बदक पक्षाची संपूर्ण माहिती Duck Bird Information In Marathi

Duck Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो एक पान पक्षी म्हणून ओळखला जाणारा बदक सर्वांच्या परिचयाचा आहे. तो मुख्यतः तलाव, नद्या, नाले यांसारख्या शांत पाण्यामध्ये राहणे पसंत करत असतो. बदक हा अतिशय शांत पक्षी असून, अनेक लोक याला त्याच्या सौंदर्यामुळे पाळत असतात. अतिशय पांढराशुभ्र असला, तरी देखील या बदकाच्या अनेक प्रजाती वेगवेगळ्या रंगांमध्ये देखील आढळून येत असतात.

Duck Bird Information In Marathi

बदक पक्षाची संपूर्ण माहिती Duck Bird Information In Marathi

बदक हा दिसायला आकर्षक असण्याबरोबरच, त्याच्या चालण्याच्या शैलीसाठी देखील ओळखला जातो. आजच्या भागामध्ये आपण या बदक पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावबदक
इंग्रजी नावडक
प्रकारपक्षी
उपप्रकारपानपक्षी
साधारण आयुष्यकिमान पाच ते कमाल दहा वर्ष
साधारण वजनपाऊन ते दीड किलो
साधारण उंचीदीड ते दोन फूट
वर्गपक्षी गट

बदकांची  वैशिष्ट्ये:

पृथ्वीवरील अनेक वैशिष्ट्यपूर्ण पक्षांमध्ये बदक यांचा समावेश होत असतो. बदक हे हंस पक्षांशी मिळते जुळते असून, त्यांची प्रजाती जवळपास साम्य दर्शविते. या बदकाचे शरीर अतिशय मजबूत असते. मात्र मान काही लहान असते. त्यांना चमकदार पिसे आढळून येत असतात. बदकाच्या मादीला कोंबडी या नावाने ओळखले जाते, मात्र मादी बदकाचे पंख तपकिरी रंगाचे आणि अतिशय निस्तेज स्वरूपाचे असतात. आपल्या पिल्लांना जन्म देऊन मादी या पिल्लांचे रक्षण करत असते.

नर बदकाला इंग्रजी भाषेमध्ये ड्रेक म्हणून ओळखले जाते. या नर बदकाला असणारी पिसे, अतिशय चमकदार स्वरूपाची असतात. आणि या चमकदार पंखांचा वापर करून नर बदक मादी बदकांना आकर्षित करत असतो. या पिसांमध्ये काही प्रमाणावर जांभळट रंग देखील असतो. अतिशय चकचकीत असणारे हे पंख नर बदकाला अतिशय आकर्षित बनवत असतात.

शरद ऋतुच्या आगमनाच्या वेळी बदकांची पिसे गळून जात असतात, नंतर मात्र पुन्हा त्यांना हे पीस मिळत असतात. बदकाचे पाय देखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. ज्यांना जाळीदार स्वरूपाचे पाय म्हणून ओळखले जाते, या पायांचा वापर करून त्यांना पोहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर चालताना देखील या पायांचा उपयोग बदकांना होत असतो.

बदकांचे शरीर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांना थंड पाण्यामध्ये देखील उबदार राहण्याकरिता त्यांची रक्ताभिसरण प्रणाली जबाबदार असते. त्यांच्या पायामध्ये एक अतिशय जटिल रक्तवाहिन्यांचे जाळे असते, त्यामुळे त्यांना थंड पाण्यामध्ये देखील काहीही वाटत नाही.

बदकाची पिसे ही पाण्यामध्ये न भिजणारी असतात. त्यामुळे पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ते ओले होत नाहीत. कारण प्रिन नावाच्या एका ग्रंथी मधून या पंखांवर नेहमी तेलकट पदार्थ सोडला जात असतो.

बदकांचे वर्तन:

मित्रांनो, बदक हा एक अतिशय स्वच्छता प्रिय असणारा प्राणी आहे. कारण तो नेहमी स्वतःला स्वच्छ ठेवत असतो. या प्रक्रियेला प्रीनिंग म्हटले जाते. त्वचेच्या साह्याने शरीरावर असणारी घाण काढून ते स्वतःला स्वच्छ करत असतात. त्याचबरोबर निघालेले तेल संपूर्ण शरीरावर पसरवत असतात.

बदकांचे राहणीमान:

मित्रांनो, बदक हा पक्षी शक्यतो वस्ती करून राहण्याला प्राधान्य देत असतो. बदक ज्या ठिकाणी अधिक अन्न मिळेल अशा ठिकाणी राहणे पसंत करत असतात. यामध्ये दलदलीचे प्रदेश, नद्या, तलाव, पाणथळ ठिकाणे, महासागर यांचा समावेश होतो. बदकांच्या अनेक प्रजाती स्थलांतर देखील करत असतात, कारण काही ठिकाणी पाणी गोठल्यानंतर त्यांना राहणे कठीण होते. आणि असे पक्षी दुसरीकडे स्थलांतरित करण्याला प्राधान्य देत असतात.

मित्रांनो, बदक हा पक्षी साधारणपणे पाच ते दहा वर्ष जगू शकतो, मात्र काही प्रजाती अधिक कालावधीसाठी देखील जगू शकतात. यामध्ये जंगली बदकांचे आयुष्य कमी असते, मात्र पाळलेले बदक अधिक कालावधीसाठी जगू शकतात. ज्यामध्ये दहा ते पंधरा वर्षांचा समावेश होतो. मल्लार्ड ड्रेक नावाचा पक्षी सुमारे २७ वर्षे जगला होता, आणि त्याच्या नावावर जागतिक विक्रम देखील केलेला आहे.

बदक पक्षी मोठी चोच असणारे असतात, त्यांचा वापर करून ते पाण्यामधील विविध बियाणे खात असतात. त्याचबरोबर ते लहान कीटकांचा देखील आहारामध्ये समावेश करत असतात. बदकाचे पाळीव पक्षी देखील संधी मिळाल्यानंतर लहान लहान किडे खाण्यास प्राधान्य देत असतात.

मित्रांनो, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बदक पक्षी प्रजनन करत असतो. याकरिता नर बदक मादी बदकाला शोधून त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर त्यांचे मिलन होऊन बदकामध्ये प्रजनन घडवून येत असते. मादी बदक घरटे तयार करून तिथे अंड्यांमधून पिले उबवत असतात.

बदकाविषयीचे तथ्य:

बदक पक्षामधील नर प्रजाती अतिशय शांत आणि न आवाज करणारी असते. मात्र मादी पक्षी जास्त आवाज करतात. बदकाची अंडी, जाळीदार स्वरूपाची असतात. ज्यामधून आतील पिल्लांना श्वास घेण्यासाठी मदत मिळत असते. या छिद्रांची संख्या प्रती अंडी साडेसात हजारापर्यंत देखील असू शकते. बदकाची पिल्ले जन्माला येताना त्यांची डोळे उघडे असतात.

एका वेळेस बदकाच्या मादीने घातलेल्या अंड्यांचा समूहाला क्लच असे म्हटले जाते, या क्लॉचचा आकार किती असेल हे त्या पक्षाच्या अनुवंशिकतेवर ठरत असते. त्याचप्रमाणे त्यांनी खाल्लेल्या अन्नावर देखील ठरत असते. ज्यावेळी पुरेसा चारा उपलब्ध असेल, त्यावेळी या अंड्याची संख्या देखील वाढत असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, बदक हा पक्षी आपल्यातील अनेकांनी बघितला असेल. क्वेक क्वेक आवाजासाठी प्रसिद्ध असणारा हा बदक दिसायला अतिशय अप्रतिम सुंदर असतो. त्यामुळे मोठ्या मोठ्या लोकांद्वारे या बदकाला सौंदर्यकरिता पाळले जाते. त्याचबरोबर मोठमोठ्या गार्डन मध्ये देखील अनेक बदक आपल्याला आढळून येत असतात.

हे बदक अतिशय शांत प्रकारचे पक्षी असतात. आजच्या भागामध्ये आपण याबद्दल पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. यामध्ये बदक म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय असतात, ते कोणत्या प्रकारचे वर्तन करत असते, बदक कशाप्रकारे राहतात, व त्यांची वस्ती कुठे आढळते.

बदकाचे साधारण आयुष्य किती असते, त्यांचे आहार विहार कसे असतात, याच बरोबर बदकांचे पुनरुत्पादन कसे होते, व बदकांविषयीची काही तथ्य माहिती बघितली आहे. त्याचबरोबर काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती वाचून तुमच्या बदकाविषयीच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडली असेल, अशी आशा आहे.

FAQ

बदक या पक्षाला इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

बदक या पक्षाला इंग्रजी भाषेमध्ये डक या नावाने ओळखले जाते.

बदक हा पक्षी साधारणपणे किती वर्षापर्यंत जगू शकतो?

बदक हा पक्षी साधारणपणे पाच ते दहा वर्ष इतका जगू शकतो.

बदकाची साधारण उंची व साधारण वजन किती असते?

बदकाची साधारण उंची ही दीड ते दोन फुटांपर्यंत असते. त्याचबरोबर, त्याचे वजन हे पाऊन किलो पासून दीड किलो पर्यंत असते. मात्र काही बदक यापेक्षा देखील अधिक वजनाचे होऊ शकतात.

बदक उडू शकतात का?

बदकांना उडण्यासाठी पंख दिलेले असतात, मात्र शक्यतो बदक उडत नाहीत. कारण त्यांच्या मोठ्या शरीराचे भार झेपण्याकरिता त्यांना त्यांचे पंख फार वेगामध्ये हलवावे लागतील, मात्र बदक शक्यतो असे करून उडण्यास प्राधान्य देत नाहीत.

बदकांच्या झोपेविषयी काय तथ्य सांगता येईल?

बदक हा असा पक्षी आहे ज्याला अर्ध निशाचर म्हणून ओळखले जाते. कारण तो शिकार मिळविण्याकरिता कुठल्याही वेळी बाहेर पडू शकतो. हे बदक पक्षी काही वेळेला दिवसा झोपतात, तर काही वेळेला रात्री झोपत असतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बदक या पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…!

Leave a Comment