Sindhutai Sapkal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, अनाथांची माय म्हटलं की आपल्या तोंडातून आपोआपच सिंधुताई सपकाळ यांचे नाव बाहेर पडते. अनाथ मुलांची काळजी घेणे, आणि त्यांचे शेवटपर्यंत संगोपन करणे, यासारखे पवित्र कार्य केलेल्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासारखा उत्कृष्ट पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांना अनाथांची माई किंवा अनाथांची आई या नावाने संपूर्ण भारतभर ओळखले जाते. साहित्य क्षेत्रातील पीएचडी मिळवणाऱ्या सिंधुताई यांना २०१६ मध्ये ही पदवी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च यांच्या माध्यमातून देण्यात आली होती.
सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi
अगदी अलीकडेच म्हणजे ०४ जानेवारी २०२२ या दिवशी त्यांचे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. ज्यावेळी त्यांचे वय ७३ इतके होते. भारतीय स्त्री मागे किती हाल अपेष्टा असतात, मात्र यातूनही ती न डकमगता कार्य करत राहते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून सिंधुताई सपकाळ यांच्याकडे बघितले जाते.
समाजामध्ये अनेक दांभिक लोक वावरत असतात, त्यांच्यामुळे सरळ मार्गी लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो. आणि त्यांच्यामुळे इतरांचे जीवन असह्य होत असते. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. या हालाखीच्या परिस्थितीतून स्वतःची सुटका स्वतःलाच करावी लागणार आहे, ते सिंधुताई सपकाळ यांनी हेरले होते. व तोच संदेश त्या नेहमी आपल्या भाषणामधून देत असत.
आजच्या भागामध्ये आपण या सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी नित्य माहिती बघणार आहोत…
नाव | सिंधुताई सपकाळ |
जन्म | १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यामध्ये |
वडील | श्री अभिमान साठे |
जोडीदार | सपकाळ श्रीहरी |
कार्य | सामाजिक सुधारणा आणि अनाथांसाठी कार्य |
मित्रांनो, सिंधुताई सपकाळ यांनी संपूर्ण भारतभर अनाथ मुलांसाठी मोठे कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांना आज संपूर्ण समाज अनाथांची माय या नावाने ओळखत आहे. ज्या मुलांना आई-वडील नसत, अशा मुलांना एकत्र करून सिंधुताई सपकाळ त्यांची सर्व जबाबदारी उचलत असत. अगदी पालन पोषण करण्यापासून, शिक्षण देखील सिंधुताई देत असत. या मुलांचे लग्न देखील लावण्याचे कार्य सिंधुताई सपकाळ यांनी केलेली आहे.
मित्रांनो, महिलांचे जीवन कोणत्याच दृष्टिकोनातून सोपे नसते. मग ते पैशांच्या बाबतीत असो, की सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत. अगदी घरामध्ये देखील महिलांना महत्त्वाची किंवा सन्मानाची वागणूक दिली जात नाही. मात्र अशी वाईट वागणूक देणारे पुरुष समाजामध्ये फिरताना स्त्री पुरुष समानतेचा सूर लावत असतात. याच प्रकारे सिंधुताई सपकाळ यांना नवऱ्याने घराबाहेर काढले होते, मात्र त्यांनी न डगमगता, आणि न खचता आपले नवीन आयुष्य सुरू केले. आणि आज सिंधुताई सपकाळ या नावाची ओळख करून द्यायची देखील कोणाला गरज नाही.
सिंधुताई सपकाळ या अतिशय गरीब घरामध्ये जन्माला आल्या होत्या. लहानपणी अंगाला नेसायला देखील त्यांना कापड नसत, म्हणून त्या कपड्याच्या तुकड्याला आपल्या अंगावर घालत असत. त्याला मराठी भाषेमध्ये चिंधी म्हणून ओळखले जाते. यावरून त्यांना चिंधी नाव पडले, त्याचे पुढे सिंधुताई मध्ये रूपांतरण झाले.
मात्र घरामध्ये दारिद्र्य असले, तरी देखील त्यांचे वडील अतिशय दूरदर्शी विचाराचे होते. त्यांनी सिंधुताई सपकाळ यांना शिक्षण देण्याचे ठरविले, त्याकाळी अगदी त्यांच्या घरातून देखील यासाठी विरोध होत होता. म्हणून ते सिंधुताई सपकाळ यांना शेतामध्ये गुरे चारण्याच्या बहनाने शाळेमध्ये पाठवत असत.
ज्यावेळी सिंधुताई सपकाळ यांचे लग्न लावून देण्यात आले, तिथून पुढे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी झाला होता, त्यावेळी त्यांच्या पतीचे वय त्यांच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी अधिक होते. येथे काही वर्षांच्या संसारानंतर त्यांचा पती सिंधुताई सपकाळ यांच्यावर संशय घेत असे.
वयाच्या विसाव्या वर्षी गरोदर असताना त्या गावातील एका जमीनदाराने मुद्दामहून अफवा पसरवली, की सिंधुताई यांच्या पोटातील मुलगा श्रीहरी सपकाळ यांचा नाही. आणि हलक्या कानाच्या श्रीहरी सपकाळ यांनी यावर विश्वास ठेऊन सिंधुताई सपकाळ यांना घराबाहेर काढले. त्यावेळी त्या तब्बल नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या.
अशा अवस्थेत त्यांनी गोठ्यामध्ये एका सुंदर मुलीला जन्म दिला. पुढे त्या मुलीला त्यांनी एकट्यानेच सांभाळले. त्या मुलीचा सांभाळ करताना त्यांचे होणारे हाल, त्यांनी वेळप्रसंगी रेल्वेमध्ये गाणे म्हणून देखील त्यांनी या मुलीचे पोट भरले.
मित्रांनो, आपल्यावर आलेली वेळ ही इतर कोणावर येऊ नये, असा विचार करणारी माणसे या जगात फारच थोडी असतात. याच विचारातून सिंधुताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांना आपल्याकडे आश्रय देऊन, त्यांचे कल्याण केले. त्यामुळे सिंधुताई सपकाळ या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत देखील समाजासाठीच कार्य केले. अशा या सिंधुताई सपकाळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७३ व्या वर्षी हार्ट अटॅकच्या कारणाने ०४ जानेवारी २०२२ या दिवशी मृत्यू झाला.
निष्कर्ष:
मित्रांनो, जोपर्यंत आपल्यावर कुठलीही परिस्थितीत ओढवत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही. ज्या लोकांना लहानपणीच आई-वडिलांनी सोडले, अर्थात देवा घरी गेले त्यांच्या समस्या केवळ या परिस्थितीतून गेलेल्या लोकांनाच समजू शकतात.
ज्यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्या पतीने त्यांना घरातून बाहेर काढले, त्यावेळी अशा प्रकारच्या अनेक लोकांचे दुःख त्यांच्यासमोर आले. आणि यापुढे कोणालाही असे दुःख येणार नाही, किंवा अनाथ आहे म्हणून जीवन असह्य होईल असे घडू नये, याकरिता त्यांनी आपले उभे आयुष्य सामाजिक सेवेमध्ये घातले.
आज याच सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी आपण माहिती बघितली आहे. ज्यामध्ये त्यांचा जन्म, त्यांच्या शैक्षणिक आयुष्य, आणि वैयक्तिक आयुष्य, त्यांनी जीवनात केलेले संघर्ष, केलेले विविध सामाजिक कार्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, विवाह, आलेल्या अडचणी, त्यांनी सुरू केलेल्या संस्था, त्यांच्यावर निघालेले चित्रपट, त्यांना मिळालेले पुरस्कार, आणि त्यांचा मृत्यू इत्यादी विषयांवर माहिती बघितलेली आहे. जी नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरली असेल.
FAQ
सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण नाव काय होते?
सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण नाव सिंधुताई श्रीहरी सपकाळ असे होते, मात्र त्यांना सर्वत्र अनाथांची माय किंवा माई या नावाने ओळखले जात असे.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता?
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा जिल्ह्याच्या एका गावामध्ये १४ नोव्हेंबर १९४८ या दिवशी झाला होता.
सिंधुताई सपकाळ यांच्या शालेय जीवना बद्दल काय सांगता येईल?
सिंधुताई सपकाळ यांच्या लहानपणी, शक्यतो मुली शिक्षण घेत नसत. मात्र त्यांच्या वडिलांनी अर्थात अभिमान साठे यांनी त्यांना शाळेमध्ये घातले. मात्र त्याकाळी समाजाने त्यांना त्रास दिला, म्हणून सिंधुताई सपकाळ चौथी इयत्ता पर्यंत शिकू शकल्या.
सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणते संघर्ष केले?
सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या पतीने घराबाहेर काढल्यानंतर त्या पोट भरण्याकरिता अनेक कामे करीत असत. त्या अगदी ट्रेनमध्ये गाणी देखील गात असत.
सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या विविध कार्यांमध्ये सर्वात महत्त्वाचे कोणते कार्य समजले जाते?
सिंधुताई, सपकाळ यांनी अनेक प्रकारचे कार्य केले होते. ज्यामध्ये त्यांनी अनाथांसाठी केलेले कार्य खूपच उल्लेखनीय आहे. आजकाल समाजामध्ये अनेक अनाथ लोक असतात, ज्यांच्यासाठी अहोरात्र काम केल्यामुळे त्यांना अनाथांची माय म्हणून देखील ओळखले जात असे.
मित्रांनो, आज या लेखामध्ये तुम्हाला सिंधुताई सपकाळ यांचे जीवन चरित्र वाचायला मिळालेले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी तुम्हाला काय वाटते, व त्यांच्या कार्याविषयी आम्हाला कमेंट मध्ये थोडक्यात कळवा. आणि या लेखा विषयीच्या प्रतिक्रिया देखील कळवा. सोबतच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना हा लेख पाठवून, त्यांना सिंधुताई सपकाळ यांच्या विषयी माहिती होऊ द्या.
धन्यवाद…!