कावळा पक्षाची संपूर्ण माहिती Crow Bird Information In Marathi

Crow Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अतिशय बुद्धिमान व चपळ पक्षी म्हणून कावळ्याला ओळखले जाते. इतर दिवशी दुर्लक्षित केल्या जाणारा हा पक्षी पितृपंधरवाड्यामध्ये मात्र विशेष भक्तिभावाने पूजला जातो. आपल्या काव काव या आवाजासाठी प्रसिद्ध असणारा हा कावळा, रंगाने अतिशय काळा असतो. शास्त्रीय भाषेमध्ये या कावळ्याला कॉर्व्हस म्हणून ओळखले जाते. बगळा या प्राण्याशी अनुवंशिक साम्य दाखवणारा कावळा आजकाल संख्येने फार कमी होत चाललेला आहे. त्यामुळे या प्राण्याच्या संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.

Crow Bird Information In Marathi

कावळा पक्षाची संपूर्ण माहिती Crow Bird Information In Marathi

कावळा हा अतिशय बुद्धिमान प्राणी असून, त्याच्या रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या सहजरित्या सोडवण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचबरोबर कावळे एकमेकांशी संभाषण करण्यामध्ये देखील तरबेज आहेत. कावळ्यांना कोणता व्यक्ती चांगला आहे व कोणता व्यक्ती वाईट आहे हे ओळखण्याची शक्ती प्राप्त असते. त्यानुसार आपल्या पिलांजवळ ते वाईट माणसाला येऊ देत नाहीत.

मित्रांनो, काही संशोधनानुसार असे देखील सिद्ध झाले आहे, की कावळा एकदा बघितलेला चेहरा आयुष्यभर विसरत नाही. जर तुम्ही कावळ्याला त्रास दिला तर तो पुन्हा तुम्हाला कधी भेटल्यानंतर नक्कीच तुमचा बदला घेतो.

आजच्या भागामध्ये आपण कावळा या पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तसेच त्याची वैशिष्ट्ये देखील जाणून घेणार आहोत…

नावकावळा
हायर क्लासिफिकेशनकावळा कुटुंब
कुळकॉर्व्हिडी
साधारण आयुष्यमानकिमान १० वर्ष तर कमाल १५ वर्ष
शास्त्रीय नावकॉर्व्हस
पंखांचा घेरदोन ते अडीच फूट

मित्रांनो शेतातील अन्नधान्य खाऊन नुकसान करण्यामध्ये कावळा पुढे असला, तरी देखील हिंदू धर्मामध्ये त्याला खूपच महत्त्व दिले जाते. कारण आपल्या पित्रांचे स्वरूप म्हणून या कावळ्याकडे बघितले जाते. अतिशय काळ्या रंगाचे चमकदार पिसे असणारे हे कावळे नेहमी कळपामध्ये किंवा गटामध्ये राहणे पसंत करतात. कावळे अतिशय जिज्ञासू व हुशार प्रकारचे पक्षी असून, ते खोडी करण्यामध्ये देखील अग्रेसर असतात.

कावळ्यांना सॉंग बर्ड्स म्हणून देखील ओळखले जाते. संपूर्ण जगामध्ये जवळपास सगळ्याच देशांमध्ये कावळ्यांची संख्या आढळून येत असते. जे मुख्यतः जंगलामध्ये किंवा शेतामध्ये राहणे पसंत करतात. शहरी वातावरणाला शक्यतो कावळे सहकार्य करत नाहीत.

कावळ्यांचे प्रकार:

मित्रांनो, आपल्याला सर्वसाधारण सर्व कावळे सारखेच वाटत असले, तरी देखील त्यांचे अनेक प्रकार पडत असतात. ज्यामध्ये अल्बस कावळा, अल्बीकोलीस कावळा, बेनेटी कावळा, कॅपेंसीस कावळा, कोरेक्स कावळा, कॉर्निक्स कावळा, इत्यादी कावळ्यांचा समावेश होत असतो.

कावळ्याविषयीची तथ्य:

  • कावळा हा पक्षी गटामध्ये सर्वात उच्च बुद्धिमत्ता असलेला पक्षी आहे.
  • कावळ्यांना योग्यरीत्या प्रशिक्षित केल्यास त्यांना सात पर्यंत अंक मोजता येऊ शकतात.
  • त्यांना योग्य प्रशिक्षण दिले असता, ते कोणाचीही सांगितल्यावर खोडी काढू शकतात. त्याचप्रमाणे कोणालाही टोमणा देखील मारू शकतात.
  • कावळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर पक्षांकडून अन्न हिरावणे, किंवा चोरणे यामध्ये माहीर आहेत.

कावळ्याची वैशिष्ट्ये:

मित्रांनो, कावळा हा अन्न मिळवण्याकरिता प्रयत्न करण्याऐवजी,  बुद्धी वापरून विविध कल्पना राबवण्यावर भर देत असतो. तो जेवण मिळवण्याच्या बाबतीत अतिशय संधी साधू किंवा धूर्त स्वरूपाचा आहे. इतर पक्षांनी मिळवलेल्या अन्नाला कसे मिळवायचे याचा विचार तो करत असतो.

कावळे आपले जीवन सुखकर व्हावे यासाठी अनेक वस्तूंची देखील निर्मिती करू शकतात. काही समस्या आली, तर कावळे ती अतिशय कल्पकरीत्या सोडवू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बालपणी आपण ऐकलेली तहानलेल्या कावळ्याची गोष्ट होय.

कावळे हे आपले पूर्वज आहे असे हिंदू धर्मामध्ये समजले जाते. व त्यांना पितृपंधरवाड्यामध्ये खूप मान दिला जातो. कावळ्यांवर कोणी रागावले किंवा ओरडले तर त्यांना ते चांगल्या रीतीने समजत असते. व अशा व्यक्तीचा चेहरा कावळे लक्षात ठेवत असतात. पुढे संधी मिळाल्यास ते बदला देखील घेत असतात.

कावळ्याविषयीच्या धार्मिक श्रद्धा:

मित्रांनो, पाण्याचा घागरीवर किंवा पाणी भरलेल्या ताटामध्ये कावळा बसला तर हा एक शुभ संकेत समजला जातो. व त्यामुळे त्या घरामध्ये धनधान्य व संपत्ती वैभव येण्यास मदत होते अशी मान्यता आहे.

जर कावळ्याने तुमच्या हातातील किंवा ताटातील भाकरी किंवा इतर खाण्याचे पदार्थ हिरावले, तर तो देखील एक चांगला संकेत किंवा शुभ संकेत समजला जातो. व तुमची मागणी पूर्ण झाली आहे याबद्दल तो संकेत असतो, असे मानले जाते.

कावळ्यांचे अनेक शुभ संकेत असले, तरी देखील मोठ्या संख्येने किंवा कळपाने कावळ्यांनी एका ठिकाणी जमा करून मोठा आवाज केला तर हा एक अशुभ संकेत समजला जातो. व त्या ठिकाणी काहीतरी अघटीत घडणार आहे असा अंदाज लावला जातो. पाहुणे येण्या संदर्भात देखील कावळ्यांना जबाबदार धरले जाते.

मित्रांनो, कावळा हा अतिशय बुद्धिमान व हुशार प्राणी आपल्या आसपास वावरत असतो. मात्र या कावळ्याची संख्या आजकाल फार मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. आणि यामुळे निसर्गाचा समतोल देखील राहिलेला नाही. अगदी दशक्रियाच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी देखील कावळे उपलब्ध नसतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कावळ्यांची संख्या पूर्णपणे संपली, तरी वावगे वाटायला नको. ही वेळ येऊ नये म्हणून आपल्यातील प्रत्येकाने कावळ्यांच्या संवर्धनाकरिता प्रयत्न केले पाहिजेत.

निष्कर्ष:

मित्रांनो, कावळा हा अतिशय बुद्धिमान प्राणी आजकाल मात्र नाश पावत आहे. कारण कावळ्यांना नैसर्गिक अधिवास उरलेला नाही, त्याचबरोबर त्यांना अन्न देखील पुरेसे उपलब्ध नाही. त्याचबरोबर मानवी क्रियाकल्पांमुळे कावळ्यांचे जगणे असह्य झालेले आहे. मित्रांनो, अगदी बुद्धिमान व असणाऱ्या या कावळ्या बद्दल आज आपण माहिती बघितली आहे.

त्यामध्ये तुम्हाला कावळा पक्षी म्हणजे काय, या कावळा पक्षाचे विविध प्रकार काय पडतात, या विविध प्रकारांची इत्यंभूत माहिती, कावळ्या बद्दल विविध तत्व, कावळ्याचे काही वैशिष्ट्य, कावळ्याच्या विविध प्रजाती, कावळ्याचे विभाग, तसेच कावळ्याशी संबंधित असणाऱ्या काही धार्मिक श्रद्धा, यांच्या विषयी माहिती बघितली आहे.

सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. या माहितीने तुम्हाला कावळा विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल, अशी आशा आहे.

FAQ

कावळा या पक्षाला इंग्रजी मध्ये व शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

कावळा या पक्षाला इंग्रजी मध्ये क्रो तर शास्त्रीय भाषेमध्ये कॉर्व्हस या नावाने ओळखले जाते.

कावळा पक्षाचे साधारण आयुर्मान किती असते?

कावळा या पक्षाचे साधारण आयुर्मान कमीत कमी दहा वर्ष तर जास्तीत जास्त पंधरा वर्षे इतके असते.

कावळ्या विषयी धार्मिक श्रद्धा काय आहेत?

कावळे हे रंगाने काळे असतात, त्यामुळे अनेक जण यांना दुर्भाग्याचे लक्षण म्हणून ओळखतात. मात्र अनेक ठिकाणी यांना नशिबाचे प्रतीक किंवा चांगले म्हणून ओळखले जाते.

कावळ्याला कोणते अन्न खाणे सर्वात जास्त आवडत असते?

कावळा हा शक्यतो शाकाहारी अन्न खाण्यास प्राधान्य देत असतो. त्यामध्ये फळे व बिया यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्याचबरोबर ते मांसाहारी पदार्थ देखील खात असतात. ज्यामध्ये लहान किडे किंवा मेलेल्या प्राण्यांचे मांस यांचा समावेश असतो.

हिंदू धर्मामध्ये कावळा का महत्वाचा समजला जातो?

हिंदू धर्मामध्ये कावळ्याला आपल्या पूर्वजांचे किंवा  पित्रांचे स्वरूप समजले जाते. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी आणि पितृपंधरवाड्यातील धार्मिक कार्याकरिता कावळ्यांना फार महत्त्व दिले जात असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कावळा या अतिशय बुद्धिमान व चतुर प्राण्याविषयी माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली ना… तर मग क्षणाचाही विलंब न करता कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून, या माहितीच्या प्रसारामध्ये थोडासा हातभार लावा.

धन्यवाद…!

Leave a Comment