Horse Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो घोडा बघितला की आपल्या प्रत्येकाला त्याचे आकर्षण वाटत असते. अतिशय भारतस्त शरीरयष्टी आणि वेगाच्या बाबतीत सरस असलेला हा घोडा अगदी प्राचीन काळापासून व पौराणिक काळापासून देखील प्रवासाचे साधन म्हणून वापरला जात होता.
घोडा प्राण्याची संपूर्ण माहिती Horse Animal Information In Marathi
मात्र आजकाल विविध प्रकारची वाहने आल्यामुळे घोड्यांचे वाहतुकीसाठी प्रमाण कमी झालेले आहे. मात्र आज देखील अनेक जण आवड म्हणून अथवा शर्यती सारख्या प्रकारांसाठी घोड्याला पाळत असतात.
आजकाल कुठल्याही यंत्रांची शक्ती मोजायची असेल तर त्यासाठी हॉर्स पावर किंवा अश्वशक्ती हे एकक वापरले जाते. यावरून घोड्यांची सामर्थ्यता लक्षात येऊ शकते, एकेकाळी ज्या व्यक्तीकडे सर्वात जास्त घोडे असत तो व्यक्ती राजकारभारातील अतिशय प्रसिद्ध व ताकतवान व्यक्ती समजला जात असे. व सत्तेचे सर्व केंद्र त्याच्याजवळ एकत्रित होत असत.
मध्ययुगीन कालखंडामध्ये घोड्यांच्या संख्येवरून आणि गुणवत्तेवरून त्या राज्यकर्त्याची ताकद ओळखली जात असे. अनेक मोहिमांमध्ये देखील घोड्यांना मोठे महत्त्व प्राप्त होते, आज देखील प्रत्येक देशाकडे सैन्य दलात एक तरी घोड्यांची प्रशिक्षित तुकडी उपलब्ध असते.
आजच्या भागामध्ये आपण या घोड्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | घोडा |
प्रकार | प्राणी |
वैशिष्ट्य | असाधारण वेग |
शास्त्रीय नाव | इक्वस कॅबॅलस |
दररोज झोपेची गरज | जवळपास तीन तास |
साधारण आयुष्यमान | २५ ते ३० वर्षे |
साधारण लांबी | प्रौढ घोड्यामध्ये साधारणपणे अडीच मीटर |
कुटुंब किंवा कुळ | इक्विडी |
घोड्यांच्या उत्क्रांतीची माहिती:
मित्रांनो, सस्तन प्राण्यांच्या गटात मोडणारा घोडा perisodactila या वर्गातील आहे. आणि यापासूनच आज आपण बघत असलेला आधुनिक घोडा उत्क्रांत झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये घोडे हे कोल्ह्याएवढे असत, मात्र उत्क्रांत होता होता पुढे मेंढी इतका होऊन आणि नंतर आकार वाढत गेला.
घोड्यांबद्दल ऐतिहासिक माहिती:
मित्रांनो, काही हजार वर्षांपासून पृथ्वीवर घोड्यांचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. अगदी पौराणिक कथांमध्ये देखील घोड्यांचा उल्लेख आढळून येतो. ज्यावेळी सागर मंथन केले गेले, त्यावेळी मिळालेल्या १४ रत्नांमध्ये घोड्याचा देखील समावेश होता. ऋग्वेद या ग्रंथा नुसार इंद्र हा युद्धाचा देव असून, त्याला मोराप्रमाणे केस व शेपटी होती असे देखील म्हटले गेलेले आहे.
भगवान विष्णू यांनी कलियुगामध्ये पांढरा घोड्याचा अवतार घेतल्याचे देखील अनेक पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळून येतात. अश्वमेध सारख्या यज्ञांमध्ये देखील घोडा आढळलेला आहे.
ग्रीक या देशातील पौराणिक कथांमध्ये समुद्री घोडे व जमिनीवरील घोडे अशा दोन प्रकारांचे घोडे सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे या घोड्यांना फार जुना इतिहास आहे, असे देखील सांगितले जाते. ज्यावेळी रानाघुंडई या ठिकाणी उत्खनन चालू होते, त्यावेळी ५००० वर्षांपूर्वीचे देखील जुन्या घोड्यांचे अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळे घोड्यांना फार जुना इतिहास लाभलेला आहे, याबाबत शिक्कामोर्तब होते.
शेतीकामातून घोडसवारीमध्ये घोड्यांचा वापर:
मित्रांनो, युरोप देशामध्ये शेकडो वर्षांपूर्वी घोड्याचा वापर शेती कामासाठी केला जात असे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. अनेक काळामध्ये घोडे हे त्यांच्यावर बसून फिरण्यासाठी व विविध सामान वाहून नेण्यासाठी देखील वापरले जात असत. घोड्याची माणसांसोबतची मैत्री फार जुन्या काळापासून आहे,
मित्रांनो पूर्वीच्या काळापासून घोड्यांचा वापर घोडसवारी करण्याकरिता केले जात असे. याकरिता घोड्यांच्या कमरेला चामड्याचे कापड बांधले जात असे, ज्यामुळे घोडसवारी करणे अतिशय सुलभ होत असे.
शेतीकामामधून घोड्यांचा वापर लढाई करिता कोणत्या कालखंडामध्ये सुरू करण्यात आला याबाबत संदर्भ उपलब्ध नसले, तरी देखील मध्ययुगीन कालखंडामध्ये घोड्यांचा वापर युद्धभूमीवर केला गेला असावा असे सांगितले जाते. घोड्यांचा मूळ स्वभाव हा हिंसक स्वरूपाचा असल्यामुळे युद्धामध्ये त्यांचा वापर करणे अतिशय सोयीचे गेले.
रथामध्ये घोड्याचा वापर:
मित्रांनो, आजकाल विविध लग्न सोहळे किंवा विविध कार्यक्रमांमध्ये घोड्यांची गाडी अर्थातच रथ वापरले जातात. या रथाला अतिशय जुना इतिहास लाभलेला असून, आपल्या पौराणिक कथांमध्ये देखील घोड्यांचे रथ वापरले गेले आहेत, याबद्दल सांगितले जाते. त्याचप्रमाणे घोडे शर्यती करता देखील वापरले जातात.
मात्र यासाठी घोड्याची प्रजाती ही उत्तम सांभाळावी लागते. तुम्हाला माहिती नसेल, की शर्यतीसाठी वापरण्यात येणारे घोडे अतिशय महाग अर्थात किमान चार ते पाच लाख रुपये आणि कमाल ५० लाख रुपयांपर्यंत देखील असतात. त्यामुळे या घोड्यांची चोरी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते.
या घोड्याची किंमत महाग असली तरी देखील त्यांना सांभाळण्याचा खर्च देखील प्रचंड मोठा असतो. त्यामुळे शक्यतो धन दांडग्या लोकांकडूनच या शर्यतीसाठी घोड्यांना पाळले जाते. अलीकडच्या काळामध्ये सुमारे तीन कोटी किमतीचा घोडा स्कॉटलंड येथून चोरीला गेला होता, त्याचे नाव श्रेगर असे होते.
मित्रांनो, सस्तन प्राण्यांमधील सर्वात रुंद डोळे असणारे घोडे अगदी ३६०° मध्ये देखील बघू शकत असतात. याच बरोबर घोड्यांच्या डोळ्यांमध्ये अशी एक एक क्षमता असते, ज्यामुळे ते दोन डोळ्यांनी वेगवेगळ्या दिशेने बघू शकतात. जगभरामध्ये घोड्याच्या सुमारे साडेतीनशे प्रजाती आढळल्या असून, सर्वात जुनी प्रजाती अरबी घोड्याची आहे असे समजले जाते.
घोड्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते उभे राहून देखील झोपू शकतात.
निष्कर्ष:
मित्रांनो, घोडा हा एक अतिशय उमदा प्राणी असून, आज देखील प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून घोडा मोठ्या प्रमाणावर पाळला जात आहे. पूर्वीच्या काळी देखील घोड्यांच्या संख्येवरून कुठल्याही राज्याची प्रतिष्ठा आणि सामर्थ्य ठरविले जात असे.
आजच्या भागामध्ये आपण या घोड्याची संपूर्ण माहिती बघितली असून, घोड्यांची उत्क्रांती कशी झाली, त्यांचा इतिहास काय आहे, शेत जमिनीमध्ये वापर करण्यात येणारे घोडे पुढे घोडेसवारीमध्ये कसे वापरले जाऊ लागले, त्याचबरोबर शाही रथ, त्यामध्ये वापरले जाणारे घोडे, यांच्या बद्दल देखील माहिती बघितलेली आहे.
घोड्यांचा अरबी प्रकार देखील बघितलेला असून, संबंधित विविध तथ्य माहिती देखील बघितलेली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहे. ही संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुमच्या अनेक शंकांचे आणि प्रश्नांचे निरसन झाले असेल, अशी आशा आहे.
FAQ
घोड्यांना इंग्रजी भाषेमध्ये व शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?
घोड्यांना इंग्रजी भाषेमध्ये हॉर्स तर शास्त्रीय भाषेमध्ये इक्वस कॅबिलेस या नावाने ओळखले जाते.
प्रत्येक दिवशी घोडा साधारणपणे किती तासांची झोप घेत असतो?
मित्रांनो, प्रत्येक दिवशी अवघ्या तीन तासांची झोप पुरेशी असणारा हा घोडा शक्यतो कधीही बसताना दिसत नाही. तो झोप देखील उभ्यानेच घेत असतो असे सांगितले जाते.
घोडा साधारणपणे किती वर्षांचे आयुष्य जगत असतो?
घोडा साधारणपणे २५ ते ३० वर्षांचे आयुष्य जगत असतो.
घोड्याची साधारण लांबी किती समजली जाते?
घोडा त्याच्या प्रजातीनुसार आणि वयानुसार वेगवेगळ्या आकारांमध्ये वाढत असतो, मात्र सर्वसाधारणपणे विचार करायचा झाल्यास एक प्रौढ घोडा साधारणपणे २.४ मीटर इतका लांब होत असतो.
सर्वात जास्त कालावधी जगणारा घोडा म्हणून कोणत्या घोड्याला ओळखले जाते?
मित्रांनो, घोड्याचे साधारण आयुष्य २५ ते ३० वर्ष इतके असले, तरी देखील एक घोडा असा होता जो सुमारे ६२ वर्षे जगला होता. २७ नोव्हेंबर १८२२ या दिवशी निधन पावलेला हा घोडा, लंकेशायर येथे होता. त्याचे नाव ओल्ड बिली असे होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण घोडा या अतिशय उमद्या आणि आकर्षक प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली ना, तर मग लगेचच कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचून त्यांच्याही शंकांचे निरसन व्हावे, याकरिता त्यांच्यापर्यंत ही माहिती आवर्जून शेअर करा.
धन्यवाद…!