तांदूळची संपूर्ण माहिती Rice Information In Marathi

Rice Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तांदूळ म्हटलं की आपल्याला लगेच तोंडाला पाणी येते. संपूर्ण जगभरामध्ये असा कोणीही नसेल, ज्याला तांदूळ माहिती नाही. संपूर्ण जगभर उगवला जाणारा हा तांदूळ भारतामध्ये प्रमुख अन्न म्हणून वापरला जातो. भारतातील पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, ओडिसा यांसारखे राज्यांमध्ये तर तांदुळाचे प्रमाण अतिशय जास्त आहे.

Rice Information In Marathi

तांदूळची संपूर्ण माहिती Rice Information In Marathi

अगदी प्राचीन काळापासून खाल्ला जाणारा हा तांदूळ शिजवून इतर पदार्थांसोबत मिळून खाल्ला जातो, किंवा यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि मसाले टाकून एकटा देखील खाल्ला जातो. तांदूळ हे एक तृणधान्य असून, ते आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर ठरते.

तांदळामध्ये पांढरा तांदूळ आणि तपकिरी किंवा लाल तांदूळ असे दोन प्रकार पडतात. यातील तपकिरी तांदूळ हा पांढऱ्या तांदळापेक्षा तुलनेने अधिकच चांगला, आणि आरोग्यदायी समजला जातो. आजच्या भागामध्ये आपण तांदळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया तुमच्या आवडीच्या अन्नाबद्दल, अर्थ तांदळा बद्दल माहिती घ्यायला…

नावतांदूळ
इंग्रजी नावराईस
हिंदी नावचावल
शास्त्रीय नावओरायझा सटायव्हा
प्रकारतृणधान्य
रंगपांढरा किंवा तपकिरी
ओळखभारतातील प्रमुख अन्न

मित्रांनो, इंग्रजी मध्ये राईस या नावाने ओळखला जाणारा तांदूळ तमिळ भाषेमध्ये ओरिसी या नावाने देखील ओळखला जातो. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये तांदळाला वेगवेगळी नावे आहेत. उंचीने गुडघाभर असणारी भाताची वनस्पती चिखलामध्ये उगवली जाते.

यासाठी बियांचे रोपे तयार केले जातात. व या रोपांना पुन्हा मुख्य शेतामध्ये लावले जाते, त्यानंतर आलेल्या उत्पन्नाला वरचे साल काढून पॉलिश केले जाते. आणि यापासून तांदळ तयार होतो, जो आपण रोजच्या आहारामध्ये खात असतो. तांदूळ हा थंड प्रवृत्तीचा आहे.

मित्रांनो, तांदूळ शेतीसाठी फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते, हे आपण ऐकलेले असेल, अगदी या शेतीमध्ये पिकांच्या मुळाजवळ पाणी साचूनच ठेवावे लागते. अवघ्या एक किलो तांदुळाच्या निर्मितीसाठी सुमारे २००० गॅलन इतके पाणी आवश्यक असते.

यावरून तुम्ही कल्पना करू शकाल. त्यामुळे, ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, किंवा पाण्याची प्रमाण जास्त असते. अशाच ठिकाणी या तांदळाची शेती केली जाते. या तांदूळ शेतीमध्ये काही लोक मासे पालन देखील करत असतात. आणि या पिकांचा कालावधी संपला, की शेताच्या एका कोपऱ्यामध्ये तयार केलेल्या तळ्यामध्ये हे सर्व मासे एकत्र येत असतात. या मासे पालनाचा फायदा, म्हणजे शेतामध्ये विविध रोग किडींचा प्रादुर्भाव देखील होत नाही. आणि सरते शेवटी माशांचे उत्पन्न देखील मिळत असते.

तांदळामध्ये असणारे पौष्टिक मूल्य:

मित्रांनो, आज जगभर मोठ्या प्रमाणावर तांदळाचे सेवन केले जाते. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये केवळ तांदळाचे सेवन मोठ्या प्रमाणावर आहे, कारण या तांदूळ पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे, खनिजे, आणि उपयुक्त घटकांचा स्त्रोत असतो. त्यामुळे माणसाला नेहमी ऊर्जा युक्त वाटत असते.

विटामिन बी कॉम्प्लेक्स यासाठी तांदूळ मोठ्या प्रमाणावर चांगला स्त्रोत समजला जातो. त्याचबरोबर विविध प्रथिने, आणि कर्बोदके यांचे प्रमाण देखील उत्तम आहे. आणि त्यामध्ये बघायचे झाल्यास मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, यांसारखे विविध घटक देखील यामध्ये आढळून येतात. तांदूळ पिकामध्ये सर्वाधिक लोहाचे प्रमाण आढळून येते. सोबतच यामध्ये फायबरचे प्रमाण देखील अधिक असल्यामुळे, पोटाच्या समस्यांवर देखील हा इलाज म्हणून वापरला जातो.

भात सेवन करण्याकरिता सर्वप्रथम शिजवला जातो, मात्र तांदूळ शिजवण्याच्या पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. काही लोक केवळ मिठामध्ये तांदूळ शिजवून इतर भाज्यांबरोबर किंवा डाळीबरोबर याचे सेवन करतात. तर काही ठिकाणी पालेभाज्या व फळभाज्या भातामध्ये एकत्र शिजवून मसाले टाकून तिखट स्वरूपाचा भात बनवला जातो.

काही ठिकाणी यामध्ये मांसाचे तुकडे घालून बिर्याणी देखील बनवली जाते. अगदी घरगुती जेवण असो, की कुठला समारंभ, किंवा लग्नकार्य. या प्रत्येक ठिकाणी जेवनामध्ये भाताचा समावेश असतोच.

भाता पासून बनवलेली खिचडी प्रत्येक ठिकाणी आवडीने खाल्ली जाते. ही खिचडी चवदार असण्याबरोबरच शरीरासाठी पोषक देखील असते. यामधून तांदळात असणाऱ्या तत्त्वांबरोबरच सोबत टाकण्यात आलेल्या घटकांचे पोषण देखील शरीराला मिळत असते. खीर बनवण्याकरिता देखील मोठ्या प्रमाणावर तांदळाचा वापर केला जातो. त्यामुळे अगदी गोड पदार्थ असो, की तिखट, पदार्थ तांदूळ हमखास वापरला जातो.

तांदळाचे प्रकार:

मित्रांनो, सर्वसामान्यपणे रंगानुसार तांदळाचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. यामध्ये पांढरा तांदूळ, तपकिरी तांदूळ, पिवळा तांदूळ, लाल तांदूळ हे त्याचे प्रकार समाविष्ट असतात. पांढरे तांदूळ हे सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आणि यामध्ये कॅलरीची संख्या भरपूर प्रमाणात असते. अतिशय चमकदार असणारा हा तांदूळ शिजवण्यासाठी देखील कमी कालावधी लागत असतो.

ब्राऊन राईस, अर्थात तपकिरी तांदूळ खाण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो. आरोग्यदायी असणारा हा तांदूळ फायबरच्या प्रमाणाने अतिशय भरपूर असतो. त्यामुळे अनेक लोक हल्ली या तांदळाचे सेवन करण्याकडे वळत आहेत.

लोहाचे प्रमाण भरपूर असणारा प्रकार म्हणून लाल तांदळाला देखील ओळखले जाते. हा तांदूळ पांढरा किंवा तपकिरी प्रकारच्या तांदळाला पर्याय म्हणून वापरला जातो. आणि अतिशय पोषक देखील असतो.

याच बरोबरीने उसना नावाचा देखील प्रकार भातामध्ये आढळून येतो, यामध्ये सुद्धा लोह चांगले असते. अतिशय नगण्य फॅटचे प्रमाण, आणि भरपूर फायबर हवे असेल तर काळा भात खाण्याचा देखील सल्ला दिला जातो. मात्र याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत नाही.

मित्रांनो, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ सेवन केले जाते. आपला भारत देश चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर उत्पादनामध्ये आहे. भारतातील राज्यांचा विचार केला, तर सर्वात जास्त भाताचे उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये होते. भारत तांदळाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर करत असतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतीय आहारामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणून तांदळाला ओळखले जाते. अगदी उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत मोठ्या प्रमाणावर तांदळाचे सेवन केले जाते. उत्तर पूर्व भारतासह दक्षिण भारतामध्ये तांदळाचे उत्पादन, तसेच वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.

आजच्या भागामध्ये आपण या तांदळाविषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला तांदुळामध्ये असणारे विविध पौष्टिक मूल्य, तांदळाचे विविध प्रकार काय आहेत, तांदूळ पासून तयार केलेला भात खाण्याने काय फायदे होतात, किंवा काय तोटे होतात, इत्यादी माहिती बघितली आहे. यासोबतच तांदूळ पिकाचे इतर क्षेत्रामधील महत्त्व, आणि नेहमी विचारले जाणारे प्रश्न, यांसारखी माहिती देखील बघितली आहे. तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा झालेला असेल.

FAQ

तांदुळाला वेगवेगळ्या भाषेमध्ये कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?

तांदुळाला मराठी मध्ये तांदूळ म्हणत असले, तरी देखील हिंदीमध्ये त्याला चावल आणि इंग्रजीमध्ये राईस या नावाने ओळखले जाते.

तांदळाचे शास्त्रीय नाव काय आहे?

तांदळाचे शास्त्रीय नाव ओरायझा सटायव्हा असे आहे.

तांदळाचे कुळ किंवा कुटुंब कोणते समजले जाते?

तांदळाची कुळ किंवा कुटुंब ग्रामीनी हे समजले जाते.

तांदळाचे रंगावरून कोणकोणते दोन प्रकार पडत असतात?

तांदळाच्या रंगावरून पांढरा तांदूळ किंवा व्हाईट राईस, आणि तपकिरी तांदूळ किंवा ब्राऊन राईस असे दोन प्रकार पडत असतात.

सर्वप्रथम तांदळाची व्यावसायिक स्तरावर लागवड करण्याची सुरुवात कोणी व कुठे केली होती?

विविध प्राथमिक संदर्भानुसार, सर्वप्रथम तांदळाची व्यावसायिक लागवड करण्याचा मान चीन देशाला दिला जातो. त्यांनी चीन देशांमधील यांगतझे या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वप्रथम तांदुळाची लागवड केली होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण तांदूळ या तृणधान्याबद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतर मित्रांना ही माहिती वेळात वेळ काढून शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment