Anna Mani Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शास्त्रज्ञ म्हटलं की आपल्याला केवळ पुरुष लोकांची आठवण येते. मात्र आपल्या देशामध्ये अशी देखील एक खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ स्त्री झालेली असून, त्यांचे नाव अण्णा मणी हे होते. त्यांनी भारतीय हवामान विभागामध्ये उपमहासंचालक म्हणून देखील कार्य केलेले आहे. सोबतच त्यांनी रमण संशोधन संस्था या ठिकाणी व्हिजिटिंग प्रोफेसर या हुद्द्यावर सेवा दिलेली आहे.
अण्णा मनी यांची संपूर्ण माहिती Anna Mani Information In Marathi
सोबतच त्यांनी ओझोन वायू, पवन ऊर्जांचे उपाय इत्यादी घटकांवर संशोधन केलेले असून, विविध जनरल देखील लिहिलेली आहेत. त्यांनी मुख्यतः हवामान शास्त्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या शोधामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या अण्णा मनी यांच्या जीवनचरित्र विषयी जाणून घेणार आहोत…
नाव | अण्णा मनी |
जन्म दिनांक | २३ ऑगस्ट १९१८ |
आयुष्य | ८२ वर्षांचे |
जन्म स्थळ | केरळ मधील पिरमाडे |
मृत्यू दिनांक | १६ ऑगस्ट २००१ |
मृत्यू चे कारण | हृदयविकार |
मृत्यू स्थळ | केरळमधील तिरुअनंतपुरम |
अण्णा मनी यांचे प्रारंभिक आयुष्य:
मित्रांनो, दिनांक २३ ऑगस्ट १९१८ या दिवशी केरळ राज्यातील पिरमाडे या ठिकाणी एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये अण्णा मनी यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मोदाईल मनी असे होते. त्यांचे वडील सिविल इंजिनियर होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शिक्षणामध्ये चांगली ओढ निर्माण होण्यास मदत झाली होती.
अण्णा मनी यांच्या वडिलांना आठ अपत्य होती, ज्यामध्ये अण्णामनी यांचा क्रमांक सातवा होता. लहानपणापासून वाचनाचा प्रचंड छंद असणाऱ्या अण्णामनी यांनी मोठे वाचन केले होते. महात्मा गांधी यांनी वैकोम सत्याग्रह केला होता, आणि या घटनेचा अण्णामनी यांच्या मनावर खोल परिणाम झाला. परिणामी तेव्हापासून त्यांनी खादीचे कपडे घालण्यासाठी सुरुवात केली होती.
मित्रांनो, ज्या काळामध्ये मुलींना लग्नासाठी लवकर तयार केले जात असे, त्या काळामध्ये अण्णा मनी यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांना पुस्तकी ज्ञानाचे प्रचंड वेड होते. वयाच्या आठव्या वर्षापर्यंतच त्यांनी घराजवळ असणाऱ्या एका सार्वजनिक वाचनालयामधील सर्व पुस्तके वाचून संपविली होती. बारावीपर्यंत त्यांनी अनेक वाचन केले, ज्यामध्ये कादंबऱ्या मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होत्या.
ज्यावेळी, त्यांचा आठवा वाढदिवस साजरा केला गेला, त्यावेळी त्यांच्या कुटुंबाने त्यांना डायमंड स्टड हे कानातल्या आभूषणाची भेट दिली होती. मात्र त्यांनी ही भेट नाकारून त्यांना सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा संच मागितला, आणि या माहितीचा वापर व वाचन करून त्यांनी फार मोठे यश संपादन केले होते.
अण्णा मनी यांचे शैक्षणिक आयुष्य:
मित्रांनो, अण्णा मनी यांना लहानपणापासूनच नृत्यांगना होण्यामध्ये रस होता. त्यांनी भौतिक शास्त्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना हा विषय देखील लहानपणापासूनच खूप आवडत असे.
त्यांनी १९३९ यावर्षी त्यांचे बीएससी चे शिक्षण चेन्नई येथील पचायप्पा या महाविद्यालय मधून पूर्ण केले. त्यामध्ये त्यांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांमध्ये चांगले सन्मान मिळवले होते.
पुढे त्यांना बंगळूर स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या ठिकाणी संशोधनाकरिता १९४० या वर्षी फेलोशिप देखील देण्यात आली होती. त्यांनी आपल्या पदवीधर अभ्यासक्रमाचा अभ्यास १९४५ यावर्षी लंडनच्या इम्पेरिकल कॉलेजमध्ये केला.
अण्णा मनी यांच्या करिअर बद्दल माहिती:
मित्रांनो, आपली पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी सी व्ही रमण संस्थेमध्ये हिरे व माणिक यांची तपासणी करण्याचे कार्य सुरू केले होते. अण्णा मनी यांनी आपल्या डॉक्टरेट पदवीच्या अभ्यासासाठी सुमारे पाच संशोधन प्रकाशने प्रकाशित केली होती. मात्र तोपर्यंत त्यांची भौतिकशास्त्रामधील पदव्युत्तर पदवी मिळाली नसल्यामुळे, त्यांना ही डॉक्टरेट पदवी घेता आली नव्हती.
१९४८ यावर्षी त्यांनी पुण्यामधील हवामान खात्यात नोकरी स्वीकारली. त्यांनी येथे देखील आपले लेखन कार्य सुरू ठेवले होते. व हवामान शास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांच्या वर आधारित असणारे असंख्य लेख देखील लिहिले होते.
तेव्हा भारत हा ब्रिटन कडून विविध हवामान विषयक उपकरणे आयात करत असे, त्यांना उभारण्याचे कार्य अण्णा मनी यांच्याद्वारे केले जात असे. त्यांनी ही जबाबदारी सुमारे १९५३ या वर्षापर्यंत स्वीकारली होती.
हवामान क्षेत्रामध्ये भारताला स्वयंपूर्ण बनवण्यात यावे अशी अण्णामनी यांची इच्छा होती. त्यांनी शंभर पेक्षा अधिक हवामान उपकरणे ग्राफिक्स माध्यमातून बनवले होते.
त्यांच्या अध्यक्षतेखाली १९५७ ५८ यावर्षी सूर्य प्रकाशाचे मोजमाप करण्याकरिता एक स्टेशन देखील उभारले होते. सोबत त्यांच्या काळामध्ये मंगळूर या ठिकाणी एक हवामान कार्यशाळा देखील स्थापन करण्यात आली होती. या ठिकाणी सौरऊर्जा व वाऱ्याचा वेग इत्यादी घटकांवर लक्ष ठेवले जात असे.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणून ओझोन मापन यंत्र समजले जाते. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओझोन असोसिएशन या ठिकाणी सदस्यत्व देखील देण्यात आले होते.
अण्णा मनी यांच्या कार्यामुळे त्यांना थुंबा या ठिकाणी रॉकेट लॉन्चिंग फॅसिलिटी मध्ये एक हवामान वेधशाळा व टॉवर बांधण्यासाठी नियुक्त केले गेले होते. आपल्या कार्याला वाहून घेतलेल्या अण्णा मनी यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीही विवाह केला नाही.
निष्कर्ष:
मित्रांनो, स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. ज्यामध्ये शास्त्रज्ञ हे क्षेत्र देखील मागे नाही. एक स्त्री देखील शास्त्रज्ञ होऊ शकते. हे जगाला दाखवून देण्याचे काम अण्णा मनी यांनी केले होते. त्यांनी खगोलशास्त्र व हवामानशास्त्र या विषयांमध्ये मोलाचे योगदान देऊन, भारतीय महिलांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे.
आजच्या भागामध्ये आपण या अण्णा मणी यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला त्यांच्या जीवनचरित्राचे अनेक पैलू वाचायला मिळाले असतील. ज्यामध्ये त्यांच्या प्रारंभिक आयुष्यसह, शैक्षणिक आयुष्य व करिअर यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे.
सोबतच त्यांचे निधन व त्यांनी केलेले विविध कार्य यांच्यावर देखील प्रकाश टाकलेला आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले असून, या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच भारतीय महिला शास्त्रज्ञ बद्दल माहिती झाली असेल, अशी आशा आहे.
FAQ
अण्णा मनी यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
अण्णा मनी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ या दिवशी केरळमधील पिरमाडे या ठिकाणी झाला होता.
अण्णा मनी यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला होता व कोणत्या दिवशी झाला होता?
अण्णा मनी यांचा मृत्यू दिनांक १६ ऑगस्ट २००१ या दिवशी केरळ मधीलच तिरुवनंतपुरम या ठिकाणी झाला होता. त्यांच्या मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्ष इतके होते, तर त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असे होते.
अण्णा मनी यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे?
अण्णा मनी यांनी भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि खगोलशास्त्र विभाग मध्ये कार्य केलेले आहे.
अण्णा मनी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
अण्णा मनी यांना वेदर वूमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते.
अण्णा मनी यांनी लावलेल्या शोधामध्ये सर्वात उल्लेखनीय शोध कोणता आहे?
अण्णा मनी यांनी ओझोन वायूच्या कार्याचे विश्लेषण केले होते. त्यांनी हा अभ्यास १९६० यावर्षी सुरू केला होता. त्याच बरोबर वातावरणामध्ये ओझोनचे प्रमाण किती आहे, याचे मोजमाप करू शकणारे एक यंत्र किंवा साधन देखील अण्णा मनी यांनी तयार केले होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महिला शास्त्रज्ञ असणाऱ्या अन्ना मणी यांची संपूर्ण माहिती बघितलेली असून, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला प्रतिक्रियांच्या स्वरूपात कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून कळवा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून, या माहितीच्या प्रसारामध्ये थोडेसे सहकार्य करा.
धन्यवाद…!