आंबोली घाटची संपूर्ण माहिती Amboli Ghat Information In Marathi

Amboli Ghat Information In Marathi नमस्कार मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वसलेला आहे. जो एक उत्तम हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अतिशय आल्हाददायक हवामान असते. या हिल स्टेशनमध्ये सह्याद्री डोंगररांगांचे नेत्रदीपक दृश्य तुम्हाला बघायला मिळते. याच ठिकाणी तुम्हाला एक अतिशय उत्कृष्ट घाट रस्ता देखील दिसून येतो. त्या घाटाचे नाव आंबोली घाट असे आहे.

Amboli Ghat Information In Marathi

आंबोली घाटची संपूर्ण माहिती Amboli Ghat Information In Marathi

अगदी हिरवेगार डोंगर, वळणा वळणाचा आणि उताराचा रस्ता, खोलच खोल दऱ्या, त्यामुळे प्रवास करणारा व्यक्ती अगदी सुखावून जात असतो. त्यातही पाऊस असेल तर या आनंदामध्ये अगदी भर पडत असते. महाराष्ट्राचे सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळखले जाते. आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारा हा घाट एक निसर्गाची उत्तम कलाकृती आहे.

या घाटामध्ये तुम्हाला अनेक धबधबे देखील बघायला मिळतात. त्यामुळे प्रवासामध्ये जात असताना, तुम्हाला स्वर्गातूनच चालवण्याचा अनुभव मिळत असतो. आजच्या भागामध्ये आपण या आंबोली घाटा विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावअंबोली
प्रकारघाट रस्ता
समुद्रसपाटीपासून उंची६९० मीटर
भौगोलिक ठिकाणसिंधुदुर्ग, सह्याद्री डोंगर रांगा
जवळील शहरपणजी, गोवा
बघण्याची ठिकाणे डोंगर, घाटरस्ता, दऱ्या आणि धबधबे
आकर्षणसूर्यास्त बिंदू

आंबोली घाट म्हणजे नेमके काय आहे:

मित्रांनो, कोकण किनारपट्टी आणि दख्खनचे पठार यांना जोडणारा एक रस्ता म्हणजे आंबोली घाट असून, तो महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेतून जात आहे. हे एक नयनरम्य हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. शिवाय येथे उत्कृष्ट धबधबे असण्याने येथील निसर्ग सौंदर्यामध्ये अधिकच वाढ झालेली आहे.

गोव्याच्या किनारपट्टी जवळ असणारे शेवटचे हिल स्टेशन म्हणून आंबोली घाटाला ओळखले जाते. याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर इतकी आहे. या ठिकाणी विविध ठिकाणे बघायला मिळतात, ज्यामध्ये इको स्पोट खूपच प्रसिद्ध आहे. हा आंबोली घाट अनेक लहान लहान टेकड्यांनी वेढलेला असून, या घाटामधून प्रवास करताना एक विलक्षण अनुभव येत असतो.

आंबोली घाटामध्ये असणारे धबधबे:

मित्रांनो, पणजी गोवा या ठिकाणावरून अवघ्या या ९० किलोमीटर अंतरावर असणारा हा आंबोली घाट प्रवासामध्ये अनेक विलक्षण ठिकाणांची सहल घडवून आणत असतो. या ठिकाणी रस्त्याने अनेक नाष्ट्याची ठिकाणे मिळतात. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट स्वरूपाचा नाष्टा मिळतो.

त्याचबरोबर या ठिकाणी अनेक धबधबे देखील आहेत, जे अतिशय हिरव्यागार दऱ्यामध्ये फेसाळत वाहत असतात. या ठिकाणी अतिशय ताजी हवा, आणि हिरवळ माणसाला अगदी मोहित करून टाकत असते.

या ठिकाणाचा एक उत्कृष्ट धबधबा म्हणून बडा धबधबा ला ओळखले जाते. त्याचबरोबर तुम्हाला अनेक लहान सहान धबधबे देखील बघायला मिळत असतात

रस्त्याच्या कडेने जाताना लांबूनच हा धबधबा दिसत असतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना येथे जाण्याचा मोह आवरत नाही. हा धबधबा बघताना बर्फाळ ढग, सुंदर हिरवळ, मंद वारा, आपोआपच प्रवाशांच्या गालावर हास्य आणण्याचे कार्य करत असतो.

येथील बडा धबधबा या ठिकाणी भेट देताना, तुम्हाला आवर्जून भूक लागत असते. तरीदेखील काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण या धबधब्याजवळ अनेक लहान दुकाने असून, तेथे तुम्हाला गरमागरम साबुदाणा वडे, उत्कृष्ट वाफाळता चहा, खमंग कांदा भजी, व भाजलेल्या मक्याचे कणीस यांसारखे पदार्थ खायला मिळू शकतात.

ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत असतो. सोबतच या ठिकाणी मॅगी नूडल्स देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे येथे गेल्यावर भूक लागली तरी देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही.

आंबोली घाटामध्ये बघण्यासारखी ठिकाणे:

मित्रांनो, अनेक पर्यटक आंबोली घाटामध्ये प्रवास करताना काही ठिकाणांना भेट देत असतात. ज्यामध्ये महादेवगड याचा देखील समावेश होतो. आंबोली येथील बस स्टॅन्ड पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणारे  हे ठिकाण समुद्राचे सुंदर दृश्य बघण्याकरिता ओळखले जाते.

येथे जाण्यासाठी रस्ते चांगले नसले, तरी देखील स्थानिक लोकांच्या मदतीने तुम्ही अगदी आरामात पोहोचू शकता. याच बरोबरीने येथे सूर्यास्त बिंदू नावाचे एक ठिकाण असून, अतिशय उत्कृष्ट हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला एक उत्तम सूर्यास्त बघायला मिळू शकतो. आणि दर दिवशीचा सूर्यास्त हा वेगळा आणि अनोखा स्वरूपाचा असतो. या आंबोली बस स्थानकापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हा सूर्यास्त बिंदू वसलेला आहे.

मित्रांनो, आंबोली घाटामध्ये जाण्याकरिता उन्हाळ्याची वेळ सर्वोत्तम समजली जाते. पावसाळ्यामध्ये येथे अतिशय आनंद येत असला, तरी देखील तापमान काहीसे कमी असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर धूके देखील असते. त्यामुळे तुम्हाला आरामदायी प्रवास करायचा असेल तर उन्हाळ्याचे दिवस चांगले समजले जातात. मात्र तुम्ही साहसी पर्यटक असाल, तर तुम्हाला पावसाळा हा ऋतू अतिशय चांगला ठरू शकतो. येथे गेल्यानंतर अनेक हॉटेल्स किंवा रिसॉर्ट बघायला मिळतात, तेथे उत्तम सेवा दिली जाते.

त्याचबरोबर आंबोली या ठिकाणी तुम्हाला अनेक उत्कृष्ट खाण्यापिण्याची ठिकाणे देखील बघायला मिळत असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, घाट रस्ता म्हटलं की काही लोकांच्या अंगावर काटा येत असला, तरी देखील खऱ्या सौंदर्याची जाण असणाऱ्या लोकांना घाटा रस्ता म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. अनेक लोक केवळ आनंद लुटता यावा, म्हणून या घाटामधून प्रवास करत असतात. आणि या प्रवासात अनेक क्षण टिपत असतात.

अनेक लोक या ठिकाणी कॅम्प करून वास्तव्य देखील करत असतात. आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत असतात. आजच्या भागामध्ये आपण या आंबोली घाटाविषयी इत्यंभूत माहिती बघितली आहे. ज्यामध्ये तुम्हाला आंबोली घाट म्हणजे काय, तेथील प्रसिद्ध धबधबे, येथे कॅम्प टूर करायची असेल तर त्याविषयी माहिती, येथील विशिष्ट खाद्यपदार्थ व पाहण्यासारखी ठिकाणे, जाण्याचा रस्ता, तिथे गेल्यानंतर राहण्यासाठीचे पर्याय, तिथे उपलब्ध असणारी विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल्स व खाण्याची ठिकाणे जाण्यासाठी योग्य वेळ, व या ठिकाणाची भाषा इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल अशी आशा आहे.

FAQ

अंबोली घाट कोणत्या ठिकाणी वसलेला आहे?

आंबोली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांमध्ये वसलेला असून, त्याचे भौगोलिक ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.

आंबोली घाटामध्ये प्रवास करताना कोणकोणती ठिकाणी बघणे उत्तम ठरते?

आंबोली घाटामध्ये प्रवास करताना महादेवगड, आंबोली धबधबा, सूर्यास्त बिंदू, हिरण्यकेश्वर मंदिर, नांगरता धबधबा इत्यादी ठिकाणे बघणे उत्तम ठरते.

आंबोली या घाट रस्त्याची लांबी साधारणपणे किती किलोमीटर आहे?

आंबोली या घाट रस्त्याची लांबी साधारणपणे ३० किलोमीटर इतकी आहे.

आंबोली घाटाची समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे, व या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात?

आंबोली घाटाची साधारण समुद्रसपाटीपासून उंची ६९० मीटर असून, या क्षेत्रामध्ये इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषा बोलल्या जातातच. याशिवाय येथील मालवणी ही स्थानिक भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आंबोली या घाटा विषयी इत्यंभूत माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे कळवा. व तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना व निसर्गाची आवड असणाऱ्या व्यक्तींना ही माहिती आवर्जून शेअर करा.

धन्यवाद…!

Leave a Comment