डोळ्याची संपूर्ण माहिती Eye Information In Marathi

Eye Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्याला कुठल्याही गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी आपल्या ती गोष्ट जाणवावी लागते. मग ती हातांनी स्पर्श करणे असो, किंवा डोळ्यांनी बघणे असो. ती गोष्ट जाणवली तरच आपल्याला त्या गोष्टीचे अस्तित्व कळते.

Eye Information In Marathi

डोळ्याची संपूर्ण माहिती Eye Information In Marathi

मानवी आयुष्यामध्ये डोळा हा अतिशय महत्त्वाचा अवयव असून, ज्यामुळे आपल्याला ही संपूर्ण सृष्टी न्याहाळता येते. डोळा म्हणजे मानवी शरीरातील एक कॅमेराच असून, त्या डोळ्याला एक मजबूत पडदा अर्थात पापण्या लावलेल्या असतात.

डोळ्यामध्ये कॉर्निया नावाचा भाग देखील असतो, तसेच काही द्रव पदार्थ देखील असतात. जे कोर्नियाच्या पाठीमागे जमा झालेले असतात. त्याच्या आतल्या बाजूस एक पडदा असतो, ज्याला आयरिस नावाने ओळखले जाते. बुबळामध्ये एक छिद्र मध्यभागी असते, त्याला बाहुली म्हणून ओळखले जाते. आणि डोळ्यांमध्ये किती प्रकाश जावा याबाबत नियंत्रण करण्याचे काम हे बुबुळ करत असते.

ज्यावेळी तीव्र प्रकाश असतो त्यावेळी त्याचा आकार कमी होतो, तर कमी प्रकाशामध्ये हा आकार वाढत असतो. यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची हालचाल करावी लागत नाही, ते आपोआपच होत असते. डोळ्यांच्या आतील बाजूस असणाऱ्या पडद्यावर आपण बघितलेल्या वस्तूंच्या प्रतिमा तयार होत असतात. ज्या आकाराने लहान आणि उलट्या असतात.

आजच्या भागामध्ये आपण मानवी डोळ्या बद्दल जाणून घेणार आहोत…

नावडोळा
इतर नावेनयन, अक्ष, नेत्र, चक्षु इ.
इंग्रजी नावआय
प्रकारमानवी अवयव
कार्यसमोरील वस्तूंच्या प्रतिमा तयार करून मेंदूला सूचना करणे
स्थितीचेहऱ्याच्या वरील बाजूस नाकाच्या दोन्ही कडेने जोडीत

मानवी डोळ्याची रचना कशी असते:

मित्रांनो, डोळा हा आपण नेहमी बघितलेला आहे. तो मानवी शरीरातील एक घटक असून, त्याच्यामध्ये शिरणाऱ्या विविध प्रकाशाला समजून घेऊन त्याचे संदेश मेंदूपर्यंत पोहोचवत असतो. डोळा हे एक ज्ञानेन्द्रिय असून, ज्यामुळे आपण वस्तू बघू शकतो. असे म्हटले जाते की मानवी डोळ्यातील बुबळांचे रंग सुमारे दहा लाख रंगछटांमध्ये असतात, ज्यानुसार विविध व्यक्तींचे डोळे वेगवेगळे दिसून येतात.

डोळ्याच्या सर्वात समोर असणारा भाग म्हणजे कॉर्निया होय. जो एक बहिर्वक्र भिंगाप्रमाणे कार्य करत असतो. आणि पारदर्शक पदार्थ अर्थात जेल ने बनवलेला असतो. कॉर्निया येणाऱ्या प्रकाशाला आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्याचे कार्य करत असतो, ज्यामुळे हा प्रकाश थोडासा वाकला जातो आणि आतील पडद्यावर प्रतिमा उमटते.

बुबळांच्या अगदी मध्यभागी एक काळा ठिपका असतो, ज्याला बाहुली असे म्हटले जाते. या डोळ्यांमध्ये सिलीअरी स्नायू असतात. ज्यांच्यामुळे प्रकाशाची तीव्रता समायोजित केली जाते, आणि वस्तूंच्या लांबी व आकारानुसार या फोकल लेन्थ ची लांबी देखील कमी जास्त केली जात असते. या सर्व भिंगाच्या पाठीमागे एक पडदा असतो ज्यामध्ये डोळ्यातील प्रतिमा उमटते.

मानवी डोळ्यांचे कार्य:

मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की, वस्तू ज्या रंगाची असेल त्या रंगाचा प्रकाश ती परावर्तित करत असते. ज्यावेळी सूर्यप्रकाश कुठल्याही वस्तूवर पडतो, त्यावेळी तो परावर्तित देखील होत असतो. आणि हा परावर्तित झालेला प्रकाश ज्यावेळी मानवाच्या डोळ्यांमध्ये शिरतो, त्यावेळी मानवाला ती वस्तू दिसून येत असते. डोळ्यांचे मुख्य कार्य विविध वस्तू बघणे, आणि त्यानुसार कार्य करण्यास मानवाला सूचना देणे हे असते.

त्यामुळे माणूस आपल्या दैनंदिन जीवनातील कार्य सहजतेने करू शकतो. आणि विनाअडथळा आपली सर्व कामे पार पाडू शकतो. डोळ्यामध्ये तयार झालेली प्रतिमा पडद्यावर उलटी आणि काहीशी छोटी दिसत असते, मात्र ती वास्तविक प्रतिमा असते. या पडद्यावरील प्रतिमेचे संदेश चेतासंस्थेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचवले जातात.

डोळा या अवयवाबद्दल काही तथ्य माहिती:

  • मित्रांनो, मानवाच्या डोळ्यांमध्ये सुमारे दहा दशलक्ष वेगवेगळ्या रंगांच्या छटा आढळू शकतात.
  • आज आपण कॅमेऱ्याचे रेसुलेशन मेगापिक्सल मध्ये मोजतो. त्याप्रमाणे जर मानवी डोळ्याची मोजले तर ते सुमारे ६७६ मेगापिक्सल इतके भरेल.
  • शरीरातील इतर कुठल्याही स्नायूंपेक्षा डोळ्यातील स्नायू अतिशय जास्त सक्रिय असतात.
  • मानवी डोळ्यांमध्ये सुमारे १.२ दशलक्ष फायबर्स असतात.
  • प्रत्येक रंग बघण्यासाठी रॉड किंवा शंकू यांचा वापर केला जातो, आणि त्यानुसारच मानवी डोळ्याच्या रेटीनामध्ये सुमारे १२० दशलक्ष रॉड, तसेच ७० लक्ष शंकू उपलब्ध असतात.
  • जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवी डोळ्याची वाढ होत नाही, ते सर्वअर्थाने सारखीच असतात. मात्र यातील भिंगे वयानुसार घट्ट होतात.
  • भिंग घट्ट झाल्यामुळे बऱ्याच चाळीशी उलटलेल्या लोकांना चष्म्याची गरज भासते.
  • मानव नेहमी आपले डोळे मीचकावत असतो. या गोष्टीचा वेळ सलग मोजला तर एक माणूस संपूर्ण आयुष्यामध्ये सुमारे एक वर्षांहूनही जास्त काळ डोळे ब्लिंक करत असेल.
  • आपण दिवसातील जागे असलेल्या वेळेचा सुमारे दहा टक्के वेळ डोळे मिचकावण्यातच घालवतो. असे म्हणतात की माणूस प्रत्येक मिनिटाला बारा वेळा डोळे मिचकावत असतो.
  • मानवी डोळ्यांचे वजन हे केवळ आठ ग्रॅम इतकेच असते.
  • बालक १४ आठवड्यांचे होईपर्यंत त्याला अश्रू येत नाहीत, ते कोरडेच रडत असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, डोळा हा मानवी आयुष्यातील एक फार महत्त्वाचा घटक आहे. डोळ्याचे महत्त्व जे आंधळे आहेत त्यांनाच समजते. डोळ्यांनी कार्य करणे बंद केल्यास दैनंदिन कार्य खूपच अवघड होऊन बसतात. त्यामुळे, डोळ्यांची फार काळजी घेतली जात असते.

आजकाल अनेकांना डोळ्यांच्या विकारामुळे चष्मा लागलेला आहे, आणि आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांना अपाय देखील होत आहे. आजच्या भागामध्ये आपण या डोळ्याविषयी संपूर्ण माहिती बघितली. यामध्ये मानवी डोळ्याची रचना कशी असते, डोळे काम कसे करतात, डोळे म्हणजे काय, आणि डोळ्यांच्या बद्दल अनेक तथ्य माहिती देखील बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

डोळ्यांना इतर कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?

डोळ्यांना नयन, नेत्र, अक्ष, चक्षु इत्यादी नावांनी ओळखले जाते. त्याशिवाय इंग्रजीमध्ये या डोळ्यांना आय असे म्हटले जाते.

डोळ्यामधील सर्वात मुख्य घटक म्हणून कशाला ओळखले जाते?

डोळ्यामध्ये बाह्य स्तरावर असलेला घटक म्हणजे कॉर्निया होय. ज्याचा आकार घुमटा प्रमाणे असतो. या कॉर्निया मधून ज्यावेळी कुठल्याही वस्तूवर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये परावर्तित होतो, तेव्हा तो थोडासा वाकला जातो. आणि मध्यभागी असणाऱ्या प्रकाशबिंदू किंवा फोकल पॉईंट मध्ये प्रवेश करतो. यालाच बाहुली म्हणून देखील ओळखले जाते, आणि त्यामुळे वस्तूची प्रतिमा उमटण्यास मदत मिळते.

डोळ्या बद्दल अजून काय माहिती सांगता येईल?

मित्रांनो, डोळा हा पंच ज्ञानेंद्रियामधील एक अवयव असून, ज्यामुळे आपल्याला वस्तू दिसत असतात.

डोळ्यांचे कार्य थोडक्यात कसे सांगता येईल?

मित्रांनो, ज्यावेळी कुठल्याही वस्तूवर परावर्तित झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो फोकल पॉईंट मधून जातो. आणि आपल्या पडद्यावर प्रतिमा उमटवत असतो. या प्रतिमा चेतासंस्थेद्वारे संदेशामध्ये रूपांतरित केल्या जातात. आणि पुढे मेंदूकडे पाठविले जातात, आणि त्या वस्तूची आकलन आपल्याला होत असते.

डोळ्यांवरील भुवया किंवा आयब्रो यांच्या बद्दल काय तथ्य सांगता येईल?

शरीरातील इतर केसंप्रमाणेच आपले आईब्रो देखील वाढत असतात. जे ६४ दिवसानंतर पूर्णतः नवीन उगविले जातात आणि जुने पडून जातात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण डोळा या मानवी अवयवाची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेलच, आणि तुम्हाला देखील तुमच्या डोळ्याचे महत्व समजले असेलच. तर मग आम्ही देखील तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत आहोत. आणि याशिवाय नेहमी मोबाईल हातात असणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील डोळ्यांच्या आरोग्याच्या साठी मोबाईल बघण्याची सवय कमी होईल.

 धन्यवाद…!

Leave a Comment