अल्बर्ट आईन्स्टाईन यांची संपूर्ण माहिती Albert Einstein Information In Marathi

Albert Einstein Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो विज्ञान किंवा शास्त्रज्ञ हा शब्द उल्लेखला तरी आपल्याला एका व्यक्तीची नेहमी आठवण होते. आणि ती व्यक्ती म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन होय. अतिशय सामान्य बुद्धिमत्तेचा हा व्यक्ती जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असून, त्यांनी भौतिकशास्त्र आणि इतर क्षेत्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शोध लावलेले आहेत. त्यांनी लावलेल्या शोधामध्ये मूलभूत सापेक्षता ही संकल्पना खूपच प्रसिद्ध झाली, त्यांना विज्ञान क्षेत्रातील एक तत्त्वज्ञानी म्हणून देखील ओळख मिळालेली आहे.

Albert Einstein Information In Marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन यांची संपूर्ण माहिती Albert Einstein Information In Marathi

त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक असे प्रसिद्ध समीकरण मांडलेले आहे, ज्याला वस्तुमान ऊर्जा समीकरण म्हणून देखील ओळखले जाते. ते समीकरण E=MC2 असे आहे. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक शोध लावले असले, तरी देखील त्यांचा ह्या समीकरणाचा शोध खूपच प्रसिद्ध झालेला आहे.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा बुद्ध्यांक खूपच असामान्य असा होता. त्यामुळे ते अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ होऊ शकले.  भौतिकशास्त्रामध्ये त्यांनी केलेल्या योगदानामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये फार बदल झालेला आहे. त्यांना १९२१ या वर्षाचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे. मात्र यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेली मेहनत कारणीभूत आहे. त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये गणित हा विषय देखील होता, त्यामुळे त्यांनी गणित क्षेत्रामध्ये देखील अनेक शोध लावलेले आहेत.

आजच्या भागामध्ये आपण आईन्स्टाईन या असामान्य बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञानाबद्दल सखोल माहिती बघणार आहोत…

नाव आईन्स्टाईन
संपूर्ण नावअल्बर्ट हेरमन आईन्स्टाईन
जन्म दिनांक १४ मार्च १८७९
जन्मस्थळ जर्मनीमधील उलमा
वडिलांचे नावहेरमन आईन्स्टाईन
आईचे नावपौलीन कोच
पत्नीचे नावपमरीअक एलिसा लोविन थाल
मृत्यु दिनांक१८ एप्रिल १९५५

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे प्राथमिक जीवन:

मित्रांनो, जर्मनीच्या उलमा या ठिकाणी दिनांक १४ मार्च १९७९ यांचा जन्म झाला होता. मात्र पुढे त्यांनी म्युनिक या ठिकाणी वास्तव्य केले, आणि ते तिथेच लहानाचे मोठे झाले.

मित्रांनो, आपल्या मृत्यूच्या वेळी एक महान शास्त्रज्ञ म्हणून मृत पावलेले आईन्स्टाईन लहानपणी मानसिक दृष्ट्या विकलांग आहेत, असे त्यांचे शिक्षक म्हणत असत. कारण ते असामान्य बुद्धीचे असल्यामुळे नेहमीच विविध प्रकारचे प्रश्न विचारून शिक्षकांना भंडावून सोडत असत. त्यांना पुस्तके, लिहिणे, वाचणे यामध्ये जास्त रस वाटत नसे, मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांची बुद्धी खूपच तल्लख होती.

आईनस्टाईन यांच्या शिक्षणाबद्दल माहिती:

मित्रांनो, लहानपणी म्युनिक या शहरांमध्ये आईन्स्टाईन यांना प्राथमिक शिक्षण देण्यात आले. मात्र त्यावेळी आइन्स्टाइन हे मानसिक दृष्ट्या अपंग, किंवा विकलांग आहेत असे त्यांच्या शिक्षकांचे म्हणणे होते. त्यांना अगदी वयाच्या नवव्या वर्षापर्यंत बोलता येत नसे. त्यामुळे त्यांचे शिक्षक त्यांना खूपच कंटाळले होते.

त्यांना लहानपणी पुस्तकी शिक्षणापेक्षा खेळाच्या स्पर्धांमध्ये खूपच आनंद वाटत असे. ते वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासूनच व्हायोलिन नावाचे वाद्य वाजवत असत. इतकेच नव्हे तर त्यांनी १२ व्या वर्षी भूमिती या विषयांमध्ये संशोधन देखील केले. पुढे सोळा वर्षाचे झाल्यानंतर ते गणितामध्ये इतके तरबेज झाले, की मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अवघड गणिती क्रिया देखील ते अगदी सहजरित्या सोडवत असत.

आपल्या वयाच्या १६ व्या वर्षी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना शाळेतून काढून टाकण्याचे ठरवले. कारण त्यांच्या विविध कृत्यांमुळे इतर मुलांना इजा होत आहे, असे त्यांच्या शिक्षकांचे म्हणणे होते. या शाळेतून काढून टाकल्यानंतर त्यांनी कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यास ठरविले.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या पदवीचे शिक्षण स्वित्झर्लंडमधील कॅन्टोनल स्कूल इथून पूर्ण केले. आणि उच्च शिक्षणासाठी १९१९ या वर्षी फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश मिळवला.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे वैवाहिक आयुष्य:

आपली फेडरल इन्स्टिट्यूट येथील पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांनी विवाह केला. त्यांची पत्नी ही त्यांना शाळेपासून ओळखत होती, आणि ते दोघेही वर्गमित्र होते. या दांपत्याला दोन मुले झाली त्यावेळी त्यांचे वास्तव्य बर्मन या ठिकाणी होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे शोध:

मित्रांनो, विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावलेल्या शोधांची पूर्णपणे जाणीव आहे, कारण यांनी लावलेल्या शोधानेच जवळपास भौतिकशास्त्राचे आर्थिक पुस्तक भरलेले असे. त्यांनी सर्वात प्रसिद्ध असणारे E=MC2 हे समीकरण मांडले. जे वस्तुमान आणि उर्जा यांच्या संदर्भात होते. त्यामुळे भौतिकशास्त्रामध्ये प्रगती करण्यासाठी फार मोठी मदत झाली.

याच बरोबर रेफ्रिजरेटर मध्ये वापरले जाणारे तत्व देखील अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीच शोधून काढलेले आहे. त्यांनी सर्वप्रथम केलेल्या रचनानुसारच आज रेफ्रिजरेटर बनवली जातात.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सर्वात प्रसिद्ध सापेक्षतेचा सिद्धांत देखील जगासमोर मांडला होता. हा वेळ आणि गती यांच्यामधील संबंधावर आधारित असून, यानुसारच प्रकाशाचा वेग मोजला गेला.

आईन्स्टाईन यांना मिळालेले विविध पुरस्कार:

सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार होय. अल्बर्ट आईन्स्टाईन यांना १९२१ या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढे १९२५ या वर्षी त्यांना कोपले पदक, १९२९ मध्ये मॅक्स बँक पदक, आणि १९९९ मध्ये शतकोत्तर व्यक्ती (हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे) इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन:

मित्रांनो, जर्मनीमध्ये वास्तव्यास असलेले आईन्स्टाईन ज्यू होते. त्यामुळे त्यांना हिटलर सत्तेवर आल्यानंतर अमेरिका मधील न्यू जर्सी येथे स्थायिक व्हावे लागले. मात्र इथे  कॉलेजमध्ये प्राध्यापक पदी असताना १८ एप्रिल १९५५ या दिवशी त्यांनी अंतिम श्वास घेतला.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या असामान्य बुद्धिमत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक शोध लावलेले आहेत. त्यांच्या शोधांमध्ये E=MC2 हे समीकरण खूपच गाजले होते. आज भौतिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये जवळपास त्यांनी लावलेल्या शोधांवरच बराचसा अभ्यासक्रम आधारित आहे.

अशा या आईन्स्टाईन यांच्या बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघितलेली आहे. आणि त्यांची जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे. यामध्ये त्यांच्या जन्माविषयी माहिती, त्यांच्या शालेय शिक्षणाविषयी माहिती, विवाह, त्यांनी लावलेले विविध शोध, त्यांची समीकरण, तत्व, त्यासोबतच त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, त्यांच्या मेंदूबद्दल असामान्य माहिती, त्यांचे विचार कसे होते, त्याचबरोबर त्यांचा मृत्यू आणि त्यांच्याबद्दलचे विविध तथ्य इत्यादी माहिती बघितलेली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे संपूर्ण नाव काय होते?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या संपूर्ण नाव अल्बर्ट हेरमन आईन्स्टाईन असे होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोठे झाला होता?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म दिनांक १४ मार्च १८७९ या दिवशी जर्मनीतील उलमा या ठिकाणी झाला होता.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या आईचे नाव पौलीन कोच, तर वडिलांचे नाव हेरमन आईन्स्टाईन असे होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा मृत्यू दिनांक १८ एप्रिल १९५५ या दिवशी झाला होता.

आईन्स्टाईन यांनी लावलेल्या शोधामध्ये कोणते शोध सर्वात जास्त प्रसिद्ध झाले होते?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावलेल्या शोधामध्ये त्यांचा सापेक्षता सिद्धांत आणि E=MC2 हे समीकरण खूपच प्रसिद्ध झाले होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आइन्स्टाइन ह्या शास्त्रज्ञाबद्दल विशेष माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच, आणि सोबतच तुम्हाला या माहितीचा फायदा देखील झाला असेल. तर मग तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटते, ही प्रतिक्रिया लगेचच कमेंट सेक्शन मध्ये कळवा.

धन्यवाद…!

Leave a Comment