कोंबडी पक्षाची संपूर्ण माहिती Hen Bird Information In Marathi

Hen Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो संपूर्ण जगभरात मांसाहारी लोकांची काही कमी नाही. आणि यामध्ये सर्वात जास्त पसंत केल्या जाणारा प्राणी म्हणून कोंबडीला ओळखले जाते. मांसाहार म्हटलं की चिकन अर्थात कोंबडी नेहमीच पुढे असते. कोंबडी पासून मिळणारी अंडी देखील मोठ्या प्रमाणावर खाल्ली जात असतात. त्यामुळे मानवी शरीराला प्रथिनांची गरज पूर्ण होत असते.

Hen Bird Information In Marathi

कोंबडी पक्षाची संपूर्ण माहिती Hen Bird Information In Marathi

भारतभर मोठ्या प्रमाणावर कोंबडी हा पक्षी पाळला जातो, अनेक शेतकरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करत असतात. इतर पक्षांपेक्षा थोडेसे जास्त मोठे शरीर असणाऱ्या कोंबड्या माणसांसाठी फारच उत्तम ठरवल्या जातात. ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोंबडी पाळली जाते. आपल्या संपूर्ण देशामध्ये कोंबडीच्या अनेक प्रजाती आढळून येत असतात.

आजच्या भागामध्ये आपण कोंबडी या पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावकोंबडी
इंग्रजी नावहेन
शास्त्रीय नावग्यालस ग्यालस डोमेस्टिकस
पळण्याचा वेगप्रति तास १४ किलोमीटर
साधारण आयुष्यमानपाच ते दहा वर्ष
हायर क्लासिफिकेशनएनिमालिया
कुटुंब किंवा कुळफेसियानिडी

कोंबडीचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये:

कोंबडी पाळणे हा एक चांगला जोडधंदा किंवा व्यवसाय असून, अनेक जण यामधून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवत आहेत.

ग्रामीण भागामध्ये घरगुती माणसाची व अंड्यांची पूर्तता करण्याकरिता कोंबड्या पाळल्या जातात. त्याचप्रमाणे काही लोक विक्री करण्याकरिता देखील कोंबड्यांची देखभाल घेऊन पाळत असतात.

कोंबडी हा प्राणी त्याच्यामध्ये असणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रथिनांमुळे, भारतासह संपूर्ण जगभर खाण्यासाठी वापरला जातो.

कोंबड्या खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात असल्या, तरी देखील त्यांच्या झुंजी लावून मानव अगदी पूर्वीच्या काळापासून मनोरंजन मिळवत आलेला आहे. अंड्यांसाठी मुख्यतः पाळल्या गेलेल्या कोंबड्या वर्षभरात सुमारे ३०० अंडी घालत असतात.

कोंबडी साधारणपणे पाच ते दहा वर्ष आयुष्य जगत असते. कोंबडीचा रंग अतिशय असामान्य असून, अनेक रंगांचे मिश्रण या मध्ये आढळून येत असते. मात्र यात लाल रंगाचे अधिक्य असते.

कोंबडीची शरीर रचना:

मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांनी कोंबडी बघितली असेल. दोन पाय, मान, डोक्यावर तुरा, आणि पाठीमागे शेपटी अशा रचनेची ही कोंबडी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळून येते. काही ठिकाणी लाल, निळी, हिरवी, पिवळी, यांसारख्या रंगांनी युक्त असलेली ही कोंबडी त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या लाल तुर्‍यामुळे इतर पक्षांपासून वेगळी दिसून येत असते.

कोंबडीला दोन पंख असतात, मात्र ती जास्त उंच भरारी घेऊ शकत नाही. यासोबतच तिला दोन पाय असतात, ज्या माध्यमातून ती अतिशय तुरुतुरु धावत असते. यातील एक पाय चालण्यासाठी तर दुसरा उडण्यासाठी कारणीभूत असतो. कोंबडी शाकाहारी अन्नामध्ये विविध अन्नधान्य, उकिरड्यावरील गोष्टी खात असते, त्याचबरोबर लहान किडे, कीटक आणि अळ्या खात असते.

कोंबडी पाळताना:

मित्रांनो, संपूर्ण देशभर कोंबडी पाळली जात असली, तरी देखील तिच्या पाळण्याचे कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. काही ठिकाणी मांस उत्पादनासाठी, काही ठिकाणी अंडी उत्पादनासाठी, तर काही ठिकाणी मनोरंजन क्षेत्रामध्ये या कोंबडीचा वापर केला जातो. ग्रामीण भागामध्ये जनावरांना होणारे गोचीड, आणि तत्सम कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देखील कोंबडीची उपयुक्तता मोठ्या प्रमाणावर आहे.

कोंबडी पाळण्याच्या देखील दोन पद्धती पडत असतात, ज्यामध्ये नैसर्गिक पद्धत आणि कृत्रिम पद्धत अशा पद्धती आहेत. नैसर्गिक पद्धतीमध्ये कोंबडी आपली अंडी स्वतः उबवत असते. आणि आपल्या पिल्लांची काळजी देखील स्वतःच घेत असते. लहानपणापासून पिल्लांना उब देण्यापासून त्यांना खाणे शिकवण्यापर्यंत, कोंबडी त्यांना सर्व प्रशिक्षण देत असते. कोंबडीने अंडी उबवण्याच्या पद्धतीला नॅचरल ब्रूडिंग म्हणून ओळखले जाते.

कृत्रिम पद्धतीमध्ये अंडी उबवण्याकरिता कोंबडीची आवश्यकता नसते, यामध्ये अंडी एका ब्रूडिंग मशीन मध्ये ठेवून त्याद्वारे ऊब दिली जाते. आणि कृत्रिमरीत्या अंडी उबवली जातात, या पद्धतीला कृत्रिम ब्रूडिंग किंवा आर्टीफिशिअल ब्रूडिंग म्हणून देखील ओळखले जाते. याकरिता विशेष ब्रूडिंग हाऊस देखील उभारलेले जातात, पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना पुढे देखील उब मिळावी, याकरिता विजेच्या दिव्यांचा वापर केला जातो.

पोल्ट्री फार्म चे फायदे:

मित्रांनो, पोल्ट्री फार्म ला मराठी मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय असे म्हणून ओळखले जाते. यामुळे तुमच्या घरगुती मांसाची व अंड्यांची गरज भागली जाते. त्यासोबतच संपूर्ण देशभर या उत्पादनांना मोठी मागणी आहे, त्यामुळे तुम्ही अतिरिक्त नफा देखील मिळवू शकता. सोबतच कोंबडी पाळल्यामुळे शेती व्यवसायाला एक हातभार लागत असतो. याशिवाय घरी जनावरे पाळलेली असतील, तर त्यांना होणाऱ्या गोचीडासारख्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील फायदा होतो.

कोंबडी उकिरड्यावर देखील फिरत असल्यामुळे, तिच्याद्वारे हा उकिरडा नेहमी उकरला जातो. परिणामी खताची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते.

कोंबड्याची प्रजाती:

मित्रांनो, संपूर्ण जगभर कोंबड्यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. यामध्ये चितगाव, घोसास, कडकनाथ, गावरान, यांसारख्या अनेक प्रजातींचा समावेश होतो. कोंबड्यांच्या सामान्य प्रजातीमध्ये ब्रह्मा, व्हाईट लेग हॉर्न, लेग हॉर्न, रेड लेग हॉर्न, सिल्की यांसारख्या विदेशी प्रकारच्या प्रजातींचा समावेश होतो.

आज संपूर्ण भारतभर व्यावसायिक स्तरावर कोंबड्यांचे पालन करण्यासाठी या परदेशी प्रजाती मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात, कारण त्यांचे मांस उत्पादन कमी दिवसांमध्ये घेतले जाऊ शकते. सोबतच त्यांची अंडी देण्याची क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर असते. यातील अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेयर्स म्हणून ओळखले जाते. मात्र घरगुती स्तरावर आणि नैसर्गिक रीतीने कोंबडी पालन करायचे असेल तर, स्थानिक प्रजातींना प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते.

निष्कर्ष:

मित्रांनो, संपूर्ण जगभर अतिशय चवीने खाल्ली जाणारी मांसाहारी प्रजाती म्हणून कोंबडीला ओळखले जाते. ही एक लठ्ठ पक्षी असून, अंडी देणे, आणि मांस पुरवणे याकरिता सर्वत्र प्रसिद्ध आहे. आजकाल अनेक जण मांस खायचे म्हटले की कोंबडीचे मांस खाण्याला प्राधान्य देतात, कारण स्वस्त दर आणि सहज उपलब्धता ते यामागील मुख्य कारण आहे.

आजच्या भागामध्ये आपण या कोंबडी विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे, त्यामध्ये तुम्हाला कोंबडीची विविध वैशिष्ट्ये, तिचे गुण, कोंबडीचे शरीर रचना, तिला कसे पाळावे, कोंबडी पालन करीता पोल्ट्री फार्म सुरू करताना घ्यावयाची काळजी, कोंबडी पासून मिळणारे फायदे, तिच्या विविध जाती, कोंबडीमध्ये आढळणारे प्रजनन, कोंबडी विषयी विविध तथ्य इत्यादी माहिती बघितलेली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि इतरही माहिती बघितलेली आहे.

FAQ

कोंबडीला इंग्रजी भाषेमध्ये व शास्त्रीय भाषेमध्ये कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?

कोंबडीला इंग्रजी या भाषेमध्ये हेन या नावाने ओळखले जाते, तर शास्त्रीय भाषांमध्ये ग्यालस ग्यालस डोमेस्टिकस या नावाने ओळखले जाते.

कोंबडी जास्तीत जास्त किती वेगाने पळू शकते?

कोंबडी जास्तीत जास्त १४ किलोमीटर या वेगाने पळू शकते, आणि ती थोड्या उंचीने उडू देखील शकते.

कोंबडी पक्षाचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते?

कोंबडी पक्षाचे साधारण आयुष्यमान किमान पाच ते कमाल दहा वर्ष इतके समजले जाते.

कोंबडीच्या मांसाला कोणत्या नावाने ओळखले जाते?

कोंबडीच्या मांसाला चिकन या नावाने ओळखले जाते.

कोंबडीचा वापर कशा कशासाठी केला जातो?

कोंबडीचा वापर मुख्यतः मांस उत्पादनाकरिता केला जातो, यासोबतच तिच्यापासून अंडी देखील मिळवली जात असतात. या दोन्ही गोष्टींपासून मानवी शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रथिनांचा पुरवठा केला जात असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कोंबडी या सर्वांच्या आवडीच्या पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली ना… तर मग क्षणाचा ही विलंब न करता तुमच्या प्रतिक्रिया लिहायला घ्या. आणि त्यांना कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा. सोबतच तुमच्या इतरही मित्र मैत्रिणींना आवर्जून हा लेख शेअर करा.

धन्यवाद…!

Leave a Comment