मेंढी प्राण्याची संपूर्ण माहिती Sheep Information In Marathi

Sheep Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सर्वांना लोकरीचे उपदार कपडे फारच आवडतात. मात्र ज्या प्राण्यापासून ही लोकर मिळते त्या मेंढी प्राण्याविषयी बऱ्याच जणांना खूपच कमी माहिती आहे. मित्रांनो मेंढी हा एक शेळी सारखा दिसणारा चतुष्पाद प्राणी असून, मुख्यत्वे लोकर उत्पादन आणि मांस उत्पादन याकरिता मेंढी पाळल्या जातात.

Sheep Information In Marathi

मेंढी प्राण्याची संपूर्ण माहिती Sheep Information In Marathi

मेंढी एक रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या गटातील छोटासा प्राणी असून, वक्र शिंगे, आणि उबदार जाडसर लोकर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. खाण्याच्या बाबतीत अतिशय अधाशी असलेला हा प्राणी, हिंदी मध्ये भेड तर इंग्रजीमध्ये शिप या नावाने ओळखला जातो.

आजच्या भागामध्ये आपण या मेंढी प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमेंढी
प्रकाररवंत करणारा चतुष्पाद प्राणी
गटशेळी गट प्रकारातील प्राणी
साधारण गर्भधारणेचा कालावधीअंदाजे १५२ दिवस
साधारण वजनकिमान ४५ ते कमाल १६० किलो
साधारण आयुष्यमानदहा ते बारा वर्षांपर्यंत
साधारण लांबीदीड ते दोन मीटर लांब

मेंढी या प्राण्याचे अधिवास आणि वितरण:

मित्रांनो, मेंढ्या जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये आढळून येतात. पशुधनाचा एक प्रकार असलेल्या या मेंढ्या नैसर्गिक ठिकाणी विचार केल्यास उंच डोंगराळ प्रदेशामध्ये राहणे पसंत करतात. याशिवाय त्या टुंड्रा वने आणि वाळवंटीय प्रदेश येथे देखील आढळून येतात.

जवळपास दहा हजार वर्षांपूर्वी मानवाने मेंढी पाळण्यास सुरुवात केली, असे सांगितले जाते. त्याकाळी मुख्यत्वे मेंढ्या दूध उत्पादनासाठी वापरल्या जात असत. पुढे हळूहळू त्यांच्यापासून मांस आणि लोकर देखील मिळवणे सुरू केले गेले.

मेंढ्यांचे शास्त्रीय वर्गीकरण:

मित्रांनो, शास्त्रीय वर्गीकरण म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. त्यानुसार मेंढी ही एनिमालिया या किंगडम मधील असून, ती एक सस्तन प्राणी आहे. तिची ऑर्डर आर्टिओडॅकटिला अशी आहे. मेंढ्या बुबिडे या कुटुंबामध्ये वर्गीकृत करतानाच, त्यांना कॅप्रीना या उप कुटुंबातील सदस्य म्हणून देखील ओळखले जाते. त्यांचा वंश हा ओवीस असा आहे.

मेंढ्यांची विविध वैशिष्ट्ये:

मित्रांनो, आज आपण पाहत असलेल्या मेंढ्या या त्यांच्या जंगली पूर्वजांपेक्षा अनेक गोष्टींमध्ये वेगळे आहेत. असे असले तरी देखील आज जंगलामध्ये जंगली प्रकारच्या अनेक मेंढ्या आढळून येतात. मात्र रंगांचा मुख्य फरक सोडला तर बहुतेक गोष्टींमध्ये जंगली मेंढ्या आजच्या मेंढ्या सारखेच आहेत.

मेंढ्या विविध रंगांमध्ये दिसतानाच मध्ये पांढरा, राखाडी, करडा, तपकिरी, चॉकलेटी, इत्यादी रंगांचा समावेश होतो. तसेच जशी प्रजाती बदलेल, तसं मेंढीच्या उंची, वजन आणि दिसण्यामध्ये देखील बदल जाणवतो. मुख्यत्वे मांस उत्पादनाकरिता वापरल्या असल्यामुळे मेंढ्यांच्या वजनाचा देखील फार मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो.

मेंढ्यांचे कान अतिशय संवेदनशील असतात, ज्यांनी त्या अतिशय बारीक आवाज देखील ऐकू शकतात. मेंढ्यांच्या डोळ्यातील बाहुल्या या आडव्या असतात. त्यामुळे त्यांना एक चांगली दृष्टी प्राप्त होते. त्या डोके मागे न वळवता देखील मागील बाजूस काय सुरू आहे हे बघू शकतात.

काही मेंढ्यांच्या प्रजातीमध्ये संपूर्ण अंगावर केस असण्याबरोबरच तोंडावर देखील केस असतात. मात्र बऱ्याचशा प्रजातीमध्ये तोंडावर अगदी बारीक आणि विरळ केस असतात. उर्वरित शरीरावर घनदाट लोकर असते.

मित्रांनो, मेंढ्या सावलीत राहणे जास्त पसंत करतात. उन्हामुळे त्यांना त्रास देखील होऊ शकतो, यांच्या डोळ्याच्या समोर सुगंध घेण्यासाठी ग्रंथी आढळून येतात.

मेंढीच्या पुनरुत्पादनाबाबत विविध तथ्य माहिती:

  • मेंढ्याच्या एका कळपामध्ये दोन किंवा तीन नर मेंढी असते, ज्या साधारणपणे प्रजनन करता वापरल्या जातात.
  • प्रजननामध्ये कोणता नर भाग घेणार हे दोन नरांमध्ये संघर्ष करून ठरवले जाते. या संघर्षामध्ये जो जिंकलं तो प्रजनन कार्यामध्ये भाग घेत असतो.
  • मेंढ्या संपूर्ण वर्षभर प्रजनन करत असल्या, तरी देखील त्या हंगामी प्रजनन करण्याला प्राधान्य देत असतात.
  • मेंढ्या आपल्या वयाच्या सहा ते आठ महिन्यांनी प्रजननाकरिता लैंगिकरित्या परिपक्व झालेले असतात. या मेंढ्यांमध्ये सुमारे पाच महिन्यांचा गर्भधारणा कालावधी असून, त्या एका वेळी एक किंवा एकापेक्षा जास्त पिल्लांना जन्माला घालू शकतात.
  • मेंढ्या आपल्या पिल्लांना दूध पाजून मोठे करत असतात, आणि त्यानंतर हे पिल्लू काही दिवसानंतर स्वतः अन्न खाऊ लागते.

मेंढीचे विविध उपयोग:

मित्रांनो, मानवाने जे पण प्राणी पाळले आहेत, त्या प्रत्येकाचा मानवाने पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. मेंढी बाबत बोलायचे म्हणाल तर मेंढी पासून मिळणारी लोकर, दूध, आणि मांस हे मुख्य उत्पादने मानव मिळवत असतो.

मुख्यत्वे मेंढीचे पालन मांस उत्पादनाकरिता केले जाते. मेंढी पासून मिळालेले मांस अतिशय उत्कृष्ट दर्जाचे समजले जाते. तसेच या मांस मधून शरीराला आवश्यक असे अनेक घटक मिळत असतात.

यासोबतच लोकर उत्पादन हे देखील मुख्य उद्देशात समाविष्ट होते. या लोकरी पासून थंडीच्या दिवसात परिधान करण्याकरिता विविध पोशाख बनविले जातात. तसेच आराम करण्यासाठी गाद्या, खुर्ची इत्यादी देखील बनवले जाते. लोकरी पासून अनेक खेळाच्या वस्तू देखील बनवल्या जात असतात.

याच बरोबरीने मेंढी पासून लॅनोलीन देखील मिळवले जाते, मेंढी पालनांमधून कातडे, दूध, अनेक औषधे, यांचे देखील उत्पादन घेतले जात असते. मित्रांनो मेंढी कमी खर्चामध्ये पाळता येणारा प्राणी असला, तरी देखील त्यापासून मिळणारे उत्पन्न अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आणि चांगल्या आर्थिक फायदा देणारे आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर मांस उत्पादनाकरिता वापरला जाणारा प्राणी म्हणून या मेंढीचा उल्लेख केला जातो. याशिवाय दरवर्षी या मेंढी पासून नवनवीन पिल्ले आणि लोकर देखील मिळत असते. ज्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळवले जाते. आणि नर जातीच्या लहान मेंढ्यांना मटन उत्पादनासाठी वापरले जाते.

अतिशय उपयुक्त समजला जाणारा हा मेंढी प्राणी स्वभावाने देखील तेवढाच शांत असतो. केवळ खात राहणे, आणि शांत बसणे हाच या प्राण्यांचा दिवसभराचा दिनक्रम असतो. आजच्या भागामध्ये आपण याच मेंढी प्राण्याविषयी माहिती बघितलेली आहे.

यामध्ये तुम्हाला मेंढी म्हणजे काय, मेंढीचा नैसर्गिक अधिवास कोठे होता?, सध्याची मेंढ्यांची स्थिती, मेंढ्यांचे विविध प्रकारावर आधारित वर्गीकरण, मेंढ्यांची काही वैशिष्ट्ये, तसेच मेंढ्यांच्या शरीराचा प्रकार, मेंढ्यांच्या विविध जाती, तिच्या पुनरुत्पादनाबद्दल माहिती, मेंढ्यांचे विविध उपयोग आणि मेंढी विषयी विविध तथ्य माहिती याविषयी माहिती घेतलेली आहे. सोबतच काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.

FAQ

मेंढी या प्राण्याचे साधारण वजन किती किलोग्राम पर्यंत असते?

मेंढी या प्राण्याचे साधारण वजन नरांमध्ये ४५ ते १६० किलो पर्यंत आणि मादी मध्ये ४५ ते १०० किलो पर्यंत असते.

मेंढी साधारणपणे किती वर्षे जगत असते?

मेंढी हा साधारणपणे १० वर्षे ते बारा वर्षे इतकी जगत असते.

मेंढीचे शास्त्रीय नाव व इंग्रजी नाव काय आहे?

मेंढीचे शास्त्रीय नाव ओवीस अरीस असे असून तिचे इंग्रजी नाव शिप असे आहे.

मेंढीच्या खानापानाच्या सवयी बद्दल काय सांगता येईल?

मेंढी ही सतत खात असलेली प्राजती असून ती रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या गटातील आहे, त्यामुळे पोटभर खाल्ल्यानंतर ती रवंत देखील करत असते.

मेंढ्यांच्या काही सर्वात प्रसिद्ध जाती कोणत्या आहेत?

मेंढ्यांच्या काही प्रसिद्ध जातीमध्ये मारवाडी मेंढी, गड्डी मेंढी, निलगिरी मेंढी, लोही मेंढी, चोकला मेंढी, मेरिनो, सफोक, मेंढी, दोरपर मेंढी, लिंकन मेंढी इत्यादी जाती आहेत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मेंढी या प्राण्याविषयी माहिती पहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य कळवा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना आणि लोकरीचे कपडे आवडणाऱ्या इतरांना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Leave a Comment