Hibiscus Flower Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो गणपतीचे सर्वात आवडीचे फुल म्हणून जास्वंद या फुलाला ओळखले जाते. हे एक अतिशय सुंदर आणि मोहक सुगंधाचे फुल असून, छोट्याशा झुडूपाच्या स्वरूपात याचे झाड असते. या झाडाला जास्वंदीचे झाड म्हणून ओळखले जाते. इंग्रजीमध्ये त्याला हिबिस्कस असे नाव आहे. जास्वंदाचे फुल अतिशय भव्य व सुरेख लाल रंगांमध्ये आढळते. या जास्वंदीच्या पानांचा आणि फुलांचा वापर केसाचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो.
जास्वंद फुलाची संपूर्ण माहिती Hibiscus Flower Information In Marathi
आजच्या भागामध्ये आपण या जास्वंदीच्या फुलाबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…
नाव | जास्वंद |
इंग्रजी नाव | हिबिस्कस |
शास्त्रीय नाव | हिबिस्कस स्पेसीज |
प्रकार | फुलझाड |
क्लास किंवा वर्ग | मॅग्नोलिओस्पीडा |
कुटुंब किंवा कुळ | मालवेसी |
फुलांचा आकार | मोठा |
फुलांचा रंग | लालसर केशरी किंवा गुलाबी आणि पांढरा |
मित्रांनो, इंग्रजी मध्ये हिबिस्कस या नावाने ओळखले जाणारे जास्वंदीचे फुल काही ठिकाणी गुडल किंवा जावाकुसुम या नावाने देखील ओळखले जाते. जास्वंदाचे फुल मुख्यतः लाल रंगांमध्ये आढळते, मात्र काही प्रजातीमध्ये ते पांढरे किंवा पिवळे या रंगांमध्ये देखील आढळून येते. अतिशय सुंदर फुलांमध्ये या जास्वंदीच्या फुलाचा समावेश होत असून, त्याची पाने देखील खूपच वैशिष्ट्यपूर्ण असतात, व फुले देखील मोठी मोठी असतात.
जास्वंदाच्या फुलाचा आकार हा ट्रंपेट स्वरूपाचा असतो. आकर्षक दिसणारी ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रजातीमध्ये आढळून येते. आणि तिचे साधारण आयुर्मान देखील जास्त असते.
जास्वंदीची झाडे अगदी दहा ते पंधरा फुटांपर्यंत देखील उंच वाढतात. अतिशय गर्द हिरव्या रंगाची पाने असणारी जास्वंदी तिच्या पानांच्या विशिष्ट रचनेसाठी ओळखली जाते. कारण या पानांवर खाचा असतात. व हे पान बदामाच्या आकाराचे असते, आकाराला सुमारे पाच ते सात इंचापर्यंत वाढणारे हे पान केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजले जाते.
जगभरामध्ये या जास्वंदीच्या अनेक प्रजाती आढळून येतात. त्यांना प्रजातीनुसार पिवळे लाल किंवा पांढरे फुले येत असतात. या फुलांमध्ये पाच किंवा सात अथवा अधिक पाकळ्या देखील आढळून येतात. कोवळी कळी स्वरूपात असणारे हे फुलं चवीला देखील खूपच गोड असतात.
जास्वंद फुलाचा वापर:
मित्रांनो, जास्वंदीचा वापर फार प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मुख्यतः आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरले जाणारे हे फुल इतरही गोष्टींसाठी वापरले जाते. पांढऱ्या रंगाचे जास्वंदीचे फुल वाळवून, त्याची पावडर केली जाते व औषधी म्हणून वापरली जाते.
या फुलांच्या पाकळ्या वाळवून त्यापासून बनवलेला चहा देखील खूपच सुंदर आणि चवीला छान लागतो. जास्वंदीचे फुल आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि बाह्य सौंदर्याकरिता अर्थात केसांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम समजले जाते. याच बरोबर गणपती या देवाला वाहण्याकरिता मोठ्या प्रमाणावर या जास्वंदीच्या फुलांची निवड केली जाते. जास्वंदीचे फुल गणपती या देवाला खूपच प्रिय आहे.
केसांना जास्वंदीचे फुल वापरताना:
मित्रांनो, तुम्ही वर बघितले आहे की जास्वंदीचे फुल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त समजले जाते. ज्या लोकांच्या केसांची शक्ती गेलेली आहे, किंवा सारखे केस गळत असतील, किंवा केस पांढरे झाले असतील अशा विविध समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या जास्वंदीच्या फुलाचा वापर केला जातो. त्याचबरोबर केसांसाठी जास्त प्रभावी जास्वंदीची पाने समजली जातात.
तुमच्या केसांमध्ये काही समस्या जाणवत नसतील, तरीदेखील तुम्हाला अधिक कालावधीसाठी सुंदर केस हवे असतील तर केसांसाठी जास्वंदीचा वापर करायला हवा. ज्यामुळे अनेक दिवसांपर्यंत तुमचे केस काळेभोर आणि घनदाट राहतील. याकरिता जास्वंदीचे आणि ऑलिव्ह चे पाने घेऊन त्यांना बारीक करून त्यांची पेस्ट बनवावी, व ती डोक्याला लावावी. ही पेस्ट सुमारे दहा ते पंधरा मिनिटे चांगली केसांमध्ये मुरू द्यावी. आणि त्यानंतर कोमट पाण्याच्या साह्याने केस धुवावे. यामुळे केस आधी पेक्षा चांगले घनदाट तर होतीलच, शिवाय काळेभोर देखील दिसून येतील.
तेलाच्या स्वरूपात देखील जास्वंदी डोक्याला लावली जाऊ शकते. यासाठी जास्वंदीची पाने आणि पाकळ्या तेलामध्ये उकळून हे तेल थंड करून घ्यावे. असे थंड केलेले तेल केसांना लावल्यामुळे केस अतिशय चमकतात, याशिवाय डोक्यामध्ये कोंडा झाला असेल तरीदेखील तो दूर होण्यास मदत होते. मात्र तेल उकळण्याकरिता खोबरेल तेल वापरावे.
मित्रांनो, ज्या रुग्णांना कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवत असेल, अशांसाठी जास्वंदीचा चहा पिल्याने खूपच फायदेशीर ठरू शकते. या फुलातील पोषक द्रव्यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये होणारे ब्लॉकेज दूर होण्यास मदत होते. शिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलचे पातळी कमी करण्यामध्ये देखील फायदा होतो.
जास्वंदीचे होणारे तोटे:
- मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असते, त्याप्रमाणे जास्वंदीचे अगणित फायदे असले, तरी देखील काही तोटे देखील आहेत. ज्यामध्ये जास्वंदीच्या चहाने होणारे तोटे जास्त प्रमाणावर समाविष्ट आहेत.
- गरोदरपणात महिलांना जास्वंदीचा चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे त्रास देखील होऊ शकतो.
- जास्वंदीचा चहा पिल्यामुळे झोपेचे प्रमाण वाढते.
- जास्वंदीचा चहा पिल्यानंतर चालण्यामध्ये देखील काही प्रमाणात अडचणी होऊ शकतात, त्यामुळे प्रवासात हा चहा पिऊ नये.
- जास्वंदीचा चहा पिल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणला जात असला, तरी देखील सामान्य रक्तदाब असणाऱ्या लोकांचा रक्तदाब कमी देखील होऊ शकतो.
- जास्वंदीची पाने डोक्याला लावल्यामुळे काही प्रमाणात दुर्गंधीचा देखील सामना करावा लागू शकतो.
निष्कर्ष:
मित्रांनो, प्रत्येक कामाची आराध्य देवता गणपती यांचे सर्वात आवडीचे फुल म्हणून या जास्वंदीच्या फुलाला ओळखले जाते. हे फुल वेगवेगळ्या प्रजातीमध्ये आढळून येते. या वेगवेगळ्या प्रजातीनुसार त्याचे रंग देखील वेगवेगळे आढळून येतात. मुख्यतः लालसर केसरी किंवा गुलाबी रंगांमध्ये आढळणाऱ्या या फुलाच्या काही प्रजाती पांढऱ्या रंगांमध्ये देखील फुलांची निर्मिती करत असतात.
केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाणाऱ्या या जास्वंद फुलाविषयी आज आपण माहिती बघितली आहे. त्यामध्ये जास्वंदीचे फुल, त्याचा वापर, त्यापासून मिळणारे फायदे, जास्वंदीच्या चहा, जास्वंदीच्या झाडाचे व फुलाचे वेगवेगळे फायदे, रक्तदाबासाठी जास्वंद कसे वापरावे, त्याचप्रमाणे वजन कमी करण्यामध्ये जास्वंदीचे कशा रीतीने फायदे होतात
जास्वंदी पासून होणारे तोटे, जास्वंदीची लागवड कशी करावी, जास्वंदीच्या बिया असतात का, व त्यापासून लागवड केली जाऊ शकते का? त्याचबरोबर घरी लावलेल्या जास्वंदीची काळजी कशी घ्यावी, इत्यादी माहिती बघितली आहे. याशिवाय काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितले आहेत.
FAQ
जास्वंदीच्या फुलाला इंग्रजी मध्ये काय म्हटले जाते व त्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
जास्वंदीच्या फुलाला इंग्रजी मध्ये हिबिस्कस असे म्हटले जाते, व त्याचे शास्त्रीय नाव हिबिस्कस स्पेसीज किंवा हिबिस्कस रोजा सीनेसिस असे आहे.
जास्वंदीच्या वनस्पतीचा क्लास आणि फॅमिली कोणकोणते आहेत?
शास्त्रीय वर्गीकरणाच्या आधाराने जास्वंदीच्या वनस्पतीचा क्लास हा मॅग्नॉलीओस्पिडा, तर फॅमिली ही मालवेसी आहे.
जास्वंदीच्या फुलाचा रंग साधारणपणे कसा असतो?
जास्वंदीच्या फुलाचा रंग हा मुख्यतः लालसर केसरी किंवा गुलाबी असतो. मात्र काही प्रजातीमध्ये पांढऱ्या रंगाचे जास्वंद देखील बघितले जाते.
जास्वंदीचे फुल कोणत्या देवतेसाठी सर्वात प्रिय समजले जाते?
जास्वंदीचे फुल आराध्य दैवता असणाऱ्या गणपती साठी सर्वात प्रिय समजले जाते.
जास्वंदीचे झाड कसे असते?
जास्वंदीचे झाड हे लहानशा झुडपाच्या स्वरूपात असते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जास्वंदी आपला विषय संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीची ओळख व्हावी, म्हणून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती आवर्जून शेअर करा. धन्यवाद…!