चक्रासनची संपूर्ण माहिती Chakrasana Information In Marathi

Chakrasana Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक योगासनांची माहिती बघितलेली आहे, मात्र यातील सर्वात महत्त्वाचे आणि मूळ आसन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चक्रासनाची आज आपण माहिती घेणार आहोत. हा योग प्रकार पाठीवर झोपून पार पाडला जातो.

Chakrasana Information In Marathi

चक्रासनची संपूर्ण माहिती Chakrasana Information In Marathi

चक्रासन म्हणजे चक्र आणि आसन म्हणजे स्तिथी या दोन शब्दांचा मीलाप असून, शरीराला चक्रासारख्या आसनात स्थित करणे म्हणून या आसनाला चक्रासन नाव दिलेले आहे. चक्रासनाचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे माणूस लवकर म्हातारा होत नाही. आणि त्याचे तारुण्य चिरकाल टिकत असते. या आसानानंतर धनुरासन करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून शरीर संतुलित राहण्यास मदत होईल.

चला तर मग सुरु करूया चक्रासनाबद्दलच्या या माहितीला…

नावचक्रासन
प्रकारयोगासन
अर्थचक्र म्हणजे चाक व आसन म्हणजे स्थिती
उपयोगशरीर तानवणे
मुख्य फायदाचिरकाल तरुण राहणे, आणि म्हातारपण न येऊ देणे

चक्रासन म्हणजे काय:

मित्रांनो, चक्रासन म्हणजे मानवी शरीर चाकाच्या स्थितीमध्ये आणून, योग मुद्रा करणे होय. चक्रासन या नावातच चाकासारखी स्थिती असा अर्थ दडलेला आहे. याला इंग्रजीमध्ये व्हील पोझिशन किंवा विल पोज या नावाने देखील ओळखले जाते.

चक्रासन करण्याचे फायदे:

मित्रांनो, कुठलेही आसन असो शरीराला निश्चितच फायदा होत असतो. यातील चक्रासणामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. या आसनामध्ये कंबर आणि पोट ताणले जात असल्यामुळे तेथील चरबीवर ताण पडतो, आणि ती चरबी लवकरच वितळायला लागते.

याशिवाय कंबर दुखी असणाऱ्या रुग्णांसाठी देखील चक्रासन हे आसन करणे फायद्याचे ठरते. या आसनामुळे पाठीचा कना अतिशय मजबूत होत असतो. ज्या लोकांना दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसावे लागते, त्यांच्यासाठी हे आसन खूपच उपयुक्त समजले जाते.

मांड्यांवरील अतिरिक्त चरबी हे देखील व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये बाधा आणत असते, मात्र या आसनाच्या नियमित सरावामुळे मांडीची चरबी वितळली जाते. आणि सोबतच मांडीचे स्नायू देखील बळकट होण्यास मदत मिळते.

चक्रासनाचा मुख्य फायदा म्हणजे चेहऱ्यावर तेज आणणे, आणि सुरकुत्या घालविणे होय. चक्रासन केल्यामुळे चेहऱ्याचा रंग देखील काहीसा गोरा होण्यास मदत मिळते. याशिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या जाऊन चेहऱ्यावर एक वेगळेच तेज चमकत असते, कारण या आसनामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह बरोबरच चेहऱ्याचा रक्त प्रवाह देखील वाढत असतो. याशिवाय मुरूम पुटकुळ्या येणे, किंवा डाग पडणे याच बरोबरीने विविध कॉस्मेटिक उत्पादने वापरून चेहऱ्याचे झालेले नुकसान देखील या आसनामुळे भरून निघण्यास मदत होते.

चक्रासन केल्यामुळे माणसाची पचनसंस्था देखील मजबूत बनते, ज्यामुळे अन्न लवकर पचून मल त्याग करण्यास देखील सोयीचे होते. त्यासोबतच पोटाच्या विविध समस्या जसे की ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेसचा त्रास यावर देखील हे आसन खूपच प्रभावीपणे कार्य करत असते. तसेच चक्रासनामध्ये श्वास जलद घेतला जात असल्यामुळे, फुफुसे देखील मजबूत आणि निरोगी होत असतात.

खास करून महिलांसाठी हे चक्रासन खूपच फायदेशीर असते. कारण यामुळे केसांचे आरोग्य देखील मोठ्या प्रमाणावर सुधारण्यास मदत होत असते.

यासोबतच चक्रासनामुळे संपूर्ण शरीर बळकट होते, ज्यामध्ये अगदी पायापासून डोक्यापर्यंत म्हणजेच पाय, नितंब, छाती, पोट, कंबर, मनगट, हात इत्यादी अवयवांना ताकद प्राप्त होऊन बळकट होतात. सुरुवातीला हे चक्रासन करताना काही लोकांना शारीरिक वेदना देखील जाणवू शकतात, ज्या पुढे पुढे कमी होत असतात.

चक्रासन करण्याची योग्य पद्धत:

सर्वप्रथम स्वच्छ व शांत जागी चटई अंथरून, त्यावर काही काळ पडून राहावे. पुढे पाठीवर झोपून श्वास नियंत्रित करावा. त्यानंतर दोन्ही गुडघे वाकवून घोटे नितंबाजवळ आणावे, आणि दोन्हीही हात वर करावे. यावेळी दोन्ही कोपर एकाच वेळी वाकविले जातील याची दक्षता घ्यावी.

त्यानंतर खांद्याच्या वरील बाजूस हाताचे तळवे जमिनीवर टेकवावे. एक मोठा दीर्घ श्वास घेऊन हळूहळू आपले शरीर मध्यभागून उचलावे. आता शक्य तेवढा जास्तीत जास्त वेळ या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, आणि त्यानंतर हळूहळू पुन्हा मूळ स्थितीमध्ये यावे. असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

अर्ध चक्रासन म्हणजे काय:

मित्रांनो, काही लठ्ठ लोकांना हे आसन करण्यासाठी त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला अर्ध चक्रासन करावे असा सल्ला दिला जातो. हे आसन देखील चक्रासनाप्रमाणेच असते, मात्र या ठिकाणी हाताचे तळवे कंबरावर ठेवण्याचा सल्ला दिला जातो, आणि शक्य तेवढ्या उंचीवर पोट उचलायला सांगितले जाते.

चक्रासन करताना घ्यावयाच्या खबरदारी:

  • हृदय विकार किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असतील, तर चक्रासन करू नये.
  • हर्निया असणाऱ्या रुग्णांनी हे आसन करू नये.
  • चक्रासन करण्यासाठी कोणालाही सक्ती करू नये, किंवा अधिक काळ या स्थितीमध्ये थांबण्यास सांगू नये.
  • गर्भवती महिलांनी देखील हे आसन न करण्याचा सल्ला दिला जातो.
  • सायटिका आजार असलेल्या रुग्णांनी देखील हे आसन करू नये.
  • चक्रासन करताना काही त्रास जाणवू लागल्यास ताबडतोब हे आसन करणे थांबवावे, आणि समस्या अधिकच बिकट होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निष्कर्ष:

मित्रांनो, विविध प्रकारचे योगासन करणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. आणि या आसनांचा नियमित सराव करण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देखील देत असतात. या प्रत्येक आसनांचा आपला स्वतःचा एक वेगळा फायदा असून, त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये फार आमूलाग्र बदल घडवून येत असतात.

आजच्या भागामध्ये आपण याच योगासन प्रकारातील चक्रासनाची माहिती घेतली आहे. ज्यामध्ये तुम्हाला चक्रासन म्हणजे काय, त्याचे काय फायदे आहेत, चक्रासन करण्याची पद्धत, अर्ध चक्रासन म्हणजे काय, आणि पूर्ण चक्रासन म्हणजे काय, चक्रासन करताना घ्यावयाची खबरदारी, चक्रासन करण्याचा योग्य वेळ, चक्रासन कोणी करू नये, तसेच या आसनाला असलेले पर्यायी आसन, त्याच्या आधी व नंतर केली जाणारी योगासने, इत्यादी बाबतीतली माहिती घेतलेली आहे. त्याशिवाय काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील पाहिलेले आहेत.

FAQ

आजपर्यंत कधीही चक्रासन केले नसेल तर सुरुवातीला काय खबरदारी घ्यावी?

पहिल्यांदाच चक्रासन सुरू करणाऱ्या लोकांसाठी एका कुशल योग प्रशिक्षकाने शिकविल्याप्रमाणे चक्रासन करणे फायद्याचे ठरते. याकरिता तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ देखील बघू शकता. किंवा पैसे देऊन देखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकता.

चक्रासनाचा मुख्य फायदा काय आहे?

मित्रांनो, चक्रासणामुळे माणसाची त्वचा चिरकाल तरुण राहण्यास मदत होते. ज्याने म्हातारे होण्याचे वय पुढे ढकलले जाते.

चक्रासनामुळे उंची वाढते असे म्हणतात हे खरे आहे का?

मित्रांनो, चक्रासनामध्ये करणाऱ्या व्यक्तीची पाठ व पोट ताणले जात असल्यामुळे, उंचीवर त्याचा काहीसा परिणाम होतो. मात्र तुम्ही जर १८ वर्षापेक्षा कमी वयाचे असाल, तर तुम्हाला याचा फारच फायदा होऊ शकतो.

चक्रासन कोणी करू नये?

ज्या लोकांना खांदा, पाठ किंवा कंबर येथे काही त्रास असेल, किंवा शस्त्रक्रिया झाली असेल, सोबतच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, अशा कोणत्याही व्यक्तीने चक्रासन करू नये.

चक्रासन करण्यापूर्वी कोणकोणती आसने केली जावीत?

चक्रसानापूर्वी वज्रासन, सेतुबंधासन, बालासना, भुजंगासन, आणि हलासन यांसारखे आसने करावेत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चक्रासन या योगासन प्रकाराबद्दल माहिती घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता यावा, आणि त्यांच्या देखील जीवनामध्ये चांगले बदल घडवून यावे याकरिता ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

 धन्यवाद…!

Leave a Comment