दालचिनीची संपूर्ण माहिती Cinnamon Information In Marathi

Cinnamon Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अगदी आयुर्वेदापासून दालचिनीला आहारामध्ये फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज प्रत्येक घरामध्ये दालचिनी आढळून येतेच. दालचिनीला हिंदी भाषेतून दालचिनी हे नाव मिळालेले आहे. हा एक मसाल्याचा पदार्थ असून, जवळजवळ प्रत्येकालाच याबाबत माहिती आहे. या दालचिनीला मसल्यांची राणी म्हणून देखील ओळख मिळालेली आहे. या मसाल्याचा वापर केवळ जेवणामध्येच केला जात नाही, तर आयुर्वेदिक व विविध प्रकारच्या ऍलोपॅथी औषधांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर या दालचिनीचा वापर केला जात आहे.

Cinnamon Information In Marathi

दालचिनीची संपूर्ण माहिती Cinnamon Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण या दालचिनी विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि त्यामध्ये आढळून येणारे विविध पोषक घटक, तिचे आरोग्यदायी फायदे यासारख्या गोष्टीबद्दल देखील जाणून घेणार आहोत…

नावदालचिनी
प्रकारमसाल्याचा पदार्थ
स्वादतिखटसर
रंगतपकिरी
इंग्रजी नावसीनामॉन
शास्त्रीय नावसिनेमॉनम वेरम
मुख्य वापरजेवणामध्ये चव आणणे
इतर वापरआयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये

दालचिनी म्हणजे काय:

मित्रांनो, लॉरेसी कुटुंबातील सिनेमोनम वेरम हे शास्त्रीय नाव असलेल्या मसाल्याच्या पदार्थाला दालचिनी नाव दिले जाते. खऱ्या अर्थाने हे दालचिनीच्या झाडाची साल असून, ती पूर्णतः वाळवलेली असते. ज्यावेळी दालचिनीच्या झाडाची साल काढली जाते, तेव्हा ती ओली असते. पुढे सुकल्यानंतर ती आपोआप गोलाकार होते. ज्याला संपूर्ण भारतभर दालचिनी नावाने ओळखले जाते.

अनेक भारतीय रेसिपी मध्ये वापरला जाणारा हा पदार्थ त्याच्या सुंदर सुवासासाठी ओळखला जातो, तसेच अन्नाची चव वाढवण्यामध्ये देखील ओळखला जातो. पूर्वीच्या काळी दालचिनीच्या वासाचा उपयोग मृतदेहांना येणाऱ्या दुर्गंधी पासून वाचण्याकरिता केला जात असे.

दालचिनी या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट उपलब्ध असतात, त्याचप्रमाणे अनेक जीवनसत्वे व खनिजे देखील असतात. यामुळे मानवाच्या त्वचे करिता तसेच आरोग्याकरीता देखील दालचिनी खूपच फायदेशीर ठरत असते. सोबतच अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार म्हणून या दालचिनीचा वापर केला जातो.

दालचिनी मध्ये असणारे घटक:

मित्रांनो, दालचिनी मध्ये आढळून येणारे घटक तिला आरोग्यदायी बनवण्यामध्ये मदत करत असतात. त्याचबरोबर तिला तिला चव देखील प्राप्त करून देत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट, अँटी फंगल, घटक अँटीबॅक्टरियल गुणधर्म, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन्स, फायबर्स, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, कॉपर, झिंक, मॅंगनीज, इत्यादी घटकांचा समावेश होतो. या प्रत्येक घटकाचे शरीरासाठी एक अमूल्य महत्त्व आहे.

कोरड्या दालचिनी खाण्याचे परिणाम:

मित्रांनो, अनेकांना कोरडी दालचिनी सतत तोंडात टाकून चघळायची सवय असते. मात्र ही सवय अनेकदा घातक ठरू शकते. दालचिनीचे मोठ्या प्रमाणावर सेवन करणे, चांगले नसते. आणि त्यातही डायरेक्ट तोंडात टाकून सेवन करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. याकरिता नेहमी दालचिनी मसाल्यामध्येच वापरली पाहिजे. किंवा तशी खायची असेल तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये उकळून मगच चघळली पाहिजे.

दालचिनीचे विविध प्रकार:

इंडोनेशियन दालचिनी:

मित्रांनो, पडांग कॅसिया या नावाने ओळखली जाणारी ही दालचिनी बर्मानी या शास्त्रीय नावाची आहे. या दालचिनीचे उत्पादन इंडोनेशिया या देशांमध्ये होत असते, आणि त्या उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के उत्पादन हे इतर देशांमध्ये निर्यात केली जाते. ही दालचिनी भारतामध्ये काहीशा कमी प्रमाणात वापरली जाते. ही इतर दालचिनी पेक्षा काहीशी स्वस्त असते. ही दालचिनी आकाराने जाडसर व अतिशय सुवासिक प्रकारची असते.

सिलोन दालचिनी:

या दालचिनीला मेक्सिकन दालचिनी म्हणून देखील ओळखले जाते. या दालचिनीची साल अतिशय पातळ स्वरूपाची असते. आणि यामध्ये कमरिन चे प्रमाण देखील कमी असते. ही दालीचिनी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, आणि तिचा दर देखील महाग आहे.

केसिया दालचिनी:

मित्रांनो, या दालचिनीला चिनी दालचिनी म्हणून देखील ओळखले जाते. अरोमॅटिकम असे शास्त्रीय नाव असलेली ही दालचिनी जराशी कडक असते, मात्र चवीला काहीशी कडूसर असते. या दालचिनीचा मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये वापर केला जातो.

व्हिएतनामी दालचिनी:

या दालचिनीला सायगोन दालचिनी म्हणून देखील ओळखले जाते. या दालचिनीचा सुवास इतर प्रकारांपेक्षा सर्वाधिक असतो. त्यामुळे आजकाल या दालचिनीला मोठी मागणी आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने यकृताला हानी पोहोचवण्यासाठी देखील ही दालचिनी निकारणीभूत ठरते. त्यामुळे केवळ तिच्या सुगंधावर न जाता आरोग्यदायी फायदा लक्षात घेऊन याचे सेवन काहीसे कमी केले पाहिजे.

दालचिनी चे फायदे:

मित्रांनो, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात आणून दालचिनी हृदय रोगासाठी फायदेशीर ठरत असते. त्याचप्रमाणे ज्यांना शरीरावर जळजळ जाणवत असेल, अशा लोकांसाठी देखील दालचिनी उपयुक्त आहे. ऍसिडिटी मध्ये देखील दालचिनीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

ज्या लोकांना मधुमेह असेल, अशा रुग्णांसाठी दालचिनीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे शरीराच्या रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होत असते. त्याचबरोबर विविध बुरशीजन्य आजार किंवा जिवाणू यांच्याविरुद्ध लढण्यासाठी देखील दालचिनी मोठ्या प्रमाणावर प्रतिजैवक म्हणून काम करत असते. वजन कमी करण्याच्या कार्यामध्ये देखील दालचिनी मोठ्या प्रमाणावर आपले काम करत असते.

दालचिनीचे सेवन करण्याचे विविध प्रकार:

मित्रांनो, दालचिनी हा मुख्यतः एक मसाल्याचा पदार्थ आहे, त्यामुळे विविध भाज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पुलावामध्ये दालचिनी हमखास वापरली जाते.

दुधामध्ये किंवा चहामध्ये मसाला म्हणून देखील या दालचिनीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सौंदर्याच्या दृष्टीने देखील दालचिनीचा वापर केला जातो, चेहऱ्यावर लावताना दालचिनी मधामध्ये उगाळून लावण्याचा सल्ला दिला जातो. दालचिनी मध्ये डेटॉक्स गुणधर्म असल्यामुळे, हर्बल टी मध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतामध्ये मसाल्यांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे. भारतीय जेवण हे अतिशय उत्कृष्ट, व मसालेदार स्वरूपाचे असते. संपूर्ण जगाला मसाल्यांची देण ही भारताने दिलेली आहे. या मसाल्याच्या पदार्थांमधील मसाल्यांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दालचिनी बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती घेतलेली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला दालचिनी म्हणजे काय, तिच्यामध्ये असणारे घटक, दालचिनी खाण्याचे फायदे, दालचिनीचे प्रकार, तिचा उगम, आरोग्यासाठी उपयुक्तता, आणि इतर काही दालचिनी पासून होणारे नुकसान इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

दालचिनी ला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

इंग्रजी मध्ये दालचिनीला सिनेमोन या नावाने ओळखले जाते.

दालचिनी सेवन करताना साधारण प्रमाण काय असावे?

दालचिनीचे सेवन करताना अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरासाठी घातक देखील ठरू शकते, त्यामुळे त्याचे योग्य प्रमाण राखणे खूपच गरजेचे असते. संशोधन अहवालानुसार प्रत्येक दिवशी एका व्यक्तीने ०.१ मिलीग्राम प्रति किलो या प्रमाणात सेवन करणे योग्य असल्याचे सांगितलेले आहे.

दालचिनीचा वापर कुठे कुठे केला जातो?

दालचिनी हा पदार्थ गोड पदार्थांपासून तिखट पदार्थांपर्यंत प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. हा अगदी सकाळी सकाळी बनवण्यात येणाऱ्या चहापासून, संध्याकाळी बनवल्या जाणाऱ्या तिखट जेवणापर्यंत देखिल वापरला जातो.

दालचिनीचे दोन प्रकार कोणते आहेत?

दालचिनीचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, ज्याला सिलोन आणि केसिया या नावाने ओळखले जाते.

दालचिनीची कुठली प्रजाती खाण्यास चांगली समजली जाते?

केसिया व सिलोन या दोन्ही दालचिनीच्या प्रजाती खाण्या योग्य आहेत. मात्र केसिया प्रजातीमध्ये कौमरीन अधिक प्रमाणात असल्यामुळे, सिलोन प्रकार अधिक सुरक्षित व चांगला दर्जाचा समजला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण दालचिनी या मसाल्याच्या पदार्थाबद्दल विशेष माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच, तर मग विचार कसला करताय? पटापट कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. आणि इतर मित्र-मैत्रिणींना शेअर करण्यासाठी देखील कुठलाही विचार करू नका. धन्यवाद…!

Leave a Comment