सिंहगड किल्याची संपूर्ण माहिती Sinhagad Fort Information In Marathi

Sinhagad Fort Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो गिर्यारोहणाचा अनेकांना छंद असतो, तर काहींना गड किल्ले फिरण्याचा. सह्याद्री पर्वतामध्ये देखील एक अतिशय असामान्य किल्ला असून, प्राचीन तटबंदी आणि भक्कमता या गोष्टींसह स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा किल्ला म्हणजे सिंहगड होय. पूर्वीच्या कोंढाणा नावाने ओळखला जाणारा हा किल्ला स्वराज्यासाठी फार महत्त्वाचा होता. या सिंहगड किल्ल्यावर झालेले युद्ध देखील खूप प्रसिद्ध असून, १६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी या किल्ल्यावरील लढाईत दाखवलेल्या शौर्यमुळे या किल्ल्याचे नाव कोंढाणा वरून सिंहगड असे करण्यात आले.

Sinhagad Fort Information In Marathi

सिंहगड किल्याची संपूर्ण माहिती Sinhagad Fort Information In Marathi

समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंच असणारा हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असून, चढाई करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. हा मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा साक्ष म्हणून आज देखील दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या आसपास तोरणा, राजगड, आणि पुरंदर इत्यादी किल्ले असून, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी, आणि छायाचित्रकार भेट देत असतात.

सिंहगड या किल्ल्यावर असणारे वातावरण अतिशय उत्कृष्ट असून, पर्यटकांना एक आल्हाददायक अनुभव प्रदान करण्यासाठी ओळखले जाते. अनेक लोक विकेंड ला या ठिकाणी भेट देणे पसंत करतात, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी येथे फार गर्दी असते.

अगदी मध्ययुगीन इतिहासामध्ये देखील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी या ठिकाणी आपला वेळ घालवलेला आहे. हल्ली नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून या किल्ल्याचा वापर केला जातो.

मित्रांनो, या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे, येथे कोणत्याही वाईट गोष्टींना परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे येथे जाताना काळजी घेणे फारच गरजेचे ठरते.

आजच्या भागामध्ये आपण सिंहगड या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावसिंहगड
स्वरूपकिल्ला
प्रकारगिरीदुर्ग किल्ला
समुद्रसपाटीपासून उंची७५० मीटर
भौगोलिक स्थळपुणे
प्राचीन नावकोंढाणा किल्ला
जवळील गावसिंहगड गाव
हल्ली मालकीशासनाकडे

सिंहगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती:

सिंहगड या किल्ल्याविषयी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पूर्वीच्या काळी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बांधला असल्याचे सांगितले जाते.

त्यावेळी तत्कालीन ऋषी कौदिन्य यांच्या नावावरून त्याला कोंढाणा हे नाव दिले होते, असे सांगितले जाते. चौदाव्या शतकानंतर या किल्ल्यावर राजा नाग नाईक यांचे साम्राज्य होते. पुढे मोहम्मद तुगलक यांनी १३२८ यावर्षी हा किल्ला ताब्यात घेतला. व या किल्ल्याची जबाबदारी शहाजीराजे भोसले यांच्याकडे दिली होती.

शहाजीराजे भोसले यांचे चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाची नोकरी करण्याऐवजी स्वतःचे स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, व याला मोठे यश देखील प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा ताबा मिळवल्यामुळे सिद्धी अंबर सह शहाजी भोसले यांना आदिलशहाकडून कैद केले गेले.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहशी तह करून किल्ल्याच्या बदल्यात आपल्या वडिलांना सोडविले होते. पुढे अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये हा किल्ला होता. जो पुरंदरच्या तहाच्या वेळी १६६५ मध्ये जयसिंग याच्याकडे गेला. मात्र पुन्हा तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाने हा किल्ला स्वराज्यामध्ये परत आणला गेला.

सिंहगड किल्ल्याची स्थापत्यशैली:

मित्रांनो, अतिशय प्राचीन किल्ल्यांमध्ये सिंहगड किल्ल्याचा समावेश होतो. तो पठारी भागाच्या पर्वत शिखरावर वसलेला असून, अतिशय संरक्षित आहे. समुद्र सपाटीपासून १३०० मीटर तर पायथ्यापासून ७५० मीटर उंच असणारा हा किल्ला दोन प्रवेशद्वारांनी युक्त आहे. आणि या प्रत्येक प्रवेशद्वाराला दगडांच्या प्राचीन पायऱ्या आहेत. या किल्ल्यावर अनेक महत्त्वाचे बुरुज असून, अनेक प्रकारच्या इमारती देखील आहेत.

मित्रांनो, तुम्हाला ट्रेकिंग करण्याची आवड असेल, तर सिंहगड किल्ला तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण ठरू शकतो. अनेक ट्रेकर्स पहाटेच्या वेळी या किल्ल्याला भेट देत असतात. यावेळी या किल्ल्यावर असणारे धूके त्यांच्या अनुभवांमध्ये आनंद भरत असते.

या किल्ल्याचा पायथ्यापर्यंत तुम्ही वाहनाने जाऊ शकता, मात्र तिथून पुढे तुम्हाला चालत जावे लागेल. या किल्ल्यावर ट्रेकिंग करताना तुम्हाला तेथील अतिशय सुग्रास पदार्थांचा देखील आस्वाद घेता येईल. ज्यामध्ये पिठले भाकरी, किंवा झुणका भाकरी, ताक, लिंबू पाणी, दही, आणि भाकरी खायला मिळेल. यासोबतच तुम्हाला गरमागरम कांदा भजी देखील खाता येतील.

सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा उत्तम मार्ग:

मित्रांनो, सिंहगड हा किल्ला पुणे शहरापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर असून, या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे साधन वापरता येऊ शकतात. विमानाने येणार असाल तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेने येणार असाल तर पुणे जंक्शन, या ठिकाणी तुम्ही उतरू शकता. तुम्ही टॅक्सी किंवा पुणे शहरातील शहर बस सेवा वापरून किल्ल्यावर पोहोचू शकता.

सिंहगड किल्ला बघताना तुम्ही अनेक निसर्ग सौंदर्य न्याहाळू शकता. त्याचबरोबर ट्रेकिंग देखील करू शकता. या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक इमारती असून, त्यामध्ये टिळक बंगला, देवटाके, कल्याण दरवाजा, राजाराम महाराजांचे स्मारक, आणि उदयभान राठोड यांचे स्मारक इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. या किल्ल्यावर भेट दिल्यानंतर ही ठिकाणी बघायला विसरू नका.

निष्कर्ष:

मित्रांनो, स्वराज्य म्हटलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आठवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना अर्थात मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली होती. त्यांनी एका मागून एक किल्ले जिंकत, व काही किल्ले बांधत स्वराज्याला अतिशय मजबूत बनवले होते.

मात्र काही कारणाने कोंढाणा हा किल्ला शत्रूंना द्यावा लागला होता, हा किल्ला परत मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहीम आखली होती. त्याकरिता तानाजी मालुसरे यांनी पुढाकार दर्शवला होता. आजच्या भागामध्ये आपण या सिंहगड किल्ल्याविषयी इत्यंभूत माहिती बघितलेली असून, या किल्ल्याचा इतिहास, या किल्ल्याच्या स्थापत्य कलेविषयी माहिती, येथे ट्रेकिंग किंवा इतर उपक्रमाकरिता कसे जावे, या ठिकाणी जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे.

सिंहगड किल्ला चढताना घ्यावयाची काळजी, या ठिकाणी बघण्यासारखे ठिकाण, आणि या किल्ल्याविषयी हल्लीच आलेला तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. या माहितीने तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असेल, अशी आशा आहे.

FAQ

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते.

सिंहगड किल्ल्यावर झालेली सर्वात प्रसिद्ध लढाई कोणती आहे?

सिंहगड किल्ल्यावर झालेली सर्वात प्रसिद्ध लढाई ही तानाजी मालुसरे यांनी सिंहगड ताब्यात घेण्यासाठी लढलेली होती.

सिंहगडावर कोणती प्रसिद्ध पाहण्यासारखे ठिकाणी आहेत?

सिंहगडावर अनेक प्रसिद्ध व पाहण्यासारखी ठिकाणे आहेत, त्यामध्ये टिळक बंगला, देवटाके, कल्याण दरवाजा, उदयभान राठोड चे स्मारक, राजाराम महाराज स्मारक इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

सिंहगड किल्ल्यावर झालेल्या लढाईनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते उद्गार काढले होते?

सिंहगड किल्ल्याच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सैनिक तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले होते.

सिंहगड किल्ल्यावर बॉलीवूड मध्ये कोणता चित्रपट आलेला आहे?

बॉलीवूड ने सिंहगड या किल्ल्याच्या दैदिप्यमान इतिहासावर तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट काढलेला आहे.

मित्रानो आजच्या भागामध्ये आपण पूर्वीच्या कोंढाणा नाव असलेल्या किल्ल्याचे अर्थात आजच्या सिंहगड किल्ल्याची माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना, आणि किल्ल्यांची आवड असणाऱ्या लोकांना ही माहिती अवश्य शेअर करा. धन्यवाद…!

Leave a Comment