दूरदर्शन वर मराठी निबंध | Essay on Doordarshan In Marathi

दूरदर्शन वर मराठी निबंध | Essay on Doordarshan In Marathi

दूरदर्शनचा विळखा

रविवारची दुपार. ऊन मी म्हणत होते. उकाड्याने असह्य होऊन त्रासलेली भी अलगद पलंगावर आडवी झाले. हातात पेपर घेऊन चाळत असताना सहजच ‘सहजीवन” फोटेशनची खुली निबंध स्पर्धा या जाहिरातीकडे माझे लक्ष गेले. विषय होता ‘दूरदर्शन नावाचे गर्द

खरंच आजच्या या दूरदर्शनमय जगात दूरदर्शनचा गर्द म्हणून विचार करणारे महाभाग किसी सापडतील? जन्मलेल्या लहान मुलापासून पार पंच्याहत्तरी ओलांडलेल्या वयोवृद्ध आजोबांना सुद्धा आजकाल दूरदर्शनचा मोह आवरता येत नाही. सहा महिन्यांचे लहान मूल दूरदर्शनच्या छायागीतावर नाचू लागते, कॉलेजची तरुण पिढी दूरदर्शनवर मॅच बघण्यासाठी कॉलेजला दांडी मारून घरी राहण्यातच स्वतःला धन्य मानते. डोळ्यांच्या पार खाचा झालेली वृद्ध मंडळीही जाड भिंगाचा चष्मा वापरून दूरदर्शनचे कार्यक्रम बघतील…. पण या छंदापासून अलिप्त राहू शकणार नाहीत.

दूरदर्शन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. दूरदर्शनशी जडलेले नाते हे इतके अतूट आहे की, एकवेळ पती-पत्नीत घटस्फोट घेणे सोपे, पण दूरदर्शनशी जडलेले हे नाते युगायुगाचे आहे. तेथे कायद्याचेही काही चालू शकणार नाही. दूरदर्शन हे शाप की वरदान ? खरं तर शाप आणि वरदान या एकाच नाण्याच्या दोन आहेत. जो जसा चष्मा वापरेल तसे त्याला दूरदर्शनचे फायदे व तोटे कळतील. नाहीतरी म्हणतातच ना जशी दृष्टी तशी सृष्टी! बाजू

आज दूरदर्शनवर अनेक चांगले कार्यक्रम सादर केले जातात. त्यातले काही मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहून आपण आनंदीत होतो. आपल्याला आपल्या रुक्ष जीवनाचा विसर पडून आपण काही काळ का होईना त्या स्वप्नील भावविश्वात रंगून जातो, हरवून जातो, तर शैक्षणिक कार्यक्रम पाहून आपला बौद्धिक विकास होतो. आपल्या जीवनाला नवी दिशा मिळते. आताचे छायागीत व सिनेमा या विषयावर न बोलणेच बरे. एकूण काय तर दूरदर्शनवरील कोणते कार्यक्रम बघायचे व कोणते टाळायचे हे ज्याच्या त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवरून ठरेल.

दूरदर्शनचे तोटे या बाजूचा विचार करता आज घराचे घरपण हरवले आहे. ‘याची जाणीव होते. कधी काळी कोणा नातेवाईकाला भेटायला जावे तर तो घरात दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहत बसलेला असतो. अशा वेळेस बोलणे तर दूरच पण या बसा ! असं म्हणायला सुद्धा घरातल्या कर्त्या पुरुषाला वेळ नसतो.

हल्ली दूरदर्शनवर जाहिराती तर अशा दाखवितात की, त्या बघताना आमची मान शरमेने खाली जाते. लहान मुले नको त्या जाहिराती बघतात आणि नको ते प्र विचारतात. एकदा माझ्या मुलानेच प्रश्न केला की, ‘आई तू बाळ का आणत नाहीस? तू ‘माला डी’ घेतेस काय?’ अशा वेळेस पालकांनी काय बरे उत्तर द्यावे? नको त्या वयात नको ते अर्धवट ज्ञान मुलांना होते. त्याचा परिणाम त्यांच्या कोवळ्या मनावर होऊन यापुढील पिढी कभी निपजेल? या काळजीने मन खिन्न होते.

पूर्वी पाहुणे घरी आल्यावर आई मुलाला सांगायची, “बाळा! काकांना श्लोक म्हणून दाखव बघू.” पण आताचे पालक मात्र पाहुण्यांसमोर मायकल जॅक्सनची नक्कल करून दाखव असं सांगतात. चित्रपटाद्वारे समाजावर लादला जाणारा हिंसाचार, लैंगिकता, गुन्हेगारी, बीभत्सता या गोष्टी दूरदर्शनमार्फत आता घराघरात पोहोचल्या असून, प्रसारमाध्यमाचा हा दुरूपयोग वेळीच रोखला गेला नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक नीतिमूल्यांचा पूर्णपणे हास होईल अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

गर्दपासून सुटका करून घेण्यास दूरदर्शनसारखे माध्यम आहे. परंतु दूरदर्शनपासून मुक्त होण्यास कोणते बरे माध्यम असणार? ते एका ईश्वरालाच ठावे! अनेक सेवाभावी संस्थांनी सरकारी यंत्रणांनी जरी या व्यसनापासून मुक्त होण्याचे कार्यक्रम राबविले तरीसुद्धा या व्यसनातून कायमचे मुक्त होणे कठीण आहे, नव्हे तर जवळजवळ अशक्यच आहे. ज्या कोणाला खरोखरच या व्यसनापासून आपली सुटका करून घ्यावयाची असेल, त्याने तामसी वृत्ती पूर्णपणे सोडून सात्त्विक गुण अंगिकारणे आवश्यक आहे. मनातील तामसी भावनांचा त्याग करून मोहाला बंधनात जखडून सात्त्विक आचरण करण्यास जो सफल होईल, त्याला या दूरदर्शनरूपी गर्दची काय तमा? मग यश त्याच्या दारात पायघड्या टाकत येईल, यात काय शंका ?

‘सुख आले माझ्या दारी,

मज काय कमी या संसारी ।

अशी त्याची अवस्था झाल्यास नवल नाही !

Also read:-