सफरचंद फळाची संपूर्ण माहिती Apple Fruit Information In Marathi

Apple Fruit Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो दर दिवशी एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टर पासून दूर राहण्यास मदत होईल, अशी सुप्रसिद्ध म्हण तुम्ही नेहमीच ऐकली असेल. ही म्हण रूढ होण्याचे कारण म्हणजे सफरचंदामध्ये असणारे असामान्य गुणधर्म होय. या सफरचंदामध्ये अनेक प्रकारचे आरोग्यदायी गुणधर्म आढळल्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह असलेले आजार दूर होण्यासाठी देखील मदत मिळत असते. त्याचप्रमाणे शारीरिक विकास होण्यासाठी देखील या सफरचंदाचा मोठा वाटा आहे. नेहमी सफरचंदाचे सेवन केल्यामुळे, शरीर अतिशय निरोगी राहण्यास मदत होते.

Apple Fruit Information In Marathi

सफरचंद फळाची संपूर्ण माहिती Apple Fruit Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण सफरचंदाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. यासोबतच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील बघणार आहोत…

नावसफरचंद
प्रकारफळ
शास्त्रीय नावमालुस डोमेस्टा
कुळ अथवा कुटुंबरोजासीइ
आकारमानसरासरी पाच ते दहा सेंटिमीटर व्यासाचे
आकारगोलसर
रंग पिकण्यापूर्वीहिरवा
रंग पिकल्यानंतरपिवळसर लाल

सफरचंद सेवनाचे फायदे:

मित्रांनो, हृदय रोगामध्ये सफरचंद अतिशय उत्कृष्ट समजले जाते. या सफरचंदामध्ये आढळणारे विविध फायटो न्यूट्रियन्स रक्तवाहिन्यांना मजबूत करण्याचे काम करत असतात. आणि हृदयाला अतिशय भक्कम बनवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा निभावत असतात.

त्याचबरोबर ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे हृदयाचे होणारे नुकसान भरून काढले जाते. त्याचबरोबर शरीरामध्ये वाढणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील सफरचंदाच्या सेवनामुळे कमी होते. सोबत रक्तातील साखर देखील नियंत्रणात आणली जाते. याचबरोबर शरीरामध्ये असणारा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर सफरचंद फायदेशीर आहे.

कॅलिफोर्निया येथील विद्यापीठांमध्ये केलेल्या संशोधनानुसार प्रत्येक दिवशी दोन सफरचंद खाणे किंवा त्याचे रस पिणे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदतगार ठरते.

हाडांच्या आरोग्यामध्ये देखील सफरचंद उपयुक्त असते, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम हा घटक आढळून येतो. ज्यामुळे हाडे व दात अतिशय मजबूत होत असतात. सफरचंदाच्या फळांमध्ये आढळणारे फेव्हनोईड आणि  फ्लोरिझिन नावाचे घटक रजोनिवृत्तीच्या वेळी आढळणाऱ्या हाडांच्या समस्यांसाठी देखील फायदेशीर ठरते. त्याचबरोबर शरीरावर होणारी जळजळ, आणि रॅशेस कमी करण्यासाठी देखील सफरचंदाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

अनेक लोकांना दमा या आजाराने त्रस्त केलेले असते, त्या लोकांसाठी सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये असणारे फिनोलिक ऍसिड आणि इतरही प्रकारचे आम्ल दमा कमी करण्यासाठी आणि फुफुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील मदत करत असतात. ज्या लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल त्यांना नेहमी सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. ज्या रुग्णांना दमा असेल त्यांनी प्रत्येक आठवड्यात किमान पाच सफरचंद खाल्ले तर हा धोका ३२ टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलेला आहे.

मित्रांनो, यकृत हे मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाच्या अवयव आहे. मात्र जेव्हा या यकृतामध्ये विषारी पदार्थ साचतात, त्यांना काढून टाकण्याचे काम सफरचंद करत असते. कारण सफरचंद हे डिटॉक्सिफाइंग क्षमता असलेले आहे. त्याचबरोबर शरीराच्या इतर भागातील विषारी इतर द्रव्य बाहेर काढणे, पचनक्रिया सुधारणे, रक्तप्रवाह नियंत्रित करणे, आणि मूत्रपिंड व यकृत यांच्यातील विषारी तत्व बाहेर काढणे, याकरिता सफरचंद फायदेशीर ठरते. याकरिता सफरचंदाचा रस पिणे अतिशय फायदेशीर आहे.

मित्रांनो, मेंदू हा खूपच महत्त्वाचा अवयव आहे. आणि या मेंदूच्या उत्तम आरोग्याकरिता सफरचंद अतिशय उपयुक्त असते. वाढत्या वयात मेंदूचे होणारी झीज आणि ढळणारे संतुलन नियंत्रित करण्याकरिता सफरचंदाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा आणि रक्तपुरवठा वाढवण्याचे कार्य या सफरचंद सेवनामुळे केले जाते. याचबरोबर वृद्ध लोकांमध्ये स्मरणशक्ती वाढवण्याकरता सफरचंदाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

मेंदूचे आजार दूर करण्यासाठी देखील सफरचंद खूपच प्रभावी आहे असे निदर्शनास आलेले आहे. याचबरोबर मेंदूमधील पेशींचे मोठ्या प्रमाणावर विभाजन करणे, आणि मेंदूला अतिशय तीक्ष्ण आणि तल्लख करणे यासाठी सफरचंद ओळखले जाते.

आजकाल सर्वात भीतीदायक असणारा आजार म्हणून कर्करोगाला ओळखले जाते. आणि या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे किंवा त्याचा धोका टाळणे यासाठी सफरचंद खूपच उपयुक्त आहे. अनेक महिलांवर केलेल्या संशोधनानुसार असे निदर्शनास आलेले आहे की, महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू सफरचंदाच्या सेवनामुळे अगदीच नगण्य पातळीवर येण्यास मदत मिळते. आणि हे सफरचंदामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळेच शक्य होते.

मधुमेही रुग्णांमध्ये खाण्याचे अनेक पथ्य सांगितले जातात. त्यामुळे त्यांच्यावर गोड खाण्याचे फार बंधन येते. मात्र चवीला गोडसर असणारे सफरचंद त्यांच्यासाठी केवळ खाण्याचा उत्तम स्त्रोत नाही, तर मधुमेह कमी करण्याची एक गुरुकिल्ली देखील आहे. काही संशोधनानुसार ज्यांना अगदी टाईप दोन प्रकारचा मधुमेह असला, तरी देखील सफरचंद खाल्ल्यामुळे त्यांना होणारा त्रास सुमारे सात टक्क्यांनी देखील कमी केला जाऊ शकतो.

सफरचंद खाण्याचे तोटे:

मित्रांनो, जगभर रुग्णांसाठी उत्तम आहार समजले जाणारे सफरचंद काही वेळेला धोकेबाज देखील ठरत असते. याच्या सेवनामुळे जिभेला सूज येऊ शकते, तसेच ओठांना देखील सूज येऊ शकते. घशामध्ये जळजळ जाणवू शकते, सोबतच इतर अन्न खाल्ले असता चव देखील बिघडू शकते.

काही रुग्णांमध्ये सफरचंदाच्या अतिसेवनामुळे चेहरा सुजण्याची समस्या देखील आढळून येते. याच बरोबर सफरचंदाच्या बिया मोठ्या प्रमाणावर खाण्यात आल्या तर हे माणसासाठी घातक किंवा विषारी देखील ठरू शकते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या ओळखीतील कोणीही आजारी असले की आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जाताना हमखास सफरचंद घेऊन जात असतो. कारण सफरचंद हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. त्यामुळे आजारी माणसांसह इतर लोकांना देखील या सफरचंद फळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

आजच्या, भागामध्ये आपण सफरचंद या फळाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे, तसेच सफरचंद केव्हा खावे, त्यापासून इतर काय फायदे मिळतात, इतर कोणाकोणाच्या ठिकाणी सफरचंदाचा वापर केला जातो.

सफरचंद कोठे उगवली जातात, ते खाण्यासाठी योग्य वेळ कोणती समजली जाते, सफरचंदाच्या अतिसेवनामुळे कोणकोणते तोटे होतात इत्यादी प्रकारची माहिती बघितलेली आहे. या शिवाय नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल.

FAQ

सफरचंद या फळाला कोणती चव प्राप्त असते?

सफरचंद हे काहीसे गोडसर तर काहीच हे तिखटसर प्रकारातील फळ असते. मात्र सर्व चवींचे यामध्ये बॅलन्स साधलेले असते. सफरचंदाच्या चवीवर काढणीचा हंगाम आणि काढणीची स्थिती प्रभाव दाखवत असते.

सफरचंदाच्या किती प्रजाती आहेत?

मित्रांनो, सफरचंद हे मोठ्या प्रमाणावर विविध प्रजातीमध्ये विभागले गेलेले आहे. जगभरात विचार केल्यास सुमारे साडेसात हजार प्रजाती आढळून येतात. पैकी एकट्या अमेरिकेमध्ये सुमारे अडीच हजार प्रजातींची संख्या आहे. आणि उर्वरित जगभरातील देशांमध्ये पाच हजार प्रजाती आढळतात.

सफरचंद हे फळ इंग्रजी व शास्त्रीय भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते?

सफरचंद या फळाला इंग्रजी भाषेमध्ये एप्पल, तर शास्त्रीय भाषेमध्ये मालूस डोमेस्का या नावाने ओळखले जाते.

सफरचंदाचा रंग कसा असतो?

सफरचंदाचा रंग पिकण्यापूर्वी हिरवट प्रकारचा असतो, ज्याला काहीशा प्रमाणात पोपटी रंगाची छटा आढळून येते. पिकल्यानंतर मात्र हा लाल किंवा काहीसा तपकिरी रंगाचा होतो. आणि त्यावर छोटे छोटे ठिपके आढळून येतात.

सफरचंदामध्ये कोणकोणते गुणधर्म आढळून येतात?

सफरचंदामध्ये अँटिऑक्सिडंट प्रकारचे गुणधर्म असल्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाते. सोबतच हा एक सर्दी खोकल्यावरील चांगला घरगुती उपचार म्हणून ओळखला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सफरचंद या फळाविषयी इत्यंभूत माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना आणि नेहमी आजारी पडणाऱ्या लोकांना या माहितीचा आस्वाद घेता यावा, याकरिता त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद.…!

Leave a Comment