालेली असून, या विरुद्ध पावले उचलणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे.

 Child Labor Information In Marathi

बालमजुरीची संपूर्ण माहिती Child Labor Information In Marathi

आज अनेक लोक घरातील व्यक्ती आहे असे सांगून बालमजुरांना कामावर ठेवत असतात. कारण या बालमजुरांना कमी वेतन द्यावे लागते, मात्र त्यांच्यामुळे या बालमित्रांचे भविष्य धोक्यात येत असते. त्यांचे शिक्षण रखडत असते, त्यामुळे आपण एका सामाजिक जबाबदारी म्हणून अशा बालमजुरीला आळा घालण्यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजे.

आजकाल अनेक लोक लहान मुलांचे अपहरण करून दुसऱ्या ठिकाणी त्यांना कामासाठी ठेवत आहेत, यामुळे त्यांचे उद्योग नफ्यामध्ये जात असले, तरी देखील या मुलांचे बालपण हिरावले जात आहे. आणि भविष्यावर त्यांच्या गदा येत आहे. याच कारणामुळे ही मुले मोठी झाल्यानंतर गरीबीच्या खाईमध्ये ढकलली जातात. आणि संपूर्ण देशभर गरिबी निर्माण होते.

आज जगभर सर्वच देशांमध्ये बालमजुरी वर बंदी आणली असली, तरी देखील त्याविषयी कठोर कायदा करणे खूपच गरजेचे आहे. बालमजुरीकडे वेळेवर लक्ष न दिल्यास देशाचे संपूर्ण भविष्य धोक्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे.

आजच्या भागामध्ये आपण बालमजुरी या विषयाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.…

बालमजुरी म्हणजे काय:

लहान मुलांचे बालपण जगू न देता त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेणे, म्हणजे बालमजुरी असून त्यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे ठेवले जाते, व एखाद्या गुलामासारखी वागणूक दिली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास काहीशा पैशांच्या बदल्यात अथवा इतर काही लोभ दाखवून लहान मुलांकडून कुठलेही कार्य करून घेणे म्हणजे बालमजुरी होय. यामध्ये ज्या मुलांना आर्थिक किंवा इतर कुठली गरज असेल अशी मुले हेरली जातात, व त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जाते.

कायद्यानुसार १४ वर्षांच्या आतील मुलांचे वय हे शिक्षणाचे वय असते. त्यांच्यासाठी राज्यघटनेने मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केलेले आहे. मात्र अशा मुलांना वेगवेगळ्या स्वरूपाचा त्रास देऊन त्यांच्याकडून काम करून घेणे, व मजुरी करण्यासाठी भाग पाडणे याला बालमजुरी म्हटले जाते. बालमजुरी हे शोषणाचा प्रकार असून, त्यामुळे लहान मुलांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होत असते, आणि पुढे जाऊन त्याचा गंभीर परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत असतो.

बालमजुरीने निर्माण होणाऱ्या समस्या:

मित्रांनो, बालमजुरी ही समाजासाठी अतिशय घातक आहे. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त गरिबी असते, त्या ठिकाणी बालमजुरी ही सर्वात मोठी समस्या असते. जे लोक काही कारणास्तव उदरनिर्वाह करण्यासाठी समर्थ नसतात, अशा कुटुंबातील लहान मुलांना बळजबरीने काम करावे लागते.

मित्रांनो, कुठलेही लहान मूल असले तरी देखील त्याला काम करायला आवडत नसते. मात्र कुठलेही प्रलोभन दाखवून, किंवा पैशांच्या लोभानी अन्यथा कुठल्याही धाकाने त्यांना काम करायला लावणे, हे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे ठरत असते.

काही ठिकाणी पालक स्वतः पैशांच्या लोभामुळे बालमजुरी करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. बालमजुरीचे प्रमाण मुख्यतः चहाची दुकाने, हॉटेल्स, लहान उद्योग, घरगुती नोकर, ढाबे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येत असते.

बालमजुरीमुळे भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असतो, कारण व्यवसाय चालक मुलांच्या नावावर जास्त पगार दाखवत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना कमी पगार देत असतात. त्यामुळे कर चोरी देखील होते.

बालमजुरी वर बंदी असल्यामुळे अनेक लोक चोरून लपून असा व्यवसाय करत असतात, त्यामुळे त्यांना पकडले जाण्याची भीती असते. यातून देखील भ्रष्टाचाराला जन्म मिळत असतो. आणि लाच देऊन अशा प्रकारा मधून निर्दोष सुटका करून घेतली जाते.

बालमजुरी विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय:

मित्रांनो, बालमजुरी ही समाजाला लागलेली एक कीड आहे, आणि त्यामुळे मुलांचे भविष्य उध्वस्त होण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील सुरुंग लागत आहे. त्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे, अतिशय गरजेचे ठरते.

बालमजुरी रोखण्याकरिता सर्वप्रथम प्रत्येकाने आपली विचारसरणी बदलली पाहिजे, आणि ज्या ठिकाणी आपल्याला अशी बालमजुरी आढळून येईल, त्या प्रत्येक ठिकाणी आवाज उठवला पाहिजे.

बालमजुरी प्रतिबंधित करण्याकरिता राज्यघटनेमध्ये कलम टाकण्यात आले असले, तरी देखील आज या विरुद्ध अतिशय कठोर कायदे तयार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

कुठलेही पालक गरीब असले, तरी देखील शासनाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या विविध योजना अंतर्गत त्या मुलांना शाळेमध्ये पाठवणे पालकांचे कर्तव्य ठरत आहे. या ठिकाणी अगदी मोफत शिक्षणापासून मध्यान भोजन यांसारख्या योजना देखील असल्यामुळे मुलांचा कुठलाही ताणतणाव उरत नाही.

मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण काही वस्तू किंवा सेवा घेत असू, त्या ठिकाणी बालमजुरी करताना कोणी आढळल्यास त्या संदर्भात दुकानदाराला जाब विचारणे आणि त्याची तक्रार करणे यांसारखी कार्य केली पाहिजेत.

निष्कर्ष:

मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे आणि चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर करावे असे आपल्याला वाटत असते, त्याचप्रमाणे बालमजूर लोकांना देखील वाटणे साहजिक आहे. मात्र त्यांना अनेक मजबुरी मुळे बालमजुरी करावी लागत असते. अनेक ठिकाणी आई वडील नसल्यामुळे, या मुलांवर सर्व जबाबदारी येऊन ठेपत असते.

तर अगदी काही ठिकाणी तर या मुलांना बळजबरीने कामाला ठेवले जात असते. मात्र या संदर्भात कोणीही फारसा आवाज उठवताना दिसत नाही, आजच्या भागामध्ये आपण या बालमजुरी विषयी संपूर्ण माहिती बघितली असून, बालमजुरी म्हणजे काय, या बालमजुरीमुळे उपस्थित होणाऱ्या विविध समस्या, त्यांचे समाजावर होणारे परिणाम, या बालमजुरी विरुद्ध करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच सरकारने केलेले विविध उपाय, याबद्दल माहिती घेतलेली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरलेली असेल.

FAQ

बालमजुरी म्हणजे काय?

कमी वयामध्ये मुलांचे बालपण हिरावून त्यांना जबरदस्तीने कामाला लावणे म्हणजे बालमजुरी होय. त्यांना या ठिकाणी अगदी गुलामासारखी वागणूक दिली जाते.

बालमजूर कोणाला म्हटले जाते?

ज्या मुलांचे वय शाळेमध्ये जाण्याचे असते, अर्थात १४ वर्षांपेक्षा कमी असते, अशा मुलांना कामावर ठेवणे व त्या बदल्यात अतिशय तुटपुंजे वेतन त्यांना देणे, म्हणजे म्हणजे बालमजुरी. आणि असे काम करणाऱ्या मुलांना बालमजूर म्हणून ओळखले जाते.

बालमजुरी रोखण्याकरिता संविधानामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे?

बालमजुरी रोखण्याकरिता संविधानामध्ये एक बालमजुरीच्या विरुद्ध कलम टाकण्यात आलेले असून, त्या कलमाचा क्रमांक २४ वा आहे. त्यानुसार १४ वर्षांच्या आतील मुलांना कुठल्याही ठिकाणी काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच अठरा वर्षांच्या आतील मुलांना धोकादायक ठिकाणच्या कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

बालमजूर म्हणून शक्यतो कोणत्या क्षेत्रामध्ये मुलांना कामावर ठेवले जाते?

बालमजूर म्हणून शक्यतो हॉटेल, धाबे, घरगुती नोकर, शेतमजूर, कारखाने इत्यादी ठिकाणी मुलांना कामावर ठेवले जात असते.

बालमजुरामुळे समाजावर काय परिणाम दिसून येतो?

बालमजुरी केल्यामुळे मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही, परिणामी मोठे झाल्यानंतर त्यांना नोकराचेच काम करावे लागते. यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी निर्माण होते, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बालमजुरी याविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ती माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा. त्याचप्रमाणे तुमच्या ओळखीतील कोणी अशा बालमजुरीला प्रोत्साहन देत असेल, किंवा तुमच्या आसपास कोणी दुकानदार बालमजुरांना कामावर ठेवत असेल, तर त्याबाबत नक्की आवाज उठवा.

 धन्यवाद…!

Leave a Comment