भूकंपाची संपूर्ण माहिती Earthquake Information In Marathi

Earthquake Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भूकंप म्हणजे काय हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे. मात्र आपल्यापैकी अनेक लोकांनी या भूकंपाचा अनुभव घेतला नसेल. ज्या लोकांना भूकंपाचा अनुभव आला आहे, ती लोक या भूकंपाचे खरे वास्तव सांगू शकतील. भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती असून, अतिशय हानिकारक स्वरूप देखील धारण करू शकते. अगदी काही मिनिटे येणारा भूकंप मागच्या कित्येक वर्षांची मेहनत क्षणार्धात भुईसपाट करू शकतो.

Earthquake Information In Marathi

भूकंपाची संपूर्ण माहिती Earthquake Information In Marathi

पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतात. यामध्ये पूर भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, दुष्काळ, यांसारख्या आपत्तींचा समावेश होत असतो. मात्र भूकंप हा अतिशय घातक स्वरूपाचा असून, भूकंप होण्यापूर्वी साधी कल्पना देखील येत नाही. अगदी कोणत्याही क्षणी भूकंप घडून येऊ शकतो.

या भूकंपाची तीव्रता अधिक असेल, तर तो अतिशय विनाशकारी स्वरूप धारण करत असतो. आणि क्षणार्धात त्या ठिकाणाचे सर्व काही नष्ट करण्याची ताकद या भूकंपामध्ये आहे. त्यामुळे भूकंप होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. मात्र यासाठी काही कालावधीसाठी केलेले प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर प्रत्येक काळापासून त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात.

आजच्या भागामध्ये आपण भूकंप विषयी इथे माहिती बघणार आहोत…

नावभूकंप
प्रकारनैसर्गिक आपत्ती
उपप्रकारअचानक येणारी आपत्ती
स्वरूपजमिनीमध्ये हादरे बसणे
परिणाम इमारतीला तडे जाणे, इमारती पडणे इत्यादी
मोजमाप यंत्रणारिश्टर स्केल

भूकंप म्हणजे काय:

मित्रांनो, जमिनीच्या भूपृष्ठाची फार मोठ्या प्रमाणावर हालचाल होणे, किंवा थरथरणे म्हणजे भूकंप होय. मुख्यतः जमिनीच्या पृष्ठभागावरील खडकांच्या लवचिकतेमुळे पृथ्वीवर शांत वातावरण असते, मात्र या खडकांमध्ये कठीणता आली, तर ते जोराने तुटत असतात.

परिणामी मोठ्या प्रमाणावर कंपने किंवा लाटा तयार होतात, ज्याला माणूस भूकंप म्हणतो. यामध्ये भूपृष्ठाची मोठ्या प्रमाणावर हालचाल होत असते, ज्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होत असते. त्यामध्ये आर्थिक नुकसान व जीवित हानी जास्त प्रमाणावर असते.

भूकंपाचे प्रकार:

मित्रांनो, भूकंपाच्या तीव्रतेनुसार तसेच भूकंप केंद्रकापासून किती अंतरावर झालेला आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, इत्यादी गोष्टींवर आधारित भूकंपाचे अनेक प्रकार पडत असतात .

प्राथमिक भूकंप किंवा प्राथमिक लहरी यांना पी लहरी म्हणून देखील ओळखले जाते. या भूकंपाच्या अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या लहरी असतात, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. एक अनुभट्टीमध्ये जेवढ्या स्वरूपाचे कंपने निर्माण होतात, त्या स्वरूपामध्ये या भूकंपाची तीव्रता असते.

दुय्यम भूकंप किंवा दुय्यम लहरी म्हणून भूकंपाच्या दुसऱ्या टप्प्याला ओळखले जाते. यामध्ये व्यक्तींना अगदी सहजरित्या भूकंपाची संवेदना जाणवू लागते, ज्यावेळी सात अणुभट्ट्या एकत्र आल्यानंतर जेवढे कंपने तयार होतील, तसेच स्वरूप या भूकंपाचे असते. या भूकंपामध्ये घरातील विविध गोष्टी जसे की वाहन, फर्निचर, आणि इतर वस्तू हलायला लागतात. त्याचप्रमाणे खिडक्यांच्या काचा देखील फुटतात. भिंतींना तडे जाऊ लागतात, हा भूकंपाचा प्रकार नुकसानदायी देखील असतो.

भूकंपाचा तिसरा प्रकार म्हणून पृष्ठभाग भूकंप किंवा पृष्ठभाग लहरी याला ओळखले जाते. भूकंपातील सर्वात जास्त धोकेदायक प्रकार म्हणून या प्रकाराला ओळखले जाते. यामध्ये जीवित हानी होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील होत असते. सात पेक्षा जास्त अनुभट्ट्या एकत्र आल्याने ज्या प्रमाणाचे कंपन तयार होतील, तेवढी या भूकंपाची तीव्रता असते. त्यामुळे मोठ्या इमारती, पूल, कोसळू शकतात. शिवाय समुद्रामध्ये असा भूकंप झाल्यास सुनामी देखील येऊ शकते.

भूकंपामुळे होणारे परिणाम:

मित्रांनो, भूकंपामुळे प्राणी, वनस्पती, मानव या सर्वांवरच खूप विपरीत परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे आर्थिक हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. ज्या ठिकाणी भूकंपाचे केंद्रबिंदू असतात, तिथे सुरुवातीला ही कंपने जाणवू लागत असतात. आणि तिथून भूकंपाच्या लाटा आसपासच्या परिसरामध्ये पसरत असतात.

  • भूकंपामुळे इमारती कोसळून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होत असते. त्याचप्रमाणे जीवितहानी देखील होऊ शकते.
  • वीज पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्याशिवाय दळणवळणाच्या साधनांमध्ये अनियमितता येत असते.
  • मानवासह विविध प्राण्यांचे मृत्यू होऊ शकतात.
  • सार्वजनिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.

भूकंपाचे मोजमाप:

मित्रांनो, भूकंप हा लहरींच्या स्वरूपात असतो. त्यामुळे या लहरींची तीव्रता मोजणे म्हणजेच भूकंपाची तीव्रता मोजणे असते. यासाठी सिस्मोग्राफ नावाचे उपकरण वापरले जाते. ज्यामध्ये रिश्टर स्केल स्वरूपात या भूकंपाची नोंद केली जाते. या रिश्टर स्केलचे प्रमाण झिरो ते नऊ पर्यंत असते. यावरून भूकंपाची तीव्रता लक्षात येत असते.

मित्रांनो, भूकंपाची घातकता लक्षात घेता भूकंप होऊ नये म्हणून पावले उचलणे खूपच गरजेचे असते. मात्र मानव भूकंप थांबवू शकत नाही, त्यामुळे मानवाला या भूकंपाला रोधक प्रकारच्या इमारती तयार करणे, शासनाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सूचना पाळणे, सर्व इमारतींच्या नकाशांचे मूल्यमापन करून घेणे, यासारख्या उपाययोजना करणे फारच गरजेचे ठरते. जेणेकरून लोकांच्या जीविताला धोका पोहोचणार नाही.

निष्कर्ष:

मित्रांनो, अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो रुपयांचे नुकसान होत असते. त्याचबरोबर अनेक लोकांना आपले जीवदेखील गमवावे लागत असतात. भूकंप हा असाच एक जीवघेणा प्रकार असून, अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये याचा समावेश होतो.

भूकंप येण्याआधी थोडीशी देखील कल्पना लागत नाही, त्यामुळे लोकांना जीव वाचवण्याकरिता फार कमी ऊसंत मिळत असते. मोठ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर येणे अतिशय कठीण होत असते, त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर देखील इमारती अंगावर पडण्याची भीती असते.

आजच्या भागामध्ये आपण भूकंपाविषयी संपूर्ण माहिती बघितली असून, भूकंप म्हणजे काय, भूकंप का येतात, या भूकंपाचे विविध प्रकार काय असतात, भूकंपामुळे होणारे परिणाम, नुकसान, यासह भूकंपाचे मोजमाप करण्यासाठीची यंत्रणा, त्यासाठी उचलण्यात येणारी पाऊले, आणि भूकंप झाल्यास काय करावे इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघितले आहेत. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल, अशी आशा आहे.

FAQ

भूकंप म्हणजे काय?

भूकंप म्हणजे जमिनीमध्ये होणाऱ्या विविध भूगर्भिय हालचालींमुळे जमिनीच्या पृष्ठभागावर हालचाली होणे, व त्यामुळे जमिनीला हादरे बसणे होय. त्यामध्ये अनेक नुकसान होत असतात. जमिनीला भेगा पडण्याबरोबरच इमारतीना तडे जाणे, इमारती पडणे, यांसारख्या घटना देखील होत असतात.

भूकंप तयार होण्याची प्रक्रिया काय असते?

ज्यावेळी टॅक्टोनिक ही अतिशय हळूहळू चालणारी भूवर्भीय प्लेट घर्षणामुळे अभेद्य बनते, त्यावेळी काठावर अधिक जास्त ताण पडतो. परिणामी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वाहणाऱ्या लहरी व त्यामधील साठवलेली ऊर्जा मुक्त होते, व हादरे बसू लागतात. अशा रीतीने भूकंप तयार होतो.

भूकंप मागे काय कारण असते?

ज्यावेळी भूपृष्ठावरील खडक अचानकपणे तुटतो, त्यावेळी फार जलद हालचाली निर्माण होतात. व जमिनीमध्ये लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होते. परिणामी जमीन हादरायला लागते हे भूकंपाचे मुख्य कारण आहे.

भूकंपाचे मोजमाप कशाच्या साह्याने केले जाते?

भूकंपाचे मोजमाप रजिस्टर स्केल च्या माध्यमातून केले जाते.

अचानक भूकंप सुरू झाल्यास काय करावे?

अचानक भूकंप सुरू झाल्यास सर्वात आधी वीजप्रवाह आणि गॅस कनेक्शन बंद करून घराबाहेर पडावे, घराबाहेर पडणे शक्य नसेल तर भिंतीच्या कोपऱ्यामध्ये किंवा टेबल खाली डोक्याला हाताने झाकून बसावे.

 मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भूकंप या विषयावर संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्याचबरोबर भूकंप झाला असता काय काळजी घ्यावी याबद्दल देखील तुम्हाला कल्पना आली असेल, तर मग पटापट तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये येऊ द्या. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना सुरक्षित ठेवण्याकरिता त्यांच्यापर्यंत ही माहिती आवर्जून शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment