बडीशेपची संपूर्ण माहिती Fennel Seeds Information In Marathi

Fennel Seeds Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जेवण झाले की आपल्याला प्रत्येकाला बडीशेप खायला लागते. खरंतर बडीशेप हा एक मसाल्याचा पदार्थ असून, जिरा सारखा दिसतो. मात्र त्याचा रंग हिरवा असतो. गाजर कुळातील वनस्पती पासून या बडीशेपेची निर्मिती केली जाते. भारतातील प्रत्येक घरामध्ये ही बडीशेप आढळून येत असते. जेवणानंतर मुखवास म्हणून बडीशेप खाणे सर्वत्र प्रसिद्ध आहे.

Fennel Seeds Information In Marathi

बडीशेपची संपूर्ण माहिती Fennel Seeds Information In Marathi

बडीशेप ही अन्न पचविण्यासाठी देखील अतिशय उत्कृष्ट समजली जात असून, दक्षिण भारतामध्ये तीला फार महत्त्व दिले जाते. भारताच्या पूर्व भागामध्ये पंच फोरेन नावाचा एक मसाला बनवला जातो, ज्यामध्ये बडीशेप हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्याचबरोबर जम्मू कश्मीर आणि गुजरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या बडीशेपेचा वापर केला जात असतो. भूमध्य प्रदेशात उगम पावलेली ही बडीशेप सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसंत केली जात आहे.

आजच्या भागामध्ये आपण या बडीशेप बद्दल माहिती बघणार आहोत…

नावबडीशेप
प्रकारमसाल्याचा पदार्थ
वापरमुखवास म्हणून जेवणानंतर
उपलब्ध कॅलरी१९.८
फायबर२.३ ग्रॅम
प्रथिने ०.९ग्राम
कर्बोदके०३ ग्राम
चरबीचे प्रमाण०.६ ग्राम
कोलेस्ट्रॉलचे प्रमाणनाही

मित्रांनो, सर्वात प्रथम ग्रीस या देशांमध्ये लागवड केला गेलेला पदार्थ म्हणून या बडीशेप ला ओळखले जाते. ग्रीस मधून त्यानंतर तो युरोप या देशांमध्ये आला. आणि तिथून सर्व जगभर पसरला. बडीशेप हे एक उत्तम मुखवास आणि वैद्यकीय मिळणारे फायदे यांसाठी अतिशय लोकप्रिय असून, भारत देखील बडीशेप उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. याबरोबरच रोमानिया, रशिया, फ्रान्स, आणि जर्मनी यांसारख्या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बडीशेप उत्पादित केली जात असते.

मित्रांनो, एकच बडीशेप अनेक प्रकारे फायदे देऊ शकते, हे गोष्ट जाणून घेऊन तुम्हाला विश्वास बसणार नाही. या वनस्पतीची फुले, व पाने सजावटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात असतात. तसेच पाने किंवा देठ आहारामध्ये सॅलड च्या स्वरूपात खाल्ले जात असतात. बडीशेप सतत चघळत असल्यामुळे तोंडामध्ये मोठ्या प्रमाणावर लाळीची निर्मिती होत असते. जेणेकरून खाल्लेले अन्न पचण्यासाठी फायदा होतो. या बडीशेपेचा वापर सूप तयार करणे, व जेवण बनविणे, विविध मांसयुक्त पदार्थ बनविणे इत्यादी गोष्टींमध्ये वापरले जाते.

बडीशेप खाण्याचे फायदे:

मित्रांनो, बडीशेप खाणे पचनसंस्थेसाठी अतिशय उत्तम असते.

बडीशेपेच्या सेवनामुळे हर्निया सारख्या आजारावर उपचार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर शांत झोप लागणे, केस मजबूत करणे, किंवा केसांची गळती रोखणे, यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बडीशेप वापरली जाते.

मन खंबीर करणे, तसेच डोळ्यांची नजर तीक्ष्ण करणे, इत्यादी गोष्टींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बडीशेप वापरली जात असते. शरीरामध्ये अंतर्गत असणारी जळजळ शांत करण्यासाठी देखील बडीशेप वापरली जाते. महिलांमध्ये स्तनाचा आकार वाढविणे, व दूध वाढवणे याकरता देखील बडीशेप वापरली जात असते.

बडीशेप खाण्यापासून उद्भवणारे तोटे:

  • मित्रांनो, बडीशेप मोठ्या प्रमाणावर खाल्ली तर त्याचे काही तोटे देखील होत असतात. ज्यामध्ये अनेक रोगांना सामना देखील करावा लागू शकतो.
  • बडीशेप मोठ्या प्रमाणावर खाणे तुम्हाला एलर्जी देखील करू शकते, आणि जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्यानंतर तुम्ही उन्हाच्या संपर्कात आल्यास तुमच्या शरीरावर पुरळ देखील येऊ शकते.
  • बडीशेप मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यामुळे शिंका येणे, आणि पोटशुळ यांसारखी लक्षणे  देखील दिसू शकतात.
  • महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी जास्त बडीशेप सेवन करणे देखील कारणीभूत ठरत असते.

बडीशेप वापरण्याचे योग्य पद्धत:

  • बडीशेप पासून चहा देखील बनवता येतो. लठ्ठपणा सारख्या समस्या दूर करण्यासाठी या चहाचे सेवन करणे फायदेशीर सांगितले जाते.
  • जेवल्यानंतर चिमूटभर बडीशेप खाणे, पचनशक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त समजले जाते. त्याचबरोबर रक्त शुद्धीकरणांमध्ये देखील फायदेशीर असते.
  • तोंडातून दुर्गंधी येत असेल तर जेवणानंतर चिमूट दोन चिमूट बडीशेप चघळणे, अतिशय फायद्याचे असते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते.
  • रोजच्या भाज्यांमध्ये बडीशेप वापरली तर खोकल्याच्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. त्याचबरोबर आवाजामध्ये गोडवा देखील येऊ शकतो.

बडीशेप खाण्याची योग्य पद्धत:

  • बडीशेपीचा चहा बनवण्यासाठी त्याची पूड करून आपल्या नेहमीच्या चहामध्ये वापरावी, ज्यामुळे चव वाढण्याबरोबरच आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
  • विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये एकत्र करून किंवा साखरेसोबत देखील बडीशेप चे सेवन केले जाते. जेणेकरून तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळेल.
  • बडीशेप पासून विशिष्ट प्रकारच्या लोणच्याची देखील निर्मिती करण्यात येते, याच सोबतच बडीशेप खाल्ल्यामुळे माणसाला ताजताने देखील वाटू शकते.

निष्कर्ष:

मित्रांनो, जेवण झाले की प्रत्येक जण बडीशेपच्या डब्याकडे वळतो. अगदी हॉटेलमध्ये जेवल्यानंतर देखील प्रत्येकाला बडीशेप खाणे आवडते. मुख्यतः खाल्लेले जेवण व्यवस्थित पचावे, याकरिता या बडीशेपेचा वापर केला जात असतो. त्याचप्रमाणे एक उत्तम मुखवास म्हणून देखील बडीशेप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

आजच्या भागामध्ये आपण या बडीशेप बद्दल माहिती बघितली असून, बडीशेप म्हणजे काय, या बडीशेप चे सेवन कधी करावे, यामध्ये आढळणारे विविध पौष्टिक मूल्य, त्यापासून मिळणारे फायदे, तसेच त्वचा व हाडांसाठी बडीशेप ची उपयुक्तता, आणि पचनक्रिया मध्ये बडीशेप चे कार्य, यांसह बडीशेप चे मोठ्या प्रमाणावर सेवन करण्यापासून होणारे तोटे, बडीशेप वापरण्याच्या योग्य पद्धती, तसेच खाण्याच्या योग्य पद्धती इत्यादी बद्दल माहिती बघितली आहे. ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडलेली असेल. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितले आहेत.

FAQ

बडीशेप हा पदार्थ केव्हा सेवन केला जातो?

बडीशेप हा पदार्थ साधारणपणे जेवण झाल्यानंतर खाल्लेले जेवण पचविण्यासाठी वापरला जातो. त्याच बरोबर अनेक वेळा मुखवास म्हणून देखील हा पदार्थ वापरला जात असतो.

बडीशेप हा पदार्थ कोणी खाऊ नये असा सल्ला दिला जातो?

ज्या रुग्णांना दमा अथवा एलर्जी जाणवत असेल, अशा लोकांनी बडीशेप चे सेवन करू नये असे सांगितले जाते. त्याच बरोबर औषध म्हणून बडीशेप खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम ठरते.

बडीशेप चे सेवन करणे इस्ट्रोजन पातळीवर कशा रीतीने प्रभाव पडत असते?

बडीशेप हा पदार्थ अगदी प्राचीन काळापासूनच इस्ट्रोजन वाढवण्यासाठी ओळखला जातो. यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते, मात्र पुरुषांनी अधिक प्रमाणावर याचे सेवन केल्यास त्यांना कामवासनेचा त्रास होऊ शकतो.

बडीशेप खाणे कशासाठी चांगले समजले जाते?

बडीशेप खाण्यापासून असंख्य फायदे मिळत असतात, त्यातील पचन सुधारणे, हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. त्याचबरोबर रक्ताचे शुद्धीकरण करणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, दृष्टी वाढविणे, कर्करोगाचा धोका कमी करणे, बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करणे, कमी भूक लागण्याच्या समस्यांवर उपाय, इत्यादी गोष्टींमध्ये बडीशेप चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

निद्रानाश मध्ये देखील बडीशेप चा वापर केला जाऊ शकतो का?

बडीशेप ही निद्रानाश वर उपाय म्हणून देखील वापरली जाऊ शकते, कारण बडीशेप खाल्ल्याने शांत झोप लागत असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बडीशेप या मसाल्याचा पदार्थांसह एक उत्तम मुखवास असणाऱ्या पदार्थाची माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. आणि तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना ही माहिती आवर्जून शेअर करा.

 धन्यवाद…!

Leave a Comment