बेरोजगारी मराठी निबंध | Essay on Unemployment In Marathi

बेरोजगारी मराठी निबंध | Essay on Unemployment In Marathi

बेरोजगारी समस्या व उपाय मराठी निबंध

अविकसित आणि भारतासारख्या विकसनशील देशात बेरोजगारीची समस्या आहे, तसेच प्रगत वा विकसित राष्ट्रातही बेरोजगारीची समस्या आहे. फरक एवढाच की, प्रगत राष्ट्रांमध्ये बेरोजगारीची समस्या आपल्या देशाएवढी तीव्र नाही. थोडक्यात बेरोजगारीची समस्या ही आधुनिक काळात जगातील सर्वच देशांची समस्या आहे.

भारतातील बेरोजगारीविषयक परिस्थितीचा आढावा घेतला असता असे आढळते की, बेरोजगार व्यक्तींचे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच आहे. बेरोजगारी व रोजगार हे देशातील बहुतांश लोकांच्या जीवनातील स्थायी स्वरूपाचे प्रश्न होऊन बसले आहेत. भारतात गेल्या ५४ वर्षात ज्ञानाची प्रगती फार झाली आहे. पर्यंत शाळा पोहोचलेल्या आहेत. ज्ञानाचे महाद्वार उघडे झालेला असून, भराभर नवे ज्ञान त्या दरवाजातून आत शिरत आहे आणि प्रत्येकजण बुद्धीच्या कसोटीवर उतरून, मिळेल ती बिद्या पदरी पाडून घेत आहेत. एवढा ज्ञानाचा सागर आत्मसात करूनही नोकरीचा मार्ग कुंठित झाला आहे, असे आपणास म्हणावे लागेल.

बेरोजगारीमुळे व्यक्ती व समाजजीवनावर अनेक दुष्परिणाम घडून येतात. बेरोजगारांची संख्या वाढल्यास चळवळीमध्ये म्हणजे दहशतवादी चळवळीमध्ये देखील वाढ होते. कारण क्रांति घडवून आणण्याच्या कार्यात यश प्राप्त झाले तरी आपली व अन्य लोकांची बेरोजगारीची समस्या सुटेल, असा क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या लोकांचा ठाम विश्वास असतो. बेरोजगारीमुळे तक्रारी, अंमली पदार्थाचा व्यापार, गुन्हेगारी कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. बेरोजगार व्यक्तीमुळे कुटुंबात ताण-तणाव निर्माण होतो. समाजजीवनातील शांततेला धक्का बसतो.

बेरोजगारी हे विष असून ते भ्रष्टाचार, खोटेपणा आणि लाचलुचपत यांना प्रोत्साहन देते, तसेच ते राजकीय स्थिरतेलाच कमजोर करून टाकते. योग्य व सन्माननीया मार्गाने पैसा मिळविणे अशक्य झाल्याने व्यक्ती वाममार्गाने पैसा मिळविण्यास प्रवृत्त होतात… पुढे केव्हातरी कामावरून कमी करतील, ही भीती असल्यामुळे बेरोजगारीच्या काळात चरितार्थाची सोय म्हणूनही भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते. कुटुंबातील कर्ता पुरुषच बेरोजगार झाला तर त्या कुटुंबावर आघात होतो. त्यावर अवलंबून असणाऱ्यांना कष्ट सोसावे लागतात. कर्जबाजारीपणा वाढतो व कुटुंब उपडद्यावर पडते. काम नाही म्हणून भूक नाही असे होत नाही. पोटाची खळगी तर भरावीच लागते. अशा कुटुंबात अशांतता व संघर्ष बरेचदा आढळून ‘येतो. सतत बेरोजगार व लोकांकडून टोचणी, गरजा न भागणे वगैरेंमुळे व्यक्ती निराश होते व त्या दुःखाच्या भरात ती घरातून निघून जाते. स्वतः चे बरे-वाईट करून घेते.

सतत बेरोजगारी, उपासमार, हालअपेष्टा अशा विविध संकटांना कंटाळून व्यक्ती बरेचदा असा विचार करते की, उपाशी मरण्यापेक्षा लूटमार करून जगणे चांगले.. त्यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते. रिकाम्या वेळात त्यांची विध्वंसक कार्याकडे वळते. समाजाविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. याचा बदला म्हणून ते समाजविरोधी कार्य करू लागतात. बेरोजगारीच्या संकटामुळे आई-टील हवा होतात. प्राथमिक गरजा भागविणे त्यांना कठीण होऊन बसते. बेरोजगारीचे चटके निष्पाप बालकांना सुद्धा बसू लागतात. त्यांच्यावरही उपासमारीची पाळी येते. त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. शाळेची फी, पाट्या-पुस्तके, कपडे वगैरेंचा खर्च आई-वडील करू शकत नाहीत. परिणामत मुले शाळेत जात नाहीत. त्याच्या शिक्षणाचे तर नुकसान होतेच, परंतु जीवनावश्यक वस्तु प्राप्त करण्यासाठी ते चोऱ्या वगैरे करू लागतात. अशा मुलांचा फायदा समाजातील गुंड प्रवृत्तीचे लोक घेतात व बालगुन्हेगारी वाढू लागते.

प्रत्येक देशातच बेरोजगारीच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी सरकारद्वारे विविध उपाय योजले जातात. उदा. महाराष्ट्रात ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारने “रोजगार हमी योजना” सुरू केली आहे. भारत सरकारने देशातील शिक्षितांची बेरोजगारी दूर करण्यासाठी स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अर्ज मंजूर झाल्यास उमेदवाराला फोटोग्राफी, डेअरी इत्यादी व्यवसायांसाठी जवाहर योजनेमधून कर्ज देण्याची सोय करण्यात आली आहे. माझ्या मते बेरोजगारीच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आर्थिक व सामाजिक स्वरूपाच्या उपायांचे थोडक्यात विवेचन करणे योग्य होईल.

लोकसंख्यावाढ थांबविल्याशिवाय बेरोजगारीच्या समस्येचे नियंत्रण होणे शक्य नाही. लोकसंख्येची वाढ थांबविण्यासाठी जन्मदरात घट होणे आवश्यक आहे. महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढविणे, यांसारख्या उपायांमुळे जन्मदरात घट होऊन बेरोजगारीच्या समस्येचे नियंत्रण होण्यास मदत होते. म्हणजेच बेरोजगारी दूर करण्यासाठी एका बाजूने अर्थव्यवस्थेची वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना सामावून घेण्याची शक्ती वाढवायला हवी, तर दुसन्या बाजूने लोकसंख्या नियंत्रित करून नोकऱ्या मागणान्यांची संख्या कानू ठेवायला हवी. बेरोजगारी दूर करण्याकरिता सरकारने सक्रीय प्रोत्साहन दाखविले पाहिजे. औद्योगिक बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग-व्यवसायात वाढ करणे जरूरी आहे. उद्योगधंदे चालू करण्यास सरकारने सक्रीय प्रोत्साहन द्यावे. राष्ट्राराष्ट्रातील व्यापारास उत्तेजन मिळावे

खेडी हा विकासाचा केंद्रबिंदू राहावा, असे महात्मा गांधींना वाटत होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव प्रारंभीच्या धोरणांवर होता. जीवनावरही तो राहिला. गांधींचे तत्त्वज्ञान त्यावेळी लोकांना पटले होते म्हणण्यापेक्षा उपभोगाच्या फारशा संधी नव्हत्या. त्यामुळे जीवनसरणी साधी, गरजा कमी होत्या. मध्यमवर्गीय घरात नोकरीचा सरधोपट मार्ग स्वीकारला जायचा. रेल्वे, पोस्ट, डिफेन्स अकाऊंटस्, महसूल, लोकल फंड अकाऊंटस् (पुढे झेडपी झालेले) जगातल्या सर्वात पुरातन उद्योग शिक्षण या चिकटणाच्या जागा होत्या. शिक्षक व्हायला तर व्हर्नाक्युलर फायनल एवढी पात्रताही पुरी व्हायची. मैट्रिक्युलेशनला तेव्हा जे महत्त्व होते, तेवढे आज डॉक्टर, इंजिनिअरलाही राहिलेले नाही. गावोगावी महाविद्यालये निघाली नव्हती मिळवण्यासाठी ही पक्की होती. त्यामुळे मॅट्रिक होताच ओळखीपाळखीनेच नोकऱ्या पटकावल्या जात. त्याला वशिला म्हणत नसत. अशाप्रकारे उमेदवाराला पांढरपेशा, चाळकरी, कर्मचारी म्हणून दीक्षा दिली जायची. साहेबाने लावलेले हे नोकरशाहीचे झाड वाढत गेले. इतके की आता त्याच्या फांद्या छाटण्याची वेळ आली आहे.

शेतीला आज प्रतिष्ठेची गरज आहे. एखाद्या शेतकरी तरुणाला मुलगी द्यायची म्हटलं की, मुलीचा बाप चार वेळा विचार करतो. कारण कष्ट करावे लागतात. कष्टाची भाकरी गोड असते हे त्यांना समजत नाही. सरकारने खेड्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची आज खरी गरज आहे. पण लक्ष देईल कोण? पावसाळ्यामध्ये एक पाऊल टाकलं की दुसरे पाऊल टाकण्याचा प्रश्न पडतो आणि तुम्ही तिकडे उड्डाण पुलं बांधतात. खेड्यांना काय जनावरांची वस्ती समजता की काय? खेड्यांची आज फार दुर्दशा झाली आहे. शेतकरी चहूबाजूने भरडला जात आहे. तो अधिकाधिक कर्जबाजारू होत आहे. दुकान काढून द्यावे तर ते चालेल याची हमी नाही. कारण उभा देश केवळ “ट्रेडिंग’ या एकाच अॅक्टिव्हिटीत गुंतलेला! फार थोडयांनी काळाची पा

जो धान्य पिकवतो तोच आज उपाशीपोटी झोपत आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला योग्य भाव मिळत नाही आणि इतर वस्तूंचे भाव तर गगनाला भिडले. आहेत. तेव्हा तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे अन्यथा ग्रामीण तरुणांपुढे एकच प्र उभा राहील. कशासाठी जगतो आहोत आम्ही?

“एका वर्षासाठी नियोजन करावयाचे असेल तर अन्न-धान्याचे उत्पादन घ्या, दहा वर्षाचे नियोजन करावयाचे असेल तर झाडे लावा, परंतु शंभर वर्षांसाठी नियोजन करा वयाचे असेल तर माणसे घडवा.” बेरोजगारीने आपला देश पोखरत चाललेला आहे. नोकरीचा जयघोष आपल्या लोकांच्या नसानसांतून रक्ताच्या रूपाने वाहत आहे. बेरोजगारीची कारणे शोधण्यापेक्षा उपायाचे मूळ कशात आहे. हे आपण पाहिजे.

Also Read:-