पोलीसची संपूर्ण माहिती Police Information In Marathi

Police Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पोलीस बघितले की सर्वसामान्य लोकांना नेहमीच धडकी भरत असते. मात्र पोलीस हे नेहमी सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणाकरताच असतात. पोलीस केवळ अनैतिक कृत्य करणाऱ्या लोकांनाच धारेवर धरत असतात.

Police Information In Marathi

पोलीसची संपूर्ण माहिती Police Information In Marathi

मित्रांनो, ज्याप्रमाणे भारताबाहेरील शत्रूंशी लढण्याकरिता सैन्य दलांची निर्मिती करण्यात येते, त्याचप्रमाणे अंतर्गत शांतता अबाधित राखणे आणि देशांतर्गत राष्ट्रविरोधी लोकांना धडा शिकवणे, याकरिता पोलीस दलाची स्थापना केली जाते. हे एक नागरि सुरक्षा दल असून, कोणत्याही देशांमधील अंतर्गत सुरक्षिता अबाधित राहावी याकरिता पोलिसांचे मोठे कर्तव्य असते.

आजच्या भागामध्ये आपण पोलीस यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावपोलीस
प्रकारसुरक्षा दल
उपप्रकारअंतर्गत सुरक्षा दल
वर्दीखाकी
नियंत्रणराज्य शासन
कार्यगुन्हेगारी क्षेत्राला आळा घालणे
वर्गीकरणवाहतूक पोलीस आणि नागरि पोलीस

पोलीस म्हणजे काय:

समाजातील अनेक गुन्हेगारी घटनांना आवर घालण्याकरिता रात्रंदिवस कर्तव्य बजावत असणाऱ्या दलाला पोलीस असे म्हटले जाते. या पोलीस दलामध्ये खाकी वर्दी घातलेल्या पोलिसांचा समावेश असतो. या पोलीस दलाला राज्य शासनामार्फत संचलित केले जात असले, तरी देखील जिल्हा पातळीवरील जिल्हाधिकारी दर्जाची व्यक्ती देखील त्यांना आदेश किंवा निर्देश देऊ शकते. संपूर्ण राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य या पोलिसांमार्फत केले जात असते.

पोलिसांचे कार्य किंवा जबाबदाऱ्या:

मित्रांनो, पोलिसांच्या प्रकारानुसार मुख्यतः दोन जबाबदाऱ्या पडत असतात. त्यामध्ये गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालणे, किंवा गुन्ह्याचा शोध लावणे. आणि वाहतूक व्यवस्था नियंत्रणात ठेवणे. या जबाबदाऱ्यांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे त्यांना इतरही कार्य करावे लागतात.

जसे की कुठल्याही संशयास्पद घटना किंवा व्यक्ती यांची माहिती तपासणे, समाजातील सर्वसामान्य घटकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून, कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करणे, त्याचबरोबर स्थानिक स्तरावरील विविध समित्या, संस्था किंवा कार्यालय यांच्यासोबत समन्वय राखून गुन्हेगारी क्षेत्र आटोक्यात आणणे, त्याचबरोबर कौटुंबिक घटनांमध्ये किंवा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पंचनामा करणे, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील माहिती तपासणे, ती गोळा करणे, त्याचप्रमाणे विविध महत्त्वाच्या लोकांना सुरक्षा पुरवणे, इत्यादी असते.

मित्रांनो, पोलीस दल हे गृह विभागाच्या अखत्यारीत येत असून, संपूर्ण राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस जबाबदार असते. त्यांना गुन्हेगारांना पकडणे, अटक करणे, कुठे गुन्हेगारी कृती होत असेल तर त्यास मनाई करणे, घडून गेलेल्या गुन्ह्यांचा तपास लावणे, राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करणे, किंवा त्याला सुरक्षा पुरविणे, पंचनामा करताना घटनास्थळी असणारे पुरावे गोळा करणे, इत्यादी मुख्य कार्य असतात.

याबरोबरच ज्यांना अटक केलेली आहे त्यांना न्यायालयामध्ये सादर करणे, त्यांच्याविषयीची पुरावे सादर करणे, इत्यादी देखील कार्य असते. त्याचबरोबर कोणत्याही महत्त्वाच्या सणाच्या वेळी ग्रस्त घालणे, विविध मिरवणुकी, सभा, रॅली, इत्यादी ठिकाणी कर्तव्य बजावणे, यांसारखी कार्य करावी लागतात.

ज्यावेळी कोणताही नागरिक तक्रार घेऊन येतो, त्यावेळी अशी तक्रार नोंदवून घेणे, त्याबद्दलची विशिष्ट दस्तऐवज गोळा करणे, आणि त्यानुसार कारवाई करत त्या गुन्ह्याच्या किंवा घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करणे, या संदर्भामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल करून, दोशी ठरविणे व न्यायालयामध्ये सादर करणे यांसारखे देखील कार्य करावी लागतात.

मित्रांनो, पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार कार्य करावे लागते. केवळ एखाद्या व्यक्तीला अटक केली, म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. त्याविषयी ठोस पुरावे सादर करणे, आणि त्याला न्यायालयाने तसे सिद्ध करणे गरजेचे ठरते. याच बरोबरीने पोलिसांना अनेक प्रतिबंधित क्षेत्रामधील क्रियाकल्पांवर देखील लक्ष ठेवावे लागते.

जसे की देशभर अमली पदार्थांना बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र अनेक लोक चोरून लपून अशा प्रकारच्या पदार्थांची तस्करी करत असतात. ही तस्करी होऊ नये, किंवा कोणी करत असेल तर त्याला रोखले जावे, याकरिता पोलीस नेहमीच तत्पर असतात.

त्याचप्रमाणे वाळू किंवा गौण खनिज यांच्या उत्खननाला देखील मनाई आहे, अशा रितीचे कार्य कोणी करत असेल तर पोलिसांना महसूल खात्यासोबत मिळून कारवाई करण्याचे देखील अधिकार असतात. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करत, त्यांची वाहने देखील जप्त केली जाऊ शकतात. मुख्यतः हे कार्य महसूल विभागाचे असले, तरी देखील पोलिसांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभत असते.

मित्रांनो, पोलिसांचे अनेक प्रकार पडत असतात, त्यामध्ये वाहतूक पोलीस, गुप्त पोलीस, नागरी पोलीस इत्यादी प्रकारचा समावेश होत असतो. ते त्यांच्या कामानुसार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागले जात असतात.

त्याचप्रमाणे पोलिसांसाठी विविध संस्थांची देखील स्थापना केली जात असते, या संस्था पोलिसांसाठी तपास यंत्रणा म्हणून कार्य करत असतात. त्याचप्रमाणे पोलिसांवर देखील नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत, पोलीस दलामधील फसवणूक व भ्रष्टाचारावर नियंत्रण आणत असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, प्रत्येक नागरिक अतिशय निश्चिंतपणे आणि अगदी बिनधास्त समाजामध्ये वावरू शकतो. कारण प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करण्याकरिता पोलीस   कुठेही गुन्हा घडला, किंवा काही अनैतिक कृत्याची बातमी कानावर आली की लगेच पोलीस अशा लोकांना अटक करून त्यांना गुन्हे करण्यापासून प्रतिबंध करण्याचे कार्य करत असतात.

मित्रांनो आजच्या भागात देखील आपण या पोलीस दलाविषयी माहिती बघितली आहे. यामध्ये पोलीस काय कार्य करतात, पोलिसांचे प्रकार काय असतात, गुप्त पोलीस म्हणजे काय, पोलिसांचा विविध संस्था किंवा एजन्सी काय असतात, यासारख्या घटकांवर माहिती बघितली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. मित्रांनो, पोलिसांविषयीची माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरली असेल.

FAQ

भारतामध्ये पोलीस दलावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते?

पोलीस दल हे शक्यतो राज्य सरकारच्या अधिनस्त असते. आणि या राज्य पोलिसांच्या प्रशासनाची व नियंत्रणाची देखील जबाबदारी संपूर्णतः राज्य स्वीकारत असते. त्याचप्रमाणे या पोलिसांना जिल्हा दंडाधिकारी अर्थात डी एम जिल्हा पातळीवर निर्देश देऊ शकतात. असे निर्देश एस पी यांना दिले जातात, त्याचप्रमाणे डी एम या पोलिसांवर देखरेख देखील ठेवू शकतात.

सामान्य जनतेवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिसांनी गैरवर्तन केले तर काय तरतूद आहे?

मित्रांनो, पोलीस देखील एक नागरिकच असतात. आणि त्यांच्यावर गैरवर्तनासाठी नियंत्रण ठेवण्याकरिता काही तरतुदी आहेत. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले नाही, किंवा वर्तन अयोग्य केले, तर भारतीय पोलीस कायदा यामध्ये नमूद केलेल्या कलम २९ प्रमाणे त्यांना सुमारे तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास दिला जाऊ शकतो. किंवा या कालावधीमध्ये त्यांचा पगार दंड स्वरूपात जप्त केला जाऊ शकतो.

पोलिसांबद्दल इतर माहिती काय सांगता येईल?

प्रत्येक पोलीस चौकीमध्ये एक पोलीस अधिकारी असेल, पोलिसांना जिल्हाभरात कोणत्याही ठिकाणी अधिकारी म्हणून काम करता येऊ शकते. पोलिसांना नेहमी कर्तव्यावर असल्याचेच समजले जाते.

गुप्त पोलीस म्हणजे काय?

कोणत्याही विशेष मोहिमेकरिता पोलिसांनी आपली वेशभूषा बदलून अर्थात वर्दी न घालता समाजामध्ये वावरणे, आणि गुन्ह्याचा शोध लावणे, अशा प्रकारच्या पोलिसांना गुप्त पोलीस म्हणून ओळखले जाते.

पोलीस मित्र म्हणजे काय?

पोलीस मित्र हे कोणत्याही प्रकारे सेवेमध्ये नसतात, मात्र देशसेवे करिता त्यांनी पोलीस खात्यासोबत जोडणी केलेली असते. या पोलीस मित्रांचे कार्य समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांवर लक्ष ठेवून नियंत्रण मिळवणे, तसेच वेळप्रसंगी पोलीस दलाला सुचित करणे असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पोलीस दलाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धती विषयी तुम्हाला माहिती झाली असेल. हीच माहिती तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना व्हावी, याकरिता त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा. आणि सोबतच तुम्हाला या माहितीविषयी काय वाटते, तसेच पोलिसांविषयी तुम्हाला आलेले अनुभव कमेंट सेक्शन मध्ये दिलखुलास पणे लिहा.

 धन्यवाद…!

Leave a Comment