सौर ऊर्जाची संपूर्ण माहिती Solar Energy Information In Marathi

Solar Energy Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण पूर्वापार अनेक प्रकारचे इंधन किंवा ऊर्जा वापरत आलेलो आहोत. मात्र आजकाल या ऊर्जांच्या स्त्रोतांचा भरपूर वापर केल्यामुळे काही स्त्रोत संपत आलेले आहेत. मात्र जगभरात असे देखील स्त्रोत आहेत जे कितीही वापरले तरी देखील संपवू शकत नाहीत. त्यामध्ये सौरऊर्जाचा देखील समावेश होतो.

Solar Energy Information In Marathi

सौर ऊर्जाची संपूर्ण माहिती Solar Energy Information In Marathi

भारतासारख्या वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये सौरऊर्जेची मागणी अतिशय प्रचंड वाढलेली आहे. आणि या ऊर्जेच्या मागणीचे पूर्तता करण्याकरिता पारंपरिक, नवीकरणीय, अपारंपारिक यांसारख्या विविध प्रकारच्या ऊर्जा साधनांचा किंवा संसाधनांचा वापर केला जातो. 

वीज निर्मिती करणे असो किंवा इतर काही प्रत्येक ठिकाणी ऊर्जा ही द्यावीच लागते. आपला भारत देश वीज निर्मिती क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकावर येतो, आणि आपल्या देशातील दरवर्षी होणारी विद्युत निर्मिती वाढतच चाललेली आहे. मात्र त्या प्रमाणात लोकसंख्या देखील वाढत आहे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ऊर्जा पुरवण्याकरिता सौर ऊर्जा खूपच महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

आजच्या भागामध्ये आपण सौर ऊर्जा याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावसौर ऊर्जा
प्रकारऊर्जा स्त्रोत
उपप्रकारनवीकरणीय किंवा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत
स्त्रोतसूर्य
वापरवीज निर्मिती, पाणी तापवणे, अन्न शिजवणे इत्यादी
सूर्यप्रकाशाचे ताससर्वसाधारणपणे २३०० ते ३२०० तास प्रतिवर्ष

सौरऊर्जा म्हणजे नेमके काय:

मित्रांनो, सूर्यापासून प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा होय. यावेळी सूर्यामध्ये विविध रासायनिक अभिक्रिया घडतात त्यामधून या सौरऊर्जेची निर्मिती होत असते. आणि ही सौर ऊर्जा ज्यावेळी जमिनीवर येते, तेव्हा त्याची सर्व किरणे एका बिंदूमध्ये एकत्रित केल्यानंतर ज्या ऊर्जेची निर्मिती होते त्याला सौर ऊर्जेचे उत्पादन असे म्हटले जाते.

मग ते विविध स्वरूपांमध्ये असू शकते. काही ठिकाणी या सौरऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर केले जाते, तर काही ठिकाणी उष्णतेच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित करून त्यापासून अन्न शिजवले जाते. याचबरोबर काही ठिकाणी पाणी देखील उकळविले जाते.

भारत हा उष्ण कटिबंधीय परिसरामध्ये येणारा देश असल्यामुळे, येथे सूर्यप्रकाशाचा कुठलाही तुटवडा भासत नाही. त्यामुळे अगदी संपूर्ण वर्षभर या सूर्यापासून ऊर्जा मिळवली जाऊ शकते. मित्रांनो, सूर्य हा ऊर्जेचा असा स्त्रोत आहे जो कधीही संपू शकत नाही. या सूर्याला पृथ्वीवरील सर्व सजीवांचा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून ओळखले जाते. अगदी झाडांना देखील ऊर्जा देण्याचे कार्य या सूर्या मार्फत केले जाते.

सौरऊर्जेचे तंत्रज्ञान:

सौरऊर्जेचे वीज निर्मितीमध्ये रूपांतर करण्याकरिता काही तंत्रज्ञान वापरले जाते. यामध्ये विशिष्ट धातूच्या पट्ट्या उन्हामध्ये ठेवल्यामुळे त्यापासून विविध आयनांचे वाहन सुरू होते, आणि परिणामी वीज ची निर्मिती केली जाते. यासाठी सोलर पॅनल नावाचे उपकरण वापरले जाते.

सौर ऊर्जा वापरण्याचे फायदे:

मित्रांनो, पारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत टाळून नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांमध्ये सौर ऊर्जा वापरणे अतिशय फायद्याचे ठरते, हे फायदे पुढे दिलेले आहेत.

सौर ऊर्जा हे कधीही न संपणारे संसाधन असल्यामुळे याचा भविष्यात कधीही तुटवडा पडणार नाही, तसेच हे अतिशय मोफत उपलब्ध असल्यामुळे भविष्यामध्ये याचे दर वाढणे, किंवा कमी होणे यांसारख्या समस्या देखील उद्भवणार नाहीत.

पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वापरामुळे कार्बन डायऑक्साइड किंवा तत्सम अनेक धोकादायक वायू वातावरणामध्ये उत्सर्जित केले जातात. ज्याने वातावरणामध्ये प्रदूषण होण्यास सुरुवात होते. मात्र सौर ऊर्जा वापरल्यामुळे अशा रीतीने कुठलेही वायू उत्सर्जित होत नाहीत. त्यामुळे पर्यावरण देखील अतिशय स्वच्छ व प्रदूषण विरहित राहते. त्यामुळे याला पर्यावरण पूरक म्हणून देखील ओळखले जाते.

सौर ऊर्जा विविध प्रकारांमध्ये वापरली जाते, यामध्ये उष्णता ऊर्जा, विद्युत ऊर्जा, इत्यादींचा समावेश होतो. सौर ऊर्जा वापरून अन्न शिजवणे, अन्नधान्य वाळविणे इत्यादी गोष्टींमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला जातो. अगदी कॅल्क्युलेटर पासून विमानापर्यंत मोठ्या मोठ्या उपकरणांमध्ये देखील सौरऊर्जेचा वापर केला जातो.

सौर ऊर्जा केवळ दिवसाच उपलब्ध असते, मात्र असे असले तरी देखील ही ऊर्जा बॅटरी चार्ज करण्यासाठी देखील उपयोगात आणली जाते. परिणामी ज्यावेळी सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल अशावेळी या बॅटरीचा वापर करून साठवलेली ऊर्जा वापरली जाऊ शकते. त्यासाठी इन्व्हर्टर व बॅटरी या दोन अतिरिक्त उपकरणांची आवश्यकता असते.

सर्वसाधारणपणे सोलर पॅनल किंवा प्राथमिक उपकरणे ही स्वस्त असतात, मात्र तुम्हाला रात्री देखील या गोष्टींचा वापर करायचा असेल तर बॅटरी व इन्व्हर्टरचा खर्च वाढू शकतो.

अनेक ठिकाणी वीज वाचवण्यासाठी रस्त्यांच्या कडेचे दिवे सौरऊर्जेवर चालविले जातात, सोबतच रस्त्यांवरील सिग्नल देखील सौरऊर्जेवर करण्यात आलेले आहेत.

या सौर ऊर्जेला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नसल्यामुळे, केवळ ही सौर ऊर्जा उपकरणे खरेदी करण्यासाठी एकदा खर्च केला की तुम्ही अगदी कित्येक वर्ष विनमूल्य या ऊर्जेचा वापर करू शकता.

सौर ऊर्जेचे काही तोटे देखील आहेत, जसे की या उपकरणांचा सुरुवातीचा खर्च प्रचंड असतो. त्याचप्रमाणे हे उपकरणे नाजूक असल्यामुळे त्यांची वेळोवेळी देखभाल घेणे गरजेचे असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजकाल ऊर्जाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मग ते विकसित देश असो किंवा विकसनशील देश, प्रत्येक देशांना लागणारी ऊर्जा ही वाढत चालली आहे. कारण लोकसंख्येचे प्रमाण देखील त्या पटीत वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला ऊर्जा पुरवण्यासाठी जर पारंपारिक स्त्रोत वापरले, तर त्यांचे साठे लवकरच संपुष्टात येतील.

ही काळाची गरज लक्षात घेता अनेक सरकारांनी नवीकरणीय किंवा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत वापरायला सुरुवात केली आहे. यामध्ये सौर ऊर्जाचा देखील समावेश होतो. आजच्या भागामध्ये आपण या सौर ऊर्जेविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये सौर ऊर्जा म्हणजे काय, सौरऊर्जावर आधारित कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, सौर ऊर्जेपासून कशा रीतीने ऊर्जा मिळवली जाते त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत.

भारताने सौरऊर्जेचा वापर करण्याकरिता बनवलेली विविध उत्पादने, भारतामध्ये सौर ऊर्जा मधील सद्यस्थिती, शहरी व ग्रामीण या भागांमध्ये सौर ऊर्जा वापरण्यासाठी असणारी आव्हाने, इत्यादी माहिती बघितली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

सौर ऊर्जेला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते?

सौर ऊर्जेला इंग्रजी या भाषेमध्ये सोलार एनर्जी या नावाने ओळखले जाते.

सौर ऊर्जा कोणत्या प्रकारांमध्ये येते?सौर ऊर्जा कोणत्या प्रकारांमध्ये येते?

सौर ऊर्जा नवीकरणीय अर्थात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या प्रकारांमध्ये येते.

सौर ऊर्जेची निर्मिती कशाप्रकारे होते?

ज्यावेळी सूर्याच्या केंद्रकामध्ये न्यूक्लियर फ्युजन होते, त्यावेळी या सूर्य ऊर्जेची निर्मिती होत असते.  सूर्याच्या मध्यामध्ये किंवा गाभ्यामध्ये हायड्रोजनच्या अणूंना हेलियमचे प्रोटॉन अनु टक्कर देत असतात, त्यावेळी रासायनिक प्रक्रिया घडते, आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होत असते.

सौर ऊर्जेचा महत्त्वाचा स्त्रोत कोणता समजला जातो?

सौर ऊर्जेचा एकमेव आणि सर्वात महत्त्वाचा स्त्रोत हा सूर्य आहे. सूर्यामध्ये घडणाऱ्या विविध रासायनिक अभिक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हटले जाते.

सौर ऊर्जेचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केला जातो?

सौरऊर्जेपासून सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज निर्मिती केली जाते. याचबरोबर घरगुती स्वरूपावर पाणी उकळविण्याकरिता सोलर वॉटर हीटर्स वापरले जातात. त्याचबरोबर अन्न शिजविणे, धान्याची कोठारे मध्ये धान्य वाळवणे, यांसारख्या गोष्टींमध्ये देखील सौरऊर्जेचा वापर केला जातो. अनेक तांत्रिक उपकरणांकरिता देखील सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वापरली जात असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सौर ऊर्जा विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या मित्रांना ही माहिती पाठवा, व त्यांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे वापर कमी करून सौर ऊर्जा सारखे स्त्रोत वापरण्याला प्रवृत्त करा.

धन्यवाद…!

Leave a Comment