इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती Indira Gandhi Information In Marathi

Indira Gandhi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी यादेखील महिलांमधील पहिल्या भारतीय पंतप्रधान बनल्या होत्या. जगातील मोजक्या उत्कृष्ट महिला नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्या अतिशय दृढ संकल्प असणाऱ्या, आत्मविश्वासू, शिस्तप्रिय, राजकीय कौशल्य असणाऱ्या, आणि एक कार्यक्षम नेतृत्व म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध होत्या. त्यांना एक अद्वितीय राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून देखील गौरवले जाते.

Indira Gandhi Information In Marathi

इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती Indira Gandhi Information In Marathi

मित्रांनो, अनेक क्रांतिवीरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. आणि त्यानंतर भारत मातेच्या सुपुत्रांनी हे राज्य चालविले होते. मात्र स्वतंत्र्योत्तर काळामध्ये देखील भारतावर अनेक आक्रमणे झाली, त्यामध्ये भारत चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, किंवा पूर्व पाकिस्तानचा मुद्दा असो या प्रत्येक गोष्टी योग्य रीतीने हाताळून भारताला अद्वितीय वर्चस्व मिळवणाऱ्या इंदिरा गांधी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूप प्रतिष्ठा मिळालेली आहे.

भारताने १९७४ मध्ये केलेल्या पोखरण अणुचाचणी मध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. तसेच त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये देखील फार महत्त्वपूर्ण बदल घडवून आणलेले आहेत. ज्यामुळे आज भारत एका वेगळ्या उंचीवर पोहोचण्यास मदत झालेली आहे. त्यांनी अनेक वर्ष भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.

आजच्या भागामध्ये आपण या इंदिरा गांधी यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावइंदिरा गांधी
वडीलजवाहरलाल नेहरू
आईकमला नेहरू
जन्म दिनांक१९ नोव्हेंबर १९१७
जन्मस्थळअलाहाबाद, उत्तर प्रदेश
ओळखएक राजकारणी महिला
शिक्षणविश्वभारती विद्यापीठ व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
गौरवपहिल्या भारतीय महिला पंतप्रधान
महत्त्वाचे पुरस्कार१९७१ यावर्षी भारतरत्न आणि; १९८४ यावर्षी जवाहरलाल नेहरू पुरस्कार
मृत्यु दिनांक३१ ऑक्टोबर १९८४

इंदिरा गांधी यांचे बालपण:

मित्रांनो, उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद या ठिकाणी जवाहरलाल नेहरू व कमला नेहरू यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १९१७ दिवशी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कौटुंबिक वारसा लाभलेल्या इंदिरा गांधी यांना देशभक्तीची भावना खूपच प्रखर होती. तसेच वडील राजकारणात असल्यामुळे त्यांना देखील बालपणापासूनच राजकारणामध्ये प्रचंड रस होता. अगदी त्यांच्या आजोबांपासून अर्थात मोतीलाल नेहरूंपासून या कुटुंबाला राजकारणी वारसा लाभलेला असल्यामुळे, त्यांनी देखील या क्षेत्रामध्ये येण्याचे ठरविले.

इंदिरा गांधी यांना आपल्या आई खूपच प्रिय होत्या, मात्र त्यांचा सहवास त्यांना फार काळ मिळू शकला नाही. इंदिरा गांधी १८ वर्षांच्या असताना त्यांच्या आई या टीबी आजाराने ग्रस्त झाल्या, आणि त्यातच त्या इंदिराजींना सोडून गेल्या. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता, मात्र त्यातून त्या लवकरच सावरल्या.

इंदिरा गांधी यांचे शैक्षणिक आयुष्य:

मित्रांनो, आईचे निधन आणि वडिलांचे राजकारणातील लक्ष यामुळे इंदिराजी बालपणी शैक्षणिक वातावरणासाठी मुकल्या होत्या. नेहरूंनी त्यांना शिक्षण घेता यावे, याकरिता घरीच सोय केली होती. अनेक नामांकित शिक्षक त्यांना घरी शिकवण्यासाठी येत असत.

इंदिरा गांधींनी पुढे पुणे विद्यापीठातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, आणि शांती निकेतन मध्ये इसवी सन १९३४ -३५ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. या ठिकाणी त्यांना प्रियदर्शनी हे नाव मिळाले, जे रवींद्रनाथ टागोर यांनी दिले होते. पुढील शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या. येथे त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. याचवेळी त्यांची भेट फिरोज गांधी यांच्यासोबत झाली. शिक्षणामध्ये फारसा रस नसणाऱ्या या इंदिराजींनी मधल्या काळामध्येच शाळा सोडून दिली.

इंदिरा गांधींचा विवाह:

मित्रांनो, इंदिरा गांधी यांची भेट शिक्षणादरम्यान फिरोज गांधी यांच्या सोबत झाली होती. हे फिरोज गांधी तत्कालीन युवक काँग्रेसचे प्रमुख सदस्य आणि पत्रकार देखील होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, आणि त्यांनी १९४२ या वर्षी लग्न केले.

या विवाहाला जवाहरलाल नेहरूंचा विरोध होता, मात्र पुढे जाऊन त्यांनी देखील हे संबंध मान्य केले. या दांपत्याला दोन मुले झाली, ज्यांचे नाव अनुक्रमे राजीव गांधी व संजय गांधी असे होते. इंदिराजींना आईप्रमाणेच आपल्या पतीचाही सहवास फार काळ लाभला नाही, आणि हृदयविकाराच्या झटक्यामध्ये १९६० यावर्षी फिरोज गांधी यांचे निधन झाले.

इंदिरा गांधींची राजकीय कारकीर्द:

मित्रांनो, लहानपणापासूनच राजकारणाची आवड असलेल्या इंदिरा गांधी यांनी राजकारणामध्ये सक्रियरित्या भाग घेतला. ज्यावेळी जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांना १९६४ या वर्षी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून नेमण्यात आले होते. पुढे त्यांनी अनेक पदे भूषवत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान पटकावला.

या सोबतच त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी देखील विराजमान झाल्या. त्यांनी समाजासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, तसेच भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करण्याकरिता त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. भारताला डिफेन्स मध्ये देखील त्यांनी मजबूत केले.

याचे उदाहरण म्हणजे त्यांनी १९७४ या वर्षी पोखरण अणुचाचणी घडवून आणली होती, त्यामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला होता. तसेच त्यांनी १९७१ या वर्षी बांगलादेशच्या अर्थात तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आजच्या पाकिस्तान देशाला नामोहरम केले होते. आणि यामुळे भारत एक बलाढ्य देश म्हणून देखील उदयास आला होता.

इंदिरा गांधी अर्थव्यवस्थेत देखील खूपच हुशार होत्या, त्यामुळे त्यांनी १९७२ या वर्षी कोळसा मंत्रालय व विमा मंत्रालय याचे राष्ट्रीयकरण करून, अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. त्यांनी जमीन सुधारणा क्षेत्रांमध्ये देखील अमलाग्र बदल घडवून आणला. त्यासोबतच त्यांनी समाज कल्याणच्या देखील विविध योजना राबवून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून दिला.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण इंदिरा गांधी यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळाले असतील, जसे की इंदिरा गांधी यांचे बालपण, त्यांचे शिक्षण, तसेच त्यांचा विवाह, स्वतंत्र सेनानी म्हणून इंदिरा गांधींचा उल्लेख, त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती, तसेच त्यांच्या विविध वादांविषयी माहिती, आणि त्यांच्या सत्तेत येण्याच्या घटनेवर आधारित माहिती इत्यादी माहिती पाहिली.

तसेच इंदिरा गांधींनी दिलेला सांस्कृतिक वारसा, त्यांच्या नावे देण्यात येणारे पुरस्कार, व त्यांचे निधन इत्यादी बाबींवर माहिती बघितली आहे. सोबतच काही महत्त्वपूर्ण नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी व कुठे झाला होता?

इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ या दिवशी अलाहाबाद या ठिकाणी झालेला होता.

इंदिरा गांधी यांनी कोणाकोणाच्या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेले आहे?

इंदिरा गांधी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ, तसेच भारतातील विश्वभारती विद्यापीठ या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.

इंदिरा गांधी यांना कोणकोणते स्वरूपाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत?

इंदिरा गांधी यांना अनेक राष्ट्रीय,  आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असले तरीदेखील राष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्त्वाचे दोन म्हणजेच भारतरत्न आणि जवाहरलाल नेहरू पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळाला होता?

इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते देण्यात आला होता. त्यांनी पूर्व पाकिस्तानच्या मुद्द्यावर केलेला हस्तक्षेपामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता.

इंदिरा गांधी यांचे निधन कोणत्या दिवशी झाले होते?

इंदिरा गांधी यांचे निधन ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी झाले होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंदिरा गांधी या भारताच्या सर्वात पहिल्या महिला पंतप्रधान यांच्या विषयी माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट मध्ये कळवण्याबरोबर तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद मिळेल, याकरिता ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा.

धन्यवाद…!

Leave a Comment