Aryabhatta Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो गणित हा विषय म्हटलं की अनेकांना नकोसे वाटते. मात्र याच गणित विषयांमध्ये सखोल संशोधन करून आपले नाव संपूर्ण जगभर करणारे एक उत्कृष्ट गणित तज्ञ व खगोलशास्त्रज्ञ म्हणून आर्यभट्ट यांना ओळखले जाते. त्यांनी गणित आणि विज्ञान क्षेत्रामध्ये केलेल्या विविध योगदानामुळे आज संपूर्ण जग प्रेरणा घेत आहे. बीजगणित क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करणारे आर्यभट्ट, आर्यभट्टिय या पुस्तकाचे लेखक असून, त्यांनी श्लोक किंवा कवितेच्या स्वरूपात गणिताची मांडणी केली आहे, ही गोष्ट खरंच आश्चर्यकारक आहे.
आर्यभट्ट यांची संपूर्ण माहिती Aryabhatta Information In Marathi
त्यांनी लिहिलेले आर्यभटीय हे अतिशय प्राचीन साहित्य असून, गणितासह खगोलशास्त्रातील देखील काही घटक यामध्ये समाविष्ट आहेत. या ग्रंथांमध्ये अंकगणिताचे ३३ नियम, व बीजगणित व त्रिकोणमिती अर्थात ट्रिग्नोमेट्री विषयी माहिती दिलेली आहे.
मित्रांनो आर्यभट्ट अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. खगोलशास्त्रामध्ये यांनी फार मोलाचे संशोधन केलेले असून, निकोलस कोपर्निकस यांच्या देखील कित्येक वर्ष आधी त्यांनी जगासमोर एक गोष्ट मांडली होती, आणि ती म्हणजे जग अर्थात पृथ्वी गोल असून, या पृथ्वीचा घेर सुमारे २४८३५ मैल इतका आहे. त्यांनी आपल्या गणिती ज्ञानाच्या जोरावर ही आकडेवारी मांडली होती.
मित्रांनो, आर्यभट्ट यांनी विविध पुराणांमध्ये दाखवलेले चंद्रग्रहण व त्याच्याशी संबंधित हिंदू संस्कृतीतील गोष्टी खोट्या असल्याचे ठरविले होते. त्यांच्या मते चंद्र स्वतः प्रकाशमान नसून, सूर्याच्या किरणांमुळे इतर ग्रह व चंद्र प्रकाशित होत असतात. त्याचबरोबर एका वर्षांमध्ये २६५.२९५१ दिवस असतात, हे सांगितले होते. आणि याच संकल्पनेवर लीप वर्ष आधारलेले आहे. यावरून त्यांच्या गणिताचा अंदाज लावता येऊ शकतो.
आजच्या भागांमध्ये आपण आर्यभट्ट यांच्या विषयी माहिती बघून, त्यांच्या जीवनचरित्राबद्दल जाणून घेणार आहोत…
नाव | आर्यभट्ट |
जन्म कालावधी | ४७६ अश्मक युग |
जन्माचे ठिकाण | महाराष्ट्रातील अश्मक प्रदेश |
कार्य | खगोलशास्त्र, गणित, आणि ज्योतिष शास्त्र. |
शिक्षण | नालंदा विद्यापीठ |
प्रसिद्धी | आर्यभटीय ग्रंथ आणि आर्यभटाचा सिद्धांत |
योगदान | पाय चे मूल्य, व शून्याचा शोध |
मृत्यू कालावधी | इसवी सन ५५० |
आर्यभट्ट यांचे प्रारंभिक जीवन:
मित्रांनो, आर्यभट्ट यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या आर्यभट या पुस्तकांमध्ये त्यांनी आपल्या जन्माबद्दल वर्णन केलेले आहे. त्यानुसार त्यांची जन्मतारीख इसवी सण ४७६ या वर्षीची असावी, असे सांगितले जाते. मात्र असे असले तरी देखील त्यांचा जन्म कोणाच्या ठिकाणी झाला होता याबद्दल साशंकता आहे.
काही लोकांच्या म्हणण्यानुसार यांचा जन्म कुसुमपुरा येथे झाला होता, मात्र इतर अनेक लोक असे देखील सांगतात की महाराष्ट्रातील अश्मक या जिल्ह्यात जन्म झालेले आर्यभट्ट उच्च शिक्षण घेण्याकरिता या कुसुमपुरा या ठिकाणी गेले होते.
त्यांनी नालंदा विद्यापीठातून आपले शिक्षण घेतले असल्याचे देखील काही ठिकाणी पुरावे उपलब्ध आहेत. गुप्त साम्राज्याचा शेवटचा कालखंड सुरू असताना आर्यभट्ट यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते असे देखील पुरावे आढळून येतात.
आर्यभट्ट यांचे कार्य:
मित्रांनो, आर्यभट्ट यांनी खगोलशास्त्र व गणित या विषयांमध्ये फार मोलाची कामगिरी केलेली आहे, असे आपल्याला माहितीच आहे. मात्र त्यांनी आर्यभट्टीय या ग्रंथातून या शोधांना प्रसिद्धी देखील दिलेली आहे. त्यांनी हा ग्रंथ श्लोक किंवा कवितेच्या स्वरूपामध्ये लिहिला होता.
त्यांनी लिहिलेल्या या आर्यभटीय ग्रंथामध्ये अनेक भाग असून, चार अध्यायांचा समावेश आहे. या अध्यायमध्ये अनुक्रमे लिरिक पॅड, गणित, काल गणित किंवा कालगणना, आणि गोल पॅड इत्यादी विषयी माहिती दिलेली आहे. या संपूर्ण ग्रंथांमध्ये सुमारे १०८ श्लोक असून १३ अतिरिक्त श्लोक सुरुवातीला दिलेले आहेत.
आर्यभट्ट यांचे योगदान:
मित्रांनो, आर्यभट्ट यांनी गणित व खगोलशास्त्र या विषयांमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. हे आपल्याला माहितीच आहे. मात्र याबरोबर त्यांनी ज्योतिष शास्त्रामध्ये देखील फार महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यांनी ग्रहांची स्थिती आणि आकार जाणून घेण्यासाठी काही गणिते मांडली होती. आणि आजच्या नवनवीन शोधानुसार ती खरे देखील ठरत आहेत. पाय या घटकाला गणितामध्ये फार महत्व दिले जाते.
वर्तुळामधील काहीही गोष्ट काढायची असेल, अर्थात क्षेत्रफळ म्हणा किंवा परिमिती म्हणा तरी या पाय चे महत्व अनन्यसाधारण असे ठरत असते. या पाय ची किंमत किती असावी, याबद्दल सखोल संशोधन करून आर्यभट्ट यांनी ही किंमत निश्चित केली होती. त्यामुळे पुढील काळामध्ये फार फायदा झाला. त्याचबरोबर या गोष्टींचा वापर करून त्यांनी पृथ्वीच्या गोल असण्याचे संकेत दिले होते. पुढे कोपर्निकस यांनी लावलेल्या शोधामुळे ते देखील सत्य ठरले.
निष्कर्ष:
मित्रांनो, आज काल आपण अनेक प्रकारची आकडेमोडे सहजरीत्या करत असतो. मात्र यामध्ये अनेक वेळा आपल्याला ० हा आकडा दिसून येत असतो. मित्रांनो आज जर शून्य अस्तित्वात नसता, तर आकडेमोड करताना केवळ नऊच अंक असले असते. ज्यामुळे आकडेमोड करणे अधिकच कठीण झाले असते.
मात्र या शून्याचा शोध लावून संपूर्ण जगभराला शून्याची ओळख करून देणारे शास्त्रज्ञ म्हणून आर्यभट्ट यांना ओळखले जाते. त्यांनी गणितासह खगोलशास्त्र या विषयांमध्ये देखील फार मोलाची कामगिरी बजावलेली आहे. व आर्यभट्टीय या ग्रंथांमध्ये अनेक नियम देखील लिहून ठेवलेले आहेत.
आजच्या भागामध्ये आपण या आर्यभट्ट विषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्यांचे जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे. यामध्ये त्यांच्या आयुष्याची सुरुवात, त्यांनी केलेले कार्य, लिहिलेला आर्यभटिय ग्रंथ, त्यांनी मांडलेला सिद्धांत, त्यांनी इतिहासामध्ये दिलेले योगदान, आणि शून्याचा शोध, इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितले आहेत. या माहितीमुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असेल, अशी आशा आहे.
FAQ
आर्यभट्ट यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेले आहेत?
आर्यभट्ट यांनी गणित खगोलशास्त्र बीजगणित आणि ट्रिग्नोमेट्री या विषयांमध्ये मोठे योगदान दिलेले आहे.
आर्यभट्ट यांना काय म्हणून ओळखले जाते?
आर्यभट्ट यांना भारतीय गणिताचे जनक म्हणून ओळखले जाते.
आर्यभट्ट प्रसिद्ध होण्यामागे काय कारण आहे?
आर्यभट्ट यांनी लावलेल्या शून्याच्या शोधामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर त्यांनी गणित व खगोलशास्त्र या विषयांमध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांची प्रसिद्धी सर्वदूर पसरली होती. त्यांनी वर्गमूळ काढणे, विविध समीकरणे सोडवणे, ग्रहण कधी होईल याचे भाकीत करणे, इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठे कार्य केले होते. सोबतच त्यांनी गणितीय आकडेमोडीमध्ये आणि वर्तुळाच्या परिघबद्दल व क्षेत्रफळाबद्दल उपयोगी असणारे पाय याची देखील किंमत ठरवली होती. याच जोरावर त्यांनी पृथ्वीचा घेर किंवा परिमिती देखील मोजली होती.
शून्य या अंकाचा शोध कोणी लावला होता?
शून्य या अंकाचा शोध आर्यभट्ट यांनी लावलेला असून, या शून्याशिवाय कुठल्याही आकडेमोडीची प्रणाली अगदीच अशक्य आहे. या गोष्टीला फ्रेंच गणित तज्ञ जॉर्ज इफ्राह यांनी देखील दुजोरा दिलेला आहे.
आर्यभट्ट यांचा जन्म कधी व कोठे झाला होता?
आर्यभट्ट यांचा जन्म इसवी सन ४७६ च्या आसपास झाला असावा, असे सांगितले जाते. त्यांच्या जन्माचे ठिकाण अश्मक प्रदेश असल्याचे सांगण्यात येते जो महाराष्ट्र मध्ये आहे.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आर्यभट्ट या खगोलशास्त्रज्ञ व गणित शास्त्रज्ञ यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तसेच तुमच्या ज्ञानामध्ये देखील भर पडली असेल. तर मग लगेचच कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या, आणि इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद…!