Share Market Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पैसा हा आजकाल सर्वस्व म्हणून समजला जातो. आज काल प्रत्येकालाच पैसा कमवायचा आहे, त्यासाठी अनेक जण वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. मात्र केवळ पैसा मिळवला म्हणजेच तुम्ही श्रीमंत होता असे नाही, तर तो योग्य ठिकाणी गुंतवला देखील पाहिजे, आणि पैसा गुंतवणुकीसाठी आणि त्यातून भरपूर रिटर्न्स मिळवण्यासाठी शेअर मार्केट ओळखले जाते. यामध्ये अनेक आव्हाने असले, तरी देखील आज अनेक लोक शेअर मार्केटकडे वळताना दिसत आहेत.

शेअर मार्केटची संपूर्ण माहिती Share Market Information In Marathi
अनेकांना आपले आयुष्य अतिशय चांगले आणि सुखकर जावे असे वाटत असते, आणि त्यासाठीच प्रत्येक जण पैसा कमावण्याची धडपड करत असतो. अनेकजण पैसा कमवल्यानंतर विविध ठिकाणी गुंतवत असतात. मात्र विचारपूर्वक आणि अभ्यासांती शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला तर तुम्हाला देखील चांगला फायदा होऊ शकतो. हा एक पैसा पुरवण्याचा जिवंत स्त्रोत असून, योग्य रीतीने तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो.
आज शेअर मार्केटमध्ये प्रभावी ज्ञान असलेले अनेक लोक चांगला पैसा कमावत असले, तरी देखील एकमेकांच्या सांगण्यावरून या क्षेत्रात उतरणारे लोक आपला पैसा गमावत देखील आहेत. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अतिशय विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
आजच्या भागामध्ये आपण शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | शेअर मार्केट |
प्रकार | गुंतवणुकीचे साधन |
वर्गीकरण | लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे ट्रेडिंग, आणि फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग |
स्थापना | १८७५ |
भारतीय एक्सचेंज ची संख्या | दोन |
भारतीय एक्सचेंज ची नावे | एन एस इ, आणि बी एस इ |
शेअर मार्केट म्हणजे काय:
शेअर मार्केट म्हणजे भांडवली बाजार असून, या ठिकाणी अनेक कंपन्या आपले भाग भांडवल विकत असतात. आणि अनेक लोक त्याबद्दल्यात कंपनीच्या शेअरची अर्थात हिश्यांची खरेदी करत असतात. सर्वप्रथम १८७५ या वर्षी शेअर बाजाराची स्थापना झाली असून, त्यामध्ये आज मीतिला अनेक कंपन्यांचे शेअर खरेदी विक्री केले जात आहेत. यालाच भांडवली बाजार किंवा स्टॉक मार्केट म्हणून देखील ओळख आहे.
विविध घटकांमध्ये होणाऱ्या बदलामुळे किंवा चढउतारामुळे स्टॉक किमतीमध्ये देखील बदल होत असतात. त्यामुळे काही लोक नफा, तर काही लोक तोटा करत असतात. मात्र तुम्ही कोणत्या रितीने गुंतवणूक करत आहात, यावर तुमचा नफा किंवा तोटा अवलंबून असतो.
त्यावेळी कोणताही व्यक्ती कंपनीचे शेअर्स अर्थात भाग भांडवल खरेदी करतो, त्यावेळी त्या कंपनीमध्ये त्याला हिस्सा दिला जातो. त्या प्रमाणामध्ये होणाऱ्या नफ्यामध्ये देखील त्याला डिव्हिडंट च्या स्वरूपामध्ये भागीदार करून घेतले जाते. सोबतच कंपनीच्या वाढणाऱ्या कॅपिटल नुसार, त्याच्या शेअर अर्थात हीश्याची किंमत देखील वाढत जात असते.
शेअर बाजार वर नियंत्रण ठेवण्याकरिता सेबी अर्थात सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून, शेअरच्या खरेदी आणि विक्री करिता अनेक ब्रोकर कार्य करत असतात. पूर्वी भौतिक बाजारामध्ये शेअरची खरेदी विक्री केली जात असे, मात्र आजकाल शेअरचे डीमटरालायझेशन करण्यात आल्यामुळे ऑनलाइन स्वरूपामध्ये डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून तुम्ही खरेदी किंवा विक्री करू शकता.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू कशी करावी:
मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर सर्वात प्रथम डिमॅट अकाउंट सुरू करावे लागते. त्यासाठी कोणत्याही दलालाकडे अर्थात ब्रोकरकडे त्यांचे ॲप डाऊनलोड करून, तुम्ही अगदी जुजबी माहिती भरून आणि पॅन खात्याबद्दल माहिती देऊन हे डिमॅट अकाउंट सुरू करू शकता.
त्यानंतर या डिमॅट अकाउंट मध्ये तुम्ही काही पैसे भरून, तुम्हाला आवडीच्या शेअरची खरेदी देखील करू शकता. ज्यावेळी तुम्ही घेतलेल्या शेअरच्या कंपनीमध्ये नफा होईल, त्यावेळी तुमच्या शेअरची किंमत आपोआपच वाढेल. परिणामी तुम्ही त्यापासून चांगला परतावा मिळवू शकता.
तुम्हाला हा परतावा योग्य वाटत असेल तर तुम्ही पुन्हा हे शेअर विकून परतावा हातात घेऊ शकता, किंवा तुम्हाला आणखी परताव्याची अपेक्षा असेल तर काही दिवस थांबू देखील शकता. मात्र यामध्ये या किमतीमध्ये कमी होण्याची देखील भीती असते. ज्यावेळी तुम्ही घेतलेल्या शेअर धारक कंपनीला चांगला नफा मिळतो, त्यावेळी तुम्हाला देखील त्यामध्ये काही हिस्सा दिला जातो, ज्याला डिव्हिडंट म्हणून ओळखले जाते.
यामध्ये तुम्ही एकाच दिवसांमध्ये कुठलाही शेअर घेऊन, दिवसभरामधील कमाई हाताशी घेऊन हा शेअर पुन्हा विकू देखील शकता. ज्याला इंट्राडे म्हटले जाते. शक्यतो इंट्राडे हे इंडेक्स मध्ये केले जाते, जसे की बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी इत्यादी.
शेअर बाजार मधील नोकरीच्या संधी:
मित्रांनो, कुठलेही क्षेत्र निर्माण झाले की त्यामध्ये नोकऱ्यांची संख्या आपोआपच निर्माण होत असते. त्याचप्रमाणे शेअर मार्केट हे एक गुंतवणुकीचेच क्षेत्र नसून, यामध्ये अनेक लोक नोकरी देखील करत आहेत. तुम्ही शेअर मार्केटमधील विशेषज्ञ असाल, तर तुम्ही सेबी रजिस्टर सल्लागार म्हणून देखील कार्य करू शकतात. त्याचबरोबर आर्थिक बाजार तज्ञ, स्टॉक ब्रोकर, सुरक्षा सल्लागार तज्ञ, खरेदी विक्री कर्मचारी, सुरक्षा प्रतिनिधी, यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी देखील करू शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो, अलीकडेच स्कॅम १९९२ नावाची एक वेब सिरीज प्रसिद्ध झाली होती, आणि त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांना शेअर मार्केटमध्ये येण्यास मदत झाली. मात्र असे असले देखील तरीदेखील अनेकांनी अर्धवट ज्ञानाच्या जोरावर मार्केटमध्ये आपला पैसा घातला. आणि आपले हात पोळून घेतले.
मात्र यामध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी चांगला फायदा देखील कमावला आहे, आजच्या भागामध्ये आपण शेअर मार्केट विषयी इत्यंभूत माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मधील मूल्य काय असते, शेअर खरेदी करण्यासाठीचे सल्ले, गुंतवणूक सुरू करण्यासाठीच्या पद्धती, सपोर्ट आणि रेजिस्टंट म्हणजे काय, इत्यादी माहिती बघितली आहे.
याशिवाय शेअर मार्केटच्या विविध संकल्पना, जसे की सेन्सेक्स, निफ्टी, यांसारखी माहिती देखील बघितली आहे. सोबतच शेअर मार्केट कसे समजून घ्यावे, शेअर मार्केटमध्ये नोकरीच्या संधी आहेत का, व असतील तर काय, यांसह अनेक वारंवार विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरलेली असेल.
FAQ
शेअर मार्केट ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
शेखर मार्केटला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
भारतीय शेअर मार्केटमधील दोन एक्सचेंज ची नावे काय आहेत?
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्याकरिता सर्वात पहिली पायरी काय असते?
शेअर बाजारामध्ये कमीत कमी किती रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते?
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शेअर मार्केट याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून त्यांच्या देखील ज्ञानामध्ये भर घाला.
धन्यवाद…!