Dr. Hargobind Khurana Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल आपण कुठल्याही मालिका किंवा सिनेमांमध्ये गुन्ह्याची उकल करताना डीएनए असा शब्द ऐकला असेल. या डी एन ए मध्ये एक उत्कृष्ट संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर हरगोविंद खुराना यांना ओळखले जाते. हे भारतीय वंशाचे एक अमेरिकन शस्त्रज्ञ होते, व त्यांनी जेनेटिक इंजीनियरिंग च्या विकासामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी विविध प्रोटीन सिंथेसिस आणि न्यूक्लिओटाइडस यांच्या कार्यांच्या स्पष्टीकरणासाठी वैद्यक शास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक देखील पटकावलेले आहे.
डॉ. हरगोविंद खुराना यांची संपूर्ण माहिती Dr. Hargobind Khurana Information In Marathi
आजच्या भागामध्ये आपण या जेनेटिक्स विषयांमध्ये सखोल संशोधन करणाऱ्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | डॉक्टर हरगोविंद खुराना |
जन्म दिनांक | ९ फेब्रुवारी १९२२ |
जन्मस्थळ | रायपूर, मुलतान, पंजाब |
वडिलांचे नाव | लाला गणपत राय |
पत्नीचे नाव | एस्थर |
विवाह वर्ष | १९५२ |
शैक्षणिक पातळी | एम एस सी (१९४५) पी एच डी (१९४८) |
डॉक्टर हर गोविंद खुराना यांचे प्राथमिक व प्रारंभिक जीवन:
मित्रांनो, आजच्या पाकिस्तान देशांमधील पंजाब राज्याच्या मुलतान जिल्ह्यामधील रायपूर या ठिकाणी डॉक्टर हरगोविंद खुराना यांचा जन्म झाला होता. सध्या हा भाग पाकिस्तानचा असला तरी देखील अविभाजित भारतामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांची जन्मतारीख दिनांक ०९ जानेवारी १९२२ होती, व त्यांचे कुटुंब एका पटवारी कुटुंब होते.
लहानपणी त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती, मात्र तरी देखील त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी त्यांच्यावर काहीही परिणाम होऊ दिला नाही. ते त्यांच्या कुटुंबातील सर्वात लहान आपत्य होते. ते नेहमी अभ्यासासाठी तत्पर असत, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना शिकविण्याचे ठरविले होते.
त्याकाळी रायपूर या गावांमध्ये सुमारे १००० लोक राहत, मात्र यामध्ये हरगोविंद खुराणा यांचे एकमेव कुटुंब असे होते जे शिकलेले होते. पुढे १९३४ मध्ये हरगोविंद खुराना यांच्या डोक्यावर असणारी वडिलांची सावली हरवली गेली, मात्र पुढे त्यांच्या मोठ्या भावाने त्यांच्या शिक्षणासाठी नेहमी तत्परता दाखवली.
डॉक्टर हरगोविंद खुराना यांचे शैक्षणिक आयुष्य:
उत्तम बुद्धीमत्तेचा आणि हुशार मुलगा म्हणून डॉक्टर हरगोविंद खुराना यांना ओळखले जात असे. त्यांनी आपल्या घराच्या अगदी शेजारी असणाऱ्या प्राथमिक शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मुलतान येथील डी ए व्ही हायस्कूल येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. पुढे १९४३ यावर्षी पंजाब विद्यापीठातून त्यांनी आपल्या पदवीचे शिक्षण अर्थात बी एस सी पूर्ण केले, आणि तिथूनच १९४५ या वर्षी एम एस सी अर्थात पदवित्तर पदवी देखील मिळविली.
पुढे त्यांना भारत सरकार द्वारे उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती देण्यात आली, आणि त्यांनी तिचा वापर करून इंग्लंडला जायचे ठरवले. पुढे तेथील विद्यापीठ येथून त्यांनी पीएचडी ही पदवी मिळवली, आणि केम्ब्रिज विद्यापीठांमध्ये देखील काम केले. १९५० ते १९५२ या दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी करिता त्यांनी केंब्रिज विद्यापीठांमध्ये कार्य केले होते.
तेथे त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील कार्य केले होते. त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील अतिशय उच्च शिक्षण घेतले होते, मात्र त्यांना या पटीत भारतामध्ये काम मिळाले नाही. परिणामी त्यांना पुन्हा परदेशी जावे लागले.
पुढे १९५२ या वर्षी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना नोकरीची संधी दिली, आणि तेथे जाऊन त्यांनी बायोकेमिस्ट्री या विभागामध्ये अध्यक्ष पद स्वीकारले. त्यांनी येथे अनुवंशशास्त्र अर्थात जेनेटिक्स याचा देखील अभ्यास केला होता.
या कालावधीमध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना विविध शैक्षणिक स्वरूपाचा जर्नल मध्ये आपले लेख प्रकाशित करत असत, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळत असे. परिणामी डॉक्टर हरगोविंद खुराना यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली, आणि त्यामुळेच १९६० यावर्षी कॅनडामधील प्रोफेसर इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्विस या संस्थेमार्फत त्यांना मार्क पुरस्कार व सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
डॉक्टर हरगोविंद खुराना यांचे वैयक्तिक जीवन:
मित्रांनो १९५२ या वर्षी वयाच्या तिसाव्या वर्षी डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नी एस्थर एलिझाबेथ सिबिलर होत्या. ज्या एक महान शास्त्रज्ञ देखील असण्याबरोबरच स्विस संसदेचा सदस्य देखील होत्या.
विवाह नंतर या उभयतांना तीन अपत्य झाली, ज्यांचे नाव डेव्ह रॉय,एमिली एत्रे, आणि ज्युलिया एलिझाबेथ असे ठेवण्यात आले होते. त्यांच्या पत्नीने एक शास्त्रज्ञ म्हणून हरगोविंद खुराणा यांच्या संशोधनामध्ये मोलाची साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्यामधील संबंध अधिकच मजबूत होण्यास मदत झाली. त्यांनी आपल्या आपत्यांची योग्य काळजी घेण्याबरोबरच, पतीचे कार्य देखील मोठ्या मनाने स्वीकारले होते. त्या नेहमीच हरगोविंद खुराना यांचा आदर करत असत.
हर गोविंद खुराना यांचे विविध पुरस्कार:
मित्रांनो, जगातील सर्वात उत्कृष्ट पुरस्कार समजला जाणारा नोबेल पुरस्कार डॉक्टर हरगोविंद खुराना यांना १९६८ यावर्षी प्रदान करण्यात आला होता. हा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्कार होता.
- नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
- याच वर्षी अर्थात १९६८ मध्ये त्यांना लूजर फेडरेशन पुरस्कार आणि लुसिया ग्रास हरी वीटझ पुरस्कार देण्यात आला होता.
- भारत सरकारने हरगोविंद खुराणा यांना १९६९ या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
- १९६७ या वर्षीचा डॅनी ह्यानेमन पुरस्कार देखील हरगोविंद खुराणा यांनी पटकावलेला आहे.
- त्यांना १९५८ यावर्षी कॅनडा द्वारे देण्यात येणारे मर्क मिडल व सुवर्णपदक देखील प्रदान करण्यात आलेले आहे.
निष्कर्ष:
मित्रांनो, भारतासह जगभरात अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, मात्र अनेकांनी भौतिकशास्त्र अथवा रसायनशास्त्र या विषयांमध्ये संशोधन करण्यामध्ये प्राधान्य दाखवले होते. मात्र हरगोविंद खुराना यांनी यापासून वेगळे म्हणजे जैवविज्ञान क्षेत्रामध्ये कार्य करून वेगवेगळे शोध लावलेले आहेत.
जेनेटिक्स इंजीनियरिंग मध्ये त्यांनी भरीव कामगिरी केल्यामुळे, त्यांना नोबेल पारितोषिक देखील प्राप्त झालेले आहे. अशा या हरगोविंद खुराणा यांच्या बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये त्यांच्या प्रारंभिक जीवनासह शैक्षणिक जीवन देखील अभ्यासलेले आहे.
सोबतच त्यांनी केलेल्या विविध विषयांतील अभ्यास, त्यांच्या वैयक्तिक पातळीवरील जीवनाची माहिती, त्यांना आयुष्यभरात मिळालेले विविध पुरस्कार, किंवा सन्मान, त्यांचे निधन इत्यादी विषयांवर माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरली असेल, तसेच तुम्हाला यामुळे प्रेरणा देखील मिळाली असेल अशी अपेक्षा आहे.
FAQ
हरगोविंद खुराना यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?
डॉक्टर हरगोविंद खुराना यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२२ या दिवशी झाला होता.
हरगोविंद खुराना यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
हरगोविंद खुराना यांचा जन्म पंजाब राज्याच्या मुलतान जिल्ह्यामधील रायपूर या गावी झाला होता.
हर गोविंद खुराना यांच्या वडिलांचे नाव काय होते?
हर गोविंद खुराना यांच्या वडिलांचे नाव लाला गणपत राय असे होते.
हर गोविंद खुराना यांचा विवाह कोणत्या वर्षी व कोणासोबत झाला होता?
हर गोविंद खुराना यांचा विवाह १९५२ यावर्षी एस्थर यांच्यासोबत झाला होता.
हर गोविंद खुराना यांनी कोण कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले होते?
हर गोविंद खुराना यांनी इसवी सन १९४५ यावर्षी एम एस सी, तर १९४८ यावर्षी पीएचडी या प्रकारचे शिक्षण घेतले होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हरगोविंद खुराना या भारतीय वंशाच्या अमेरिकन वैद्यकीय शास्त्र विषयातील शास्त्रज्ञा बद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळवणार आहातच. मात्र तुम्ही या लेखांमधून काय प्रेरणा घेतली, याबद्दल देखील आम्हाला वाचायला नक्की आवडेल. या सोबतच इतरांना ही माहिती वाचायला मिळावी याकरता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील तुम्ही नक्की पार पाडाल ही अपेक्षा आहे.
धन्यवाद…!