इंजिनियरची संपूर्ण माहिती Engineer Information In Marathi

Engineer Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो इंजिनियर म्हटलं की आपल्याला नवनवीन स्वप्नांची दुनिया दिसायला लागते. कारण इंजिनियर हे कधीकाळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. आजच्या भागामध्ये आपण इंजिनियर अर्थात अभियंता यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. आणि सोबतच इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते, हे देखील बघणार आहोत. इंजिनियर चे विविध प्रकार, आणि त्यासाठीचे प्रशिक्षण याबद्दल देखील जाणून घेणार आहोत.

Engineer Information In Marathi

इंजिनियरची संपूर्ण माहिती Engineer Information In Marathi

मित्रांनो इंजीनियरिंग हे असे क्षेत्र आहे जिथे आपण चांगले कार्य व मेहनत करून खूप यश मिळवू शकतो. या इंजिनियरिंग क्षेत्राला कुठलीही मर्यादा नाही, मात्र त्यासाठी योग्य रीतीने अभ्यास करणे फार गरजेचे ठरते. अश्या रीतीने तुम्ही एक उज्वल भवितव्य घडवू शकता.

चला तर मग सुरु करूया इंजिनियर विषयी माहितीच्या या ज्ञानमय आणि तेवढ्यात मजेशीर प्रवासाला…

अभियंता म्हणजे काय?

मित्रांनो, ज्या व्यक्तीने अभियांत्रिकी शिक्षणाचे सर्व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत अश्या व्यक्तींना अभियंता म्हणून ओळखले जाते. अभियंता होण्याकरिता सर्वप्रथम कोणत्या क्षेत्रातील अभियंता व्हायचे हे निवडण्यापासून त्यामध्ये योग्य प्राविण्य प्राप्त करण्यापर्यंत प्रक्रिया असते.

अभियंता होण्यासाठी आणि पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरिता या पदाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या आणि चांगला करणे खूपच गरजेचे असते. विविध ठिकाणी नोकऱ्या असण्याबरोबरच व्यावसायिक जीवनामध्ये देखील अभियंता यांना खूप संधी उपलब्ध असतात.

अभियंता ज्या स्वरूपाचे कार्य करत असतात, त्या क्षेत्रातील नाव त्यांना दिले जाते. कुठल्याही अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर विज्ञान क्षेत्रातील ज्ञान व त्याचबरोबर गणिताची चांगली समज असणे फार गरजेचे असते. कारण इंजिनीयर चा पाया या दोन विषयांवरच आधारलेला असतो.

इंजीनियरिंग करण्याकरिता दोन मार्गाने प्रवेश घेता येतो, यासाठी दहावी नंतर डिप्लोमा हा कोर्स केला जातो. आणि त्यानुसार पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळवला जाऊ शकतो. मात्र काही विद्यार्थ्यांना  बारावी पर्यंत शिक्षण घेऊन मग इंजीनियरिंग क्षेत्रामध्ये उतरावे वाटते, त्यांच्यासाठी सर्वात आधी बारावीची परीक्षा विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण करणे व पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा पूर्ण करणे गरजेचे ठरते. त्यानंतर त्यांना या अभियांत्रिकी विद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो.

अभियंत्यांचे प्रकार:

मित्रांनो, अभियंत्यांच्या कार्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. त्यांनी पदवीकरिता कोणते क्षेत्र निवडले होते, हे सांगणारे त्यांचे प्रकार असतात. त्यांच्या नावावरून हा इंजिनियर कोणते कार्य करत असेल, याचा अंदाज आपण सहज लावू शकतो.

विद्युत अभियंता हे विजेशी संबंधित सर्व उपकरणे, आणि तत्सम साहित्य यांच्या बद्दल कार्य करत असतात. या विद्युत अभियंत्याचे कार्य बऱ्यापैकी धोक्याच्या स्वरूपाचे असते.

यात्रिक अभियंते यंत्रांच्या संदर्भात असणाऱ्या कार्यामध्ये व्यस्त असतात. यामध्ये कोणत्या प्रकारचे यंत्र कसे कार्य करेल, कमीत कमी ऊर्जा खर्च करून जास्तीत जास्त काम कसे करून घेता येईल, एखादे काम करण्याकरिता विविध यंत्रे कशी बनवता येतील, यामध्ये हे अभियंते कार्य करत असतात.

संगणक अभियंता काय काम करतो हे आज कोणालाही सांगण्याची गरज नाही. संगणक अभियंता संगणकातील किंवा लॅपटॉप मधील विविध हार्डवेअर उपकरणे तयार करण्याचे कार्य करत असतो.

मित्रांनो, संगणकासाठी हार्डवेअर सोबतच सॉफ्टवेअर विकसित करणे देखील खूप गरजेचे असते. आणि हे काम सॉफ्टवेअर इंजिनियर करत असतात. लोकांना ज्या प्रकारच्या मागण्या असतात, त्यानुसार विविध सॉफ्टवेअर किंवा ॲप्स विकसित करण्याकरिता या प्रकारच्या अभियंत्याचा मोठा हातखंडा असतो.

या मुख्य पाच प्रकाराव्यतिरिक्त ऊर्जा अभियांत्रिकी, हायड्रोलिक्स, फोटोप्रिक्स, कृषी अभियांत्रिकी यासारखे अनेक उपप्रकार या इंजिनियर चे पडत असतात.

अभियंत्यांना दिला जाणारा पगार:

मित्रांनो, क्षेत्र कुठलेही असो तुम्ही कार्य कशा स्वरूपाचे करता, व त्या क्षेत्रातील तुम्हाला अनुभव काय आहे, याच बरोबर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात, त्यानुसार वेगवेगळ्या स्वरूपाचा पगार दिला जात असतो. त्याला अभियांत्रिकी हे क्षेत्र देखील अपवाद नाही.

मात्र सर्वसाधारण विचार करायचा ठरला, तर कमीत कमी ०१ लाख ५० हजार प्रति वर्ष, ते १७ लाख रुपये प्रति वर्ष या दरम्यान इंजिनियर ला पगार दिला जात असतो. मात्र काही अभियंते असे देखील आहेत, जे एक लाख रुपये प्रति वर्ष पेक्षा देखील कमी पगारामध्ये कार्य करतात. तर काही ५० लाख प्रतिवर्षी देखील कमावत आहेत.

निष्कर्ष:

मित्रांनो, इंजिनियर म्हटलं की आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी आपोआपच आदर निर्माण होतो. कारण मागच्या दोन ते तीन दशकांमध्ये इंजिनियर हे सर्वाधिक कमाई करणारे क्षेत्र होते, मात्र त्यानंतर अनेक लोकांनी या क्षेत्राकडे प्रवेश घेण्यात कल दाखवल्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी निर्माण झाली. आणि त्यामुळे उगीच अभ्यास न करता या क्षेत्रामध्ये आलेल्या लोकांना बेरोजगार म्हणून सामोरे जावे लागले.

त्यामुळे इंजिनियरिंग या क्षेत्राचे महत्त्व काही अंशी कमी झाले, मात्र आज देखील जे विद्यार्थी योग्य अभ्यास करून आणि आपल्या ध्येयाने या क्षेत्रात प्रवेश करतात त्यांना उज्वल भवितव्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आजच्या भागामध्ये आपण या इंजिनियर विषयी माहिती बघितलेली आहे.

यामध्ये अभियंता किंवा इंजिनियर कोणाला म्हटले जाते, त्यांचे प्रकार काय असतात, यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, स्थापत्य अभियंता, व सॉफ्टवेअर अभियंता, इत्यादी प्रकाराबद्दल माहिती देखील बघितलेली आहे. सोबतच इंजिनीयर होण्यासाठी काय करावे लागते, स्ट्रीम किंवा शाखा कशी निवडावी, यासाठी पूर्वतयारी काय करावी, त्यानंतर पदवी मिळवल्यानंतर नोकरी कशी निवडावी, पगार काय असतो, इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे.

सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरलेली असून, या माहितीमुळे तुमचे इंजिनियर विषयी असणारे सर्व प्रश्न दूर झाले असतील, अशी आशा आहे.

FAQ

इंजिनीयर अर्थात अभियंत्यांचे कोणकोणते प्रकार आढळून येतात?

अभियंतांचे मुख्य पाच प्रकार असतात. ज्यामध्ये यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, स्थापत्य अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, आणि संगणक अभियंता यांचा समावेश होतो.

अभियंता किंवा इंजिनियर कुणाला म्हटले जाते?

ज्या व्यक्तीने इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवीचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असतो, अशा प्रत्येकाला इंजिनियर म्हणून ओळखले जाते.

अभियंता किंवा इंजिनिअर होण्यासाठी काय करावे लागते?

अभियंता होण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही कोणत्या क्षेत्रात निपुण आहात, तो विषय निवडावा लागतो. त्यानुसार प्रवेश परीक्षेचा अभ्यास करून अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवावा लागतो. व विद्यापीठांमध्ये नोंदणी करून घ्यावी लागते. पुढे या पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही इंजिनिअर बनता.

इंजीनियरिंग ला प्रवेश घेण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते?

मित्रांनो, इंजीनियरिंग हा विविध विषयांतील वेगवेगळ्या अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या क्षेत्रांमध्ये शिरायचे आहे हे प्रवेश घेण्यापूर्वीच माहीत असले पाहिजे. त्यानुसार योग्य प्रवेश मिळवला पाहिजे.

इंजिनीयर काय काम करत असतो?

कोणत्या क्षेत्रातील पदवी घेऊन इंजिनियर झालेले आहात, यानुसार इंजिनियर चे वेगवेगळे कार्य असते. जसे की स्थापत्य अभियंता गृहनिर्माण कार्यामध्ये, संगणक अभियंता संगणकाच्या कार्याविषयी, विद्युत अभियंता विविध विद्युत घटकांच्या कार्यामध्ये, आणि यांत्रिक अभियंता विविध यंत्रांच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंजिनियर याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही कळवाच. मात्र तुम्ही इंजिनियर असाल, तर इंजीनियरिंग करण्याच्या तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये वाचायला आवडेल. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीच्या सागरामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment